Title

Astrology Blog by Anagha Bhade


Sunday, 1 November 2015

राशिभविष्य नोव्हेंबर २०१५

राशिभविष्य नोव्हेंबर २०१५
(के. पी. पद्धतीप्रमाणे)
(खालील राशी भविष्य अॅस्ट्रॉलॉजी काउन्सेलिंग तर्फे देण्यात आलेली आहेत.)
(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष:मेष राशीचा स्वामी मंगळ पंचमात, रवि सप्तमात व पंचमेश आहे. प्रथम व षष्ठ स्थानाचा संबंध आल्यामुळे उष्णतेचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. पण रवि पंचमेश असल्यामुळे तीव्रता कमी जाणवेल. द्वितीयेश शुक्र पंचमात व रवि सप्तमात आणि राहू षष्ठात त्यामुळे आर्थिक बाबतीत परिस्थिती साधारण राहील. कदाचित हा आर्थिक लाभ शेअर्स अगर म्युचुअल फंड ह्यामार्गाने पण होऊ शकतो. तृतीयेश बुध सप्तमात असल्याने जोडीदाराबरोबर थोडे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जुळवून घेण्यातच शहाणपणा आहे. चतुर्थेश चंद्राचा काही काळासाठी अष्टमातील शनिशी नवपंचम योग होईल. घरगुती बाबतीत तो काळ उत्तम जाईल. तरीही अष्टमातील शनिमुळे थोडाफार मानसिक ताण जाणवेल. पंचमातील तीन ग्रह, मंगळ, गुरु आणि शुक्र, मुलांच्या दृष्टीने उत्तम आहेत, त्यांच्या अभ्यासातील प्रगतीच्या दृष्टीने काळजी नसावी. दशमेश शनि अष्टमात असल्याने नोकरीतील ताणामुळे मानसिक ताण जाणवेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.
वृषभ :वृषभ राशीचा स्वामी शुक्र चतुर्थात, रवि षष्ठात असल्याने शरीरप्रकृतीसंबंधी काही त्रास उद्भवू शकतो. पण पंचमातील राहूमुळे आजारपणाला ताबडतोब आळा बसेल. त्यामुळे फारसे काळजीचे कारण नाही. द्वितीयेश बुध षष्ठात, मंगळ चतुर्थात आणि राहू पंचमात त्यामुळे घरासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. तरीही चतुर्थात तीन ग्रह, मंगळ, गुरु, शुक्र असल्याने घराबाबत होणारा खर्च त्रासदायक ठरणार नाही. पहिल्या आठवड्यात तृतीय स्थानातील चंद्र काहींच्या बाबतीत लहानसा प्रवास घडवून आणू शकतो. पंचमेश बुध षष्ठात व मंगळ चतुर्थात मुलांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. तसेच शेअर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील जपून व्यवहार करावेत. षष्ठेश शुक्र चतुर्थात व रवि षष्ठात असल्याने हा योग शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक आहे, विशेषत: क्लासेस असणाऱ्यांना आर्थिक फायदा चांगला होईल. सप्तमात शनि व सप्तमेश मंगळ चतुर्थात जोडीदाराशी किरकोळ स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे, पण साधारणपणे वातावरण उत्तम राहील. अष्टमेश गुरु चतुर्थात व शुक्र देखील तिथेच, त्यामुळे वाहने शक्यतो जपून चालवावीत. दशमेश शनि सप्तमात असल्याने बिल्डींग मटेरीअलचा व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक लाभ उत्तम होईल. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल.
मिथुन :मिथुन राशीचा स्वामी बुध पंचमात असून राहू चतुर्थ स्थानी कन्या ह्या बुधाच्या राशीत आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहील आणि त्या अनुषंगाने प्रकृती देखील उत्तम राहील. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र द्वितीय स्थानी असल्याने काही लोकांना अचानक धनलाभाची पण शक्यता आहे. गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात, ज्यांचा व्यवसाय पुस्तकाशी संबंधित आहे, अश्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. तसेच लेखक आणि शिक्षक ह्यांन सुद्धा हा काळ अनुकूल आहे. चतुर्थात मंगळ, शुक्र व राहू हे तीन ग्रह असल्याने तुम्ही घरगुती बाबतीत जास्त लक्ष द्याल व काही लोकं कुटुंबासमवेत मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आखण्याची शक्यता आहे. षष्ठातील शनि व पंचमातील रवि प्रकृती उत्तम ठेवेल ह्यात शंकाच नाही, पण षष्ठ स्थान हे धन स्थान असूनही आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगावी. सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात, जोडीदाराशी सुखसंवाद होतील. अष्टमेश शनि षष्ठात त्यामुळे ज्यांचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय आहे त्यांना उत्तम लाभ होतील. दशमेश गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात आणि शनि षष्ठात हे सर्व ग्रहयोग नोकरी करणाऱ्यांना सर्वसाधारण असतील. ज्यांचे व्यवसाय फिरतीचे आहेत अश्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लाभेश मंगळ चतुर्थात व रवि पंचमात घरासंबंधी काहीतरी काम निघण्याची शक्यता आहे. ज्यांना घर विकायचे आहे अश्यांनी थोडा संयम बाळगावा. एकंदरीत हा महिना मिथुन राशीसाठी उत्तमच आहे!
कर्क :कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या सुरुवातीला स्वराशीतच, बुध चतुर्थात आणि केतू नवमात असल्याने शरीर प्रकृती व्यवस्थित राहील. द्वितीयातील गुरु आर्थिक परिस्थिती व्यवस्थित ठेवेल. तृतीयात मंगळ, शुक्र, राहू हे तीन ग्रह आणि केतू नवमात निश्चितपणे प्रवास घडवून आणतील. तसेच पुस्तक लेखन, पुस्तक विक्रेते ह्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. चतुर्थातील रवि आणि बुध तुम्हाला कुटुंबाच्या अधिक जवळ आणतील आणि तुम्ही कुटुंबासाठी बराच वेळ घालवाल. पंचमातील शनि व तृतीयातील मंगळ मुलाबाळांच्या दृष्टीने उत्तम आहे. सप्तमात मकर रास असून शनि पंचमात आहे व रवि चतुर्थात, ह्यामुळे कुटुंबात जोडीदाराशी सुखसंवाद होतील. दशमातील मंगळ तृतीयात आणि रवि चतुर्थात त्यामुळे नोकरीतील तुमचे स्थान उंचावत राहील, नोकरीच्या निमित्ताने प्रवास होत राहतील आणि त्यायोगे बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती देखील संभवते. काहींना प्रमोशन मिळण्याचे देखील योग आहेत. एकंदरीत हा महिना नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
सिंह :गुरु सिंह राशीत, सिंह राशीचा स्वामी रवितृतीयात, बुध-रवि तृतीयातच ह्यामुळे शरीर प्रकृतीविषयी कोणतीही काळजी राहाणार नाही. द्वितीय स्थानातील तीन ग्रह मंगळ, शुक्र, राहू आर्थिक लाभासाठी उत्तमच आहेत, त्यातल्या त्यात ज्यांचा संबंध कम्युनिकेशन, व्याख्याने आणि शिक्षण खाते ह्याच्याशी आहे अश्यांना विशेष लाभदायक आहे. चतुर्थातील शनि, वृश्चिकेतील मंगळ आणि तृतीयातील रवि थोडाफार प्रवास दाखवत आहेत. पंचमेश गुरु प्रथम भावात असल्याने मुलांशी सलोख्याचे संबंध राहतील, तसेच त्यांच्या शिक्षणाबाबत चिंता राहणार नाही. षष्ठेश शनि चतुर्थात व रवि तृतीयात त्यामुळे जुन्या दुखण्यांचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे, पण रविमुळे परिस्थिती आटोक्यात राहील. काळजीचे कारण नाही. सप्तमेश शनि जोडीदाराशी किरकोळ मतभेदाचे प्रसंग आणण्याची शक्यता आहे. नवमेश मंगळ द्वितीयात आणि रवि तृतीयात प्रवास घडवून येण्यास पुष्टी देतात. दशमेश शुक्र द्वितीय स्थानी व रवि तृतीय स्थानी त्यामुळे नोकरी अगर व्यवसायातील लोकांना प्रमोशन व आर्थिक लाभाची शक्यता आहे, तसेच कामाच्या निमित्ताने प्रवास देखील घडतील. एकंदरीत सिंह राशीला हा महिना चांगला आहे.
कन्या :तीन ग्रह, मंगळ, राहू व शुक्र कन्या राशीत व कन्या राशीचा स्वामी बुध द्वितीय स्थानी तसेच तो दशमेश असल्याने शरीर प्रकृती तर सुदृढ राहीलच, याशिवाय तुमचा सामाजिक दर्जा देखील उंचावण्याची शक्यता आहे. द्वितीयातील रवि व बुध आर्थिकदृष्ट्या चांगलेच आहेत, आर्थिक लाभ करून देतीलच. तृतीयेश मंगळ लग्नी व रवि द्वितीय स्थानी त्यामुळे तृतीय स्थानाच्या माध्यमातून म्हणजेच पुस्कात विक्रेते आणि ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अश्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. ह्या महिन्यात घरासंबंधी थोडाफार खर्च करावा लागेल असे दिसते. पंचमेश शनि तृतीय स्थानी असल्याने मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळजी नसावी. सप्तम स्थानी केतू व सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी असल्याने जोडीदारापासून काही काळ लांब राहण्याचे योग आहेत. अष्टमेश मंगळ लग्नी आणि रवि द्वितीय स्थानी. द्वितीय स्थान मारक स्थान असल्याने व अष्टमेश मंगळ लग्नी असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. नवमेश शुक्र लग्नी व रवि द्वितीय स्थानी त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना सफलता मिळेल. लाभेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तिथेच असल्याने बऱ्याच लोकांना आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकुणात हा महिना अतिशय उत्तम जाईल असे दिसते.
तूळ :तूळ राशीचा स्वामी शुक्रबाराव्या स्थानी आणि रवि प्रथम स्थानी ह्यामुळे २-३ गोष्टी संभवतात. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग आहेत.काही लोकांना जर धन स्थान उत्तम असल्यास, परदेशातून नोकरी अगर व्यवसायाद्वारे पैसा मिळण्याची शक्यता आहे. शरीर प्रकृती विषयी काळजी नसावी, जरी शुक्र बाराव्या स्थानी असला तरी रवि प्रथम व गुरु लाभ स्थानी आहे. द्वितीयातील शनि काही प्रमाणात आर्थिक अडचण निर्माण करेल असे दिसते. तृतीयेश गुरु लाभात, शुक्र बाराव्या स्थानी ह्या योगात तुम्ही गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल असे दिसते. मात्र योग्य ठिकाणीच गुंतवणूक होईल ह्याची खबरदारी घ्यावी. चतुर्थेश शनि द्वितीयात आणि रवि लग्नी कुटुंबासाठी अगर घरासाठी बराच खर्च होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ चांगलाच आहे. सप्तमेश मंगळ बाराव्या स्थानी व रवि लग्नी ह्यामुळे जोडीदार लांबच्या प्रवासास जाण्याची शक्यता आहे. दशमेश चंद्र सुरुवातीला दशमात व गुरु लाभात असल्याने महिन्याच्या सुरुवातीला आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे.एकुणात महिना उत्तम राहील.
वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळलाभात, रवि महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्याच राशीत आणि राहू देखील लाभात त्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील व कामात तुमचा उत्साह देखील चांगलाच राहील. फक्त शनि तुमच्याच राशीत आणि पहिल्या पंधरवड्यात रवि बाराव्या स्थानी त्यामुळे काही लोकांची जुनी दुखणी उद्भवण्याची शक्यता आहे. द्वितीयेश गुरु दशमात व शुक्र लाभात ह्यामुळे आर्थिकदृष्ट्या लाभदायक काळ आहे हे निश्चित! पंचमेश गुरु दशमात व शुक्र लाभात आणि शनि तुमच्याच राशीत हे योग प्रथमदर्शनी जरी लाभदायक वाटले तरी शक्यतो शेअर ब्रोकर्सनी व्यवहार जपूनच करावेत. मुलांच्या शाळेतील व अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. सप्तमेश शुक्र लाभात असल्याने जोडीदाराशी सुखसंवाद होतील. नवमेश चंद्र नवमातच असून बुध बाराव्या स्थानी आहे. त्यामुळे काही लोकांना महिन्याच्या सुरुवातीलाच परदेशगमनाचे अगर लांबच्या प्रवासाचे योग दिसत आहेत. नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम आहे, आर्थिक लाभ चांगलेच होतील. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीला चांगलाच आहे.
धनु :धनु राशीचा स्वामी गुरुनवमात, शुक्र दशमात आणि शनि बाराव्यात त्यामुळे कामासंबंधी प्रवास घडण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी आणि रवि पण महिन्याच्या उत्तरार्धात बाराव्या स्थानी त्यामुळे खिशाला कात्री लागण्याची शक्यता जास्त! तृतीयेश शनि देखील बाराव्या स्थानी आणि रवि देखील बाराव्या स्थानी येत असल्यामुळे उत्तरार्धात प्रवासाची शक्यता वाढत आहे. पंचमेश मंगळ दशमात त्यामुळे मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. सप्तमेश बुध लाभात आहे त्यामुळे जोडीदाराशी संवाद सुखाचे राहतील. महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात चंद्र व बुध लाभात असल्याने मानसिक ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. दशमात मंगळ, शुक्र, राहू हे तीन ग्रह व दशमेश बुध लाभात आणि महिन्याच्या पूर्वार्धात रवि पण लाभात ह्या ग्रहस्थितीमुळे निश्चितच धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ तसेच पदोन्नती किंवा कामाची विशेष दखल घेतली जाणे ह्या पैकी काहीतरी निश्चितपणे संभवते. एकंदरीत हा महिना धनु राशीसाठी सर्व दृष्टींनी उत्तम आहे.
मकर :मकर राशीचा स्वामी शनिलाभात व रवि दशमात त्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान अगर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शनि असल्यामुळे आर्थिक लाभ देखील बऱ्यापैकी होतील. तृतीयेश गुरु अष्टमात व शुक्र नवमात बऱ्याच लोकांना धार्मिक स्थळी प्रवास होण्याची शक्यता आहे. चतुर्थेश मंगळ नवम स्थानी, रवि दशम स्थानी व राहू देखील नवमात ह्यामुळे घरात मंगल कार्य अगर धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. पंचमातील योग मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगतीच्या दृष्टीने चांगले आहेत. सप्तमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला सप्तमातच त्यामुळे जोडीदाराशी सुखसंवादात चंद्राच्या कलेप्रमाणे फरक पडेल. दशमात रवि व बुध हे दोन ग्रह, राहू नवमात त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ त्यांच्या प्रमोशनच्या दृष्टीने चांगलाच आहे, तसेच पीएच. डी. करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फलदायक आहे. लाभातील शनि अनेक प्रकारचे फायदे मिळवून देईल. एकुणात हा महिना बऱ्याच अंशी उत्तम आहे.
कुंभ :कुंभ राशीचा स्वामी शनिदशमात वृश्चिक राशीत आणि रवि नवमात त्यामुळे शरीर प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही. तसेच तुमचा उत्साह देखील चांगला राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व शुक्र अष्टमात त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आर्थिक व्यवहार जपून करावेत. तृतीयेश मंगळ अष्टमात व महिन्याच्या उत्तरार्धात रवि दशमात हा योग तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या तब्येतीची काळजी घ्यायला लावेल. तसेच तुमच्या देखील प्रवासात अडचणी येण्याचा संभव आहे. वाहने चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. पंचमेश बुध नवमात व राहू अष्टमात मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायला लावतील. गुरु सप्तमात, शुक्र अष्टमात आणि शनि दशमात ह्या योगामुळे तुमच्या कार्य व्यस्ततेमुळे जोडीदाराशी फारसे संवाद होणार नाहीत. दशमात शनि आणि महिन्याच्या उत्तरार्धात दशमातच येणारा रवि हा योग नोकरीसाठी अतिशय उत्तम आहे. एकंदरीत हा महिना कुंभ राशीला संमिश्र फळे देईल असे दिसते.
मीन :मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात आणि शुक्र सप्तमात असल्याने प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. द्वितीयेश मंगळ सप्तमात आर्थिक व्यवहार जपून करण्याचे सुचवतो. तृतीयेश शुक्र सप्तमात आणि राहू देखील सप्तमातच असल्याने प्रवास शक्यतो टाळावेत, अडचणी येण्याची शक्यता आहे. चतुर्थेश बुध अष्टमात असल्याने वाहने चालवताना खबरदारी घ्यावी. शेअर ब्रोकिंग चा व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सप्तमात मंगळ, शुक्र व राहू हे तीन ग्रह हा योग नोकरी करणाऱ्या जोडीदाराच्या आर्थिक लाभासाठी कारणीभूत होईल. दशमेश गुरु षष्ठात असल्याने नोकरी करणाऱ्यांना थोड्याफार आर्थिक लाभाचे योग आहेत. लाभेश शनि नवमात असल्याने नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांबरोबर सलोख्याचे धोरण ठेवावे. एकंदरीत हा महिना मीन राशीला संमिश्र आहे.

Wednesday, 30 September 2015

राशिभविष्य ऑक्टोबर २०१५

राशिभविष्य ऑक्टोबर २०१५
( खालील राशी भविष्य Astrology Counselling तर्फे देण्यात आलेली आहेत.)
राशी भविष्य
ऑक्टोबर २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी लग्न रास व जन्मरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत व समन्वय साधावा .

समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील ग्रहमान :
रवि कन्येत १८ ऑक्टोबर पर्यंत नंतर तुळेत ,मंगळ सिंहेत ,बुध(व) कन्येत,गुरु सिंहेत ,शुक्र सिंहेत,शनि वृश्चिक राशीत , राहू कन्येत ,केतू मीन राशीत.
मेष : ह्या महिन्यात प्रकृती चांगली राहील. द्वितीय भावाचा सबंध पंचम भावाशी तसेच बाराव्या भावाशी येत असल्यामुळे मनोरंजनाकरता खर्च होईल त्यातल्या त्यात द्वितीयातील चंद्र काहीतरी अनपेक्षित लाभ मिळवून देईल . कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील . पंचमात मंगळ,गुरु व शुक्र आहेत त्यामुळे मुलांच्या दृष्टीने काळजी करायाची गरज नाही .शेयर्स मध्ये गुतंवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे . षष्ठात बुध , रवि व राहू त्यामुळे आर्थिक बाजू उत्तम राहील . जोडीदाराकरता खरेदी कराल .अध्यात्माची आवड असणाऱ्यांना चांगला काळ आहे .नोकरी /व्यावसायिकांना कामाचा ताण राहील परंतु लाभ देखील होतील . एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
वृषभ : वृषभेचा स्वामी शुक्र चतुर्थात व केतू लाभात व गुरु पण चतुर्थात त्यामुळे घरात जास्त रमाल व आनंदी राहाल. द्वितीयेश बुध पंचमात व रवि पण पंचमात त्यामुळे पंचामाशी सबंधित व्यवसाय उदा . शेयर्स इ. जपुन करावेत . महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तृतीयेश चंद्र तृतीयात असल्याने अनेकाना प्रवास घडतील. चतुर्थात तीन ग्रह मंगळ ,गुरु,शुक्र . गुरु लाभेश व शुक्राच्या नक्षत्रात त्यामुळे घरासंबंधी काही लाभदायक घटना घडेल. घरासबंधी खरेदी/विक्री चे व्यवहार मनासारखे होतील. पंचमेश बुध पंचमात रवि पंचमात त्यामुळे मुलांच्या दृष्टीने उत्तम आहे . करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल . शिक्षण क्षेत्राशी सबंधित लोकांना लाभदायक काळ आहे. त्यातून रवि पण महिन्याच्या उत्तरार्धात षष्ठात जात आहे त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळत आहे . शनि सप्तमात व सप्तमेश मंगळ चतुर्थात व केतू लाभात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. वाहने जपून चालवावीत . व्यावसायिकांसाठी विशेषत: बिल्डर्स ला काळ चांगला आहे . एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
मिथुन : प्रकृती चांगली राहील . द्वितीयेश चंद्र प्रथम भावात त्यामुळे पहिल्या आठवड्यात आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे .तृतीयात तीन ग्रह असल्याने भरपूर उत्साह राहील. प्रवासाचे पण योग आहेत . भावंडांच्या गाठीभेटी होतील . घरगुती बाबतीत बराच रस घ्याल .पंचमेश शुक्र तृतीयात व केतू दशमात व दशमेश गुरु तृतीयात त्यामुळे कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्या संधी मिळतील. त्याबरोबर प्रसिद्धी पण मिळेल. जोडीदाराबरोबर शक्यतो वाद होणार नाहीत असे बघावे .नोकरी/व्यवसाय करणार्यांना हा काळ चांगला जाईल . हा महिना एकंदरीत लाभदायक आहे .

कर्क : हा महिना प्रकृतीच्या दृष्टीने चांगला राहील परंतु खाण्यापिण्यावर मात्र संयम ठेवावा . द्वितीयात तीन ग्रह असल्याने आर्थिक लाभ नक्की होतील .व्ययेश बुध तृतीयात व रवि पण तृतिय स्थानी त्यामुळे प्रवास होण्याची शक्यता आहे . चतुर्थेश शुक्र द्वितीयात . कुटुंबातील वातावरण आनंदी राहील .पाहुणे येण्याची शक्यता आहे . विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. षष्ठेश गुरु द्वितियात व शुक्र पण धनात, शुक्र लाभेश पण आहेच त्यामुळे आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील . नोकरी करणार्यांना हा महिना चांगला जाईल . एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम जाईल.
सिंह : प्रथम भावात मंगळ तसेच पंचमेश गुरु पण लग्नी त्यामुळे प्रकृती चांगली राहील . द्वितीयात रवि,राहू,बुध असल्याने आर्थिक लाभ चांगले होतील . प्रवासात काळजी घ्यावी . घरगुती वातावरण चांगले राहील . मुलांच्या दृष्टीने महिना चांगला आहे . वाहने जपून चालवावीत . खर्चाचे प्रमाण वाढते राहील असे दिसते . जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. अध्यात्मिक गोष्टींसाठी हा महिना उत्तम आहे . नोकरी/व्यवसायात कामाचा ताण जाणवेल परंतु काम समाधानकारक होईल. एकंदरीत हा महिना चांगला आहे .
कन्या : रवि, बुध, राहू तीन गृह तुमच्या राशीत असल्याने प्रकृति काळजी राहणार नाही. कामात तुमचा उत्साह भरपूर जाणवेल. द्वितीयेश शुक्र बाराव्या स्थानी गुरु पण तिथेच त्यामुळे खर्चाचे प्रमाण जास्त राहील असे वाटते. तृतीयातील शनी प्रवास देईल त्याप्रमाणे लेखकांना पण बरेच विषय सुचतील व त्याबद्दल लिखाण पण होईल. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी, व तिथेच शुक्र, मंगळ. बारावे स्थान फारच बलवान झाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेता येईल. अन्यथा नुकसान, मनःस्ताप तर ह्या भावाचा स्थायी भाव आहेच. उदा: शेयर व्यावसायिक यांना हा काळ गुंतवणूक, घर विक्री, परदेश प्रवास व नोकरी या मार्गांद्वारे फायदा करून घेता येईल. मुलाबाळांना महिना उत्तम आहे. दशमेश बुध लग्नी रवि तिथेच व शुक्र बाराव्या स्थानी हा योग परदेशात नोकरी व्यवसाय यांना उत्तम आहे. केलेल्या कामाची दाखल घेतली जाईल. सर्वसाधारण हा महिना चांगलाच आहे.
तूळ: तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभात केतू षष्ठात व शनी द्वितीयात मारक स्थानी शारीरिक त्रास अगर आजार होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश मंगळ लाभात केतू षष्ठात आर्थिक लाभ देण्यास समर्थ आहेत, त्याबरोबर द्वितीयातील शनि खर्च वाढवेल. तृतीयेश गुरु लाभात शक्र तिथेच लेखक, गुरुजन ई . मंडळींना लाभदायक काळ आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखे काही दिसत नाही. षष्ठेश गुरु लाभात, षष्ठात केतू मीनेत, हे सर्व योग आर्थिक लाभास उत्तम आहेत. (एखादी बँक रेंटल वर घ्यावयाला हरकत नाही ). जोडीदाराशी थोडे जमूघ्यावे असे वाटते. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरवातीला नवमात
वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ दशमात, केतू पंचमात कलाकारांना हा काळ उत्तम आहे. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने पण काळजीचे कारण नाही. शनि देखील तुमच्याच राशीत आणि बुध लाभात प्रकृती उत्तम ठेवणारे योग आहेत. कलाकारांनी ह्या पर्वणीचा फायदा घ्यावा. द्वितीयेश गुरु दशमात, शुक्र तिथेच नोकरी संदर्भात देखील हा काळ उत्तम असून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.तृतीयेश शनि प्रथमात व बुध दशमात हा काळ प्रवासाला उत्तम आहे. तसेच बुकसेलर्स अगर फिरतीचे व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या उत्तम काळ आहे. चतुर्थेश शनि असल्याने विद्यार्थ्यांना देखील हा काळ उत्तम आहे. पंचम स्थान व दशम स्थान ह्यांचा योग असल्याने कलाकारांना उत्तम संधी आहे, तरी ह्याचा कलाप्रदर्शनासाठी योग्य उपयोग करून घ्यावा. सप्तमेश दशमात व शुक्र पंचमात जोडीदाराबरोबर सुखसंवाद राहतील. अष्टमेश बुध लाभात व महिन्याच्या सुरुवातीला चंद्र अष्टमात त्यामुळे कामातील ताण जास्त जाणवेल. पण दशमातील इतर ग्रह तुमचे काम सुरळीत होण्यास मदत करतील. भाग्येश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात असल्याने त्याकाळात थोडी निराशा जाणवण्याची शक्यता आहे. दशम व लाभ स्थानातील ग्रहयोग नोकरी अगर व्यवसायात तुमचा दर्जा उंचावत ठेवतील, काहींना प्रमोशन देखील मिळेल. एकंदरीत वृश्चिक राशीला महिना उत्तम आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात असून मंगळ व शुक्र तिथेच आहेत. शरीर प्रकृती उत्तम राहील. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व बुध दशमात ह्यामुळे परदेशात नोकरी करणाऱ्यांना हा काळ आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. तृतीयेश शनि बाराव्या स्थानी असल्यामुळे वरील गोष्टीस पुष्टी मिळते. चतुर्थेश गुरु नवमात असल्याने पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी देखील उत्तम काळ आहे. पंचमेश मंगळ नवमात शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, पण पंचमेश नवमात भाग्य स्थानी असल्याने कलाकारांसाठी हा योग चांगला आहे. सप्तमेश बुध दशमात असल्याने जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. पहिल्या पंधरवड्यात नवमेश रवि दशमात व नंतर तो लाभात ह्या दोन्ही ग्रहस्थिती नवम स्थानाच्या दृष्टीने उत्तम आहेत. दशमेश बुध दशमातच वक्री पण तो ९ ऑक्टोबरला मार्गी होत असल्याने त्यानंतरचा काळ नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहे.लाभेश शुक्र नवमात व केतू पंचमात त्यामुळे कलाकार, खेळाडू ह्यांना उत्तम काळ आहे. एकंदरीत धनु राशीला हा महिना उत्तम आहे.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी व बुध नवम स्थानी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजी नसावी. द्वितीयेश देखील शनि लाभतच असल्याने बऱ्याच लोकांना धनलाभाची शक्यता आहे, विशेषत: ज्यांचा संबंध धार्मिक कार्ये किवा शिक्षण क्षेत्राशी असेल त्यांना लाभदायक महिना आहे. तृतीयेश गुरु अष्टमात प्रवासात काळजी घेण्याचे सुचवतो. चतुर्थेश मंगळ अष्टमात घरासंबंधी थोडा खर्च अगर काही अडचणी दाखवतो. तसेच वाहन देखील जपून चालवणे इष्ट आहे. पंचमेश शुक्र अष्टमात शेअरचे व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा नुकसान संभवते. तसेच मुलाबाळांकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. षष्ठेश बुध नवमात व पहिल्या पंधरवड्यात रवि देखील नवमात त्यामुळे दुसरा पंधरवडा (रवि दशमात जाईल) नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर राहील. सप्तमेश चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात षष्ठात आहे, त्यामुळे जोडीदाराशी जमवून घेणे इष्ट, नाहीतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता! अष्टमात तीन ग्रह मंगळ, गुरु आणि शुक्र त्यामुळे कामाचा व्याप व ताण वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पंधरवड्यात रवि दशमात पण अष्टमात तीन ग्रह असल्याने सरकारी नोकरी करणाऱ्यांना कामाचा विशेष ताण जाणवेल. लाभातील शनि त्यातल्या त्यात बरेचसे फायदे मिळवून देईल. एकंदरीत मकर राशीला हा महिना संमिश्र स्वरूपाचा असून सर्व बाबतीत लक्षपूर्वक निर्णय घेणे जरुरीचे आहे.
कुंभ : कुंभेचा स्वामी शनी दशमात प्रकृतीच्या दृष्टीने काही त्रास वाटत नाहीत . द्वितीयेश गुरु सप्तमात त्यामुळे भागीदारीतून फायदा होईल . तृतीयेश मंगळ सप्तमात असल्याने नवीन ओळखी होऊन त्यातुन फायदा होईल. चतुर्थेश शुक्र सप्तमात असल्याने घर / इस्टेट घेताना सर्व कायदेशीर बाबी निट तपासाव्यात अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे . शिक्षणाच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात . शेयर्स चा व्यवसाय असणाऱ्यांनी व्यवहार जपून करावेत नुकसान होण्याची शक्यता आहे . जोडीदाराला आर्थिक लाभ होतील . व्यावसायिकांना हा महिना चांगला राहिल. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील.
मीन : षष्ठात मंगळ, गुरु , शुक्र . प्रथमेश गुरु षष्ठात व प्रथम भावात केतू तसेच महिन्याच्या मध्यात रवी अष्टमात जाईल त्यामुळे प्रकृतीविषयी काळजी घ्यावी . प्रथमातील केतू व नवामातील शनी तुम्हाला अंतर्मुख करेल . द्वितीयेश मंगळ षष्ठात लाभेश गुरु षष्ठात तसेच शुक्र पण षष्ठ भावात आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत महिना चांगला राहील. प्रकाशक ,पुस्तक विक्रेते ह्यांना आर्थिक आवक चांगली राहील. येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करावा म्हणजे त्यांना यश मिळेल . घरा संबंधी व्यवहार जपून करावेत . जोडीदाराशी सबंध चांगले राहतील.ह्या महिन्यात थोडा मानसिक ताण राहील. दशमेश गुरु षष्ठ भावात त्यामुळे नोकरी करणार्यांना महिना चांगला जाईल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक संस्थाशी सबंधित असलेल्या लोकांना तसेच प्रवासाशी संबंधी व्यवसायिकांना आर्थिक लाभ होतील. ह्या महिन्यात प्रवासाचे योग आहेत . एकंदरीत महिना संमिश्र राहील.

Friday, 4 September 2015

राशिभविष्य सप्टेंबर २०१५

राशिभविष्य सप्टेंबर २०१५
( खालील राशी भविष्य Astrology Counselling तर्फे देण्यात आलेली आहेत.)
राशी भविष्य
सप्टेंबर २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी लग्न रास व जन्मरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत व समन्वय साधावा .
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
ह्या महिन्यातील ग्रहमान  :
रवि सिंहेत १७ सप्टेंबर नंतर कन्येत,मंगळ कर्केत १६ सप्टेंबर पासून सिंहेत ,बुध कन्येत,गुरु सिंहेत ,शुक्र वक्री ६ सप्टेंबर पर्यंत कर्केत नंतर मार्गी होत आहे ,शनि वृश्चिक राशीत , राहू कन्येत ,केतू मीन राशीत. 
मेष : या महिन्याच्या सुरवातीला चंद्र मेषेला, राशी स्वामी मंगळ चतुर्थात बुध षष्ठात आहे. हे ग्रह योग घर अगर फ्लॅट विकण्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. कलाकारांना पण हा काळ छान आहे. आजोळच्या नातेवाईकांना भेटायचा योग येणार असे दिसते , त्या तयारीत राहा. द्वितीयेश शुक्र चतुर्थात व बुध षष्ठात आर्थिक लाभ मिळवून देतील असे वाटते. पंचमातील रवि, गुरु मुलांचा अभ्यास अगर शाळाप्रवेश समाधानकारक राहतील. काही मोठ्या मुलांना कदाचित जवळच्या शहरात हॉस्टलवर राहण्याचे योग आहेत. सप्तमेश शुक्र चतुर्थात, बुध षष्ठात, काही लोकांच्या बाबतीत घर अगर तत्सम गोष्टीत जोडीदाराशी चर्चा किंवा थोडा विसंवाद होण्याची शक्यता आहे. सतरा तारखेनंतर रवि कन्येत जात आहे. षष्ठात तीन ग्रह आल्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी असे ग्रहयोग सुचवीत आहेत. अष्टमातील शनि व द्वाद्शातील केतू हेच सुचवीत आहेत. त्यातल्यात्यात पंचमातील गुरु हि जमे ची बाजू आहे. दशम व लाभ या दोन्ही भावांचा स्वामी शनि अष्टमात, नोकरी अगर व्यावसायिक त्रासदायक होईल असे वाटते. पण त्याबरोबर मंगळ चतुर्थात, बुध षष्ठात, तारीख सतरा नंतर रवि पण तिथेच हे योग आर्थिक घडामोडी थोड्याफार मनाप्रमाणे घडवून देतील असे पण वाटते. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे....
वृषभ : वृषभ राशीचा शुक्र तृतीयात वक्री आहे. त्यामुळे प्रवास विषयक बऱ्याच गोष्टी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रकृति संबंधी फारसे काळजी करण्यासारखे काही नाही. द्वितीयेश बुध पंचमात, चंद्राच्या भ्रमणानुसार शेअर व्यसायीकांना बरेच चढ उताराला सामोरे जावे लागणार असे दिसत. तरी व्यवहार जपूनच करावेत. तृतीयात मंगळ, पंचमात बुध ज्योतिष अगर तत्सम विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना काळ चांगला आहे. चतुर्थातील रवि, गुरु घरातील वातावरण समाधानी व आनंदी ठेवतील. मुलाबाळांचा अभ्यास व इतर गोष्टी व्यवस्थित चालतील. जोडीदाराशी थोडे फार वाद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. नवमेश, दशमेश शनि सप्तमात, नोकरी करणारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल असे वाटते. सर्वसाधरणपणे हा महिना ठीक जाईल.
मिथुन : या राशीचा स्वामी बुध चतुर्थात स्वतःच्याच राशीत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच प्रकृति पण छान राहील. द्वितीयात मंगळ, शुक्र व चंद्र लाभात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक प्राप्ती देणार असे ग्रह आहेत. तृतियात रवि, गुरु व दृष्टी नवमात. तुम्हाला एकंदरीत भरपूर उत्साह जाणवेल. शुक्र वक्री असला तरी थोडे फार प्रवास, नातलगांच्या भेटी इत्यादी नक्कीच होतील असे वाटते. पंचमेश शुक्र द्वितीयात व बुध चतुर्थात, अभ्यासाच्या बाबतीत उत्तम आहेत, पण वक्री शुक्राचा त्रास जाणवेल. बुध चतुर्थात असल्याने प्रेमिजनांनी सध्या काही काळ भेटी गाठी पुढे ढकलाव्यात असे वाटते. षष्ठेश मंगळ द्वितीयात मारक स्थानात, बुध चतुर्थात, शनि षष्ठात वयस्क मंडळींना दुखण्याचा थोडा फार त्रास होईल असे दिसते. सप्तमेश गुरु त्तृतियात, केतू दशमात व शनि षष्ठात जोडीदार (विशेष करून नवरे) कामानिमित्त लांब राहतील असे वाटते. एकंदरीत हा महिना तसा काही गोष्टी वगळता बऱ्यापैकी छान आहे.
कर्क : महिन्याच्या सुरुवातीला या राशीचा स्वामी चंद्र दशमात व मंगळ प्रथम स्थानी, दशमातून चंद्र-मंगळ लक्ष्मी योग करत आहेत. त्यामुळे काही लोकांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहील. रवि महिन्याच्या मध्यापर्यंत द्वितीयातून तृतीयात जाईल. द्वितीयातील गुरु आणि दशमातील चंद्र हा योग देखील आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम आहे. तृतीयात कन्येचा स्वराशीतील बुध, राहू तिथेच त्यामुळे १५ तारखेनंतर निश्चितच प्रवासाचे योग दिसत आहेत. पंचमेश मंगळ लग्नी व बुध तृतीयात त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला आहे. शेअर ब्रोकर्सना हा काळ संमिश्र फळे देणारा आहे. ज्यांना मैदानी खेळाची आवड आहे, अश्या व्यक्तींना हा काळ मात्र फलदायी आहे. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी, केतू नवमात आणि शनि पंचमात हा योग बँकेतून कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक होईल असे वाटते. कर्ज वगळता इतर आर्थिक प्राप्तीसाठी मात्र उत्तम काळ आहे. सप्तमेश शनि पंचमात असल्याने जोडीदाराशी संबंध खेळीमेळीचे राहतील. दशमेश मंगळ प्रथमात आणि बुध तृतीयात ह्यामुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल किंवा काहींना प्रमोशन पण मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना कर्क राशीसाठी उत्तम आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि १६ सप्टेंबर पर्यंत तुमच्याच राशीत असून शुक्र द्वादश स्थानी वक्री आहे. त्यामुळे तुमची बरीचशी कामे रेगाळतील असे वाटते. मनाला उभारी राहणार नाही. १४ सप्टेबर नंतर मात्र परीस्थितित बदल घडेल व उत्साहवर्धक कार्यकाल सुरु होईल. १७ सप्टेंबरला रवि कन्या राशीत प्रवेश करील तेंव्हा थोडी फार आर्थिक मिळकत होईल, पण खर्चाचा वाटा देखील वाढतील असे दिसते. तेंव्हा  व्यवहार जपून करावेत. त्रीतीयातील चंद्र काही लोकांना परदेशी जाण्याचा योग आणेल असे वाटते. ज्यांना नवीन घर बुक करायचे त्यांनी आत्ताच विचार करावा, नंतर बुध वक्री झाल्यावर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुला बाळांचा अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित आहे. घरगुती वातावरण नरम गरम राहील असे वाटते. दशमेश ७ तारखेनंतर मार्गी झाल्यावर नोकरी संदर्भात चांगली फळे देईल. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध कन्येत असून राहू पण कन्येतच आहे . रवि १७ तारखेनंतर कान्येतच येत आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील . आर्थिक लाभ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे .लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे . कलाकार मंडळीना कला सादर करण्याच्या दृष्टीने चांगले योग आहेत .मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे . शेयर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधतेने व्यवहार करावेत . जोडीदाराला प्रवास योग आहेत . सरकारी नोकरांना आर्थिक लाभ होतील . दशमेश बुध प्रथमात तसेच १७ तारखेनंतर रवि पण प्रथम भावात त्यामुळे सरकारी नोकरांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे . एकंदरीत महिना चांगला जाईल.
तूळ : प्रथमेश शुक्र दशमात ,रवि,मंगळ, गुरु लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील .ह्या महिन्यात आर्थिक लाभ चांगले होतील . लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे.नातेवाईकांच्या भेटी होतील .शेयर्स चा व्यवसाय असणार्यांना महिना थोडा लाभ मिळवून देईल. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे.नोकरी/व्यवासायानिमित्त परदेश प्रवास होईल. एकंदरीत हा महिंना आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे.
वृश्चिक : प्रथमेश मंगळ नवमात व बुध लाभात असल्याने प्रकृती चांगली राहील. भावंडांच्या गाठीभेटी होतील ,दिवस छान जातील. कलाकारांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे . बर्याच संधी चालून येतील.नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा महिना कामाच्या दृष्टीने गडबडीचा राहील. जोडीदाराशी सबंध चांगले राह्तील .ज्या लोकांची पेन्शन ची कामे आहेत ती पण मार्गी लागतील .लाभेश व अष्टमेश बुध लाभात तसेच राहू पण लाभात आहे त्यामुळे एकंदरीत ह्या महिन्यात अनेक प्रकारचे लाभ होतील असे वाटते .
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु सिंह राशीत नवम भावात आहे. केतू चतुर्थात गुरुच्याच राशीत आहे. प्रकृति संबधी काळजी नसावी. द्वितीयातील शनि खर्चाचे प्रमाण वाढत ठेवील किंवा प्राप्तीच्या संदर्भात असमाधान राहण्याची शक्यता आहे.तृतीयेश शनि बाराव्या स्थानात प्रवास घडेल असे वाटते. चतुर्थेश गुरु नवमात शनि बाराव्यात, काही मंडळींना घर बदलण्याचे योग पण आहेत. पंचमेश मंगळ अष्टमात, बुध दशमात मुलांचे प्रश्न समाधानकारक सुटतील. जोडीदाराबरोबर थोडीफार  कुरबुरी होण्याची शक्यता आहे. दशमभावातील बुध, राहू नोकरीतील तुमचे स्थान बळकट ठेवण्यात मदत करतील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे वाटते.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील . शनि द्वितीयेश पण आहे त्यामुळे आर्थिक लाभ होतील . बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा मनस्ताप किंवा लोक दुखावली जाण्याची शक्यता आहे .विद्यार्थ्यांकरता काळ चांगला आहे . प्रेमात पडलेल्यांनी सबुरीने घ्यावे . शेयर्स चे व्यवहार जपून करावेत . शिक्षक किंवा पौराहित्य करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी किरकोळ वादाची शक्यता आहे . रवि व गुरु अष्टमात त्यामुळे जोडीदाराला आर्थिक लाभ होतील . उच्च शिक्षणाला काळ चांगला आहे . ऑफिस मध्ये मिळते जुळते घ्यावे लागेल . वाहने जपून चालवावीत . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात स्वतःच्याच नक्षत्रात असल्याने तुमच्या कडून प्रकृतीची काळजी दुय्यम ठरू शकते. कारण तुमचे व्यस्त कार्यक्रम. षष्ठातील मंगळ आणि अष्टमातील बुध हाच संदेश देत आहेत. द्वितीयेश गुरु सप्तमात, केतू द्वितीयात आणि शनि दशमात आर्थिक लाभ उत्तम देईल असे वाटते. पंचमेश बुध अष्टमात आणि राहू तिथेच शेअर व्यावसायिकांनी सावधगिरीने खरेदी विक्री करावी असा संदेश हे ग्रह देत आहेत. सप्तमातील रवी, गुरु जोडीदार बरोबर किरकोळ कुबुरी होण्याचे चिन्ह आहेत. दशम व लाभ हि दोन्ही स्थाने व्यावसायिकांच्या द्रिष्टीने चांगली फळे देतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे.
मीन : मीन राशीचा गुरु षष्ठात रवि पण तिथेच व केतू लग्नी हे ग्रहमान प्रकृतीला मारक असू शकतील, तेंव्हा काळजी घ्यावी लागेल. विशेषतः ज्यांना गॅसेसचा त्रास आहे व ब्लडप्रेशर पण आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. द्वितीयेश मंगळ पंचमात व बुध सप्तमात आर्थिक बाबतीत खास नाही. पंचमातील मंगळ प्रकृतीत सुधारणा घडवून आणेल. पंचमातील शुक्र, मंगळ कलाकारांना चांगला आहे. कलेला व्यासपीठ मिळेल असे वाटते. जोडीदाराशी थोडीफार कुरबुरी होण्याचे चान्सेस आहेत असे वाटते. नवमातील शनि मीन राशीच्या लोकांना कुंभ मेळ्याचे पुण्य मिळवून देण्याचे चान्सेस बरेच आहेत. दशमेश गुरु षष्ठात, केतू लग्नात व शनि नवमात हे ग्रहमान कर्तृत्वापेक्षा भाग्याला अधिक महत्व देत आहे. त्यामुळे इतर संसारिक गोष्टीपेक्षा मानसिक समाधान, शांति मिळेल असे वाटते.  एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे म्हणायला हरकत नाही.




Friday, 7 August 2015

गुरु बदल २०१५

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे गुरु १३ जुलै २०१५ ला संध्याकाळी सिंह राशीत प्रवेश करत आहे गुरु  सिंहेत १० ऑगस्ट २०१६ पर्यंत असेल .
गुरु बदलणे म्हणजे काय ह्या साठी आधीच लिहिला आहे .
http://anaghabhade.blogspot.in/2014/06/blog-post.html

गुरु सिंह राशीत मघा , पूर्वा  व उत्तरा ह्या तीन नक्षत्रातून भ्रमण करेल .
मघा नक्षत्रात गुरु सप्टेंबर १३ पर्यंत आहे .
पूर्वा नक्षत्रात सप्टेंबर मध्यापासून नोव्हेबर पर्यंत असेल . त्यानंतर नोव्हेबर पासून जानेवारी पर्यंत उत्तरा नक्षत्रात असेल . ८ जानेवारी ते १० मे २०१६ पर्यंत गुरु वक्री असून तो काही काळ  परत पूर्वा  मध्ये जाईल . १० मे नंतर  मार्गी होऊन ११ ऑगस्ट २०१६ ला कन्येत प्रवेश करेल .
(वरील तारखा ह्या कृष्णमुर्ती पंचांगा नुसार आहेत )

ह्या गुरु भ्रमणाचा प्रत्येक राशीनुसार काय परिणाम होईल ते आता बघुयात .
(अर्थातच ह्या अंदाजात प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तसेच दशा ह्यांचा विचार  नसल्याने  'ढोबळ ' अंदाज असे म्हणता येईल.  ) 

मेष रास : ह्या राशीच्या पंचम भावात सिंह रास येते त्यामुळे गुरु मेषेला पंचम भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मेष राशीच्या लोकांना  गुरु पाचवा आहे असे म्हणतात . पंचम स्थान हे संतती स्थान आहे तसेच शिक्षणाच्या दृष्टीने पण महत्वाचे  स्थान आहे . कला /क्रीडा ह्या गोष्टी पण ह्याच स्थानावरून पहिल्या जातात .शेयर्स सबंधित व्यवहार सुद्धा पंचामावरून पहिले जातात.

 जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत)
तोवर शेअर्स चा व्यवसाय असणार्या लोकानी सावधगिरी बाळगावी .संततीच्या दृष्टीनेने पण हा काळ  फारसा अनुकूल नाही . अध्यात्मिक दृष्ट्या मात्र हा काळ  उत्तम रहिल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ  उत्तम आहे . नोकरी /व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती 'जैसे थे '  अशी राहील . 

जो पर्यंत गुरु पूर्वा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल. )
मेष राशीच्या लोकांना शुक्र द्वितीयेश व सप्तमेश आहे . गुरु जेव्हा पूर्वा नक्षत्रातून म्हणजे शुक्राच्या नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा विवाह इच्छुक लोकांचे विवाह ठरण्यास तसेच प्रेम विवाहासाठी पण अनुकूल काळ आहे . अर्थातच मूळ जन्मपत्रिकेमध्ये तसे योग हवेत . शेअर्स चा व्यवसाय असणार्या लोकांना हा काळ चांगला आहे. जेव्हा गुरु वक्री होऊन पुन्हा पूर्वा  नक्षत्रात येईल तेव्हा पुन्हा मंदी जाणवेल .
.
 जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
कला/क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम काळ  आहे त्यांना प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने हा चांगला काळ आहे  . मुलांच्या दृष्टीने पण चांगला काळ आहे . १८ फेब्रुवारी नंतर परत गुरु पूर्वा नक्षत्रात जात असल्याने सर्व बाबतीत कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे . १०  मे नंतर जेव्हा गुरु मार्गी होईल तेव्हा सर्व कामे मार्गी लागतील .

वृषभ रास : ह्या राशीच्या चतुर्थ भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु वृषभ राशीच्या लोकांच्या चतुर्थ भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ वृषभ राशीच्या लोकांना  गुरु चौथा  आहे असे म्हणतात . चतुर्थ स्थानावरून शिक्षण , मातृसौख्य ,घर , वाहन इ. गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या स्थानातील गुरु अनुकूल आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत)
घर / वाहन खरेदीच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ आहे . विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने तसेच अभ्यासाच्या दृष्टीने  हि ग्रहस्थिती चांगली आहे . शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांच्या दृष्टीने चांगला काळ आहे . १४ जुलै २०१५ ते ३ ऑगस्ट २०१५ पर्यंतचा काळ घर/वाहन  तसेच फर्निचर इ. गोष्टी घेण्यासाठी उत्तम आहे .

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ह्या काळात नातेवाईकांशी गाठी भेटी होतील .इंटिरियर डीझायनर असणाऱ्या व्यावसायीकांची भरभराट होईल.
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल . इतर योगांची साथ असेल तर जमीन /घर विक्रीत फायदा होईल ..

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
गुरु उत्तरा नक्षत्रात म्हणजे रवीच्या नक्षत्रात आहे . वृषभ राशीच्या लोकांना चंद्र  कुंडली  प्रंमाणे रवि चतुर्थेश आहे . तसेच गुरु सिंह राशीत म्हणजे चतुर्थातच आहे . त्यामुळे चतुर्थ भावाशी सबंधित असलेली फळे प्रामुख्याने चांगली मिळतील . उदा . शिक्षण , मातृसौख्य ,घर , वाहन इ.

मिथुन रास : ह्या राशीच्या तृतिय भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मिथुन राशीच्या लोकांच्या तृतिय भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मिथुन राशीच्या लोकांना  गुरु तिसरा  आहे असे म्हणतात . तृतिय  स्थानावरून  छोटे प्रवास ,लेखन ,प्रकाशन ,प्रसिद्धी (अर्थातच प्रत्येकाच्या पत्रिकेच्या दर्जावर अवलंबून राहील ) इ. गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या स्थानातील गुरु अनुकूल आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत (सप्टेंबर १३ पर्यंत):
लेखक, प्रकाशक ,वक्ते , consultants इ. व्यावसायिकांना उत्तम आहे . बर्याच कामांमध्ये व्यस्त राहतील . काही प्रमाणात प्रसिद्धीचे पण योग आहेत .कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ह्या काळात प्रवासाचे योग आहेत . ज्या कलाकारांना विविध ठिकाणी जाऊन आपली कला प्रदर्शित करायची असते अशा लोकांनी जास्तीत जास्त प्रवास करावा /घडेल .जे लोक agency मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असतील त्याचे काम ह्या काळात होऊ शकेल . विशेषत: सौदर्य प्रसाधने , कपडे  , सुगंधी द्रव्ये इ.ज्यांनी नोकरीसाठी परदेशात अर्ज केला असेल त्यांचेही काम होईल .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
ह्या काळात लेखक,प्रकाशक,वक्ते , consultants ,स्टेशनरी विक्रेते ,प्रवासी संस्था इ. व्यावसायिकांना त्यांच्या कामातून चांगली धनप्राप्ती होण्याचे योग आहेत .ह्या काळात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. धाकट्या भावंडांच्या गाठी भेटी होतील .

कर्क रास : ह्या राशीच्या द्वितीय भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कर्क राशीच्या लोकांच्या द्वितीय भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कर्क राशीच्या लोकांना  गुरु दुसरा आहे असे म्हणतात .द्वितीय भावावरून कुटुंब वृद्धी ,धन वृद्धी बघतात तसेच हे पत्रिकेतील एक मारक स्थान पण आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
धार्मिक संस्था तसेच शिक्षण ,संशोधन ह्या क्षेत्रातील लोकांसाठी हा गुरु फायद्याचा राहील . तसेच वडिलांकडून सुद्धा धनलाभ होण्याची शक्यता आहे . काही लोकांना नोकरी/व्यवसायासबंधी लांबचे प्रवास घडतील.


जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
उच्च शिक्षण घेणार्यासाठी इथला गुरु अनुकूल आहे .तसेच इस्टेट agent,बिल्डर्स  करता सुद्धा हा गुरु चांगला आहे . ह्या काळात मातृसौख्य चांगले राहील .ह्या काळात परदेशी जायचे असेल तर मात्र पूर्वा नक्षत्रातील  गुरु फारसा उपयोगी नाही .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
इथला गुरु पैसे मिळण्याच्या दृष्टीने उत्तम आहे कारण उत्तरा हे रविचेच नक्षत्र आहे व रवि द्वितीयेश आहे .  रवि भ्रमणा प्रमाणे हा गुरु लाभ देईल. उदा . चतुर्थात रवि असताना बिल्डर्स ,शिक्षण क्षेत्र , गृह सजावट क्षेत्रातील लोक इ. लोकांना धनलाभ होईल  . जोडीदाराचे हे मारक स्थान असल्याने जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी .

सिंह रास : ह्या राशीच्या प्रथम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु सिंह राशीच्या लोकांच्या प्रथम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ सिंह राशीच्या लोकांना  गुरु पहिला आहे असे म्हणतात.प्रथम भावावरून प्रकृती, आवड -निवड , समाजातील स्थान , परदेश गमन इ. गोष्टी बघतात .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत  (सप्टेंबर १३ पर्यंत):
केतू अष्टमात आणि गुरु प्रथमात  व पंचमेश ह्यामुळे ह्या काळात नोकरी /व्यवसायात मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे .इथला गुरु अध्यात्मिक प्रगती करता चांगला आहे .

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ज्यांच्या मूळ जन्मपत्रिकेत प्रसिद्धी योग आहे अशांना  ह्या काळात प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे . ज्यांचा व्यवसाय लेखन,प्रकाशन , agency इ. आहे त्यांना पण हा काळ चांगला जाईल .भावंडांशी सबंध सलोख्याचे राहतील .

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
ह्या काळात प्रकृती चांगली राहील . तसेच समाजातील स्थान उंचावेल .काहीना सरकारी मानमरातब पण मिळण्याची शक्यता आहे . नोव्हेंबर मध्ये लांबचे प्रवास होतील .

कन्या : ह्या राशीच्या बाराव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कन्या राशीच्या लोकांच्या बाराव्या  भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कन्या राशीच्या लोकांना  गुरु बारावा आहे असे म्हणतात
बाराव्या भावावरून आपण लांबचे प्रवास (परदेश गमन ),आर्थिक गुंतवणूक, कर्जफेड ,अध्यात्म इ. गोष्टी बघतो . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत (सप्टेंबर १३ पर्यंत):
१३ सप्टेंबर पर्यंत तो मघा नक्षत्रात असल्याने केतूची फळे देईल. केतू मीन राशीत, त्यामुळे गुरुची फळे अपेक्षित आहेत. बुधाची पण केतूवर दृष्टी आहे. त्यामुळे केतू गुरु व बुध दोघांची फळे देईल. बुध कन्या राशीत उच्चीचा व तो दशमेश आहे. व्यवसाय अगर नोकरी करणाऱ्यांना चांगली फळे देईल असे वाटते गुरु चतुर्थेश व सप्तमेश आहे. तो घरा संबंधी काही अडचणी उपस्थित करेल असे वाटते.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतर गुरु पूर्वाफाल्गुनी म्हणजेच शुक्र या ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करत आहे. कन्या राशीला शुक्र द्वितियेश, नवमेश व स्वतः शुक्र लाभात आहे. शुक्र आर्थिक बाबतीत उत्तम फळे मिळण्याचा योग आणून देईल असे दिसत आहे. अनेकांना सुखावह प्रवास पण घडणार.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोवेंबरला गुरु उत्तराफाल्गुनी म्हणजेच रवीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. त्यावेळेस रवि वृश्चिक राशीत असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना लग्नी शुक्र, मंगळ, राहू  व रवि, बुध, शनि तृतीयात अशी ग्रहांची रचना आहे. इतर अनेक भावांबरोबर एक आणि तीन या भावांमधील ग्रहांचा एकदुसऱ्याशी संबंध असल्याने कन्याराशीतील मंडळी कुठल्याही व्यवसायात अगर नोकरीत चांगले जम बसवतील. काहींना कामानिमित्त परदेश वारी पण अपेक्षित आहे.

तूळह्या राशीच्या अकराव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु तूळ राशीच्या लोकांच्या अकराव्या  भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ तूळ राशीच्या लोकांना  गुरु अकरावा म्हणजेच लाभात आहे असे म्हणतात. ह्या स्थानावरून सर्व प्रकारचे लाभ बघतात .पारंपरिक ज्योतिष प्रमाणे नुसता गुरूच अनेक लाभ मिळवून देईल. के. पी. प्रमाणे पण काही अंशी बरोबर आहे.

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
१३ सप्टेंबर पर्यंत गुरु मघा नक्षत्रात असल्याने तो केतू ची फळे देईल. केतू षष्ठात गुरूच्या राशीत आर्थिक लाभास उत्तम आहे. गुरु तृतीयेश असल्याने स्पर्धात्मक अनेकांना यश मिळेल. लेखक मंडळींना पण हा काळ  उत्तम आहे. त्यांचे लेख, गोष्टी अगर कादंबर्या वाचकांच्या पसंतीस उतरतील.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतरचा काळ पूर्वाफाल्गुनी म्हणजे शुक्राचा आहे. शुक्र दशमात, लग्नेश व अष्टमेश आहे. या काळात आर्थिक लाभ, नोकरीत पदोन्नती इत्यादी योग संभवतात. तसेच काहींच्या बाबतीत वारसा हक्क, फंड किंवा पॉलीसी या रूपाने देखील लाभ होतील.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. रवि द्वितीय भावात व चंद्र मिथुनेत अष्टमात, आर्थिक व्यवहारात नुकसानाची भीति आहे. चंद्र मिथुनेत असे पर्यंत सावधानता बाळगावी. पुढचा काळ सर्व द्रिष्टीने उत्तम आहे.

वृश्चिकह्या राशीच्या दशम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु वृश्चिक राशीच्या लोकांच्या दशम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ वृश्चिक  राशीच्या लोकांना  गुरु दहावा आहे असे म्हणतात.दशम भावावरून व्यक्तीचे कर्तुत्व, व्यवसाय ,प्रसिद्धी इ. बघतात.

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत  (सप्टेंबर १३ पर्यंत):
मघा नक्षत्राचा स्वामी केतू पंचम स्थानी आहे. केतू मीनेत म्हणून गुरूचीच फळे मुख्यात्वे करून देईल. केतू वर १४ जुलै पासून १३ सप्टेंबर पर्यंत इतर ग्रहांची पण दृष्टी येऊ शकते. केतू त्या ग्रहांची पण फळे देईल. उदा. १३ सप्टेंबर ला चंद्र व बुध या दोन ग्रहांची दृष्टी केतूवर आहे. त्यामुळे केतू चंद्र व बुध या ग्रहांची पण फळे देईल. एकंदरीत या राशीच्या लोकांना भरपूर यश, पैसा, कीर्ती, प्रमोशन इत्यादी विनसायास मिळतील. विशेषतः कलाकार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, शेअर व्यावसायिकांना पण चांगला आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर नंतर गुरु शुक्राच्या नक्षत्रातून जात आहे. काही लोकांना नवीन नोकरी मिळून परदेशात जातील. व तिथेच जम बसवतील. काही मंडळी भारतातच यात्रा अगर सहली करतील. एकंदरीत काळ मजेत जाणार असे योग आहेत.व्यावसायिक लोकांना पण चांगला काळ आहे . 

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर रोजी गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करत असून रवि प्रथम स्थानात म्हणजे वृश्चिकेत आहे. 
महादशेची ची साथ असेल काही मंडळींना त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारी मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे योग आहेत.
एकंदरीत या राशीला आर्थिक प्राप्तीबारोबर मानसन्मान मिळण्याचा पण योग आहे.


धनुह्या राशीच्या नवम भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु धनु राशीच्या लोकांच्या नवम भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थधनु  राशीच्या लोकांना  गुरु नववा आहे असे म्हणतात.नवम भावावरून लामाबाचे प्रवास ,उच्च शिक्षण , अध्यात्मिक साधना इ. गोष्टी बघतात .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
धनु राशीस गुरु नऊव्या स्थानी व केतू चौथ्या स्थानी येत आहे. हि दोन्ही उच्च शिक्षण व बुद्धी ची स्थाने आहेत. याचा खरा फायदा जी मंडळी पी.एच.डी. किंवा रिसर्च करत आहेत. त्यांना उत्तम वेळ आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र पण नवमातच असल्याने वरील प्रमाणेच म्हणता येईल.तसेच शुक्र धनु लग्नाच्या लोकांना षष्ठेश व लाभेश पण आहे त्यामुळे शैक्षणिक संथांमध्ये काम करणार्यांना चांगला काळ आहे .  

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रविच्या नक्षत्रात जात आहे व रवि धनु राशीस बारावा होते आहे. उच्च शिक्षणासाठी काही लोकांना परदेशी कॉलेजेस मध्ये  प्रवेश मिळेल. व पुढील अभ्यासक्रम तिथेच पार पडेल. असे योग आहेत.
एकंदरीत हा गुरूबद्दल शैक्षणिक गोष्टी साठी उत्तम. याचा अर्थ असा होत नाही की इतरांसाठी योग्य नाही. इतर ग्रहांची स्थितीनुसार नोकरी अगर व्यवसायिकांना पण त्या प्रमाणे फळे मिळतील.


मकरह्या राशीच्या अष्टम  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मकर राशीच्या लोकांच्या अष्टम भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मकर  राशीच्या लोकांना  गुरु आठवा आहे असे म्हणतात.अष्टम भावावरून मनस्ताप, पेन्शन , insurance, तसेच हे जोडीदाराचे धन स्थान असल्याने जोडीदाराकडून पैसा पण ह्या स्थानावरून बघितला जातो . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
मकर राशीस गुरु आठवा आणि केतू तिसरा येत आहे. सर्व साधारणपणे आठव्या राशीतील ग्रह त्या व्यक्तीला मानसिक त्रास, नोकरीतील ताण तणाव, नातेवाईकांमधील गैरसमज  इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच काहीसे रविच्या भ्रमणानुसार काही अप्रिय गोष्टी होतील असे वाटते.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु जेंव्हा शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल त्यावेळी हे तणाव एकदम नाहीसे होतील. शुक्र दशमेश व पंचमेश आहे. या वेळी शुक्र संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. गुरु जसा अष्टमात आहे तसा तो तृतीयेश व द्वाद्शेष पण आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे .  

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर रोजी गुरु रवीच्या नक्षत्रात जाईल तेंव्हा रवि मकर राशीला १५ डिसेंबर पर्यंत अकरावा असणार आहे. त्यावेळी अनेक लोकांना अष्टम भावाच्या माध्यमातून बरेच आर्थिक तसेच इतर लाभ होऊ शकतील असे वाटते. त्यानंतर रवि बारावा होत आहे. हा काळ अटीतटीचा जाईल असे वाटते.
एकंदरीत हा काळ साईन वेव प्रमाणे कधी वर कधी खाली असे राहणार असे दिसते.



कुंभ : ह्या राशीच्या  सातव्या भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु कुंभ  राशीच्या लोकांच्या सप्तमातून भावातून  भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ कुंभ  राशीच्या लोकांना  गुरु सातवा आहे असे म्हणतात.सप्तम भावावरून आपण विवाह , खंडित प्रवास , जनसंपर्क , व्यवसाय, प्रतिस्पर्धी इ. बघतात . 

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
विवाहोत्सुक लोकांचे लग्न ठरण्याची /होण्याची शक्यता आहे . गुरूची दृष्टी तृतिय भावावर असल्याने लेखक , प्रकाशक इ. लोकांना हा काळ चांगला आहे . प्रवास चांगले होतील . 

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
ज्यांना उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे अशा लोकांना चांगला काळ आहे . तसेच वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याचे योग आहेत . ज्या वेळेस शुक्र कर्केत असेल  तेव्हा  जोडीदाराशी जुळवून घेणे श्रेयस्कर .


जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबर पासून गुरु रवीच्या नक्षत्रात जाईल तेंव्हापासून  रवि कुंभ राशीला १०,११ असणार आहे . हा काळ व्यवसाय व नोकरी दृष्टीने उत्तम आहे . अनेक आर्थिक लाभ होतील 


मीनह्या राशीच्या सहाव्या  भावात  सिंह रास येते त्यामुळे गुरु मीन राशीच्या लोकांच्या षष्ठ भावातून भ्रमण करणार आहे त्याचाच अर्थ मीन  राशीच्या लोकांना  गुरु साह्वा आहे असे म्हणतात .षष्ठ भावावरून नोकरी, आजारपण , मातृ घराणे ,स्पर्धात्मक परीक्षेतील यश इ. बघतात हे एक धन स्थान पण आहे .

जो पर्यंत गुरु मघा नक्षत्रात आहे तो पर्यंत आहे (सप्टेंबर १३ पर्यंत):
मीन राशीस गुरु सहाव्या स्थानी व केतू लग्नी येत आहे आहे. केतू मीन राशीत असल्याने गुरु षष्ठात जास्त प्रबळ राहील असे दिसते. एक आणि सहा या भावांचा एक दुसऱ्याशी संबंध आल्याने काही लोकांची जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांना मधुमेह, पोटा संबंध  विकार, मेदवृद्धी इत्यादी गोष्टी आहेत त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे दिसते. मीन रास आणि मीन लग्न यांना गुरु वर्षभर सिंहेत असल्याने हा धोका जास्त संभवतो. गुरु दशमेश असल्याने नोकरीतील मंडळीना आर्थिक बाबतीत उत्तम आहे.

जो पर्यंत गुरु पूर्वा नक्षत्रात आहे तो पर्यंत (नोव्हेंबर २०१५ पर्यंत तसेच काही काळ २०१६ मध्ये परत गुरु च्या वक्री भ्रमणात पूर्वा नक्षत्रात येइल.)
१३ सप्टेंबर ला गुरु शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करतो. शुक्र त्यावेळी कर्क राशीत आहे. व मीनेला पाचवा येत आहे. गुरु संबंधी सर्व दुखणी एकदम पळून जातील. कलाकार मंडळीना भरपूर उत्साह संचारेल. त्यांची कला लोकांपर्यंत पोचवायला बरेच मार्ग सापडतील. आर्थिक आवक कमी जास्त होण्याचा संभव आहे.

जो पर्यंत गुरु उत्तरा  नक्षत्रात आहे तो पर्यंत ( १८ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत तसेच काही काळ परत पूर्वा नंतर  परत उत्तरा नक्षत्रात येइल. )
२८ नोव्हेंबरला गुरु रवीच्या नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी रवी वृश्चिक राशीत व मीनेला नवम स्थानी येतो. पत्रिकेतील इतर योग पूरक असल्यास लांबच्या प्रवास होतील असे वाटते. १७ डिसेम्बरला रवी धनु राशीत गेल्यावर अनेकांना प्रमोशन आणि त्याबरोबर आर्थिक लाभ देखील होतील.
गुरु ८ जानेवारी ते ९ मे २१०६ पर्यंत वक्री अवस्थेत आहे. ह्या काळात तो रवी वरून शुक्रापर्यंत मागे येवून पुन्हा मार्गी होतो. रवी व शुक्र या दोघांची पुढील वाटचाल मीन राशीला बहुतांशी चांगलीच आहे.


गुरु ११ ऑगस्ट  २०१६ ला कन्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी पुन्हा भेटू....

वरील लेख हा अनघा भदे व सुनील देव(Astrology Counselling ) ह्यांनी लिहिलेला आहे .




Monday, 3 August 2015

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस(बेसिक कृष्णमुर्ती कोर्से )   पासून सुरु करत आहोत .


दोन बॅचेस : आठवड्यातून एक दिवस ( साधारण अडीच ते तीन महिने )

१.गुरुवार १३ ऑगस्ट २०१५ पासून (११:३० ते  १२:३० )

२. रविवार १६ ऑगस्ट २०१५ पासून (२.३० ते ३:३० )


के.पी प्रवीण अभ्यासक्रम

(ह्या  कोर्स मध्ये बेसिक ज्योतिषशास्त्र व कृष्णमुर्ती पद्धतीचे नियम तसेच के.पी पद्धतीने पत्रिका

 तयार करणे ह्यांचा समावेश आहे )

१. पत्रिका का बघावी ? जन्मपत्रिका म्हणजे काय ? कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ? पारंपरिक       
   
  व कृष्णमुर्ती ह्यातील फरक काय आहे ? ग्रहांबद्दल माहिती 

२. १२ राशी ,२७ नक्षत्र व १२ भावासंबंधी माहिती ,महत्वाचे ग्रहयोग

३. कृष्णमुर्ती पद्धतीची पत्रिका तयार करणे . (कॉम्पुटर software चा उपयोग न करता )

   कृष्णमुर्ती अयनांश संबंधी माहिती .तात्कालिक ग्रह (ruling planets)म्हणजे काय ?

४. नक्षत्र स्वामी ,उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय ? पत्रिकेत ह्यांचे महत्व काय ?

५. प्रथम भाव ,द्वितीय भाव , तृतिय भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

६. चतुर्थ भाव ,पंचम भाव , षष्ठ भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

७. सप्तम भाव ,अष्टम भाव , नवम भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

८. दशम भाव , एकादश भाव , द्वादश भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

९. महादशा म्हणजे काय ? दशेचे परिणाम कसे बघावेत ? वरील सर्व भावासंबंधी चर्चा ,प्रश्न -    
   
   उत्तरे इ.

१०. परीक्षा . 


अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा .

अनघा भदे- 9011201560


सुनिल देव -9822206170


क्लास चा पत्ता : 

शिवप्रताप अपार्टमेंटस
flat no - १०१
४३ ,मयुर कॉलनी
पुणे - ४११०३८


वरील कोर्से पूर्ण करणार्यांना मग कृष्णमुर्ती पध्दतीचा विषारद(advance) हा कोर्से करत येईल . 
हा वरील बेसिक कोर्से संपल्यानंतर पुढे advance कोर्से चालू करू .