व्यय स्थान
कृष्णमुर्ती
पद्धती मध्ये व्यय भावाचा नेमका अर्थ आपण समजावून घेऊ.
कोणत्याही पत्रिकेमध्ये व्य य भाव म्हणजे बारावे स्थान. परंतु ह्या लेखात आपण व्यय भावाचा दुसरा अर्थ बघणार आहोत.
कोणत्याही
भावाच्या आधीचा भाव म्हणजे त्याचे व्यय स्थान /व्ययभाव असतो. उदा. प्रथमभावाचा
बारावा भाव हा व्यय भाव आहे ,द्वितीय भावाचा प्रथम भाव हा व्यय भाव आहे तृतीय भावाचा
द्वितीय भाव हा व्यय भाव आहे. ह्याप्रमाणे प्रत्येक भावच्या आधी येणार भाव हे
त्याचे व्यय स्थान असते. जेव्हा एखाद्या भावाचा उपनक्षत्र स्वामी किंवा त्याचा
नक्षत्र स्वामी जर त्याच्या व्यय भावात असेल तर तो त्या भावावरून मिळणाऱ्या फळात
अडथळे आणतो.अपवाद फक्त लाभ स्थानाचा .उदा. पंचमभावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा
नक्षत्र स्वामी जर चतुर्थभावात असेल तर पंचमभावावरून मिळणाऱ्या भावांच्या फळात अडथळा
आणतो . म्हणजे पंचमावरून पहिल्या जाणार्या गोष्टी जसे प्रेमप्रकरण ,संतती तसेच
शेर्यस संबंधी गोष्टी इ. ह्यामध्ये बाधा आणतो .म्हणजे प्रेमप्रकरण यशस्वी न होणे, abortion
होणे/अपत्य न होणे, शेयर्स च्या व्यवहारात तोटा इ. ह्याचप्रमाणे आपण आता बाराही
भावांच्या उपनक्षत्र स्वामी वा त्यांचा नक्षत्र स्वामी जर त्याच्या व्यय स्थानी
असेल तर काय परिणाम होऊ शकतील हे बघुयात .
प्रथम
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर बाराव्या भावात असेल तर :
असे
असता जर प्रथम स्थानाशी ६ व ८ ह्या भावांचा पण संबंध येत असेल तर व्यक्तीची रोगप्रतिकारक
शक्ती कमी असते व काही प्रसंगी हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते.
जर
का ६ व ८ ह्या भावांशी संबंध येत नसेल तर अशी व्यक्ती अंतर्मुख/स्वकेंद्रित असू
शकते.तसेच घरापासून लांब जाण्याचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासास हा योग कारणीभूत
होतो.
द्वितीयभावाचा
उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर प्रथम भावात असेल तर :
द्वितीय
भावावरून धन बघतात त्यामुळे असा योग असेल तर अर्थातच धनस्थिती च्या दृष्टीने
चांगला नव्हे. परंतु सामाजिक मान ,प्रतिष्ठा ह्या दृष्टीने चांगली फळे देतो.तसेच
द्वितीय वरून कुटुंब वृद्धी बघितली जाते त्यादृष्टीने पण हा योग अडथळा ठरू शकतो.
तृतीयभावाचा
उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर द्वितीय भावात असेल तर :
तृतीय
भाव हे पराक्रम स्थान आहे. द्वितीय भाव हे वाचा स्थान आहे.त्यामुळे अशा योगात बोलण्यात
ती व्यक्ती तरबेज असू शकते. तसेच धनार्जन पुस्तक विक्री,लेखन,प्रकाशन इ. मार्गे
होण्याची शक्यता असते. इथे द्वितीय भाव जरी तृतीयाचा व्ययस्थान असले तरी प्रवास
व्यतिरिक्त इतर बाबतीत चांगली फळे देईल.
चतुर्थ
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर तृतीय भावात असेल तर :
चतुर्थ
भावावरून आपण घर,वाहन,आई शिक्षण हे बघतो वरील योगात ह्या सर्व गोष्टींमध्ये अडचणी
निर्माण होतात.घरापासून लांब राहण्याचे प्रसंग येतात. आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने
पण समस्या निर्माण होऊ शकतात.शिक्षणात अडथळे येतात इ.
पंचमभावाचा
नक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर चतुर्थभावात असेल तर पंचमभावावरून
मिळणाऱ्या भावांच्या फळात अडथळा आणतो . म्हणजे पंचमावरून पहिल्या जाणार्या गोष्टी
जसे प्रेमप्रकरण ,संतती तसेच शेर्यस संबंधी गोष्टी इ. ह्यामध्ये बाधा आणतो .म्हणजे
प्रेमप्रकरण यशस्वी न होणे , abortion होणे/अपत्य न होणे , शेयर्स च्या व्यवहारात
तोटा इ.
षष्ठ
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर पंचम भावात असेल तर :
आजारपणातून
बरे होण्याच्या दृतीने हा योग उत्तम .प्रतिकारशक्ती चांगली असते. षष्ठ भावावरून
आजारपण,धन,नोकरी,आजोळ इ. बघतात . त्यामुळे अशा योगात नोकरी सतत बदलाने अथवा सुटणे
असे घडते . तसेच धना संबंधी पण हा कमजोर आहे.ह्या शिवाय जर भागीदारीत व्यवसाय असेल
तर पंचमातील ग्रह भागीदाराला जास्त फायदा दाखवतात.तसेच मातुल घराण्याशी पण संबंध
फारसे राहत नाहीत.
सप्तम
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर षष्ठ भावात असेल तर :
सप्तम
भावावरून वैवाहिक जोडीदार ,कोर्ट कचेरी ,स्पर्धक, चोर इ.बघतात.अशा योगात लग्न
उशिरा होणे किंवा वैवाहिक आयुष्यात खटके उडणे अशी शक्यता असते. कोर्ट कचेरीच्या
दृष्टीने हा योग चांगला आहे. स्पर्धा परीक्षेत साठी सुद्धा मात करण्याच्या
दृष्टीने हा योग चांगला आहे. घरात चोरी झाली तर चोर पकडला जाण्याची शक्यता वाढते.
अष्टम
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर सप्तम भावात असेल तर :
अष्टमावरून
पेन्शन ,विमाची कामे ,अचानक धनलाभ बघतात. अशा योगात ह्या सगळ्यात अडथळे येण्याची
शक्यता असते.
नवम
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर अष्टमात भावात असेल तर :
नवमावरून
लांबचे प्रवास,उच्च शिक्षण, धार्मिक गोष्टी इ. बघतात . अशा योगात ह्या सगळ्यात
अडथळे येणे संभवते. तसेच मानसिक त्रास पण होतो.
दशम
भावाचा उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर नवम भावात असेल तर :
दशम
स्थान हे कर्म स्थान आहे. ह्यावरून व्यक्तीची नोकरी/व्यवसाय तसेच त्याच्या हातून
होणारे सामाजिक कार्य इ. बघतात. जर का व्यक्ती धार्मिक असेल (म्हणजे १-५-९ ह्याचा
एक दुसर्याशी संबंध ) आणि तसेच कार्यक्षेत्र पण धार्मिक बाबींशी संबंधित असेल तर हा
योग चांगला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व संशोधन क्षेत्रात काम
करणाऱ्या व्यक्तींकरता पण चांगला आहे. मात्र इतर क्षेत्रासाठी हा योग वारंवार
नोकरीत बदल घडवणारा आहे.जर प्रसिद्धी योग असेल तर नवम भाव हा भाग्यकारक असल्याने
१० व ९ चा सबंध प्रसिद्धीस पूरक आहे
लाभाचा
उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर दशम भावात असेल तर :
ह्या
योगात मात्र सगळी चांगली फळे मिळतात.हातून काही कार्य घडण्याची शक्यता असते.
मोठ्या जबाबदारया यशस्वीपणे पेलतात.१० व ११ हि दोन्ही धनस्थाने असल्याने आर्थिक फायदे पण होतात.
द्वादश
उपनक्षत्र स्वामी वा त्याचा नक्षत्र स्वामी जर लाभात भावात असेल तर :
ह्या
योगात फक्त परदेश प्रवसास अडथला येऊ शकतो. बाकी हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला
आहे. अडकलेले पैसे पण मिळतात.
हा लेख astrology counselling(सुनील
देव व अनघा भदे) ह्यांनी लिहिला आहे.
No comments:
Post a Comment