Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday, 22 January 2014

पत्रिकेतील बुध

' बुध'  म्हटले कि लगेच बुद्धि , हजारजबाबी पणा , वक्तृत्व इ . गोष्टी डोळ्यासमोर येतात . बुध माणसाला गणिती बुद्धी देतो . आकलन शक्ती देतो. जेव्हा आपण म्हणतो कि एखाद्या मुलाचे ग्रास्पिंग चांगले आहे .त्याला  पटकन  एखादी गोष्ट कळते. जास्त अभ्यास न करता चांगले मार्क मिळतात . अशावेळेस आपण त्याच्या पत्रिकेतल्या बुधा बद्दलच बोलत असतो . जितका पत्रिकेतला बुध चांगला तेवढी आकलन शक्ती चांगली .

 गुरु माणसाला व्यापक बुद्धी देतो तर बुध गणिती बुद्धी किंवा instant  solution काढताना जी बुद्धी लागते ती देतो . उदा . स्कॉलरशीप च्या परीक्षेकरता बुध मदत करेल तर डॉक्टरेट मिळवण्यासाठी  गुरूची मदत होईल .बुध हा वाचा ( बोलणे ) ,मामा- मावशा ( मातुल घराणे) ,  विनोदबुद्धि इ. गोष्टींचा कारक ग्रह आहे .

बुध हा communication,तसेच लिखाणाचा  ग्रह आहे . त्यामुळे पत्रकार , सेल्समन , सर्व प्रकारचे एजंट्स  इ. बुधाच्या अमलाखाली येतात . तसेच बुध हा analysis करणारा ग्रह आहे विशेषत: कन्या राशीतील बुध . त्यामुळे चिकित्सक लोक, ज्योतिषी ,critics , analyst इ. लोकांचा पण बुध चांगला असावा लागतो .  विनोदी लेखन करणारे , वकील , व्यापारीवर्ग  हे सुद्धा बुधाच्या अमलाखाली येतात  .

बुधाच्या स्वत: च्या राशी मिथुन व कन्या आहेत . ह्याचा अर्थ जेव्हा बुध मिथुनेत किंवा कन्येत असतो तेव्हा तो स्वराशीत आहे असे म्हणतात . बुधाची उच्च रास कन्या व नीच रास मीन आहे .

 आता मिथुन व कन्या ह्या दोन्हीही द्विस्वभाव राशी आहेत . त्यामुळे बुध एखादी गोष्ट  एकाहून अधिक वेळा घडवून आणतो. कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बुधाचा हा गुणधर्म बर्याच वेळा वापरला जातो . उदा  सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल व कोणत्याही द्विस्वभाव राशीत असेल तर एकाहून अधिक विवाह  होण्याची शक्यता असते / होतात .
तसेच दशमस्थनाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल तर बर्याच वेळा एकाहून अधिक गोष्टी (अर्थार्जना करता ) करण्याकडे कल  असतो .
तसेच प्रश्नकुंडली मध्ये आजार संबंधी प्रश्न असेल व षष्ठ स्थानाचा उ.न स्वमि जर बुध आला तर second opinion घ्या म्हणून सांगतात . 

आता हा लेख लिहितना पण  सलग एका वेळेस लिहून झाला नाही . हा बुधाचाच परिणाम म्हणायचा !

Medical  astrology मध्ये बुधावरुन nervous system , चक्कर येणे , मेंदूचे विकार , श्वसनाचे  आजार ,दमा ,पचन ,आतडी ,वाचादोष,त्वचारोग  इ. गोष्टी  बघतात  . ज्यांच्या पत्रिकेतील बुध बिघडलेला आहे त्यांना कार्मिक हिलिंग म्हणून मामा- मावशा ( मातुल घराणे)  ह्यांच्याशी संबंध चांगले ठेवणे तसेच वेळप्रसंगी त्यांना मदत करणे इ. सुचवले जाते .

माझ्यापात्रिकेतील  बुधामुळेच मला ब्लॉग  लिहिण्याची बुद्धी होत असावी का ?

1 comment:

  1. - AstroTalk is the leading astrology platform with 30 million monthly users and over 3100 astrologers. Each day, they provide over 2,50,000 minutes of consultation for their customers. Talk to Astrologer on our website and get the solution of all your life related problems.

    ReplyDelete