राशीभविष्य ऑगस्ट २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :
१४ ऑगस्ट पासून शुक्र कर्क राशीत वक्री , २३ ऑगस्ट पासून बुध कन्या राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत ,१७ ऑगस्ट पासून रवि सिंह राशीत,१४ जुलै पासून गुरु सिंह राशीत, २ ऑगस्ट पासून शनि वृश्चिक राशीत मार्गी होत आहे .
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात त्याच्या जोडीला रवि व बुध हे सर्व योग प्रकृती ठणठणीत राहील असे दाखवतात . तसेच ह्या महिन्यात प्रवास फारसा होणार नाही . तुम्ही घरात जास्त वेळ देऊ शकाल . ह्या महिन्यात आर्थिक व्यवहार जपून करावेत कारण शुक्र पंचमात आणि केतू बाराव्या स्थानात आहेत . हे दोन्ही ग्रह व्यवहारात नुकसान दाखवतात . जी लोक सध्या घरापसुन लांब आहेत त्यांना स्वगृही येण्या करता काळ उत्तम आहे . चतुर्थात तीन ग्रह असल्याने शिक्षणाच्या दृष्टीने चांगला काळ आहे . १७ ऑगस्ट नंतर कला /क्रीडा , शेयर्स चा व्यवसाय असणारे लोक ह्यांच्या करता काळ चांगला आहे . जोडीदाराशी सबंध सर्वसाधारण राहतील . सध्याचा काळ धार्मिक /अध्यात्मिक कार्याला चांगला आहे .नोकरी/व्यवसायात कामाचा ताण राहील तसेच आर्थिक बाबतीत सुद्धा पटकन हातावेगळी होण्याची शक्यता कमी आहे . हा महिना सर्वसाधारण राहील .
वृषभ : ह्या महिन्यात मनाविरुद्ध काही प्रवास घडण्याची शक्यता आहे कारण शुक्र वक्री आहे व तृतीयात तीन ग्रह आहेतच . कदाचित भाऊ बहिणीच्या काही कामासाठी प्रवास घडतील . शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे . तसेच मातृसौख्य चांगले मिळेल . कलाकारांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता आहे . जोडीदाराबरोबर वाद टाळणे शहाणपणाचे ठरेल . काही आर्थिक लाभ पण होतील असे वाटते. ह्या महिन्यात भाग्य फारसे साथ देणार नाही त्यामुळे प्रयत्न जास्त करावे लागतील . नोकरी/व्यवसायात पण त्रास होण्याची शक्यता आहे .हा महिना वृषभ राशीच्या लोकांना सर्वसाधारण राहील .
मिथुन : ह्या राशीच्या लोकांना त्यांनी पूर्वी केलेल्या कामाचे फळ ह्या महिन्यात मिळेल . तसेच प्रसिद्धीच्या दृष्टीने पण योग चांगले आहेत . द्वितीयात तीन ग्रह असल्याने आर्थिक दृष्टीने महिना चांगला जाईल.पुस्तक विक्रेते किंवा सरकारी कामाशी सबंधित असलेले व्यावसायिक ह्यांना हा महिना फायद्याचा जाईल. चतुर्थातील राहूमुळे घरासबंधी लाभ होतील तसेच घरात थोडेफार ताण-तणाव पण जाणवतील. कलाकार मंडळी कामात व्यस्त राहतील .मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील . ज्या लोकांनी कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना उशिराने किंवा अपेक्षेपेक्षा कमी कर्ज मिळेल.घरातले वातावरण थोडे नरम-गरम राहील .त्यामुळे मौन स्वीकारणे उत्तम . व्यावसायिकांना हा काळ त्यांच्या कार्याची दाखल घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे . हा महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल.
कर्क : प्रथम स्थानात रवि,बुध ,मंगळ हे ग्रह असल्याने प्रकृती चांगली राहील. समाजामध्ये मान मिळेल . ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. भावाबहिणींचे सबंध चांगले राहतील. लेखकांच्या दृष्टीने चांगला काळ आहे . विद्यार्थ्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे . मुलांशी सबंध खेळीमेळीचे राहतील . व्यावसायिक खेळाडू तसेच ह्या क्षेत्राशी सबंधित व्यावसायिक ह्याना काळ चांगला आहे . कर्ज मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असाल तर यश मिळेल . जोडीदाराबरोबर थोड्या कुरबुरी होऊ शकतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा होईल . भागीदाराशी सबंध सालोख्याचे राहतील . धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्यांना आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे परंतु लाभ एकदम होणार नाहीत .एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
सिंह : हा महिना अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला व्यस्त ठेवेल . प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला आहे . केलेल्या कामाचा मोबदला आर्थिक दृष्टीने लगेच मिळणार नाही . ह्या महिन्यात अनेक प्रवास होतील . कदाचित काही वेळेला प्रवासात ऐनवेळी अडचणी येण्याची शक्यता आहे . तयारीत राहावे . घरासबंधी काही खर्च निघतील. मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे . ह्या महिन्यात कामाच्या व्यस्ततेमुळे घरात वेळ कमी दिला जाईल . त्यामुळे थोडीफार घरामध्ये अशांती राहील.अनेक गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागत असल्याने मानसिक ताण / थकवा जाणवेल. हा महिना कामाच्या बाबतीत उत्तम परंतु घरघुती बाबतीत नरम-गरम राहील .
कन्या : तुम्ही ठरवलेल्या कामात अडथळे येतील किंवा विलंब होण्याची शक्यता आहे .प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे . आर्थिक व्यवहारात म्हणावा तसा फायदा होणार नाही कारण द्वितीयेश शुक्र बाराव्या स्थानी असून तो वक्री आहे . कागदपत्राशी सबंधित व्यवहार थोड्याश्या विलंबाने परंतु सुरळीत पार पडतील . ज्या लोकांनी नोकरी संबंधात इंटरव्ह्यू दिले /देणार आहेत त्यांना त्यात यश मिळेल. ज्या लोकांना नवीन घर घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर घ्यावे त्यात अडचणी येणार नाहीत . शिक्षणाच्या दृष्टीने तृतिय स्थानातील शनि चांगला आहे . बांधकाम क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. ह्या महिन्यात थोडे प्रवास होतील. काही लोकांना वारसा हक्काने मिळणारी संपत्ती मिळण्याचे योग आहेत .नोकरी करणार्यांनी आपल्या अधिकाऱ्याशी जमवून घेणे उत्तम . नवमेश शुक्र बाराव्या घरात असला तरी वक्री असून थोडे दिवसांनी कर्केत येत आहे .त्यामुळे परदेश प्रवास लांबणीवर पडतील. हा महिना एकंदरीत संमिश्र राहील.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभ स्थानी असून केतू षष्ठात मीन राशीत आहे व मीन राशीचा स्वामी गुरु हा देखील लाभातच आहे, त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील. शुक्र वक्री असल्याने आर्थिक लाभ थोडाफार उशिराने होण्याचा संभव आहे. द्वितीय स्थानातील शनि मार्गी झाल्याने तुमचे आर्थिक व्यवहार एकेक करून पूर्ण होतील. तृतीयातील गुरु लाभात आणि केतू षष्ठात हा योग स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना यश देईल. पुस्तकाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. चतुर्थेश शनि द्वितीय स्थानात मार्गी आहे, त्यामुळे घरासंबंधी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पंचमात चंद्र व पंचमेश शनि द्वितीयात मुलाबाळांच्या अॅडमिशनच्या दृष्टीने पण काळ चांगला दर्शवतात. शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांना ऑगस्टच्या सुरुवातीचा काही काळ चांगला आहे, पुढे मात्र सावधगिरीने व्यवहार करावा. सप्तमेश मंगळ दशमात व गुरु लाभात जोडीदाराशी थोडी कुरबुर होण्याची शक्यता दाखवतात, तरीही त्याच्या मार्फत लाभ देखील होतील. दशमातील तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध हे निश्चितपणे अनेक लोकांना नोकरीत प्रमोशन किंवा इतर लाभ मिळवून देतील. एकंदरीत महिना उत्तम आहे.
वृश्चिक :ह्या महिन्यात शनि लग्नी व रवि ,मंगळ नवमात ,पंचमात केतू असल्याने हा योग धार्मिक /अध्यात्मिक दृष्ट्या उत्तम आहे . आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत , हा महिना थोडा खर्चाचा वाटतो आहे . कामाच्या ठिकाणी उत्साह राहिल. मातृसौख्य चांगले राहील. ह्या महिन्यात तुम्ही कुटुंबा सोबत बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल . कलाकार कामामध्ये व्यस्त राहतील.ज्यांच्या पत्रिकेत १ व ६ ह्याच्याशी सबंधित अशा दशा चालू असेल त्यांनी ह्या महिन्यात प्रकृतीस जपावे .जोडीदाराशी सबंध ठीक राहतील. सरकारी नोकरदारांना आर्थिक फायदे होतील. दशमात बुध,गुरु,शुक्र एवढे तीन ग्रह असले तरी बुध व गरु केतूच्या नक्षत्रात असून केतू पंचमात असल्याने तसेच शुक्र वक्री असून नंतर कर्केत जात असल्यामुळे दशमभाव तसा बलवान नाही . त्यामुळे व्यवसाय/नोकरी करणार्यांनी व्यवहार जपून करावेत . एकंदरीत हा महिना काही बाबतीत चांगला आहे व काही बाबतीत खबरदारी घ्यावी .
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात आहे त्यामुळे भाग्याची साथ लाभेल तसेच प्रकृती पण चांगली राहील. . शनि बाराव्या स्थानी असल्याने खर्च वाढतील. नवमात बुध,गुरु शुक्र व तृतीयेश शनि बाराव्या स्थानी असल्याने अनेकांना प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे . विशेषतः पद्युत्तर शिक्षणासाठी छानच . घरगुती वातावरण आनंदी राहील. शेयर्स चा व्यवसाय करणार्यांनी जपून व्यवहार करावेत . आधीची काही कर्ज असतील तर ह्या महिन्यात फेडू शकाल . मंगळ अष्टमात असल्याने मानसिक ताण जाणवेल तसेच काही लोकांना नातेवाईक किंवा मित्रमंडळ ह्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील .व्यवसाय /नोकरी करणार्यांना मानसिक ताण जाणवेल.एकंदरीत हा महिना विशेष आर्थिक लाभदायक नाही .
मकर : ह्या महिन्यात प्रकृतीच्या कुरबुरी राहतील . द्वितीयेश शनि लाभात आर्थिक प्राप्ती मात्र चांगली राहील. केतू तृतीयात व गुरु ,बुध ,शुक्र हे तीन ग्रह अष्टमात असल्याने जोडीदाराची पण आर्थिक प्राप्ती चांगली राहील .वारसा हक्काच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर हा महिना चांगला आहे . घरात थोद्य्फार कुरबुरी झाल्या तरी एकंदरीत वातावरण सुखद राहील .मुलांशी मात्र ह्या महिन्यात थोडे समजुतीने घ्यावे लागेल नाहीतर वादाचे प्रसंग उद्भवतील .ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी . ह्या महिन्यात फारसे प्रवास होणार नाहीत . केतू तृतीयात असल्याने नोकरी /व्यवसाय करणार्यांना कामाचा व्याप वाढलेला जाणवेल. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील .
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि मार्गी असून तो तुमच्या दशमात आहे. ह्या महिन्यात तुमच्या यशाची कमान चढत राहील. कामाची दाखल गेतली जाईल. तारीख ५-६ च्या दरम्यान चंद्र द्वितीयात येतो. अचानक धनलाभाचा प्रसंग दिसत आहे. तृतीयेश मंगळ षष्ठात, शनि दशमात हा योग इंटरव्ह्यु, अग्रीमेंट , स्पर्धा परीक्षा इ. गोष्टींमध्ये यश मिळेल . विवाह इच्छुकांनी तयारीत राहावे .लग्न ठरण्याचे योग आहेत . शनि दशमात , मंगळ षष्ठात आहे व दशमेश आहे त्यामुळे नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ उत्तम आहे . एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
मीन : राशीस्वामी गुरु षष्ठात व केतू लग्नी व ज्यांच्या पत्रिकेत शनि अष्टमात असेल अशा लोकांचे जुने आजार त्रास देऊ शकतील असे वाटते परंतु रवि पंचमात असल्याने आजाराची तीव्रता फार राहणार नाही . आर्थिक दृष्ट्या हा महिना ठीक राहील. आर्थिक व्यवहार सावधानीने करावेत . ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे किंवा पुस्तक व स्टेशनरी चा व्यवसाय असणाऱ्या लोकांचे आर्थिक व्यवहार लांबणीवर पडतील. धार्मिक अध्यात्मिक दृष्टीने हा महिना चांगला जाईल .जोडीदारशी पटवून घेतलेले बरे .भागीदारीत व्यवसाय असणार्यांनी व्यवहारात काळजी घ्यावी .नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही . प्रवासाचे फारसे योग वाटत नाहीत . एकंदरीत हा महिना ठीक राहील.
गुरु बदलाचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम ह्या विषयावरील लेख लवकरच प्रसिद्ध करू .
वरील राशी भविष्य अनघा भदे व सुनील देव (Astrology Counselling ) ह्यांनी लिहिले आहे .