Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday, 3 February 2014

पत्रिकेतील शनि

 शनि  ह्या ग्रहबाबत सर्वसामान्य पणे बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते ती म्हणजे ' शनीची साडेसाती ' !
आयुष्यात जेव्हा केव्हा व्यक्तीला त्रास व्हायला लागतात तेव्हा मग शनि महाराजांची आठवण येते . मग बर्याच वेळा "साडेसाती सुरु आहे म्हणून हा त्रास होतोय "किंवा "बापरे आता पुढील वर्षीपासून साडेसाती सुरु "किंवा "मग संपली बुवा एकदाची साडेसाती "असे ऐकायला मिळते . तर सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते  पाहू .


जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यानदशनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .

 साडेसाती व्यतिरिक्त आता शनि बद्दल अजून माहिती घेऊ.

शनि म्हणजे विलम्ब ,त्याग ,वैराग्य , वृद्धत्व,नैराश्य ,राजकारण  .शनि हा नैसर्गिक पापग्रह मनाला आहे . 
शनीच्या  स्वत:च्या राशी मकर व कुंभ आहेत . शनि तूळ राशीत उच्चीचा व मेष  राशीत नीचीचा मानतात . शनीचे रत्न नीलम आहे . शनि गोर गरीबांचा , कामगार  वर्गातील  लोकांचा ,दिन दुबळ्याचा कारक ग्रह आहे .शनि हा काटकसरी वृत्तीचा,गंभीर ग्रह आहे . शनि कोणतीही गोष्ट  विलंबाने घडवतो . प्रश्न कुंडली मध्ये रुलिंग मध्ये शनि  आल्यास घटना उशिरा घडते.जन्मपत्रिकेत पंचमातील शनि संतती होण्यास विलंब लावण्याची शक्यता असते. तसेच जन्मपत्रिकेत सप्तमातील  शनि विवाह होण्यास विलंब लावण्याची शक्यता असते.

शनि हा लोंकाचा support दाखवतो . एखादी व्यक्ती लोकप्रिय होण्यामागे शनि कारणीभूत असतो . प्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्तींच्या पत्रिकेत शनि चांगला असतो . तसेच न्यायदानाच्या कामात पण शनीचे महत्व आहे त्यामुळे वकील , न्यायाधीश ह्यांच्या पत्रिकेतील शनि पण चांगला असावा लागतो . 

शनि हा हाडांचा कारक ग्रह आहे . थंडीमुळे होणारे आजार तसेच दीर्घ मुदतीचे आजार शनि च्या अमलाखाली येतात . व्यंग ,कफ ,महारोग ,दमा, पायाचे विकार , दातांचे आजार.,अपंगत्व  इ. विचार शनीवरून करतात . 

'भोग भोगा आणि मुक्त व्हा ! ' हा संदेश शनि देतो . 

No comments:

Post a Comment