काही दिवसांपूर्वी रश्मीचा ( नाव बदलले आहे ) फोन आला . रश्मी एका आयटी कंपनी मध्ये काम करते . तिला काही कामासाठी अमेरिकेत असणाऱ्या त्यांच्याच तिथल्या ऑफिस मध्ये काही कामासाठी जायचे होते . परंतु काही न काही कारणाने तिच्या जाण्याची तारीख निश्चित होत नव्हती . दुसरे महत्वाचे म्हणजे तिला व्हिसा पण करायचा होता . त्यामुळे त्यांच्याच कंपनी मध्ये काम असले तरी मी अमेरिकेला जाऊ शकेन का आणि कधी असा प्रश्न तिला सतावत होता. रश्मीचा मुलगापण तसा लहान म्हणजे ९ वर्षांचा त्यामुळे महिनाभर अमेरिकेला जायचे म्हणजे इथे त्याची पण सगळी व्यवस्था लावून जाणे भाग होते . त्यामुळे मी अमेरिकेला कधी जाईन हा प्रश्न तिने मला विचारला . अशा प्रश्नाची उत्तरे प्रश्नकुंडली द्वारे चांगल्या प्रकारे देता येतात त्यामुळे मी तिच्याकडून प्रश्नकुंडली करता १ ते २४९ मधील नंबर मागितला . तिने लगेच ९९ नंबर दिला . नंबर बघून दोनदा ९ आकडा बघून वाटले अगदी काही अडचण न येता हि अमेरिकेला जाईल कारण नवम भावावरून लांबचा प्रवास बघतात .
तिने दिलेल्या नंबर प्रमाणे प्रश्नकुंडली तयार केली .
प्रश्नकुंडली (kp no 99, 20/12/2014, 20:00 ,pune )
Because of some technical issues unable to upload kundali .
९९ नंबर प्रमाणे हि सिंह लग्नाची पत्रिका आहे . पत्रिकेत चंद्र तृतीयात आहे . तसेच चंद्राची कर्क रास बाराव्या भावात आहे . ३ व १२( प्रदेश प्रवास ) हि प्रवासाची स्थाने आहेत . ह्याचाच अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . प्रश्नकुंडली मध्ये जेव्हा चंद्र प्रश्न दाखवतो तेव्हा उत्तर सहसा चुकत नाही .
प्रश्नकुंडली (kp no 99, 20/12/2014, 20:00 ,pune )
Because of some technical issues unable to upload kundali .
९९ नंबर प्रमाणे हि सिंह लग्नाची पत्रिका आहे . पत्रिकेत चंद्र तृतीयात आहे . तसेच चंद्राची कर्क रास बाराव्या भावात आहे . ३ व १२( प्रदेश प्रवास ) हि प्रवासाची स्थाने आहेत . ह्याचाच अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . प्रश्नकुंडली मध्ये जेव्हा चंद्र प्रश्न दाखवतो तेव्हा उत्तर सहसा चुकत नाही .
मी परदेशी जाईन का? ह्या प्रश्नासाठी बाराव्या भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो जर तृतीय , नवम किंवा बाराव्या भावाचा कार्येश असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर व्यक्ती परदेश प्रवास करते .
ह्या पत्रिकेत बाराव्या भावाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र आहे . चंद्र स्वत: तृतीय भावात आहे . चंद्र शनीच्या नक्षत्रात त्यामुळे ३,६,७,११,१२ ह्या सर्व भावांचा कार्येश होतो . ह्याचाच अर्थ परदेश प्रवास होणार .
लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शनि तृतीयाचा कार्येश आहे त्यामुळे visa मिळायला पण काही अडचण वाटत नाही .
आता रश्मी अमेरिकेला कधी जाईल हा प्रश्न आहे .
आता शनीची महादशेत गुरूची अंतर्दशा आहे .गुरु चतुर्थ भावाचा प्रथम दर्जाचा कार्येश असला तरी इथे प्रश्न short stay /शोर्ट travel to US चा आहे ( जर प्रश्न २-३ वर्षाच्या stay चा असता तर गुरु अंतर्दश घेत आलीे नसती )व गुरु ४ बरोबर १२ चा कार्येश आहेच. बुध सुद्धा केतूच्या नक्षत्रात आहे व केतू मीन राशीत असल्याने गुरूची फळे देईल . त्यामुळे गुरूच्या अंतर्दशेत व बुधाच्या विदशेत साधारण १७ मार्च २०१५ च्या आत जाणे होईल . अजून अचूकतेकारता रुलिंग प्लानेटस मधून रवि भ्रमण बघावे .
प्रश्नवेळेस रुलिंग planet खालील प्रमाणे :
लग्न स्वामी : चंद्र
नक्षत्र स्वामी : शनि
राशी स्वामी : मंगळ
दिवसाचा स्वामी :शनि
प्रश्नकुंडली मध्ये रवी धनु राशीत केतूच्य नक्षत्रात आहे गुरु रुलिंग मध्ये नाही त्यामुळे धनु रास सोडावी लागेल नंतर मकरेत रवीच्या उत्तराषाढा नक्षत्रात जाईल . पण रवि रुलिंग मध्ये नाही त्यामुळे मकर राशीत चंद्राचे श्रवण नक्षत्र धरायला हरकत नाही . हा PERIOD साधारण २४ जानेवारी ते ६ फेब्रुवारी असा येतो . त्यामुळे ह्या काळात अमेरिकेला जाशील असे सांगितले व त्याप्रमाणे ती २५ तारखेला गेली . visa मिळायला पण काही अडचण आली नाही .
No comments:
Post a Comment