Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday, 30 September 2015

राशिभविष्य ऑक्टोबर २०१५

राशिभविष्य ऑक्टोबर २०१५
( खालील राशी भविष्य Astrology Counselling तर्फे देण्यात आलेली आहेत.)
राशी भविष्य
ऑक्टोबर २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी लग्न रास व जन्मरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत व समन्वय साधावा .

समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील ग्रहमान :
रवि कन्येत १८ ऑक्टोबर पर्यंत नंतर तुळेत ,मंगळ सिंहेत ,बुध(व) कन्येत,गुरु सिंहेत ,शुक्र सिंहेत,शनि वृश्चिक राशीत , राहू कन्येत ,केतू मीन राशीत.
मेष : ह्या महिन्यात प्रकृती चांगली राहील. द्वितीय भावाचा सबंध पंचम भावाशी तसेच बाराव्या भावाशी येत असल्यामुळे मनोरंजनाकरता खर्च होईल त्यातल्या त्यात द्वितीयातील चंद्र काहीतरी अनपेक्षित लाभ मिळवून देईल . कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील . पंचमात मंगळ,गुरु व शुक्र आहेत त्यामुळे मुलांच्या दृष्टीने काळजी करायाची गरज नाही .शेयर्स मध्ये गुतंवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे . षष्ठात बुध , रवि व राहू त्यामुळे आर्थिक बाजू उत्तम राहील . जोडीदाराकरता खरेदी कराल .अध्यात्माची आवड असणाऱ्यांना चांगला काळ आहे .नोकरी /व्यावसायिकांना कामाचा ताण राहील परंतु लाभ देखील होतील . एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
वृषभ : वृषभेचा स्वामी शुक्र चतुर्थात व केतू लाभात व गुरु पण चतुर्थात त्यामुळे घरात जास्त रमाल व आनंदी राहाल. द्वितीयेश बुध पंचमात व रवि पण पंचमात त्यामुळे पंचामाशी सबंधित व्यवसाय उदा . शेयर्स इ. जपुन करावेत . महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तृतीयेश चंद्र तृतीयात असल्याने अनेकाना प्रवास घडतील. चतुर्थात तीन ग्रह मंगळ ,गुरु,शुक्र . गुरु लाभेश व शुक्राच्या नक्षत्रात त्यामुळे घरासंबंधी काही लाभदायक घटना घडेल. घरासबंधी खरेदी/विक्री चे व्यवहार मनासारखे होतील. पंचमेश बुध पंचमात रवि पंचमात त्यामुळे मुलांच्या दृष्टीने उत्तम आहे . करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल . शिक्षण क्षेत्राशी सबंधित लोकांना लाभदायक काळ आहे. त्यातून रवि पण महिन्याच्या उत्तरार्धात षष्ठात जात आहे त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळत आहे . शनि सप्तमात व सप्तमेश मंगळ चतुर्थात व केतू लाभात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. वाहने जपून चालवावीत . व्यावसायिकांसाठी विशेषत: बिल्डर्स ला काळ चांगला आहे . एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
मिथुन : प्रकृती चांगली राहील . द्वितीयेश चंद्र प्रथम भावात त्यामुळे पहिल्या आठवड्यात आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे .तृतीयात तीन ग्रह असल्याने भरपूर उत्साह राहील. प्रवासाचे पण योग आहेत . भावंडांच्या गाठीभेटी होतील . घरगुती बाबतीत बराच रस घ्याल .पंचमेश शुक्र तृतीयात व केतू दशमात व दशमेश गुरु तृतीयात त्यामुळे कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्या संधी मिळतील. त्याबरोबर प्रसिद्धी पण मिळेल. जोडीदाराबरोबर शक्यतो वाद होणार नाहीत असे बघावे .नोकरी/व्यवसाय करणार्यांना हा काळ चांगला जाईल . हा महिना एकंदरीत लाभदायक आहे .

कर्क : हा महिना प्रकृतीच्या दृष्टीने चांगला राहील परंतु खाण्यापिण्यावर मात्र संयम ठेवावा . द्वितीयात तीन ग्रह असल्याने आर्थिक लाभ नक्की होतील .व्ययेश बुध तृतीयात व रवि पण तृतिय स्थानी त्यामुळे प्रवास होण्याची शक्यता आहे . चतुर्थेश शुक्र द्वितीयात . कुटुंबातील वातावरण आनंदी राहील .पाहुणे येण्याची शक्यता आहे . विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. षष्ठेश गुरु द्वितियात व शुक्र पण धनात, शुक्र लाभेश पण आहेच त्यामुळे आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील . नोकरी करणार्यांना हा महिना चांगला जाईल . एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम जाईल.
सिंह : प्रथम भावात मंगळ तसेच पंचमेश गुरु पण लग्नी त्यामुळे प्रकृती चांगली राहील . द्वितीयात रवि,राहू,बुध असल्याने आर्थिक लाभ चांगले होतील . प्रवासात काळजी घ्यावी . घरगुती वातावरण चांगले राहील . मुलांच्या दृष्टीने महिना चांगला आहे . वाहने जपून चालवावीत . खर्चाचे प्रमाण वाढते राहील असे दिसते . जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. अध्यात्मिक गोष्टींसाठी हा महिना उत्तम आहे . नोकरी/व्यवसायात कामाचा ताण जाणवेल परंतु काम समाधानकारक होईल. एकंदरीत हा महिना चांगला आहे .
कन्या : रवि, बुध, राहू तीन गृह तुमच्या राशीत असल्याने प्रकृति काळजी राहणार नाही. कामात तुमचा उत्साह भरपूर जाणवेल. द्वितीयेश शुक्र बाराव्या स्थानी गुरु पण तिथेच त्यामुळे खर्चाचे प्रमाण जास्त राहील असे वाटते. तृतीयातील शनी प्रवास देईल त्याप्रमाणे लेखकांना पण बरेच विषय सुचतील व त्याबद्दल लिखाण पण होईल. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी, व तिथेच शुक्र, मंगळ. बारावे स्थान फारच बलवान झाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेता येईल. अन्यथा नुकसान, मनःस्ताप तर ह्या भावाचा स्थायी भाव आहेच. उदा: शेयर व्यावसायिक यांना हा काळ गुंतवणूक, घर विक्री, परदेश प्रवास व नोकरी या मार्गांद्वारे फायदा करून घेता येईल. मुलाबाळांना महिना उत्तम आहे. दशमेश बुध लग्नी रवि तिथेच व शुक्र बाराव्या स्थानी हा योग परदेशात नोकरी व्यवसाय यांना उत्तम आहे. केलेल्या कामाची दाखल घेतली जाईल. सर्वसाधारण हा महिना चांगलाच आहे.
तूळ: तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभात केतू षष्ठात व शनी द्वितीयात मारक स्थानी शारीरिक त्रास अगर आजार होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश मंगळ लाभात केतू षष्ठात आर्थिक लाभ देण्यास समर्थ आहेत, त्याबरोबर द्वितीयातील शनि खर्च वाढवेल. तृतीयेश गुरु लाभात शक्र तिथेच लेखक, गुरुजन ई . मंडळींना लाभदायक काळ आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखे काही दिसत नाही. षष्ठेश गुरु लाभात, षष्ठात केतू मीनेत, हे सर्व योग आर्थिक लाभास उत्तम आहेत. (एखादी बँक रेंटल वर घ्यावयाला हरकत नाही ). जोडीदाराशी थोडे जमूघ्यावे असे वाटते. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरवातीला नवमात
वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ दशमात, केतू पंचमात कलाकारांना हा काळ उत्तम आहे. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने पण काळजीचे कारण नाही. शनि देखील तुमच्याच राशीत आणि बुध लाभात प्रकृती उत्तम ठेवणारे योग आहेत. कलाकारांनी ह्या पर्वणीचा फायदा घ्यावा. द्वितीयेश गुरु दशमात, शुक्र तिथेच नोकरी संदर्भात देखील हा काळ उत्तम असून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.तृतीयेश शनि प्रथमात व बुध दशमात हा काळ प्रवासाला उत्तम आहे. तसेच बुकसेलर्स अगर फिरतीचे व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या उत्तम काळ आहे. चतुर्थेश शनि असल्याने विद्यार्थ्यांना देखील हा काळ उत्तम आहे. पंचम स्थान व दशम स्थान ह्यांचा योग असल्याने कलाकारांना उत्तम संधी आहे, तरी ह्याचा कलाप्रदर्शनासाठी योग्य उपयोग करून घ्यावा. सप्तमेश दशमात व शुक्र पंचमात जोडीदाराबरोबर सुखसंवाद राहतील. अष्टमेश बुध लाभात व महिन्याच्या सुरुवातीला चंद्र अष्टमात त्यामुळे कामातील ताण जास्त जाणवेल. पण दशमातील इतर ग्रह तुमचे काम सुरळीत होण्यास मदत करतील. भाग्येश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात असल्याने त्याकाळात थोडी निराशा जाणवण्याची शक्यता आहे. दशम व लाभ स्थानातील ग्रहयोग नोकरी अगर व्यवसायात तुमचा दर्जा उंचावत ठेवतील, काहींना प्रमोशन देखील मिळेल. एकंदरीत वृश्चिक राशीला महिना उत्तम आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात असून मंगळ व शुक्र तिथेच आहेत. शरीर प्रकृती उत्तम राहील. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व बुध दशमात ह्यामुळे परदेशात नोकरी करणाऱ्यांना हा काळ आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. तृतीयेश शनि बाराव्या स्थानी असल्यामुळे वरील गोष्टीस पुष्टी मिळते. चतुर्थेश गुरु नवमात असल्याने पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी देखील उत्तम काळ आहे. पंचमेश मंगळ नवमात शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, पण पंचमेश नवमात भाग्य स्थानी असल्याने कलाकारांसाठी हा योग चांगला आहे. सप्तमेश बुध दशमात असल्याने जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. पहिल्या पंधरवड्यात नवमेश रवि दशमात व नंतर तो लाभात ह्या दोन्ही ग्रहस्थिती नवम स्थानाच्या दृष्टीने उत्तम आहेत. दशमेश बुध दशमातच वक्री पण तो ९ ऑक्टोबरला मार्गी होत असल्याने त्यानंतरचा काळ नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहे.लाभेश शुक्र नवमात व केतू पंचमात त्यामुळे कलाकार, खेळाडू ह्यांना उत्तम काळ आहे. एकंदरीत धनु राशीला हा महिना उत्तम आहे.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी व बुध नवम स्थानी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजी नसावी. द्वितीयेश देखील शनि लाभतच असल्याने बऱ्याच लोकांना धनलाभाची शक्यता आहे, विशेषत: ज्यांचा संबंध धार्मिक कार्ये किवा शिक्षण क्षेत्राशी असेल त्यांना लाभदायक महिना आहे. तृतीयेश गुरु अष्टमात प्रवासात काळजी घेण्याचे सुचवतो. चतुर्थेश मंगळ अष्टमात घरासंबंधी थोडा खर्च अगर काही अडचणी दाखवतो. तसेच वाहन देखील जपून चालवणे इष्ट आहे. पंचमेश शुक्र अष्टमात शेअरचे व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा नुकसान संभवते. तसेच मुलाबाळांकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. षष्ठेश बुध नवमात व पहिल्या पंधरवड्यात रवि देखील नवमात त्यामुळे दुसरा पंधरवडा (रवि दशमात जाईल) नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर राहील. सप्तमेश चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात षष्ठात आहे, त्यामुळे जोडीदाराशी जमवून घेणे इष्ट, नाहीतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता! अष्टमात तीन ग्रह मंगळ, गुरु आणि शुक्र त्यामुळे कामाचा व्याप व ताण वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पंधरवड्यात रवि दशमात पण अष्टमात तीन ग्रह असल्याने सरकारी नोकरी करणाऱ्यांना कामाचा विशेष ताण जाणवेल. लाभातील शनि त्यातल्या त्यात बरेचसे फायदे मिळवून देईल. एकंदरीत मकर राशीला हा महिना संमिश्र स्वरूपाचा असून सर्व बाबतीत लक्षपूर्वक निर्णय घेणे जरुरीचे आहे.
कुंभ : कुंभेचा स्वामी शनी दशमात प्रकृतीच्या दृष्टीने काही त्रास वाटत नाहीत . द्वितीयेश गुरु सप्तमात त्यामुळे भागीदारीतून फायदा होईल . तृतीयेश मंगळ सप्तमात असल्याने नवीन ओळखी होऊन त्यातुन फायदा होईल. चतुर्थेश शुक्र सप्तमात असल्याने घर / इस्टेट घेताना सर्व कायदेशीर बाबी निट तपासाव्यात अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे . शिक्षणाच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात . शेयर्स चा व्यवसाय असणाऱ्यांनी व्यवहार जपून करावेत नुकसान होण्याची शक्यता आहे . जोडीदाराला आर्थिक लाभ होतील . व्यावसायिकांना हा महिना चांगला राहिल. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील.
मीन : षष्ठात मंगळ, गुरु , शुक्र . प्रथमेश गुरु षष्ठात व प्रथम भावात केतू तसेच महिन्याच्या मध्यात रवी अष्टमात जाईल त्यामुळे प्रकृतीविषयी काळजी घ्यावी . प्रथमातील केतू व नवामातील शनी तुम्हाला अंतर्मुख करेल . द्वितीयेश मंगळ षष्ठात लाभेश गुरु षष्ठात तसेच शुक्र पण षष्ठ भावात आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत महिना चांगला राहील. प्रकाशक ,पुस्तक विक्रेते ह्यांना आर्थिक आवक चांगली राहील. येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करावा म्हणजे त्यांना यश मिळेल . घरा संबंधी व्यवहार जपून करावेत . जोडीदाराशी सबंध चांगले राहतील.ह्या महिन्यात थोडा मानसिक ताण राहील. दशमेश गुरु षष्ठ भावात त्यामुळे नोकरी करणार्यांना महिना चांगला जाईल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक संस्थाशी सबंधित असलेल्या लोकांना तसेच प्रवासाशी संबंधी व्यवसायिकांना आर्थिक लाभ होतील. ह्या महिन्यात प्रवासाचे योग आहेत . एकंदरीत महिना संमिश्र राहील.

Friday, 4 September 2015

राशिभविष्य सप्टेंबर २०१५

राशिभविष्य सप्टेंबर २०१५
( खालील राशी भविष्य Astrology Counselling तर्फे देण्यात आलेली आहेत.)
राशी भविष्य
सप्टेंबर २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी लग्न रास व जन्मरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत व समन्वय साधावा .
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
ह्या महिन्यातील ग्रहमान  :
रवि सिंहेत १७ सप्टेंबर नंतर कन्येत,मंगळ कर्केत १६ सप्टेंबर पासून सिंहेत ,बुध कन्येत,गुरु सिंहेत ,शुक्र वक्री ६ सप्टेंबर पर्यंत कर्केत नंतर मार्गी होत आहे ,शनि वृश्चिक राशीत , राहू कन्येत ,केतू मीन राशीत. 
मेष : या महिन्याच्या सुरवातीला चंद्र मेषेला, राशी स्वामी मंगळ चतुर्थात बुध षष्ठात आहे. हे ग्रह योग घर अगर फ्लॅट विकण्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. कलाकारांना पण हा काळ छान आहे. आजोळच्या नातेवाईकांना भेटायचा योग येणार असे दिसते , त्या तयारीत राहा. द्वितीयेश शुक्र चतुर्थात व बुध षष्ठात आर्थिक लाभ मिळवून देतील असे वाटते. पंचमातील रवि, गुरु मुलांचा अभ्यास अगर शाळाप्रवेश समाधानकारक राहतील. काही मोठ्या मुलांना कदाचित जवळच्या शहरात हॉस्टलवर राहण्याचे योग आहेत. सप्तमेश शुक्र चतुर्थात, बुध षष्ठात, काही लोकांच्या बाबतीत घर अगर तत्सम गोष्टीत जोडीदाराशी चर्चा किंवा थोडा विसंवाद होण्याची शक्यता आहे. सतरा तारखेनंतर रवि कन्येत जात आहे. षष्ठात तीन ग्रह आल्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी असे ग्रहयोग सुचवीत आहेत. अष्टमातील शनि व द्वाद्शातील केतू हेच सुचवीत आहेत. त्यातल्यात्यात पंचमातील गुरु हि जमे ची बाजू आहे. दशम व लाभ या दोन्ही भावांचा स्वामी शनि अष्टमात, नोकरी अगर व्यावसायिक त्रासदायक होईल असे वाटते. पण त्याबरोबर मंगळ चतुर्थात, बुध षष्ठात, तारीख सतरा नंतर रवि पण तिथेच हे योग आर्थिक घडामोडी थोड्याफार मनाप्रमाणे घडवून देतील असे पण वाटते. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे....
वृषभ : वृषभ राशीचा शुक्र तृतीयात वक्री आहे. त्यामुळे प्रवास विषयक बऱ्याच गोष्टी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रकृति संबंधी फारसे काळजी करण्यासारखे काही नाही. द्वितीयेश बुध पंचमात, चंद्राच्या भ्रमणानुसार शेअर व्यसायीकांना बरेच चढ उताराला सामोरे जावे लागणार असे दिसत. तरी व्यवहार जपूनच करावेत. तृतीयात मंगळ, पंचमात बुध ज्योतिष अगर तत्सम विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना काळ चांगला आहे. चतुर्थातील रवि, गुरु घरातील वातावरण समाधानी व आनंदी ठेवतील. मुलाबाळांचा अभ्यास व इतर गोष्टी व्यवस्थित चालतील. जोडीदाराशी थोडे फार वाद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. नवमेश, दशमेश शनि सप्तमात, नोकरी करणारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल असे वाटते. सर्वसाधरणपणे हा महिना ठीक जाईल.
मिथुन : या राशीचा स्वामी बुध चतुर्थात स्वतःच्याच राशीत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच प्रकृति पण छान राहील. द्वितीयात मंगळ, शुक्र व चंद्र लाभात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक प्राप्ती देणार असे ग्रह आहेत. तृतियात रवि, गुरु व दृष्टी नवमात. तुम्हाला एकंदरीत भरपूर उत्साह जाणवेल. शुक्र वक्री असला तरी थोडे फार प्रवास, नातलगांच्या भेटी इत्यादी नक्कीच होतील असे वाटते. पंचमेश शुक्र द्वितीयात व बुध चतुर्थात, अभ्यासाच्या बाबतीत उत्तम आहेत, पण वक्री शुक्राचा त्रास जाणवेल. बुध चतुर्थात असल्याने प्रेमिजनांनी सध्या काही काळ भेटी गाठी पुढे ढकलाव्यात असे वाटते. षष्ठेश मंगळ द्वितीयात मारक स्थानात, बुध चतुर्थात, शनि षष्ठात वयस्क मंडळींना दुखण्याचा थोडा फार त्रास होईल असे दिसते. सप्तमेश गुरु त्तृतियात, केतू दशमात व शनि षष्ठात जोडीदार (विशेष करून नवरे) कामानिमित्त लांब राहतील असे वाटते. एकंदरीत हा महिना तसा काही गोष्टी वगळता बऱ्यापैकी छान आहे.
कर्क : महिन्याच्या सुरुवातीला या राशीचा स्वामी चंद्र दशमात व मंगळ प्रथम स्थानी, दशमातून चंद्र-मंगळ लक्ष्मी योग करत आहेत. त्यामुळे काही लोकांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहील. रवि महिन्याच्या मध्यापर्यंत द्वितीयातून तृतीयात जाईल. द्वितीयातील गुरु आणि दशमातील चंद्र हा योग देखील आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम आहे. तृतीयात कन्येचा स्वराशीतील बुध, राहू तिथेच त्यामुळे १५ तारखेनंतर निश्चितच प्रवासाचे योग दिसत आहेत. पंचमेश मंगळ लग्नी व बुध तृतीयात त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला आहे. शेअर ब्रोकर्सना हा काळ संमिश्र फळे देणारा आहे. ज्यांना मैदानी खेळाची आवड आहे, अश्या व्यक्तींना हा काळ मात्र फलदायी आहे. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी, केतू नवमात आणि शनि पंचमात हा योग बँकेतून कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक होईल असे वाटते. कर्ज वगळता इतर आर्थिक प्राप्तीसाठी मात्र उत्तम काळ आहे. सप्तमेश शनि पंचमात असल्याने जोडीदाराशी संबंध खेळीमेळीचे राहतील. दशमेश मंगळ प्रथमात आणि बुध तृतीयात ह्यामुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल किंवा काहींना प्रमोशन पण मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना कर्क राशीसाठी उत्तम आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि १६ सप्टेंबर पर्यंत तुमच्याच राशीत असून शुक्र द्वादश स्थानी वक्री आहे. त्यामुळे तुमची बरीचशी कामे रेगाळतील असे वाटते. मनाला उभारी राहणार नाही. १४ सप्टेबर नंतर मात्र परीस्थितित बदल घडेल व उत्साहवर्धक कार्यकाल सुरु होईल. १७ सप्टेंबरला रवि कन्या राशीत प्रवेश करील तेंव्हा थोडी फार आर्थिक मिळकत होईल, पण खर्चाचा वाटा देखील वाढतील असे दिसते. तेंव्हा  व्यवहार जपून करावेत. त्रीतीयातील चंद्र काही लोकांना परदेशी जाण्याचा योग आणेल असे वाटते. ज्यांना नवीन घर बुक करायचे त्यांनी आत्ताच विचार करावा, नंतर बुध वक्री झाल्यावर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुला बाळांचा अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित आहे. घरगुती वातावरण नरम गरम राहील असे वाटते. दशमेश ७ तारखेनंतर मार्गी झाल्यावर नोकरी संदर्भात चांगली फळे देईल. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध कन्येत असून राहू पण कन्येतच आहे . रवि १७ तारखेनंतर कान्येतच येत आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील . आर्थिक लाभ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे .लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे . कलाकार मंडळीना कला सादर करण्याच्या दृष्टीने चांगले योग आहेत .मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे . शेयर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधतेने व्यवहार करावेत . जोडीदाराला प्रवास योग आहेत . सरकारी नोकरांना आर्थिक लाभ होतील . दशमेश बुध प्रथमात तसेच १७ तारखेनंतर रवि पण प्रथम भावात त्यामुळे सरकारी नोकरांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे . एकंदरीत महिना चांगला जाईल.
तूळ : प्रथमेश शुक्र दशमात ,रवि,मंगळ, गुरु लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील .ह्या महिन्यात आर्थिक लाभ चांगले होतील . लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे.नातेवाईकांच्या भेटी होतील .शेयर्स चा व्यवसाय असणार्यांना महिना थोडा लाभ मिळवून देईल. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे.नोकरी/व्यवासायानिमित्त परदेश प्रवास होईल. एकंदरीत हा महिंना आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे.
वृश्चिक : प्रथमेश मंगळ नवमात व बुध लाभात असल्याने प्रकृती चांगली राहील. भावंडांच्या गाठीभेटी होतील ,दिवस छान जातील. कलाकारांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे . बर्याच संधी चालून येतील.नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा महिना कामाच्या दृष्टीने गडबडीचा राहील. जोडीदाराशी सबंध चांगले राह्तील .ज्या लोकांची पेन्शन ची कामे आहेत ती पण मार्गी लागतील .लाभेश व अष्टमेश बुध लाभात तसेच राहू पण लाभात आहे त्यामुळे एकंदरीत ह्या महिन्यात अनेक प्रकारचे लाभ होतील असे वाटते .
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु सिंह राशीत नवम भावात आहे. केतू चतुर्थात गुरुच्याच राशीत आहे. प्रकृति संबधी काळजी नसावी. द्वितीयातील शनि खर्चाचे प्रमाण वाढत ठेवील किंवा प्राप्तीच्या संदर्भात असमाधान राहण्याची शक्यता आहे.तृतीयेश शनि बाराव्या स्थानात प्रवास घडेल असे वाटते. चतुर्थेश गुरु नवमात शनि बाराव्यात, काही मंडळींना घर बदलण्याचे योग पण आहेत. पंचमेश मंगळ अष्टमात, बुध दशमात मुलांचे प्रश्न समाधानकारक सुटतील. जोडीदाराबरोबर थोडीफार  कुरबुरी होण्याची शक्यता आहे. दशमभावातील बुध, राहू नोकरीतील तुमचे स्थान बळकट ठेवण्यात मदत करतील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे वाटते.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील . शनि द्वितीयेश पण आहे त्यामुळे आर्थिक लाभ होतील . बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा मनस्ताप किंवा लोक दुखावली जाण्याची शक्यता आहे .विद्यार्थ्यांकरता काळ चांगला आहे . प्रेमात पडलेल्यांनी सबुरीने घ्यावे . शेयर्स चे व्यवहार जपून करावेत . शिक्षक किंवा पौराहित्य करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी किरकोळ वादाची शक्यता आहे . रवि व गुरु अष्टमात त्यामुळे जोडीदाराला आर्थिक लाभ होतील . उच्च शिक्षणाला काळ चांगला आहे . ऑफिस मध्ये मिळते जुळते घ्यावे लागेल . वाहने जपून चालवावीत . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात स्वतःच्याच नक्षत्रात असल्याने तुमच्या कडून प्रकृतीची काळजी दुय्यम ठरू शकते. कारण तुमचे व्यस्त कार्यक्रम. षष्ठातील मंगळ आणि अष्टमातील बुध हाच संदेश देत आहेत. द्वितीयेश गुरु सप्तमात, केतू द्वितीयात आणि शनि दशमात आर्थिक लाभ उत्तम देईल असे वाटते. पंचमेश बुध अष्टमात आणि राहू तिथेच शेअर व्यावसायिकांनी सावधगिरीने खरेदी विक्री करावी असा संदेश हे ग्रह देत आहेत. सप्तमातील रवी, गुरु जोडीदार बरोबर किरकोळ कुबुरी होण्याचे चिन्ह आहेत. दशम व लाभ हि दोन्ही स्थाने व्यावसायिकांच्या द्रिष्टीने चांगली फळे देतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे.
मीन : मीन राशीचा गुरु षष्ठात रवि पण तिथेच व केतू लग्नी हे ग्रहमान प्रकृतीला मारक असू शकतील, तेंव्हा काळजी घ्यावी लागेल. विशेषतः ज्यांना गॅसेसचा त्रास आहे व ब्लडप्रेशर पण आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. द्वितीयेश मंगळ पंचमात व बुध सप्तमात आर्थिक बाबतीत खास नाही. पंचमातील मंगळ प्रकृतीत सुधारणा घडवून आणेल. पंचमातील शुक्र, मंगळ कलाकारांना चांगला आहे. कलेला व्यासपीठ मिळेल असे वाटते. जोडीदाराशी थोडीफार कुरबुरी होण्याचे चान्सेस आहेत असे वाटते. नवमातील शनि मीन राशीच्या लोकांना कुंभ मेळ्याचे पुण्य मिळवून देण्याचे चान्सेस बरेच आहेत. दशमेश गुरु षष्ठात, केतू लग्नात व शनि नवमात हे ग्रहमान कर्तृत्वापेक्षा भाग्याला अधिक महत्व देत आहे. त्यामुळे इतर संसारिक गोष्टीपेक्षा मानसिक समाधान, शांति मिळेल असे वाटते.  एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे म्हणायला हरकत नाही.