Title

Astrology Blog by Anagha Bhade


Thursday, 16 January 2014

विरोधी स्थान

त्रिकेच्या बाराही स्थानांचा आपण विचार केला . जसे प्रत्येक स्थानावरून बघणाऱ्या गोष्टींची फळे त्या महादशा / अंतर्दशेत मिळतात तसे त्याच्या आधीचे ( त्या स्थानाचे व्यय स्थान ) हे त्या स्थानाचे विरोधी फळ देत असते  . 
आता कोणती दशा कसे फळ देईल ह्या संबंधी मला 'कृष्णमुर्ती पद्धती 'जास्त प्रभावी वाटते . ह्या  पद्धतीनुसार आपण प्रत्येक स्थानांचे कार्येश ग्रह काढू शकतो .
एकदा का कळाले  कि दशास्वामी कोणत्या भावांची फळे अधिकतेने देणार आहे  मग त्यानंतर त्या त्या दृष्टीने प्रत्येक भावांचा अभ्यास करता येतो .विरोधी स्थान म्हणजे काय ते खालील उदाहरणाने बघुयात . 

  उदा: आपण पत्रिकेत संतती संबंधी विचार पंचम स्थानावरून करतो . पंचमाचे व्यय ( आधीचे ) स्थान म्हणजे चतुर्थ स्थान . संतती संबंधी विचार करताना जर चतुर्थ स्थानाच्या बलवान दशा / अंतर्दशा असतील तर संतती( मुल ) होण्यास अडचणी येतात .

 जर दशा / अंतर्दशा स्वामी संतती संबंधी स्थानाचा ( २,५,११ ) कार्येश नसून चतुर्थ स्थानाचा एकमेव कार्येश असेल तर त्या दशेत / अंतर्दशेत  संतती होत नाही. गर्भधारणाच होत नाही ( conceive होत नाही  )  . 

जर दशा / अंतर्दशा स्वामी संतती संबंधी स्थानाचा ( २,५,११ ) कार्येश असून  चतुर्थ स्थानाचा एकमेव कार्येश असेल तर त्या दशेत / अंतर्दशेत  गर्भधारणा होते पण abortion होतात .अशावेळेस योग्य दशेची वाट बघणे एवढेच आपल्या हातात असते .

प्रत्येक स्थानाबाबत आपल्याला अशी अनुमाने घेता येतील उदा . 
चतुर्थ  स्थानचे व्यय स्थान म्हणजे तृतीय  स्थान. जर दशा स्वामी तृतीय स्थानचा बलवान कार्येश असेल तर चतुर्थ स्थानावरून बघण्यात येणाऱ्या गोष्टीमध्ये अडथळे आणतो . जसे कि चतुर्थ स्थानावरून घर, वाहन , शिक्षण इ . गोष्टी बघतात . त्यामुळे अशावेळेस शिक्षण चालू असेल तर त्यात यश न मिळणे . घर ,वाहन इ . खरेदी प्रकरणात अडथळे येणे इ . गोष्टी होतील . परंतु समजा घर विकायचे असेल तर उलट त्या दृष्टीने मदत होईल कारण तृतीय हे घर बदलण्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे . 

 विवाहासंबंधी प्रश्न  आपण सप्तम स्थानावरून बघतो . समजा एखाद्या मुलाचा / मुलीचा लग्नासाठी वधु / वर  संशोधन चालू आहे व अंतर्दशा स्वामी फक्त सहाव्या स्थानाचा एकमेव कार्येश आहे तर ती अंतर्दशा संपेपर्यंत लग्न ठरणे कठीण .समजा लग्न झाल्यानंतर सहाव्या स्थानाची बलवान दशा  असेल तर मग वैवाहिक सौख्य मिळणे कठीण त्यातून जर तृतीय स्थानाशी संबंध आला तर मग घटस्फोट !अर्थात पत्रिकेत घटस्फोटाचे योग पण बघावे लागतीलच . 

तसेच नोकरी संबंधीचे प्रश्न षष्ठ स्थानावरून बघतात .दशास्वामी जर पंचमाचा बलवान कार्येश असेल नोकरी सुटण्याची शक्यता अधिक .पंचमाच्या जोडीने जर २, ६,१०,११ चा पण कार्येश असेल तर आधीची नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळते  . तसेच नवम स्थान पण दशमस्थानाला व्यय स्थान असल्याने नोकरी संबंधात वाईटच फळे देते . 
वर दिलेली सर्व उदाहरणे कृष्णमुर्ती पद्धतीनेच दिली आहेत . पण ह्या विरोधी भावांच्या दशेचा मात्र अनुभव येतोच . 

ग्रहयोग हे घटना घडणार कि नाही हे ठरवताना जसे महत्वाचे असतात तसे दशास्वामी हा घटना कधी घडेल हे ठरवतो.  त्यावेळेस दशास्वामी त्या संबंधात विरोधी स्थानाचा बलवान कार्येश आहे का ते पाहणे फार महत्वाचे आहे . 

No comments:

Post a Comment