मागील लेखात आपण शिक्षण आणि पत्रिका ह्याबाबतीतला आढावा घेतला . ह्या लेखात ग्रह आणि भाव साधारण कोणती शिक्षण शाखा सुचवतात हे पाहू.
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाकरता लक्षात घ्यावा लागतो .
हा उपनक्षत्र स्वामी जर बुध किंवा गुरु शी सबंधित( बुध , गुरु असेल किंवा बुध - गुरु च्या नक्षत्रात असेल ) असेल तर शिक्षण चांगले होते . तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ४, ९,११ ह्या भावांचा कार्येश असेल तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण होते . अर्थात त्या काळात येणाऱ्या दशा सुद्धा ४,९, ११ हि स्थाने देणाऱ्या हव्यात त्या जर उलट्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या ३,८ स्थानाच्या असतील तर शिक्षणात अडचणी येतात . अडचणी येतात म्हणजे खूप मेहनत करावी लागते सहज यश मिळत नाही .
आता चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे ते बघावे तसेच
कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे ते बघून मग साधारणपणे शिक्षण शाखा ठरवू शकतो . तसेच आयुष्यात पुढे येणाऱ्या महादशा कोणते क्षेत्र सुचवते आहे ह्याचा सारासार विचार करून मग ठरवावे .
जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी रवि असेल किंवा रवीच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे रवि ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . वैद्यकशास्त्र ( medical field ) , administration , politics , astronomy इ.
उदा . आता समजा चतुर्थ स्थानाचा उ. न स्वामी रवि व मंगळ ह्यांच्याशी सबंधित असून १, ८, ५,१२ ह्या भावांचा कार्येश असेल
व मेष , वृश्चिक , सिंह , मीन ह्या राशीचा प्रभाव असेल ( म्हणजे ह्या राशीत प्रामुख्याने ग्रह असतील ) ,तसेच पत्रिकेचा शैक्षणिक दर्जा पण चांगला असेल तर मग ' सर्जन' होण्यासाठी ती पत्रिका SUPPORTING आहे असे म्हणता येईल .
एकदा जर वैद्यक शाखा निश्चित केली तर मग ग्रह , राशी भाव ह्याप्रमाणे मग आयुर्वेद , homeopathy , allopathy ह्या शाखा ठरवता येतात तसेच समजा allopathy नक्की झाले तर मग पुढील शिक्षण कोणते क्षेत्र दाखवते हे पण बघता येते . उदा . जर शुक्र, रवि,चंद्र , मंगळ हे ग्रह वृषभ ,मीन , वृश्चिक , मेष ह्या राशी व २, १२,८,१ हे भाव असतील तर मग डोळ्यांचे डॉक्टर (आय सर्जन ) होता येईल .
जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी चंद्र असेल किंवा चंद्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे चंद्र ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तसेच जलपदार्थ , ताज्या भाज्या , वाहतूक , पाककला इ. गोष्टी चंद्रावरून बघतात त्यामुळे मानसशास्त्र , नेव्ही , शेती,नर्सिंग , सुगंधी द्रव्ये इ. क्षेत्र चंद्राच्या अधिपत्याखाली येतात . त्यामुळे Agriculture and food engg , dairy technology , pscyhology , bio- chemical , लहान मुलांचे शिक्षण क्षेत्र इ. गोष्टींसाठी चंद्र अनुकूल असतो .
आता प्रत्येक क्षेत्र हे कोण्या एका ग्रहामुळेच ठरत नसून हे ग्रह , राशी भाव ह्यांचे combination बघावे लागते .
उदा .psycology मध्ये चंद्र , बुध , गुरु हे ग्रह कर्क, मीन , मेष , मिथुन ह्या राशी आणि ४,३,१२ हे भाव ह्या सगळ्या गोष्टीं असाव्या लागतात .
जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी मंगळ असेल किंवा मंगळाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे मंगळ ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते .
उदा. energy , power ,electricity , fire , जमीन etc .
त्यामुळे प्रामुख्याने अभियांत्रिकी ( enggineering ) , मिलिटरी , बांधकाम , रवि पण असेल तर मग सर्जरी , पोलिस खाते इ. क्षेत्रासाठी अनुकूल असातो .
एक उदाहरण द्यायचे झाल्यास electrical engineering करता मंगळा बरोबर बुधाचा विचार होतो तसेच मेष ,सिंह ,वृश्चिक ह्या राशी व ३, ८, ११ हे भाव महत्वाचे असतात .
वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक ग्रह ठराविक शाखेकरता कारणीभूत नसतो तर ग्रह ,राशी ,भाव ह्यांचे combination बघावे लागते व पुढे येणाऱ्या दशा ह्या सगळ्यांचा समग्र विचार करून मग दिशा ठरवता येते .
बाकी ग्रहांबद्दलची माहिती पुढील भागात बघुयात .

No comments:
Post a Comment