(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत
आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन
अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष रास : राशीस्वामी मंगळ पूर्वार्धात तुळेत असून उत्तरार्धात
वृश्चिक राशीत जात आहे. त्यामुळे उत्तरार्धात मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
नोकरदार लोकांना कामाचा ताण राहील. प्रकृतीच्या दृष्टीने पण काळजी घ्यावी. आर्थिक दृष्ट्या
काळ सर्वसामान्य आहे . तृतीयात पूर्वार्धात अनेक ग्रह असल्याने काही लोकांना छोटे
प्रवास घडतील. तसेच उत्साह पण भरपूर राहील. महिन्याच्या उत्तरार्धात बरेच ग्रह
चतुर्थात येत असल्याने प्रवास बहुतांशी पूर्वार्धातच होतील. नंतर मात्र घरात वेळ
द्याल. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांना
सुद्धा हा काळ चांगला आहे.महिन्याच्या सुरुवातीस जोडीदाराशी जमवून घेणे उत्तम .दशमेश
शनी अष्टमात असल्याने कामाचा ताण जाणवेलच पण तृतीयातील बुधामुळे कामाची दाखल घेतली
जाईल व समाधान राहील. एकंदरीत हा माहिना कामाच्या दृष्टीने ताणाचा राहील.
वृषभ रास : राशीस्वामी शुक्र द्वितीयात व गुरु चतुर्थात तसेच रवि पण
द्वितीय स्थानी असल्याने घरासाबंधी काहीतरी सुवार्ता मिळतील. तसेच आर्थिक लाभ पण
संभवतात .प्रकृती सर्वसाधारण राहील. द्वितीयात बरेच ग्रह असल्याने इतर अनेक
मार्गांनी धन लाभ होण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या आठवड्यात प्रकाशकांना, पुस्तक
विक्रेते ,प्रवासी कंपनी असणारे ,लेखक ह्या सर्वाना आर्थिक दृष्ट्या चांगला आहे.
चतुर्थात गुरु व चतुर्थेश रवि प्रथमात ह्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने महिना चांगला
आहे.मुलांच्या दृष्टीने सुद्धा महिना चांगला जाईल . षष्ठेश शुक्र द्वितीयात हा योग
सुद्धा आर्थिक दृष्टीने लाभ दाखवत आहे . परंतु मंगळ षष्ठात असल्याने कदाचित
उष्णतेचे/पित्ताचे त्रास होतील. सप्तमेश षष्ठात असल्याने जोडीदाराशी जमवून घ्यावे.वाहने
जपून चालवावीत . दशमेश शनि सप्तमात व बुध द्वितीयात हा योग व्यावसायिकांना चांगला
आहे . एकंदरीत हा महिना चांगला आहे .
मिथुन रास : मिथुन राशीचा स्वामी बुध प्रथमात आहे. तसेच रवी ,शुक्र हे
पण ग्रह आहेत त्यामुळे प्रकृती उत्तम राहील तसेच सामाजिक स्थान पण बळकट राहील
.तृतीयात गुरु व तृतीयेश रवि प्रथमात त्यामुळे उत्साह बराच राहील व काम करण्याची
क्षमता भरपूर राहील. प्रवास पण घडण्याची शक्यता आहे.चतुर्थेश बुध प्रथमात त्यामुळे
आई जर लांब असेल तर भेटीचा योग वाटतो . पंचमेश शुक्र प्रथमात तसेच गुरु तृतीयात त्यामुळे
कलाकारांना हा चांगला योग आहे . सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे
जोडीदाराबरोबर प्रवासाची शक्यता आहे.तसेच जोडीदाराशी वादावादी टाळणे उत्तम. दशमेश
गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे नामांकित व्यक्तींच्या प्रसिद्धीत भरच
पडेल. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
कर्क रास : पहिल्या आठवड्यात राशीस्वामी चंद्र बाराव्या घरात आहे.
तसेच द्वितीयेश रवी देखील बाराव्या घरात तसेच तृतीयेश बुध पण बाराव्या घरात आहे.
त्यामुळे परदेश प्रवास होतील. तसेच खर्चाचे प्रमाण देखील वाढेल. चतुर्थेश व लाभेश
शुक्र बाराव्या भावात आहे त्यामुळे घरामध्ये गुंतवणुकीस काळ चांगला वाटतो. पंचमात
शनी व पंचमेश मंगळ चतुर्थात त्यामुळे मुलांशी पटवून घ्यावे लागेल. आर्थिक व्यवहार
जपून करावेत .सप्तमेश शनि पंचमात त्यामुळे जोडीदाराशी संबंध छान राहतील. दशमेश
मंगळ चतुर्थात त्यामुळे नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळ सर्वसाधारण आहे. एकंदरीत
हा महिना ठीक आहे .
सिंह रास : राशीस्वामी रवी महिन्याच्या पूर्वार्धात लाभात आहे तसेच
चंद्र पण लाभात आहे . त्यामुळे पुस्तक विक्रते , प्रकाशक ,लेखक इ. लोकांना हा काळ
चांगला आहे . काही जणांचे अडकलेले पैसे पण मिळण्याची खूप शक्यता आहे. तसेच गुरु
,राहू लग्नी व लाभात बरेच ग्रह असल्याने पूर्वार्धात प्रकृती उत्तम राहील .
उत्तरार्धात बरेच ग्रह बाराव्या स्थानी येत असल्याने लांबचे प्रवास देखील होतील . तसेच
त्यावेळी प्रकृतीस जपावे. कदाचित नातलगांसाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या होतील. अध्यात्माची
आवड असणार्यांना हा काळ चांगला आहे. उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल.
नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने काळ सामान्य आहे . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कन्या रास : राशीस्वामी बुध पूर्वार्धात दशमात आहे. तसेच रवी,चंद्र,शुक्र
हे ग्रह देखील दशमात आहेत त्यामुळे कामाचा
व्याप वाढणार आहे. द्वितीयात मंगळ व द्वितीयेश शुक्र आधी दशमात व नंतर लाभात त्यामुळे
आर्थिक बाजू चांगली राहील. दशमात बरेच ग्रह असल्याने नोकरदारांना प्रमोशन
मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील जॉब मिळण्याच्या
दृष्टीने हा महिना उत्तम आहे . तसेच सामाजिक कार्य करणार्याचा व्याप वाढण्याची
बरीच शक्यता आहे. ह्या महिन्यात नातलगांच्या भेटी गाठी होतील. गृह /वाहन खरेदीस
चांगला काळ आहे . कलाकार देखील बरेच ह्या महिन्यात व्यस्त असतील .प्रकृतीच्या
दृष्टीने काळजी करण्यासारखे काही नाही . जोडीदारापासून नोकरी/व्यवसाय निमित्त लांब
राहण्याचे योग आहेत . एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
तूळ रास : प्रथमात मंगळ आणि राशीस्वामी शुक्र नवमात त्यामुळे प्रकृती
चांगली राहील. शुक्र मिथुनेत आणि मंगळ तुळेत हा योग खेळाडू व कलाकार ह्यांच्याकरता
चांगला आहे . शनी द्वितीयात व द्वितीयेश मंगळ प्रथमत त्यामुळे आर्थिक आवक बेताची
राहील . धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता आहे . लेखक ,प्रकाशक ,पुस्तक
विक्रेते त्यातही धार्मिक पुस्तकांशी सबंधित लोकांना हा काळ चांगला आहे. मुलांच्या
दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश मंगळ प्रथमात व गुरु लाभात त्यामुळे जोडीदाराशी
संबंध कचना राहतील. पेन्शनर मंडळींची कामे ह्या महिन्यात होतील. तसेच वारसा
हक्काविषयी ज्यांची कामे अडकलेली आहेत त्यांची पण कामे मार्गो लागतील. नवमात
पूर्वार्धात बरेच ग्रह असल्याने लांबचे प्रवास होतील. उत्तरार्धात दशमात ग्रह
असल्याने नोकरी /व्यवसायात व्यस्त राहाल तसेच प्रमोशन चे पण योग आहेत. एकंदरीत हा
महिना चांगला जाईल.
वृश्चिक रास : राशीस्वामी मंगळ बाराव्या भावात तसेच पूर्वार्धात
रवी,चंद्र,शुक्र,बुध हे ग्रह अष्टमात त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत पण
काळजी घेणे इष्ट. खास करून बँक कर्मचारी किंवा ज्यांना रोकड पैसे हाताळावे लागतात
त्यांनी खबरदारी घ्यावी. कौटुंबिक दृष्टीने महिना सर्वसधारण राहील.कलाकार व्यस्त
राहतील परंतु म्हणावे तसा आर्थिक फायदा होणे अवघड वाटते आहे. जोडीदारास आर्थिक
दृष्टीने महिना चांगला आहे .नोकरी/व्यवसायात ताण जाणवेल. नोकरी बदलण्याचे पण विचार
डोकावतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम बाळगणे चांगले.
धनु रास : राशी स्वामी गुरु नवमात ,शुक्र अष्टमात व शनी बाराव्या
भावात आहे त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत. खर्चाचे
प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना कदाचित मनासारख्या शाळा / कॉलेज मध्ये प्रवेश
मिळण्यात अडचणी येतील. संतती दृष्टीने काळ चांगला आहे. जोडीदाराशी संबंध
नेहेमीप्रमाणे राहतील. उत्तरार्धात अष्टमात रवी,बुध ,शुक्र येत असल्याने कामाचा
ताण राहील. मानसिक चिंता पण राहतील. जोडीदार जर नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यला
आर्थिक लाभ दिसतात.ह्या महिन्यात प्रवास फारसे दिसत नाहीत. एकंदर्तीत ग्रहमान
प्रवास अनुकूल नाही. नोकरी/व्यवसायात ताण राहतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम
बाळगणे चांगले.
मकर रास : राशी स्वामी शनी लाभात व बुध सप्तमात त्यामुळे
प्रकृती ठीक राहील. द्वियेश शनि लाभात आहे परंतु वक्री असल्याने आर्थिक व्यवहारास
विलंब होण्याची शकयता आहे. तृतीयेश अष्टमात व शुक्र सप्तमात त्यामुळे शब्द जपून
वापरावेत नाहीतर वाद वाढून मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.ज्यांचे व्यवसाय
घरासंबंधी आहेत त्यांना हा महिना थोडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. जुनी दुखणी
डोके वर काढण्याची शक्यता आहे. षष्ठातील पूर्वार्धातील ग्रह आर्थिक आवक चांगली
ठेवतील. उत्तरार्धात जोडीदाराशी छान जमेल. भागीदारीच्या व्यवसाय चांगले चालतील.
दशमात मंगळ व दशमेश शुक्र सप्तमात हा योग व्यावसायिकांसाठी चांगला आहे. बरेच काम
आल्याने ताण पण येईल. परंतु आर्थिक बाजू चांगली राहील.एकंदरीत हा महिना संमिश्र
आहे.
कुंभ रास : राशीस्वामी शनि दशमात व बुध पंचमात त्यामुळे प्रकृती चांगली
राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व शुक्र पंचमात हा योग विवाहोत्सुक तरुणांना उत्तम
आहे. तृतीयेश मंगळ नवमात व गुरु सप्तमात प्रवासास अनुकूल आहे. धार्मिक कार्याकरता
देखील प्रवास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश
रवि पंचमात आणि राहू सप्तमात त्यामुळे प्रेमविवाह योग पण जोरदार आहे.
भागीदारांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी दशमात गुरु सप्तमात त्यामुळे
व्यावसायिकांना काळ चांगला आहे. एकंदरीत महिना चांगला आहे.
मीन रास : राशीस्वामी गुरु षष्ठात व शुक्र चतुर्थात तसेच मंगळ अष्टमात
त्यामुळे प्रकृतीस जपावे.विशेष करून पायासंबंधी दुखणी वाढतील. ह्या महिन्यात काही
पेन्शन किंवा वडिलार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात
असणाऱ्यांना interview छान जातील. नवीन नोकरी मिळण्याची खूप शक्यता आहे. चतुर्थात
बरेच ग्रह असून बुध पण तिथेच आहे त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील.
जोडीदाराशी जमवून घ्यावे. अष्टमात मंगळ व शुक्र चतुर्थात त्यामुळे वाहन जपून
चालवावे. नवमात शनि तसेच मंगळ अष्टमात त्यामुळे प्रवासात अडचणी येतील किंवा
ठरवलेले प्रवास रद्द होतील.दशमेश षष्ठात व शुक्र चतुर्थात असल्याने काहीना नोकरीत
प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच काहींच्या बाबतीत जर घरापासून लांब काम करत
असतील त्यांची बदली स्वत:च्या गावात होऊ शकेल.एकंदरीत महिना संमिश्र जाईल.
No comments:
Post a Comment