गुरु ग्रहासंबंधी माहिती आधी दिलीच आहेच .
http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html ( पत्रिकेतील गुरु )
स्थानगत ग्रहाच्या फलांचा अभ्यास केला तरी तो ग्रह कोणत्या स्थानांचा अधिपती ( lord ) आहे . कोणत्या राशीत आहे .
अजून कोणत्या ग्रहांशी युती किंवा योग करत आहे ह्यावर त्याचे फलित अवलंबून असते .
परंतु ह्या सगळ्याची पायरी म्हणून स्थानगत फले अभ्यासायला हवीत .
आपण गुरूची स्थानगत फले बघुयात .

द्वितीय स्थानी गुरु असता : द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे तसेच धन स्थान पण आहे . ह्या स्थानातील गुरु मोठ्या कुटुंबात जन्म दाखवतो . पैशांच्या दृष्टीने गुरु आर्थिक स्थिती चांगली ठेवतो . द्वितीय स्थानातील ग्रहांवरून कोणत्या पदार्थांची आवड आहे हे समजते . गुरु मुळे गोड पदार्थ खाण्याची आवड असते .
तृतीय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून भावंडे, लिखाण इ. ह्या स्थानात गुरु असता त्याची दृष्टी विवाह व लाभ स्थानावर पडते जी ह्या दोन्ही स्थानाच्या दृष्टीने शुभ असते . ह्या स्थानातील गुरु अभ्यासू वृत्ती देतो तसेच घरात पण ह्या व्यक्तींना महत्व असते . अक्षर गुरूमुळे सुंदर असण्याचीअसण्याची पण शक्यता असते . भावंडे जास्त असतात . अर्थात आजकाल ' एक या दो बस ! ' असे असताना ह्या गुरूच्या फलाच पडताळा येणे कठीण !
हे छोट्या प्रवासाचे स्थान आहे त्यामुळे असे प्रवासास गुरु चांगला .
चतुथ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. विचार करतात . ह्या स्थानातील गुरु मातृ सुख , गृहसौख्य चांगले देतो . शुक्रा बरोबर असेल तर वाहन सौख्य पण छान असते . अशुभ ग्रहांच्या योगातील गुरु हे सगळ्या सुखात बाधा आणतो .
पंचम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या इ. गोष्टी बघतात . ह्या स्थानातील गुरु संतती सुखास तसेच शिक्षणाला चांगला असतो . तसेच उच्च शिक्षणाला पोषक असतो . इथला गुरु कोणताही अभ्यास सातत्याने करण्याची वृत्ती देतो . बर्याच शिक्षकांच्या पत्रिकेत पंचमात गुरु असतो .

षष्ठ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात . इथे गुरु असता मातुल घराण्याची ( मामा, मावश इ. ) आर्थिक स्थिती चांगली असते . इथे बिघडलेला गुरु अपचन , पोटाचे आजार ,रक्तविकार , रक्त दोष
डायबेटीस , यकृत ( लिव्हर ) इ. चे आजार होऊ शकतात .
डायबेटीस , यकृत ( लिव्हर ) इ. चे आजार होऊ शकतात .
सप्तम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ. बघतात वैवाहिक सौख्यास इथे गुरु चांगला असतो .बायकांच्या पत्रिकेत चंद्र किंवा गुरु बरोबर असलेला गुरु वैवाहिक सुखास चांगला परंतु पाप ग्रहांबरोबर असलेला वाईटच . पुरुषांच्या पत्रिकेत असा शुभ योगातील गुरु पत्नी सुशिक्षित व सुस्वभावी देतो .
अष्टम स्थानी गुरु असता : हे मृत्यू स्थान आहे . इथला एकटा गुरु शांत मरण दाखवतो. तसेच हे बायकोचे धनस्थान आहे . त्यामुळे बायकोकडून संपतिक लाभ होतात.
नवम स्थानी गुरु असता : हे भाग्य स्थान आहे . तसेच उच्च शिक्षणाचे स्थान आहे . इथल्या गुरु मुळे व्यक्तीची वैचारिक बैठक चांगली असते . उच्च शिक्षणासाठी हा गुरु अतिशय चांगला .स्वकष्टावर आयुष्यात यशस्वी होतात . अध्यात्माच्या दृष्टीने पण हा गुरु शुभ फले देतो . परदेश गमानासाठी पण नवम स्थान विचारात घेतले आहे . त्यामुळे इथला गुरु बर्याच वेळा शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी देतो. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देणे , सामाजिक कार्य करणे इ. गोष्टींकडे कल असतो .
दशम स्थानी गुरु असता : हे स्थान कर्म स्थान आहे . पारंपारिक ज्योतिष शास्त्रात वडिलांचा विचार ह्या स्थानावरून केला आहे . हा गुरु बौद्धिक क्षेत्रात व्यवसाय / नोकरी दाखवतो . तसेच उत्तम नाव लौकिक ,मान गुरूमुळे मिळते . गुरु पितृसुख पण चांगले देतो . एकंदर दशमातील शुभयोगातील गुरु चांगलाच असतो .
लाभ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून मित्रमंडळ , सर्व प्रकारचे लाभ इ. बघतात . इथे गुरु असता चांगले सुसंस्कृत , सुशिक्षित मित्र देतो . लाभतील गुरु आर्थिक दृष्ट्या पण चांगला .तसेच गुरूची सातवी दृष्टी पंचमावर असल्याने त्या दृष्टीने पण म्हणजे संतती सुखास चांगला असतो .
व्यय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून परदेश प्रवास ,मोक्ष त्रिकोणातील स्थानामुळे पारमार्थिक उन्नती वगेरे बघतात . इथला गुरु त्यामुळे पारमार्थिक उन्नती, अध्यात्म साठी चांगला , हा गुरु परदेश प्रवास पण घडवून आणतो . साधारण साधारणपणे गुरु चर राशीत असता ( मेष,कर्क,तुल,मकर ) परदेशात थोड्य काळाकरता वास्तव्य असते . द्विस्वभाव राशीत असता (मिथुन, कन्या,धनु,मीन ) परदेशात मध्यम काळाकरता वास्तव्य असते . स्थिर राशीत गुरु असता ( वृषभ सिंह , वृश्चिक, कुंभ ) परदेशात दीर्घ काळाकरता वास्तव्य असते .

No comments:
Post a Comment