Title

Astrology Blog by Anagha Bhade

Friday, 7 August 2015

गुरु बदल २०१५

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे गुरु १३ जुलै २०१५ ला संध्याकाळी सिंह राशीत प्रवेश करत आहे गुरु  सिंहेत १० ऑगस्ट २०१६ पर्यंत असेल .
गुरु बदलणे म्हणजे काय ह्या साठी आधीच लिहिला आहे .
http://anaghabhade.blogspot.in/2014/06/blog-post.html

गुरु सिंह राशीत मघा , पूर्वा  व उत्तरा ह्या तीन नक्षत्रातून भ्रमण करेल .
मघा नक्षत्रात गुरु सप्टेंबर १३ पर्यंत आहे .
पूर्वा नक्षत्रात सप्टेंबर मध्यापासून नोव्हेबर पर्यंत असेल . त्यानंतर नोव्हेबर पासून जानेवारी पर्यंत उत्तरा नक्षत्रात असेल . ८ जानेवारी ते १० मे २०१६ पर्यंत गुरु वक्री असून तो काही काळ  परत पूर्वा  मध्ये जाईल . १० मे नंतर  मार्गी होऊन ११ ऑगस्ट २०१६ ला कन्येत प्रवेश करेल .
(वरील तारखा ह्या कृष्णमुर्ती पंचांगा नुसार आहेत )

ह्या गुरु भ्रमणाचा प्रत्येक राशीनुसार काय परिणाम होईल ते आता बघुयात .
(अर्थातच ह्या अंदाजात प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तसेच दशा ह्यांचा विचार  नसल्याने  'ढोबळ ' अंदाज असे म्हणता येईल.  ) 

मेष रास : ह्या राशीच्या पंचम भावात सिंह रास येते त्यामुळे गुरु मेषेला पंचम भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मेष राशीच्या लोकांना  गुरु पाचवा आहे असे म्हणतात . पंचम स्थान हे संतती स्थान आहे तसेच शिक्षणाच्या दृष्टीने पण महत्वाचे  स्थान आहे . कला /क्रीडा ह्या गोष्टी पण ह्याच स्थानावरून पहिल्या जातात .शेयर्स सबंधित व्यवहार सुद्धा पंचामावरून पहिले जातात.

 जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत)
तोवर शेअर्स चा व्यवसाय असणार्या लोकानी सावधगिरी बाळगावी .संततीच्या दृष्टीनेने पण हा काळ  फारसा अनुकूल नाही . अध्यात्मिक दृष्ट्या मात्र हा काळ  उत्तम रहिल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ  उत्तम आहे . नोकरी /व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती 'जैसे थे '  अशी राहील . 

जो पर्यंत गुरु पूर्वा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल. )
मेष राशीच्या लोकांना शुक्र द्वितीयेश व सप्तमेश आहे . गुरु जेव्हा पूर्वा नक्षत्रातून म्हणजे शुक्राच्या नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा विवाह इच्छुक लोकांचे विवाह ठरण्यास तसेच प्रेम विवाहासाठी पण अनुकूल काळ आहे . अर्थातच मूळ जन्मपत्रिकेमध्ये तसे योग हवेत . शेअर्स चा व्यवसाय असणार्या लोकांना हा काळ चांगला आहे. जेव्हा गुरु वक्री होऊन पुन्हा पूर्वा  नक्षत्रात येईल तेव्हा पुन्हा मंदी जाणवेल .
.
 जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
कला/क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम काळ  आहे त्यांना प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने हा चांगला काळ आहे  . मुलांच्या दृष्टीने पण चांगला काळ आहे . १८ फेब्रुवारी नंतर परत गुरु पूर्वा नक्षत्रात जात असल्याने सर्व बाबतीत कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे . १०  मे नंतर जेव्हा गुरु मार्गी होईल तेव्हा सर्व कामे मार्गी लागतील .

वृषभ रास : ह्या राशीच्या चतुर्थ भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु वृषभ राशीच्या लोकांच्या चतुर्थ भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ वृषभ राशीच्या लोकांना  गुरु चौथा  आहे असे म्हणतात . चतुर्थ स्थानावरून शिक्षण , मातृसौख्य ,घर , वाहन इ. गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या स्थानातील गुरु अनुकूल आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत)
घर / वाहन खरेदीच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ आहे . विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने तसेच अभ्यासाच्या दृष्टीने  हि ग्रहस्थिती चांगली आहे . शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांच्या दृष्टीने चांगला काळ आहे . १४ जुलै २०१५ ते ३ ऑगस्ट २०१५ पर्यंतचा काळ घर/वाहन  तसेच फर्निचर इ. गोष्टी घेण्यासाठी उत्तम आहे .

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ह्या काळात नातेवाईकांशी गाठी भेटी होतील .इंटिरियर डीझायनर असणाऱ्या व्यावसायीकांची भरभराट होईल.
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल . इतर योगांची साथ असेल तर जमीन /घर विक्रीत फायदा होईल ..

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
गुरु उत्तरा नक्षत्रात म्हणजे रवीच्या नक्षत्रात आहे . वृषभ राशीच्या लोकांना चंद्र  कुंडली  प्रंमाणे रवि चतुर्थेश आहे . तसेच गुरु सिंह राशीत म्हणजे चतुर्थातच आहे . त्यामुळे चतुर्थ भावाशी सबंधित असलेली फळे प्रामुख्याने चांगली मिळतील . उदा . शिक्षण , मातृसौख्य ,घर , वाहन इ.

मिथुन रास : ह्या राशीच्या तृतिय भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मिथुन राशीच्या लोकांच्या तृतिय भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मिथुन राशीच्या लोकांना  गुरु तिसरा  आहे असे म्हणतात . तृतिय  स्थानावरून  छोटे प्रवास ,लेखन ,प्रकाशन ,प्रसिद्धी (अर्थातच प्रत्येकाच्या पत्रिकेच्या दर्जावर अवलंबून राहील ) इ. गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या स्थानातील गुरु अनुकूल आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत (सप्टेंबर १३ पर्यंत):
लेखक, प्रकाशक ,वक्ते , consultants इ. व्यावसायिकांना उत्तम आहे . बर्याच कामांमध्ये व्यस्त राहतील . काही प्रमाणात प्रसिद्धीचे पण योग आहेत .कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ह्या काळात प्रवासाचे योग आहेत . ज्या कलाकारांना विविध ठिकाणी जाऊन आपली कला प्रदर्शित करायची असते अशा लोकांनी जास्तीत जास्त प्रवास करावा /घडेल .जे लोक agency मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असतील त्याचे काम ह्या काळात होऊ शकेल . विशेषत: सौदर्य प्रसाधने , कपडे  , सुगंधी द्रव्ये इ.ज्यांनी नोकरीसाठी परदेशात अर्ज केला असेल त्यांचेही काम होईल .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
ह्या काळात लेखक,प्रकाशक,वक्ते , consultants ,स्टेशनरी विक्रेते ,प्रवासी संस्था इ. व्यावसायिकांना त्यांच्या कामातून चांगली धनप्राप्ती होण्याचे योग आहेत .ह्या काळात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. धाकट्या भावंडांच्या गाठी भेटी होतील .

कर्क रास : ह्या राशीच्या द्वितीय भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कर्क राशीच्या लोकांच्या द्वितीय भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कर्क राशीच्या लोकांना  गुरु दुसरा आहे असे म्हणतात .द्वितीय भावावरून कुटुंब वृद्धी ,धन वृद्धी बघतात तसेच हे पत्रिकेतील एक मारक स्थान पण आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
धार्मिक संस्था तसेच शिक्षण ,संशोधन ह्या क्षेत्रातील लोकांसाठी हा गुरु फायद्याचा राहील . तसेच वडिलांकडून सुद्धा धनलाभ होण्याची शक्यता आहे . काही लोकांना नोकरी/व्यवसायासबंधी लांबचे प्रवास घडतील.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
उच्च शिक्षण घेणार्यासाठी इथला गुरु अनुकूल आहे .तसेच इस्टेट agent,बिल्डर्स  करता सुद्धा हा गुरु चांगला आहे . ह्या काळात मातृसौख्य चांगले राहील .ह्या काळात परदेशी जायचे असेल तर मात्र पूर्वा नक्षत्रातील  गुरु फारसा उपयोगी नाही .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
इथला गुरु पैसे मिळण्याच्या दृष्टीने उत्तम आहे कारण उत्तरा हे रविचेच नक्षत्र आहे व रवि द्वितीयेश आहे .  रवि भ्रमणा प्रमाणे हा गुरु लाभ देईल. उदा . चतुर्थात रवि असताना बिल्डर्स ,शिक्षण क्षेत्र , गृह सजावट क्षेत्रातील लोक इ. लोकांना धनलाभ होईल  . जोडीदाराचे हे मारक स्थान असल्याने जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी .

सिंह रास : ह्या राशीच्या प्रथम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु सिंह राशीच्या लोकांच्या प्रथम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ सिंह राशीच्या लोकांना  गुरु पहिला आहे असे म्हणतात.प्रथम भावावरून प्रकृती, आवड -निवड , समाजातील स्थान , परदेश गमन इ. गोष्टी बघतात .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत  (सप्टेंबर १३ पर्यंत):
केतू अष्टमात आणि गुरु प्रथमात  व पंचमेश ह्यामुळे ह्या काळात नोकरी /व्यवसायात मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे .इथला गुरु अध्यात्मिक प्रगती करता चांगला आहे .

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ज्यांच्या मूळ जन्मपत्रिकेत प्रसिद्धी योग आहे अशांना  ह्या काळात प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे . ज्यांचा व्यवसाय लेखन,प्रकाशन , agency इ. आहे त्यांना पण हा काळ चांगला जाईल .भावंडांशी सबंध सलोख्याचे राहतील .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
ह्या काळात प्रकृती चांगली राहील . तसेच समाजातील स्थान उंचावेल .काहीना सरकारी मानमरातब पण मिळण्याची शक्यता आहे . नोव्हेंबर मध्ये लांबचे प्रवास होतील .

कन्या : ह्या राशीच्या बाराव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कन्या राशीच्या लोकांच्या बाराव्या  भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कन्या राशीच्या लोकांना  गुरु बारावा आहे असे म्हणतात
बाराव्या भावावरून आपण लांबचे प्रवास (परदेश गमन ),आर्थिक गुंतवणूक, कर्जफेड ,अध्यात्म इ. गोष्टी बघतो . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत (सप्टेंबर १३ पर्यंत):
१३ सप्टेंबर पर्यंत तो मघा नक्षत्रात असल्याने केतूची फळे देईल. केतू मीन राशीत, त्यामुळे गुरुची फळे अपेक्षित आहेत. बुधाची पण केतूवर दृष्टी आहे. त्यामुळे केतू गुरु व बुध दोघांची फळे देईल. बुध कन्या राशीत उच्चीचा व तो दशमेश आहे. व्यवसाय अगर नोकरी करणाऱ्यांना चांगली फळे देईल असे वाटते गुरु चतुर्थेश व सप्तमेश आहे. तो घरा संबंधी काही अडचणी उपस्थित करेल असे वाटते.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतर गुरु पूर्वाफाल्गुनी म्हणजेच शुक्र या ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करत आहे. कन्या राशीला शुक्र द्वितियेश, नवमेश व स्वतः शुक्र लाभात आहे. शुक्र आर्थिक बाबतीत उत्तम फळे मिळण्याचा योग आणून देईल असे दिसत आहे. अनेकांना सुखावह प्रवास पण घडणार.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोवेंबरला गुरु उत्तराफाल्गुनी म्हणजेच रवीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. त्यावेळेस रवि वृश्चिक राशीत असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना लग्नी शुक्र, मंगळ, राहू  व रवि, बुध, शनि तृतीयात अशी ग्रहांची रचना आहे. इतर अनेक भावांबरोबर एक आणि तीन या भावांमधील ग्रहांचा एकदुसऱ्याशी संबंध असल्याने कन्याराशीतील मंडळी कुठल्याही व्यवसायात अगर नोकरीत चांगले जम बसवतील. काहींना कामानिमित्त परदेश वारी पण अपेक्षित आहे.

तूळह्या राशीच्या अकराव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु तूळ राशीच्या लोकांच्या अकराव्या  भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ तूळ राशीच्या लोकांना  गुरु अकरावा म्हणजेच लाभात आहे असे म्हणतात. ह्या स्थानावरून सर्व प्रकारचे लाभ बघतात .पारंपरिक ज्योतिष प्रमाणे नुसता गुरूच अनेक लाभ मिळवून देईल. के. पी. प्रमाणे पण काही अंशी बरोबर आहे.

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
१३ सप्टेंबर पर्यंत गुरु मघा नक्षत्रात असल्याने तो केतू ची फळे देईल. केतू षष्ठात गुरूच्या राशीत आर्थिक लाभास उत्तम आहे. गुरु तृतीयेश असल्याने स्पर्धात्मक अनेकांना यश मिळेल. लेखक मंडळींना पण हा काळ  उत्तम आहे. त्यांचे लेख, गोष्टी अगर कादंबर्या वाचकांच्या पसंतीस उतरतील.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतरचा काळ पूर्वाफाल्गुनी म्हणजे शुक्राचा आहे. शुक्र दशमात, लग्नेश व अष्टमेश आहे. या काळात आर्थिक लाभ, नोकरीत पदोन्नती इत्यादी योग संभवतात. तसेच काहींच्या बाबतीत वारसा हक्क, फंड किंवा पॉलीसी या रूपाने देखील लाभ होतील.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. रवि द्वितीय भावात व चंद्र मिथुनेत अष्टमात, आर्थिक व्यवहारात नुकसानाची भीति आहे. चंद्र मिथुनेत असे पर्यंत सावधानता बाळगावी. पुढचा काळ सर्व द्रिष्टीने उत्तम आहे.

वृश्चिकह्या राशीच्या दशम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु वृश्चिक राशीच्या लोकांच्या दशम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ वृश्चिक  राशीच्या लोकांना  गुरु दहावा आहे असे म्हणतात.दशम भावावरून व्यक्तीचे कर्तुत्व, व्यवसाय ,प्रसिद्धी इ. बघतात.

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत  (सप्टेंबर १३ पर्यंत):
मघा नक्षत्राचा स्वामी केतू पंचम स्थानी आहे. केतू मीनेत म्हणून गुरूचीच फळे मुख्यात्वे करून देईल. केतू वर १४ जुलै पासून १३ सप्टेंबर पर्यंत इतर ग्रहांची पण दृष्टी येऊ शकते. केतू त्या ग्रहांची पण फळे देईल. उदा. १३ सप्टेंबर ला चंद्र व बुध या दोन ग्रहांची दृष्टी केतूवर आहे. त्यामुळे केतू चंद्र व बुध या ग्रहांची पण फळे देईल. एकंदरीत या राशीच्या लोकांना भरपूर यश, पैसा, कीर्ती, प्रमोशन इत्यादी विनसायास मिळतील. विशेषतः कलाकार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, शेअर व्यावसायिकांना पण चांगला आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतर गुरु शुक्राच्या नक्षत्रातून जात आहे. काही लोकांना नवीन नोकरी मिळून परदेशात जातील. व तिथेच जम बसवतील. काही मंडळी भारतातच यात्रा अगर सहली करतील. एकंदरीत काळ मजेत जाणार असे योग आहेत.व्यावसायिक लोकांना पण चांगला काळ आहे . 

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर रोजी गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करत असून रवि प्रथम स्थानात म्हणजे वृश्चिकेत आहे. 
महादशेची ची साथ असेल काही मंडळींना त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारी मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे योग आहेत.
एकंदरीत या राशीला आर्थिक प्राप्तीबारोबर मानसन्मान मिळण्याचा पण योग आहे.

धनुह्या राशीच्या नवम भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु धनु राशीच्या लोकांच्या नवम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थधनु  राशीच्या लोकांना  गुरु नववा आहे असे म्हणतात.नवम भावावरून लामाबाचे प्रवास ,उच्च शिक्षण , अध्यात्मिक साधना इ. गोष्टी बघतात .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
धनु राशीस गुरु नऊव्या स्थानी व केतू चौथ्या स्थानी येत आहे. हि दोन्ही उच्च शिक्षण व बुद्धी ची स्थाने आहेत. याचा खरा फायदा जी मंडळी पी.एच.डी. किंवा रिसर्च करत आहेत. त्यांना उत्तम वेळ आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र पण नवमातच असल्याने वरील प्रमाणेच म्हणता येईल.तसेच शुक्र धनु लग्नाच्या लोकांना षष्ठेश व लाभेश पण आहे त्यामुळे शैक्षणिक संथांमध्ये काम करणार्यांना चांगला काळ आहे .  

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रविच्या नक्षत्रात जात आहे व रवि धनु राशीस बारावा होते आहे. उच्च शिक्षणासाठी काही लोकांना परदेशी कॉलेजेस मध्ये  प्रवेश मिळेल. व पुढील अभ्यासक्रम तिथेच पार पडेल. असे योग आहेत.
एकंदरीत हा गुरूबद्दल शैक्षणिक गोष्टी साठी उत्तम. याचा अर्थ असा होत नाही की इतरांसाठी योग्य नाही. इतर ग्रहांची स्थितीनुसार नोकरी अगर व्यवसायिकांना पण त्या प्रमाणे फळे मिळतील.

मकरह्या राशीच्या अष्टम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मकर राशीच्या लोकांच्या अष्टम भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मकर  राशीच्या लोकांना  गुरु आठवा आहे असे म्हणतात.अष्टम भावावरून मनस्ताप, पेन्शन , insurance, तसेच हे जोडीदाराचे धन स्थान असल्याने जोडीदाराकडून पैसा पण ह्या स्थानावरून बघितला जातो . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
मकर राशीस गुरु आठवा आणि केतू तिसरा येत आहे. सर्व साधारणपणे आठव्या राशीतील ग्रह त्या व्यक्तीला मानसिक त्रास, नोकरीतील ताण तणाव, नातेवाईकांमधील गैरसमज  इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच काहीसे रविच्या भ्रमणानुसार काही अप्रिय गोष्टी होतील असे वाटते.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु जेंव्हा शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल त्यावेळी हे तणाव एकदम नाहीसे होतील. शुक्र दशमेश व पंचमेश आहे. या वेळी शुक्र संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. गुरु जसा अष्टमात आहे तसा तो तृतीयेश व द्वाद्शेष पण आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे .  

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर रोजी गुरु रवीच्या नक्षत्रात जाईल तेंव्हा रवि मकर राशीला १५ डिसेंबर पर्यंत अकरावा असणार आहे. त्यावेळी अनेक लोकांना अष्टम भावाच्या माध्यमातून बरेच आर्थिक तसेच इतर लाभ होऊ शकतील असे वाटते. त्यानंतर रवि बारावा होत आहे. हा काळ अटीतटीचा जाईल असे वाटते.
एकंदरीत हा काळ साईन वेव प्रमाणे कधी वर कधी खाली असे राहणार असे दिसते.

कुंभ : ह्या राशीच्या  सातव्या भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कुंभ  राशीच्या लोकांच्या सप्तमातून भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कुंभ  राशीच्या लोकांना  गुरु सातवा आहे असे म्हणतात.सप्तम भावावरून आपण विवाह , खंडित प्रवास , जनसंपर्क , व्यवसाय, प्रतिस्पर्धी इ. बघतात . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
विवाहोत्सुक लोकांचे लग्न ठरण्याची /होण्याची शक्यता आहे . गुरूची दृष्टी तृतिय भावावर असल्याने लेखक , प्रकाशक इ. लोकांना हा काळ चांगला आहे . प्रवास चांगले होतील . 

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ज्यांना उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे अशा लोकांना चांगला काळ आहे . तसेच वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याचे योग आहेत . ज्या वेळेस शुक्र कर्केत असेल  तेव्हा  जोडीदाराशी जुळवून घेणे श्रेयस्कर .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर पासून गुरु रवीच्या नक्षत्रात जाईल तेंव्हापासून  रवि कुंभ राशीला १०,११ असणार आहे . हा काळ व्यवसाय व नोकरी दृष्टीने उत्तम आहे . अनेक आर्थिक लाभ होतील 

मीनह्या राशीच्या सहाव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मीन राशीच्या लोकांच्या षष्ठ भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मीन  राशीच्या लोकांना  गुरु साह्वा आहे असे म्हणतात .षष्ठ भावावरून नोकरी, आजारपण , मातृ घराणे ,स्पर्धात्मक परीक्षेतील यश इ. बघतात हे एक धन स्थान पण आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
मीन राशीस गुरु सहाव्या स्थानी व केतू लग्नी येत आहे आहे. केतू मीन राशीत असल्याने गुरु षष्ठात जास्त प्रबळ राहील असे दिसते. एक आणि सहा या भावांचा एक दुसऱ्याशी संबंध आल्याने काही लोकांची जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांना मधुमेह, पोटा संबंध  विकार, मेदवृद्धी इत्यादी गोष्टी आहेत त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे दिसते. मीन रास आणि मीन लग्न यांना गुरु वर्षभर सिंहेत असल्याने हा धोका जास्त संभवतो. गुरु दशमेश असल्याने नोकरीतील मंडळीना आर्थिक बाबतीत उत्तम आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करतो. शुक्र त्यावेळी कर्क राशीत आहे. व मीनेला पाचवा येत आहे. गुरु संबंधी सर्व दुखणी एकदम पळून जातील. कलाकार मंडळीना भरपूर उत्साह संचारेल. त्यांची कला लोकांपर्यंत पोचवायला बरेच मार्ग सापडतील. आर्थिक आवक कमी जास्त होण्याचा संभव आहे.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी रवी वृश्चिक राशीत व मीनेला नवम स्थानी येतो. पत्रिकेतील इतर योग पूरक असल्यास लांबच्या प्रवास होतील असे वाटते. १७ डिसेम्बरला रवी धनु राशीत गेल्यावर अनेकांना प्रमोशन आणि त्याबरोबर आर्थिक लाभ देखील होतील.
गुरु ८ जानेवारी ते ९ मे २१०६ पर्यंत वक्री अवस्थेत आहे. ह्या काळात तो रवी वरून शुक्रापर्यंत मागे येवून पुन्हा मार्गी होतो. रवी व शुक्र या दोघांची पुढील वाटचाल मीन राशीला बहुतांशी चांगलीच आहे.

गुरु ११ ऑगस्ट  २०१६ ला कन्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी पुन्हा भेटू....

वरील लेख हा अनघा भदे व सुनील देव(Astrology Counselling ) ह्यांनी लिहिलेला आहे .

Monday, 3 August 2015

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस(बेसिक कृष्णमुर्ती कोर्से )   पासून सुरु करत आहोत .

दोन बॅचेस : आठवड्यातून एक दिवस ( साधारण अडीच ते तीन महिने )

१.गुरुवार १३ ऑगस्ट २०१५ पासून (११:३० ते  १२:३० )

२. रविवार १६ ऑगस्ट २०१५ पासून (२.३० ते ३:३० )

के.पी प्रवीण अभ्यासक्रम

(ह्या  कोर्स मध्ये बेसिक ज्योतिषशास्त्र व कृष्णमुर्ती पद्धतीचे नियम तसेच के.पी पद्धतीने पत्रिका

 तयार करणे ह्यांचा समावेश आहे )

१. पत्रिका का बघावी ? जन्मपत्रिका म्हणजे काय ? कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ? पारंपरिक       
   
  व कृष्णमुर्ती ह्यातील फरक काय आहे ? ग्रहांबद्दल माहिती 

२. १२ राशी ,२७ नक्षत्र व १२ भावासंबंधी माहिती ,महत्वाचे ग्रहयोग

३. कृष्णमुर्ती पद्धतीची पत्रिका तयार करणे . (कॉम्पुटर software चा उपयोग न करता )

   कृष्णमुर्ती अयनांश संबंधी माहिती .तात्कालिक ग्रह (ruling planets)म्हणजे काय ?

४. नक्षत्र स्वामी ,उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय ? पत्रिकेत ह्यांचे महत्व काय ?

५. प्रथम भाव ,द्वितीय भाव , तृतिय भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

६. चतुर्थ भाव ,पंचम भाव , षष्ठ भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

७. सप्तम भाव ,अष्टम भाव , नवम भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

८. दशम भाव , एकादश भाव , द्वादश भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

९. महादशा म्हणजे काय ? दशेचे परिणाम कसे बघावेत ? वरील सर्व भावासंबंधी चर्चा ,प्रश्न -    
   
   उत्तरे इ.

१०. परीक्षा . 

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा .

अनघा भदे- 9011201560

सुनिल देव -9822206170

क्लास चा पत्ता : 

शिवप्रताप अपार्टमेंटस
flat no - १०१
४३ ,मयुर कॉलनी
पुणे - ४११०३८

वरील कोर्से पूर्ण करणार्यांना मग कृष्णमुर्ती पध्दतीचा विषारद(advance) हा कोर्से करत येईल . 
हा वरील बेसिक कोर्से संपल्यानंतर पुढे advance कोर्से चालू करू .