पत्रिकेतील इतर ग्रहांच्या बरोबरीने हर्षल हा ग्रह पत्रिकेत तितकाच महत्वाचा आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा पत्रिके सबंधित अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा जर ह्या ग्रहाकडे दुर्लक्षच झाले परंतु नंतर मात्र कळून चुकले कि हा एक महत्वाचा व काही योगात / कुयोगात अति महत्वाचा ग्रह आहे .
हर्षल म्हटले कि विलक्षण , प्रचंड ,रूढीभाय्य इ. विशेषणे आठवू लागतात . हर्षल म्हणजे लहरीपणा, तऱ्हेवाईकपणा . हर्षल म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन , अचाट बुद्धिमत्ता , काहीतरी जगावेगळे करण्याचे धाडस . हल्ली चे सगळे वैज्ञानिक शोध हे हर्षलाच्या अमलाखाली येतात . हर्षल म्हणजे आकस्मिक घटनांचा कारक ग्रह आहे .
हर्शल जेव्हा इतर ग्रहांच्या शुभयोगात विशेषत: नवपंचम योगात असतो तेव्हा शुभ फळे देतो व वाईट योगात म्हणजे षडाष्टक , केंद्र , प्रतियोग व युतीत असतो तेव्हा अशुभ फळे देतो .
बुध-हर्षल नवपंचम योग बुद्धिमत्तेच्या दृष्टीने उत्तम असतो . शुक्र -हर्षल नवपंचम योग कलेच्या दृष्टीने उत्तम असतो .
थोडक्यात सांगायचे तर हर्षल ज्या ग्रहाच्या नवपंचम योगात असतो त्या ग्रहाचे कारकात्वातील चांगले गुण वृद्धिंगत करतो . ज्या ग्रहांच्या युतीत किंवा अशुभ योगात असतो त्या ग्रहाच्या कारकत्वात नुन्यता आणतो . उदा शुक्र- हर्षल युती
शुक्र- हर्षल प्रतियोग व केंद्र योग वैवाहिक सुखाच्या दृष्टीने वाईटच . बर्याच वेळा घटस्फोटाच्या पत्रिकेत शुक्र - हर्षल ह्या ग्रहांचा एखादा तरी कुयोग सापडतो . ( लगेच कोणाच्या पत्रिकेत असा कुयोग असेल तर घटस्फोट होणारच असे नका सांगू बर का , कारण महादशा पण खूप महत्वाच्या असतात ह्याबाबतीत )
हर्षलची ढोबळमानाने फळे खालील प्रमाणे आहेत .
प्रथमस्थानी हर्षल असता थोडा विक्षिप्त स्वभाव असण्याचा संभाव असतो .
द्वितीयस्थानी हर्षल असता अचानक उद्भवणारे खर्च किंवा आर्थिक संकटे येऊ शकतात . तसेच ह्यास्थानातील हर्षल
असणाऱ्या व्यक्ती बोलण्यात फटकळ असण्याची शक्यता असते .
तृतीयस्थानी हर्षल असता उत्तम आकलन शक्ती , स्मरणशक्ती असते .
चतुर्थस्थानी हर्षल असता मातृसौख्य व गृहसौख्य चांगले मिळत नाही बर्याच वेळा भांडणे होण्याचा संभाव असतो .
पंचम स्थानी हर्षल असता बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगला असतो . प्रथम व नवम स्थानी बुध , गुरु सारखे ग्रह असतील तर आकलन शक्ती व बुद्धिमत्ता चांगली असते . बायकांच्या पत्रिकेतील हर्षल abortions , delivery च्या वेळेस काही त्रास दाखवतो .
षष्ठ स्थानी हर्षल असता अचानक उद्भवणारे आजार दाखवतो . कोणत्या ग्रहाच्या योगात हर्षल आहे त्यावर आजार अवलंबून असतो . उदा . मंगळा बरोबर असता उष्णतेचे विकार ,भाजणे ,मूळव्याध इ.
सप्तम स्थानी हर्षल असता वैवाहिक सुखाला फारसा चांगला नसतो . विवाह ठरण्यात अडथळे येतात . ठरलेले लग्न मोडणे हा पण प्रकार होतो .
अष्टम स्थानी हर्षल असता अकस्मात मृत्यू येण्याची शक्यता असते .
नवम स्थानी हर्षल असता प्रदेश प्रवासाचे योग येतात . बर्याच वेळा ज्या माणसाना परदेश प्रवास करावा लागतो ( frequent flyer ) अशा लोकांच्या पत्रिकेत ह्या स्थानी हर्षल असण्याची शक्यता जास्त असते .
दशम स्थानी हर्षल असता बर्याच वेळा नोकरी/ व्यवसायात बदल होतात . शुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात चांगली प्रगती दाखवतो तर अशुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात/ नोकरीत अडचणी दाखवतो.
एकादश स्थानी हर्षल असता मित्रांशी पटत नाही . आर्थिक बाबतीत स्थिरता देत नाही .
द्वादश स्थानी हर्षल पाप ग्रहांबरोबर असता वाईटच असतो . भांडणे ,मारामाऱ्या होण्याचा तसेच समाजात नाव खराब होण्याची शक्यता असते .
वर दिलेली सर्व हर्षलाची स्थानगत फळे ढोबळ मानाने दिलेली आहेत. मुख्यत्वे हर्षला चा कोणत्या ग्रहाशी योग होत आहे
त्यावरूनच जास्त अंदाज बांधता येतो .
हर्षल कुंभ राशीत चांगली फळे देतो . हर्षाल हा ग्रह विज्ञानाचा पुरस्कार करणारा ग्रह आहे तसेच कुंभ हि रास पण बौद्धिक रास असल्याने research वगेरे दृष्टीने फार चांगले .

Unique and great content
ReplyDelete- The news these days is full of political infighting, climate change, global crises, and nuclear war. To get the right prediction from an Astrologer visit our website and get your all answers related to astrology.
Dwitiya sthani Tula rashit harshal kay phal deto?
ReplyDelete