बऱ्याच वेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ग्रह ' बदल ' ग्रह बदलणे म्हणजे काय तर सध्या ज्या राशीत ग्रह आहे त्याच्या पुढच्या राशीत जाणे . जर ग्रह वक्री असेल तर तो ज्या राशीत सध्या आहे त्याच्या मागील राशीत जातो . उदा . राहू व केतू हे नेहिमी वक्री असतात त्यामुळे राहू बदलतो म्हणजे तो त्याच्या आधीच्या राशीत जातो . सध्या राहू तूळ राशीत आहे . राहू बदल होईल तेव्हा तो कन्या राशीत जाईल .
ह्या लेख पुरता आपण गुरु बदलाचा विचार करू . १९ जून ला गुरु कर्केत आला आहे त्या आधी मिथुनेत होता आता साधारण वर्षभर गुरु कर्केतून भ्रमण करेल म्हणजेच मिथुन राशीतून कर्क राशीत येणे हा सध्याचा (२०१४ ) ' गुरु बदल ' आहे . आता गुरु गोचरीने ( as per transit ) कर्केत आल्याने त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल ? ते बघुयात . त्यासाठी गुरु ह्या ग्रहाची माहिती असणे आवश्यक आहे . गुरु हा शुभ ग्रह आहे . बाकी गुरु ग्रह बद्दलची माहिती इथे http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html दिली आहेच .
गोचर गुरुचे परिणाम आपल्या चंद्र राशीप्रमाणे तसेच लग्न राशीप्रमाणे वाचावे .
. समजा तुमची चंद्र रास मेष आहे व लग्न रास कर्क तर मग तुम्हाला कर्केत असणारा गुरु चंद्र राशीला चौथा आहे व लग्न राशीला पहिला . त्यामुळे मेष व कर्क दोन्ही राशींमधील गुरु बदलाचे परिणाम वाचावेत . बऱ्याच जणांचे मत आहे कि गोचार( transits ) चंद्र राशीकडून येतात बऱ्याच जणांचे मत असते कि transits लग्न राशीकडून अनुभवास येतात .
तुम्हाला जास्त काय APPLY होते ते तुम्ही थोडा अभ्यास करून ठरवू शकता . तसेच गोचर भ्रमणाचे परिणाम हे तुमची मूळ पत्रिका त्यातील चालू असणाऱ्या दशा ह्या सर्वांवर अवलंबून आहेच . मग गोचर भ्रमण महत्वाचे आहे का ? तर ह्याचे उत्तर ' हो ' असेच द्यावे लागेल कारण जेव्हा एखादा फलादेश सांगितला जातो त्यावेळेस गोचर भ्रमण पण लक्षात घेऊनच तर्क केले जातात . त्यामुळे फक्त गोचरीने येणारा ग्रह भविष्य बदलत नाही तर त्यात catalyst ची भूमिका करतो . गोचर ग्रह शुभ परिणाम सांगत असतील व बाकी दशा पण प्रगतीकारक असतील तर त्या पत्रिकेच्या दर्जा प्रमाणे त्याकाळात प्रगती होईलच परंतु दशा अनुकूल असून गोचर ग्रह साथ देत नसतील तर प्रगती मध्ये काही काळ अडथळे किंवा विलंब होऊ शकतो . त्या उलट जर दशा अशुभ असतील व गोचर भ्रमण शुभ असेल तर कदाचित होणारा अनर्थ तात्पुरता टळू शकतो किंवा त्याची तिव्रता कमी होते .
आता प्रत्येक राशीला आत्ता कर्केत असणारा गुरु काय फळे देईल ह्यासाठी कर्क रास त्या राशीपासून कितवी आहे हे मोजा म्हणजे आपल्या राशीला सध्याचा गुरु कितवा आहे हे कळेल त्याप्रमाणे मग त्या स्थानातून बघितल्या जाणार्या गोष्टी व गुरु ग्रहाचा स्वभाव ह्याची सांगड घाला त्यावरून सध्याचा गोचरीचा गुरु आपल्याला कसा आहे त्याचा अंदाज बांधता येईल . तसेच गुरु हा शुभ ग्रह आहे त्याची दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते . गुरू स्वत: च्या स्थानापासून ५,७,९ ह्या स्थानावर बघतो त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत कर्केत , वृश्चिकेत , मकरेत किंवा मीनेत जेवढे ग्रह असतील त्या सर्वांवर कर्केतील गुरूची दृष्टी पडेल व त्याचे शुभ परिणाम अनुभवास येतील .तसेच गुरुचे भ्रमण पत्रिकेतील ज्या ग्रहावरून होते त्या ग्रहाच्या कारकत्वा नुसार शुभ परिणाम अनुभवास येतात . उदा . जन्म पत्रिकेतील शुक्रावरून गुरुचे भ्रमण विवाह सौख्यास पोषकच असते.
( सध्या गुरु कर्क राशीत आहे जन्म पत्रिकेत कोणते कोणते ग्रह कर्केत आहेत . कदाचित काही असतील कदाचित एकही नाही . )
आता जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास मेष आहे तर कर्क रास मेषेपासून चौथी आहे म्हणजे मेष राशीला सध्या चौथा गुरु आहे . जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास वृषभ आहे तर कर्क रास वृषभ राशीपासून तिसरी आहे म्हणजे वृषभ राशीला सध्या तिसरा गुरु आहे . ह्याप्रमाणेच मिथुन राशीवाल्याना दुसरा गुरु ,कर्क राशीवाल्याना पहिला गुरु , सिंह राशीवाल्याना बारावा गुरु, कन्या राशीवाल्याना अकरावा गुरु, तूळ राशीवाल्याना दहावा गुरु, वृश्चिक राशीवाल्याना नववा गुरु, धनु राशीवाल्याना आठवा गुरु, मकर राशीवाल्याना सातवा गुरु, कुंभ राशीवाल्याना सहावा गुरु,मीन राशीवाल्याना पाचवा गुरु आहे . (इथे सध्याचा गोचरीचा कर्क राशीतील गुरु धरला आहे ) .
आता तुमची रास कोणती हे तुम्हाला माहित असेल तर तुमच्या राशीला कितवा हे लगेचच कळेल .
प्रत्येक राशीला सध्याचे गुरुभ्रमण कसे आहे ते पुढच्या लेखात बघुयात .

No comments:
Post a Comment