खरेतर रवि हा तारा आहे परंतु पत्रिकेत मात्र त्याला ग्रह म्हटले आहे . कदाचित मानवी जीवनात रवि चा थेट परिणाम होत असल्याने बाकी इतर ग्रहांबरोबर रविने पत्रिकेत महत्वाचे स्थान मिळवले व तो पण ग्रह ( पत्रिकेपुरता ) म्हणूनच गणला जाऊ लागला असेल .तर अशा ह्या स्वयंप्रकाशी रविची माहिती देण्याचा प्रयत्न करते .
रवि म्हणजेच सूर्य (sun ) . रवि म्हणजे प्रकाश , उर्जा .रविवरून म्हणूनच उत्साह ,कर्तुत्व ,मानसन्मान , प्रतिकारशक्ती , अधिकार , सरकारी कर्मचारी , सरकारी संस्था इ. चा विचार होतो .तसेच रवि हा पित्याचा कारक ग्रह मनाला आहे त्यामुळे पितृसौख्याचा विचार पण रविवरून करतात .बायकांच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने रवि, मंगळ ह्या ग्रहांना महत्व आहेच .
जसे पत्रिकेतील शुभ रवि त्याच्या अमलाखाली / कारकत्वात असणाऱ्या गोष्टी वृद्धिंगत करतो त्याचप्रमाणे बिघडलेला म्हणजे अशुभ योगात असणारा रवि अधिकार , पितृसौख्य , प्रतिकारशक्ती इ. गोष्टीची वाईट फळे पण देतो .
बिघडलेला रवि गर्विष्ठ बनवतो. रवीचा मुख्य शत्रू म्हणजे शनि . रवि- शनि युती किंवा केंद्रयोगात रवि शनि मुळे बिघडतो . तसेच रवि- राहू युती सुद्धा बिघडलेल्या रविचेच उदाहरण आहे . हि युती जर नवमात असेल तर पितृदोष आहे असे म्हणतात . पितृदोष म्हणजे जसे आपल्या आधीच्या पिढीतील लोकानी केलेल्या पुण्याचे आपण भागीदार होतो तसेच पापाचे पण होतो तर पितृदोष असणाऱ्या पत्रिकेत आधीच्या पिढ्यांमध्ये केलेल्या वाईट कर्मांचे फळ हा दोष असणाऱ्या व्यक्तीस भोगावे लागते . यावर उपाय म्हणजे मला वाटते कि आपण कायम चांगलीच कर्म करावीत .
बिघडलेल्या रविमुळे हृदयाचे आजार, प्रतिकार्शक्तीचा अभाव , सर्व प्रकारचे ताप, पाठीच्या मणक्यांचा त्रास , डोळ्यांचे आजार , शरीरातील पांढर्या पेशींचा अभाव इ. गोष्टी संभवतात .
रवि च्या अमलाखाली शासकीय नोकरी, संरक्षण व्यवस्था , ऊर्जानिर्मिती केंद्रे इ. गोष्टी येतात . तसेच वैदकीय (doctor etc ) पेशाला सुद्धा रवि कारणीभूत असतो .
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये सुद्धा रविला खूपच महत्व आहे . घटना कधी घडेल हे काढण्याकरता रुलिंग प्लानेट च्या राशी नक्षत्रातून रविचे भ्रमण घेतले जाते .
पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात पण रवि रास ( sunsign ) महत्वाच्या मानल्या जातात विशेष करून स्वभाव कळण्याच्या दृष्टीने .लिंडा गुडमन ह्यांचे sunsign वरील पुस्तक त्या बाबतीत बरेच प्रसिद्ध आहे . परंतु कोणत्याही एका ग्रह मुळे स्वभाव ठरत नाहीतर तो सगळ्या ग्रहांचा तसेच लग्न्राशिचा एकत्रित परिणाम असतो .
रविवरुनच आपण दिशा ठरवतो .त्यामुळे लग्नरास ठरवताना पण रवि किती महत्वाचा आहे हे कळले असेलच!
No comments:
Post a Comment