Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday, 10 February 2014

पत्रिकेतील राहु व केतू

पत्रिकेत शनि खालोखाल कोणाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे राहू केतूची .बर्याच वेळा कालसर्प योग , पितृ दोष अशा बर्याच प्रकारामध्ये राहू,केतू अडकलेले असतात . ( पितृदोषा बद्दल आधी लिहिले आहेच ) 

सगळ्यात आधी कालसर्प योग म्हणजे काय ते बघू , जर पत्रिकेतील सर्व ग्रह राहू व केतू च्या मध्ये असतील तर कालसर्प योग आहे असे म्हणतात . 

उदा . समजा प्रथम स्थानी राहू आहे व सप्तम स्थानी केतू आणि बाकी सगळे ग्रह १ ते ७  ह्या स्थानांमध्ये आहेत तर त्या पत्रिकेत कालसर्प योग आहे असे म्हणतात . पण खरेतर ह्या बाबत दोन मते आहेत एक तर कालसर्प योग आहे म्हणून त्रास त्या व्यक्तीस होतात त्यासाठी त्रब्यकेश्वर ला जाऊन 'नारायण नागबली 'हा विधी करण्याचा सल्ला दिला जातो . दुसरे मत असे आहे कि आपल्याकडे आधीच्या काळात कालसर्प नावाचा कोणताही योग नाही व त्यासाठी कोणताही विधी करण्याची गरज नाही .मला सुद्धा दुसरे मत जास्त पटते कारण कालसर्प असलेल्या कितीतरी यशस्वी आणि सुखी उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच  .

आता राहू केतूची इतर माहिती बघू . राहू व केतू हे खरेतर ग्रह नाहीत तर राहू केतू हे पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू आहेत .परन्तु त्यांना पत्रिकेत ग्रहांचा दर्जा दिला आहे . ह्यावरूनच त्यांचे महत्व लक्षात  येईल . 

गूढता , पाशवी मंत्र तंत्र विद्या ,जुगार ,गारुडी विद्या , विषप्रयोग,खोटेपणा  , बंधन योग इ. गोष्टींचा कारक राहु ला समजले जाते .राहुला सर्पाच्या तोंडाची उपमा दिली आहे .जेव्हा आपण म्हणतो कि एखादा ग्रह पत्रिकेत बिघडला आहे तेव्हा आपण त्या ग्रहाचा कोणत्यातरी अशुभ ग्रहाशी कुयोगाबाबत बोलत असतो .अशावेळेस जर कोणताही ग्रह जर राहू च्या युतीत ( साधारण ४ अंश )असेल तर तो ग्रह बिघडला आहे असे समजावे . अशावेळेस त्या ग्रहाच्या कारकत्वानुसार काही वाईट फळे मिळण्याची शक्यता वाढते . उदा . जर गुरु -राहू युती असेल तर संतती कारक म्हणून गुरु त्या दृष्टीने बिघडतो . जर शुक्र -राहू युती असल तर वैवाहिक सुख चांगले मिळत नाही . तसेच राहू मुळे अंतर जातीय किंवा आंतरधर्मीय जोडीदार असण्याची शक्यता असते . मंगल-राहू युती मध्ये मंगल भावंडांचा कारक ग्रह असल्याने त्या दृष्टीने काही वाईट फळे देण्याची शक्यता असते . 
एका व्यक्तीस भास होतात त्या व्यतिच्या पत्रिकेत सुद्धा राहुशी त्याचा संबंध आढळला . 

पत्रिकेतील बलवान राहू चांगली फळे पण देतो . अशावेळेस यश ,कीर्ती , आर्थिक उत्कर्ष चांगला होतो . राहू केतुला स्वत:च्याराशी नाहीत  परंतु राहू मिथुनेत व केतू धनु राशीत  उच्च मानतात .तसेच राहू केतुना दृष्टी आहे कि नाही या बाबतीत पण दोन मते आहेत एक म्हणजे त्यांना दृष्टी नसते आणि दुसरे म्हणजे राहुला ५,७,९,१२ तसेच केतुला फक्त सातवी दृष्टी असते . 

केतुला  सर्पाच्या शेपटीची उपमा दिली आहे . केतू हा मंत्र - तंत्र साधना ,कठोर तपश्चर्या , आयुर्वेदिक औषधांचा कारक ग्रह  आहे .  क़ेतुवरुन त्वचा विकार ,कोड ,मूळव्याध इ. गोष्टी बघतात . राहू प्रमाणे केतू देखील काही प्रमाणात ग्रहांना बिघडवतो . पण अध्यात्मिक प्रगतीच्या बाजूने जर पत्रिका असेल तर केतू त्यात मदतच करतो. गुरु- केतू युती त्या दृष्टीने चांगली  . चंद्र-  केतू युती असल तर थोडा नैराश्यवादी स्वभाव असण्याचा संबंध असतो . मंगळ - केतू युती कदाचित  काही रक्त  दोष उत्पन्न करणारी असू शकते . ( मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह आहे ) .

कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये राहू - केतुना अतिशय महत्व आहे . कृष्णमुर्तीप्रमाणे ' Nodes are stronger than planets ' असे मानतात त्याचा बऱ्याच  वेळा अनुभव पण येतो . ह्या पद्धतीत राहू केतू संबंधी निर्णय देताना राहू वर ज्या ग्रहांची दृष्टी आहे ते फळ राहू / केतू देतील किंवा जर कोणाची दृष्टी नसेल तर ते ज्यांच्या युतीत आहेत त्याप्रमाणे फळे मिळतील . जर कोणाच्याही युतीत नसतील तर त्यांच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळे मिळतील व जर ते स्वनक्षत्री  असतील तर ते ज्या राशीत आहेत त्या राशीस्वामी प्रमाणे फळे देतील  . 
आहे कि नाही फारच complex प्रकरण !

1 comment:

  1. Great content sir
    - The news these days is full of political infighting, climate change, global crises, and nuclear war. To get the right prediction from an Astrologer visit our website and get your all answers related to astrology.

    ReplyDelete