Title

Astrology Blog by Anagha Bhade


Thursday, 30 June 2016

राशिभविष्य जुलै २०१६

                                                                                               राशीभविष्य  जुलै-२०१६
      (के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

मेष रास : राशीस्वामी मंगळ पूर्वार्धात तुळेत असून उत्तरार्धात वृश्चिक राशीत जात आहे. त्यामुळे उत्तरार्धात मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाचा ताण राहील. प्रकृतीच्या दृष्टीने पण काळजी घ्यावी. आर्थिक दृष्ट्या काळ सर्वसामान्य आहे . तृतीयात पूर्वार्धात अनेक ग्रह असल्याने काही लोकांना छोटे प्रवास घडतील. तसेच उत्साह पण भरपूर राहील. महिन्याच्या उत्तरार्धात बरेच ग्रह चतुर्थात येत असल्याने प्रवास बहुतांशी पूर्वार्धातच होतील. नंतर मात्र घरात वेळ द्याल. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे.महिन्याच्या सुरुवातीस जोडीदाराशी जमवून घेणे उत्तम .दशमेश शनी अष्टमात असल्याने कामाचा ताण जाणवेलच पण तृतीयातील बुधामुळे कामाची दाखल घेतली जाईल व समाधान राहील. एकंदरीत हा माहिना कामाच्या दृष्टीने ताणाचा राहील.

वृषभ रास : राशीस्वामी शुक्र द्वितीयात व गुरु चतुर्थात तसेच रवि पण द्वितीय स्थानी असल्याने घरासाबंधी काहीतरी सुवार्ता मिळतील. तसेच आर्थिक लाभ पण संभवतात .प्रकृती सर्वसाधारण राहील. द्वितीयात बरेच ग्रह असल्याने इतर अनेक मार्गांनी धन लाभ होण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या आठवड्यात प्रकाशकांना, पुस्तक विक्रेते ,प्रवासी कंपनी असणारे ,लेखक ह्या सर्वाना आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थात गुरु व चतुर्थेश रवि प्रथमात ह्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने महिना चांगला आहे.मुलांच्या दृष्टीने सुद्धा महिना चांगला जाईल . षष्ठेश शुक्र द्वितीयात हा योग सुद्धा आर्थिक दृष्टीने लाभ दाखवत आहे . परंतु मंगळ षष्ठात असल्याने कदाचित उष्णतेचे/पित्ताचे त्रास होतील. सप्तमेश षष्ठात असल्याने जोडीदाराशी जमवून घ्यावे.वाहने जपून चालवावीत . दशमेश शनि सप्तमात व बुध द्वितीयात हा योग व्यावसायिकांना चांगला आहे . एकंदरीत हा महिना चांगला आहे .

मिथुन रास : मिथुन राशीचा स्वामी बुध प्रथमात आहे. तसेच रवी ,शुक्र हे पण ग्रह आहेत त्यामुळे प्रकृती उत्तम राहील तसेच सामाजिक स्थान पण बळकट राहील .तृतीयात गुरु व तृतीयेश रवि प्रथमात त्यामुळे उत्साह बराच राहील व काम करण्याची क्षमता भरपूर राहील. प्रवास पण घडण्याची शक्यता आहे.चतुर्थेश बुध प्रथमात त्यामुळे आई जर लांब असेल तर भेटीचा योग वाटतो . पंचमेश शुक्र प्रथमात तसेच गुरु तृतीयात त्यामुळे कलाकारांना हा चांगला योग आहे . सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे जोडीदाराबरोबर प्रवासाची शक्यता आहे.तसेच जोडीदाराशी वादावादी टाळणे उत्तम. दशमेश गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे नामांकित व्यक्तींच्या प्रसिद्धीत भरच पडेल. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

कर्क रास : पहिल्या आठवड्यात राशीस्वामी चंद्र बाराव्या घरात आहे. तसेच द्वितीयेश रवी देखील बाराव्या घरात तसेच तृतीयेश बुध पण बाराव्या घरात आहे. त्यामुळे परदेश प्रवास होतील. तसेच खर्चाचे प्रमाण देखील वाढेल. चतुर्थेश व लाभेश शुक्र बाराव्या भावात आहे त्यामुळे घरामध्ये गुंतवणुकीस काळ चांगला वाटतो. पंचमात शनी व पंचमेश मंगळ चतुर्थात त्यामुळे मुलांशी पटवून घ्यावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत .सप्तमेश शनि पंचमात त्यामुळे जोडीदाराशी संबंध छान राहतील. दशमेश मंगळ चतुर्थात त्यामुळे नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळ सर्वसाधारण आहे. एकंदरीत हा महिना ठीक आहे .

सिंह रास : राशीस्वामी रवी महिन्याच्या पूर्वार्धात लाभात आहे तसेच चंद्र पण लाभात आहे . त्यामुळे पुस्तक विक्रते , प्रकाशक ,लेखक इ. लोकांना हा काळ चांगला आहे . काही जणांचे अडकलेले पैसे पण मिळण्याची खूप शक्यता आहे. तसेच गुरु ,राहू लग्नी व लाभात बरेच ग्रह असल्याने पूर्वार्धात प्रकृती उत्तम राहील . उत्तरार्धात बरेच ग्रह बाराव्या स्थानी येत असल्याने लांबचे प्रवास देखील होतील . तसेच त्यावेळी प्रकृतीस जपावे. कदाचित नातलगांसाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या होतील. अध्यात्माची आवड असणार्यांना हा काळ चांगला आहे. उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने काळ सामान्य आहे . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .

कन्या रास : राशीस्वामी बुध पूर्वार्धात दशमात आहे. तसेच रवी,चंद्र,शुक्र हे ग्रह देखील दशमात  आहेत त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे. द्वितीयात मंगळ व द्वितीयेश शुक्र आधी दशमात व नंतर लाभात त्यामुळे आर्थिक बाजू चांगली राहील. दशमात बरेच ग्रह असल्याने नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील जॉब मिळण्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे . तसेच सामाजिक कार्य करणार्याचा व्याप वाढण्याची बरीच शक्यता आहे. ह्या महिन्यात नातलगांच्या भेटी गाठी होतील. गृह /वाहन खरेदीस चांगला काळ आहे . कलाकार देखील बरेच ह्या महिन्यात व्यस्त असतील .प्रकृतीच्या दृष्टीने काळजी करण्यासारखे काही नाही . जोडीदारापासून नोकरी/व्यवसाय निमित्त लांब राहण्याचे योग आहेत . एकंदरीत हा महिना उत्तम आहे. 

तूळ रास : प्रथमात मंगळ आणि राशीस्वामी शुक्र नवमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. शुक्र मिथुनेत आणि मंगळ तुळेत हा योग खेळाडू व कलाकार ह्यांच्याकरता चांगला आहे . शनी द्वितीयात व द्वितीयेश मंगळ प्रथमत त्यामुळे आर्थिक आवक बेताची राहील . धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता आहे . लेखक ,प्रकाशक ,पुस्तक विक्रेते त्यातही धार्मिक पुस्तकांशी सबंधित लोकांना हा काळ चांगला आहे. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश मंगळ प्रथमात व गुरु लाभात त्यामुळे जोडीदाराशी संबंध कचना राहतील. पेन्शनर मंडळींची कामे ह्या महिन्यात होतील. तसेच वारसा हक्काविषयी ज्यांची कामे अडकलेली आहेत त्यांची पण कामे मार्गो लागतील. नवमात पूर्वार्धात बरेच ग्रह असल्याने लांबचे प्रवास होतील. उत्तरार्धात दशमात ग्रह असल्याने नोकरी /व्यवसायात व्यस्त राहाल तसेच प्रमोशन चे पण योग आहेत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

वृश्चिक रास : राशीस्वामी मंगळ बाराव्या भावात तसेच पूर्वार्धात रवी,चंद्र,शुक्र,बुध हे ग्रह अष्टमात त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत पण काळजी घेणे इष्ट. खास करून बँक कर्मचारी किंवा ज्यांना रोकड पैसे हाताळावे लागतात त्यांनी खबरदारी घ्यावी. कौटुंबिक दृष्टीने महिना सर्वसधारण राहील.कलाकार व्यस्त राहतील परंतु म्हणावे तसा आर्थिक फायदा होणे अवघड वाटते आहे. जोडीदारास आर्थिक दृष्टीने महिना चांगला आहे .नोकरी/व्यवसायात ताण जाणवेल. नोकरी बदलण्याचे पण विचार डोकावतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम बाळगणे चांगले.

धनु रास : राशी स्वामी गुरु नवमात ,शुक्र अष्टमात व शनी बाराव्या भावात आहे त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना कदाचित मनासारख्या शाळा / कॉलेज मध्ये प्रवेश मिळण्यात अडचणी येतील. संतती दृष्टीने काळ चांगला आहे. जोडीदाराशी संबंध नेहेमीप्रमाणे राहतील. उत्तरार्धात अष्टमात रवी,बुध ,शुक्र येत असल्याने कामाचा ताण राहील. मानसिक चिंता पण राहतील. जोडीदार जर नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यला आर्थिक लाभ दिसतात.ह्या महिन्यात प्रवास फारसे दिसत नाहीत. एकंदर्तीत ग्रहमान प्रवास अनुकूल नाही. नोकरी/व्यवसायात ताण राहतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम बाळगणे चांगले. 

मकर रास : राशी स्वामी शनी लाभात व बुध सप्तमात त्यामुळे प्रकृती ठीक राहील. द्वियेश शनि लाभात आहे परंतु वक्री असल्याने आर्थिक व्यवहारास विलंब होण्याची शकयता आहे. तृतीयेश अष्टमात व शुक्र सप्तमात त्यामुळे शब्द जपून वापरावेत नाहीतर वाद वाढून मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.ज्यांचे व्यवसाय घरासंबंधी आहेत त्यांना हा महिना थोडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. षष्ठातील पूर्वार्धातील ग्रह आर्थिक आवक चांगली ठेवतील. उत्तरार्धात जोडीदाराशी छान जमेल. भागीदारीच्या व्यवसाय चांगले चालतील. दशमात मंगळ व दशमेश शुक्र सप्तमात हा योग व्यावसायिकांसाठी चांगला आहे. बरेच काम आल्याने ताण पण येईल. परंतु आर्थिक बाजू चांगली राहील.एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.

कुंभ रास : राशीस्वामी शनि दशमात व बुध पंचमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व शुक्र पंचमात हा योग विवाहोत्सुक तरुणांना उत्तम आहे. तृतीयेश मंगळ नवमात व गुरु सप्तमात प्रवासास अनुकूल आहे. धार्मिक कार्याकरता देखील प्रवास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश रवि पंचमात आणि राहू सप्तमात त्यामुळे प्रेमविवाह योग पण जोरदार आहे. भागीदारांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी दशमात गुरु सप्तमात त्यामुळे व्यावसायिकांना काळ चांगला आहे. एकंदरीत महिना चांगला आहे.


मीन रास : राशीस्वामी गुरु षष्ठात व शुक्र चतुर्थात तसेच मंगळ अष्टमात त्यामुळे प्रकृतीस जपावे.विशेष करून पायासंबंधी दुखणी वाढतील. ह्या महिन्यात काही पेन्शन किंवा वडिलार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना interview छान जातील. नवीन नोकरी मिळण्याची खूप शक्यता आहे. चतुर्थात बरेच ग्रह असून बुध पण तिथेच आहे त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी जमवून घ्यावे. अष्टमात मंगळ व शुक्र चतुर्थात त्यामुळे वाहन जपून चालवावे. नवमात शनि तसेच मंगळ अष्टमात त्यामुळे प्रवासात अडचणी येतील किंवा ठरवलेले प्रवास रद्द होतील.दशमेश षष्ठात व शुक्र चतुर्थात असल्याने काहीना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच काहींच्या बाबतीत जर घरापासून लांब काम करत असतील त्यांची बदली स्वत:च्या गावात होऊ शकेल.एकंदरीत महिना संमिश्र जाईल. 

Saturday, 4 June 2016

राशिभविष्य जून २०१६

राशिभविष्य
जून-२०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि
समन्वय साधावा .


मेष : महिन्याची सुरुवात चंद्राने तुमच्याच राशीपासून केली आहे. बुध देखील तिथेच आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ मात्र अष्टमात
आहे. गुरु पंचमात असल्याने शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. द्वितीय स्थानी रवि व शुक्र हे दोन ग्रह आणि चंद्र प्रथम
भावात त्यामुळे बराच खर्च होण्याची शक्यता आहे. १,५,९ ह्यांचा परस्पर संबंध असल्याने बराच खर्च धार्मिक किंवा सामाजिक
कार्यासाठी होण्याची शक्यता आहे. तृतीयेश बुध लग्नात, शुक्र द्वितीयात लेखक मंडळींना हा काळ चांगला आहे. प्रथमात बुध, चंद्र
असल्याने त्यांच्या विचारांना चालना मिळेल. चतुर्थेश चंद्र प्रथम स्थानी व शुक्र द्वितीय स्थानी विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.
तसेच घरातीलवातावरण देखील आनंदी राहील. पंचमात गुरु आणि शुक्र द्वितीयात उच्चीचा त्यामुळे मुलाबाळांच्या दृष्टीने हा काळ
उत्तम आहे, सर्व काही त्यांच्या मनासारखे घडेल. षष्ठेश बुध लग्नी आहे व तो तृतीयेश आहे. ज्या लोकांना मज्जासंस्थेचे विकार
असणाऱ्यांना किरकोळ त्रास जाणवेल. सप्तमेश शुक्र द्वितीय स्थानी व चंद्र प्रथम स्थानी त्यामुळे जोडीदाराशी उत्तम संवाद राहतील.
अष्टमातील शनि, मंगळ मात्र काही प्रमाणात त्रासदायक ठरतील..उष्णतेचे त्रास, वाहन चालवताना काळजी घ्यावी. दशमेश शनि
अष्टमात आणि बुध प्रथमात शनि अष्टमात जरी असला तरी उत्तम योग आहे, काही लोकांना केलेल्या कामाची पावती मिळेल.
एकंदरीत हा महिना मेष राशीला खर्चाचे प्रमाण वाढले तरी बराच चांगला आहे.


वृषभ : वृषभ राशीचा शुक्र वृषभेतच व रवि पण तिथेच शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वितीयेश बुध बाराव्या स्थानी, शुक्र प्रथम स्थानी
बरीच मंडळी आर्थिक गुंतवणुकीच्या मागे लागतील, मात्र पैसे गुंतवताना माहितीच्या कंपनीमध्ये गुंतवण्याची काळजी घ्यावी.
तृतीयेश चंद्र बाराव्या स्थानी व शुक्र प्रथम स्थानी अनेकांना लांबच्या प्रवासाची किंवा परदेशगमनाची पण संधी प्राप्त होईल.
चतुर्थातील गुरु व प्रथम भावातील रवि हा योग शिक्षणासाठी उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यांचे निकाल
मनाप्रमाणे लागतील. पंचमेश बुध बाराव्या स्थानी व शुक्र प्रथमस्थानी त्यामुळे शेअर्सचा व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी
बाळगावी. षष्ठेश शुक्र लग्नी व चंद्र बाराव्या स्थानी त्यामुळे काही लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी काळजीपूर्वक राहावे. सप्तमात मंगळ, शनि जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. प्रथमेश शनि सप्तमात व बुध बाराव्या स्थानी त्यामुळे ज्यांचा व्यवसाय आहे अश्यांना
आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी प्राप्त होऊ शकते. एकंदरीत हा महिना काहीबाबतीत संमिश्र तर काही बाबतीत उत्तम राहील.


मिथुन :मिथुन राशीचा स्वामी बुध लाभात आणि शुक्र बाराव्या स्थानी आहे. हा योग गुंतवणूकीसाठी योग्य आहे. पण शनि आणि
मंगळ दोघेही वक्री षष्ठात आहेत. व्यवहार जपून करावा. प्रकृतीच्यादृष्टीने विशेष काळजीचे कारण नाही. द्वितीयेश चंद्र लाभात केतू
अष्टमात वक्री शनि षष्ठात, हे योग पण जपून व्यवहार करण्याचा इशारा देत आहेत. त्तृतीयातील गुरु राहूमुळे काही लोकांना प्रवास
दाखवत आहे. चतुर्थातील बुध लाभात शुक्र बाराव्या भावात अनेक लोकांना नवीन घर घेण्याची संधी उपलब्ध करून देणार
आहे.पंचमेश शुक्र शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांना नुकसानीत गेलेले शेअर पुनः घेतलेल्या किंमतीत येतील. सप्तमेश गुरु तृतीय भावात
शुक्र बाराव्या भावात जोडीदाराशी काही प्रमाणात असमाधान व्यक्त होण्याशीशक्यता आहे. दशमेश गुरु ऑफिसच्या कामानिमित्त
परदेश प्रवास घडवून आणण्याची शक्यता आहे. एकूण हा महिना संमिश्र असावा असे दिसत आहे.


कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र दशमात आणि शुक्र लाभात त्यामुळे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे, पण षष्ठ स्थान
तपासताना जास्त व्यवस्थित कल्पना येईल. तरीही एक गोष्ट निश्चित ह्या महिन्यात कर्क राशीच्या काही लोकांच्या हातून
समाजमान्य चांगली गोष्ट घडून त्याचा लाभ मिळणार आहे. द्वितीय स्थानात गुरु, राहू आर्थिक आवक उत्तम ठेवतील. तृतीयेश बुध
दशमात व शुक्र लाभात हा योग प्रसिद्धीचा आहे, त्यामुळे व्यक्तीच्या कुवतीप्रमाणे नामनिर्देश होईल. चतुर्थेश शुक्र लाभात आणि चंद्र
दशमात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. शिवाय अनेक लोकांना घरासंबंधी एखादी सुवार्ता कळू शकेल. पंचमेश मंगळ
पंचमातच आणि शनि पण तिथेच, दोन्ही ग्रह वक्री, त्यामुळे पंचम स्थानाचा म्हणावा तसा उपयोग होऊ शकत नाही. पण बुध
दशमात असल्याने शनि मार्गी झाल्यावर ज्यांचा इव्हेन्ट मॅनेजमेंट किंवा मैदानी खेळाशी संबंध आहे अश्यांना त्यांच्या कार्यात यश
मिळेल. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानात, शुक्र लाभात प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही, शिवाय आर्थिक लाभ देखील होईल.
सप्तमेश शनि पंचमात, शुक्र लाभात जोडीदाराशी सलोख्याचे आणि आनंदाचे संबंध असतील. दशमात चंद्र, बुध व लाभात रवि, शुक्र
हे योग तुमच्या कामाच्या ठिकाणी लाभदायक ठरतील. नोकरीत प्रमोशन, आर्थिक लाभ तसेच व्यवसाय करणाऱ्यांना (विशेषत:
कमिशन एजंट) भरपूर प्रमाणात ऑर्डर्स आणि आर्थिक लाभ मिळणार. एकंदरीत हा महिना कर्क राशीला उत्तम आहे.


सिंह :सिंह राशीचा स्वामी रवि दशम स्थानी, चंद्र नवमात आणि गुरु, राहू दोन्ही सिंह राशीतच हा योग प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी
उत्तम आहे. शिवाय हातून भरीव सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश बुध नवमात व शुक्र दशमात आर्थिकदृष्ट्या योग
चांगला आहे. तृतीयेश शुक्र दशमात व चंद्र नवमात त्यामुळे अनेक लोकांना प्रवासाचे योग येऊ शकतात, तसेच लिखाण नावाजले
जाण्याची शक्यता आहे. चतुर्थात शनि, मंगळ-दोन्ही वक्री, बुध नवमात त्यामुळे उच्च शिक्षणासाठी हा योग उत्तम आहे, मात्र ग्रह वक्री
असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. पंचमेश गुरु लग्न स्थानी असल्याने मुलाबाळांच्या दृष्टीने काळजी नसावी. सप्तमेश शनि
चतुर्थात वक्री जरी असला तरी घरातील वातावरण ठीक राहील व जोडीदाराशी सुखसंवाद राहतील. लाभेश बुध नवम स्थानी आणि
शुक्र दशमात हा योग देखील अतिशय उत्तम आणि भाग्यकारक आहे. ह्या योगामुळे लेखकांना उत्तमकाळ आहे. तसेच ज्यांचा थिसीस
पी. एच.डी. साठी सादर झाला असेल, अश्यांना स्वीकृती मिळून पी.एच.डी. पूर्ण होण्याचे योग आहेत. एकंदरीत सिंह राशीला हा महिना
उत्तम आहे .


कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध अष्टमात व शुक्र नवमात त्यामुळे थोडीफार मानसिक चिंता लागून राहील. त्यामुळे प्रकृतीवर पण
थोडाफार परिणाम होऊ शकेल. द्वितीयेश शुक्र नवमात व शनि तृतीयात ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे (कमिशन एजंट, विक्रेते इ.)
त्यांना हा काळ बरा आहे. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी व शुक्र नवम स्थानी ज्यांच्या भावचलित पत्रिकेत चंद्र लाभ स्थानी असेल,
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. प्रवेशाची प्रक्रिया सुलभ होईल. पंचमेश शनि तृतीयात वक्री व बुध अष्टमात
त्यामुळे मुलाबाळांकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी व शुक्र नवमात उच्चीचा त्यामुळे घरातील वातावरण ठीक
राहील व जोडीदाराशी सुसंवाद राहील. शनि तृतीयात असल्याने काही वेळा वादाचे प्रसंग येऊ शकतील. अष्टमातील चंद्र, बुध व
तृतीय स्थानातील मंगळ हे ग्रह वाहने जपून चालवण्याची सूचना देतात. नवमेश शुक्र नवमातच व शनि तृतीयात वक्री काही लोकांचे
प्रवासाचे बेत ठरतील. दशमेश बुध अष्टमात व शुक्र नवमात काही लोकांना कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, तसेच कामाचा ताण
देखील वाढेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे.


तूळ : तुळेचा स्वामी शुक्र अष्टमात व शनि द्वितीय भावात. आर्थिक बाबतीत काही चिंता राहील असे वाटते. द्वितीय भावात शनि,
मंगळ वक्री हे दोन्ही ग्रह वरील गोष्टीला दुजोरा देत आहेत. तृतीयेश गुरु लाभातआणि शुक्र अष्टमात पुस्तक विक्रेते, कमिशन एजंट्स
यांनी व्यवहार जपून करावा. पैसे अडकून पडायची शक्यता आहे. पंचमात केतू, गुरु लाभात, बुध सप्तमात शेअर ब्रोकर्सना काही
प्रमाणात लाभ होईल असे दिसते, तरी पण व्यवहार जपूनच करावा. सप्तमातील चंद्र, बुध घरातील वातावरण आनंदी ठेवील तसेच
जोडीदाराशी पण सुखसंवाद होतील. दशमेश चंद्र सप्तमात व केतू पंचमात नोकरी करणाऱ्यांनीवरिष्ठांशी गोडीगुलाबीने घ्यावे.
लाभातील राहू, गुरु काहीतरी आर्थिक लाभ करतील असे दिसते. तूळ राशीला हा महिना एकूण संमिश्र स्वरूपाचा आहे.


वृश्चिक : मंगळ व शनि दोघेही तुमच्या राशीत वक्री, बुध षष्ठात प्रकृती संबंधीने जपूनच राहावे.धनेश गुरु दशमात व शुक्र सप्तमात
व्यवसायिक लोकांना छान आहे. तृतीयेश शनि प्रथमात, बुध षष्ठात प्रवास टाळावे. चतुर्थेश शनि लग्नात, बुध षष्ठात, गुरु दशमात हा
योग घरासंबंधी जर काही व्यवहार असेल तर वक्री शनिमुळे विलंब होण्याची शक्यता आहे. पण शनि मार्गी झाल्यावर व्यवहार
मनासारखा घडेल. मुला बाळांच्या दृष्टीने महिना चांगला आहे. षष्ठातील चंद्र, बुध, दशमात गुरु,राहू आर्थिक योग उत्तम आहे. लाभ
नक्कीच मिळेल. सप्तमात रवि,शुक्र व षष्ठात चंद्र, बुध जोडीदाराशी जमवून घेतल्यास उत्तम.थोडेफार खटके उडण्याचा संभव आहे.
एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.


धनु :धनु राशीचा स्वामी गुरु नवमात व शुक्र षष्ठात प्रकृती संबंधी किरकोळ तक्रारी होतील. द्वितीयेश शनि बाराव्या भावात व चंद्र
पंचमात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील पण प्रवासाची शक्यता कमीच. चतुर्थेश गुरु नवमात,
शुक्र षष्ठात स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता बरीच आहे. मुलांच्या अभ्यासासंबंधी व इतर कार्यक्रम ह्यासाठी महिना उत्तम
आहे. षष्ठातील रवि, शुक्र, पंचमातील चंद्र आजारपण येवू देणार नाहीत असे वाटते. जोडीदाराशी उत्तम वेळ व्यतीत होईल.
नवमातील गुरु व षष्ठातील शुक्र वडिलांच्या कार्यक्षेत्रास उत्तम वाव देतील.दशमेश बुध पंचमात शुक्र षष्ठात हा योग नोकरी अगर
व्यवसाय दोन्हीला उत्तम आहे. एकंदरीत हा महिना छान आहे.


मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व बुध चतुर्थात प्रकृतीस किरकोळ तक्रारी राहतील. द्वितीयेश शनि लाभात बुध चतुर्थात
घरातील एकंदरीत वातावरण आनंदी राहील.तृतीयेश गुरु अष्टमात व शुक्र पंचमात. शुक्र दशमेश पण आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना
कदाचित कामाचा जादा ताण पडेल. काहींच्या बाबतीत नोकरी बदलायची पण वेळ येईल. चतुर्थात चंद्र तुमच्या आईचा दौरा
तुमच्या भेटीसाठी होईल असे वाटते. पंचमात रवि, शुक्र तुमचा एकंदरीत मूड प्रसन्न ठेवील. त्यामुळे घरातील वातावरण देखील
आनंदी राहील. षष्ठेश बुध चतुर्थात व शुक्र पंचमात प्रकृती उत्तम राहील. अष्टमातील गुरु, राहू पंचमात शुक्र, शुक्र दशमेश, अचानक
धनलाभ दाखवत आहे. लॉटरीचे तिकीट घ्यायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी देखील हा योग छान आहे. एकंदरीत हा महिना
चांगला जाईल असे वाटते .


कुं: कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात वक्री, बुध तृतीयात, नाव मिळवण्यास एक उत्तम, परंतु वक्री शनि तसे होऊ देईल असे वाटत
नाही. थोडा फार लाभ तरी पण होईल. द्वितीयेश गुरु सप्तमात, शुक्र चतुर्थात रिअल इस्टेटचा व्यवसाय असणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त
होईल. कुंभेत केतू, मेषेत बुध, चंद्र सर्व दृष्ट्या उत्तम योग. वैचारिक लेख लिहिणारे लेखक ह्यांना उत्तम. संधी पण तशी प्राप्त होईल.
मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने सर्वसाधरण काळ आहे. सप्तमातील गुरु राहू घरातील वातावरण सर्वसाधारण ठेवील. विद्यार्थ्यांना थोडी
फार अडचण भासेल पण पुढील उच्च शिक्षणासाठी वेळ उत्तम आहे.दशम भावातील मंगळ, शनि वक्री असल्याने, त्यांची फळे विलंबाने
मिळतील असे वाटते. अन्यथा दशमातील शनि, मंगळ नोकरी व्यवसायासाठी उत्तम आहेत. एकंदरीत हा महिना संमिश्र फळे देईल


मीन : मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात व राहू देखील तिथेच आणि शुक्र तृतीयात त्यामुळे प्रकृती उत्तम राहील. द्वितीयात चंद्र, बुध,
शुक्र तृतीयात त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला काहीतरी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. द्वितीयातील बुध बऱ्याच लोकांसाठी
कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवण्याचे सुचवतो. मुलाबाळांसंबंधी काळजीचे कारण नाही. षष्ठात गुरु, राहू व शुक्र तृतीयात नोकरी
करणाऱ्यांसाठी ठीक काळ आहे मात्र काहींना छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग येतील. अष्टमेश शुक्र तृतीयात असल्याने वाहने जपून
चालवावीत. नवमात शनि, मंगळ व मंगळ वृश्चिक ह्या स्वराशीत लांबच्या प्रवासाला उत्तम योग आहे, पण दोन्ही ग्रह वक्री असल्याने
बेत ठरून देखील प्रवासाचे योग विलंबाने (ग्रह मार्गी झाल्यावर) येतील. दशमेश गुरु षष्ठात व शुक्र तृतीयात त्यामुळे काहीजण
ऑफिसच्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करतील तर काहींना प्रमोशन पण मिळेल. लाभेश शनि अष्टमात व बुध द्वितीयात त्यामुळे
काहींना वारसाहक्क प्राप्त होण्याची शक्यता आहे. शनि वक्री असल्याने कदाचित विलंब होऊ शकतो. एकंदरीत हा महिना काही
बाबतीत संमिश्र तर काही बाबतीत उत्तम राहील.