राशीभविष्य ऑगस्ट २०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
राशी भविष्य astrology councelling मार्फत दिलेली आहेत.
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष रास : ह्या महिन्यात राशिस्वामी मंगळ अष्टमात तसेच शनि देखील अष्टमात तसेच गुरु दुसऱ्या आठवड्यात षष्ठात ,षष्टेश बुध महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात कन्येत त्यामुळे प्रकृतीस जपावे. त्याचप्रमाणे ११ व १२ तारखेच्या सुमारास वाहने जपून चालवावीत. द्वितीयेश शुक्र पंचमात आहे व केतू लाभात त्यामुळे महिन्याच्या मध्यानंतर शेयर्स मध्ये लाभ होण्याची शकयता आहे. पंचमेश रवि उत्तरार्धात पंचमात येत आहे त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. तसेच ज्यांचा कलाविषयक व्यवसाय आहे त्यांना पण भरपूर काम मिळेल.परंत्तू दशमेश शनी व प्रथमेश मंगळ अष्ट्मात असल्याने एकंदरच नोकरी / व्यवसाय करणाऱ्यांना मान अपमानाच्या प्रसंगाना कदाचित सामोरे जावे लागेल. कामाचा ताण जाणवेल. सप्तमेश शुक्र बराच काळ पंचमात असल्याने जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील. नवमेश गुरु दुसऱ्या आठवड्यात षष्ठात जात आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.
वृषभ रास : प्रथमेश शुक्र चतुर्थात तसेच चतुर्थात सुरुवातीला द्वितीयेश बुध, गुरु ह्यासारखे शुभ ग्रह त्यामुळे आईचा सहवास मिळेल तसेच गृहसौख्य चांगले राहील. कौटुंबिक गाठीभेटी होतील. चतुर्थात बरेच शुभ ग्रह असल्याने घराच्या शोधात असाल तर त्या दृष्टीने महिना चांगला आहे. प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला राहील. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना चांगला जाईल. ऍडमिशन ची काही कामे मार्गी लागतील. षष्टेश मंगळ सप्तमात तसेच शनी पण सप्तमात त्यामुळे जोडीदाराशी जमवून घेणे चांगले . नवमेश व दशमेश शनि सप्तमात असल्याने नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने जनसंपर्क वाढेल. तसेच त्यासाठी एखादा प्रवास पण घडण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
मिथुन रास : प्रथमाचा स्वामी बुध तृतीयात तसेच तृतीयात शुक्र,बुध ,गुरू ,राहू तसेच द्वितीय भावात रवि त्यामुळे लेखक प्रकाशक इ. लोकांना हा महिना चांगला जाईल . प्रकृतीच्या दृष्टीने देखील ग्रहमान चांगले आहे परंतु शेवटच्या आठवड्यात मात्र प्रकृतीस जपावे.मंगळ षष्ठात आहे त्यामुळे उष्णतेचे विकार(ताप,असिडीटी,उष्णता होणे इ. ) होण्याची शक्यता आहे. तसेच शनि देखील षष्ठात आहे त्यामुळे सांधे दुखी,हाडांची दुखणी वगेरे त्रास असल्यास काळजी घ्यावी. तृतीयात बरेच ग्रह असल्याने ह्या महिन्यात छोट्या प्रवासाचे पण योग आहेत. कलाकारांच्या दृष्टीने महिना चांगला आहे. द्वितीयात रवि ,षष्ठात शनी- मंगळ त्यामुळे आर्थिक दृष्ट्या महिना चांगला जाईल. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल.
कर्क रास : पहिल्या आठवड्यात राशिस्वामी चंद्र सिंहेत येत आहे. तसेच द्वितीयात शुक्र,बुध,गुरु,राहू एवढे ग्रह आहेत त्यामुळे अनेक मार्गांनी आर्थिक लाभ चांगले होतील. द्वितीयेश रवीदेखील महिन्याच्या मध्यास सिंहेत जाईल . त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उत्तम जाईल. तृतीयेश बुध द्वितीयात इतर बऱ्याच ग्रहांबरोबर आहे त्यामुळे स्टेशनरी ,प्रकाशन , ट्रॅव्हल कंपनी इ. क्षेत्रातील लोकांना आर्थिक लाभ दाखवत आहे. ह्या महिन्यात चतुर्थेश शुक्र द्वितीयात आहे त्यामुळे घराच्या सजावटी साठी वेळ द्याल. पंचमेश मंगळ पंचमात आहे . मुलांशी छान जमेल . सप्तमेश शनि पंचमात त्यामुळे जोडीदाराशी संबंध छान राहतील. एकंदर घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महिना छान जाईल.
सिंह रास : लग्नी बुध ,गुरु ,शुक्र,राहू एवढे ग्रह आहेत त्यामुळे ह्या महिन्यात बऱ्याच कामांमध्ये व्यस्त राहाल . समाजात मान मिळेल. प्रकृती पण चांगली राहील.कामाच्या व्यापामुळे घरी वेळ देता येणार नाही. चतुर्थात शनी-मंगळ त्यामुळे घरात थोड्याफार कुरबुरी व्हायची शक्यता आहे. स्वतःसाठी खर्च कराल. नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने काही प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे. आर्थिक लाभ मिळण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल .एकंदरीत बराच BUSY जाईल असे वाटते .
कन्या रास : प्रथमेश बुध सुरूवातील बाराव्या घरात आहे. महिना अखेरीस प्रथमात येत आहे. मंगळ आणि शनि तृतीयात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शुक्र बाराव्या घरात आहे त्यामुळे काही खर्च उद्भवू शकतात. घरासंबंधी काही गुंतवणूक होतील . पाहिले दोन आठवडे सप्तमेष गुरु बाराव्या घरात व मंगळ तृतीयात त्यामुळे कोणत्याही बाबतीत पती/ पत्नींनी वादविवाद टाळलेले उत्तम . नवमेश शुक्र बाराव्या भावात तसेच तिथे बुध ,गुरू, राहू आणि उत्तरार्धात रवीदेखील आहे त्यामुळे परदेश प्रवास घडतील. नोकरी/ व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र जाईल
तूळ : राशिस्वामी शुक्र लाभात आहे . त्याजोडीने बुध ,राहू आणि गुरु देखील लाभात आहेत. शनि व द्वितीयेश शुक्र द्वितीयात आणि दशमात रवि अशी ग्रहांची छान बैठक जमून आली आहे. त्यामुळे आर्थिक लाभ चांगले होतील. चतुर्थेश शनी १३ ऑगस्ट ला मार्गी होत आहे त्यामुळे घरसंबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील . शेयर्स चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑगस्ट मध्यानंतर काळ चांगला आहे . षष्ठेश गुरु लाभात व मंगळ द्वितीयात त्यामुळे कोणाकडून पैसे येणे असेल तर तेही मिळतील. सप्तमेश मंगळ द्वितीयात त्यामुळे विवाहोत्सुक मंडळींना छान योग आहेत.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र ,बुध ,गुरु हे ग्रह बाराव्या भावात जात आहेत त्यामुळे तेव्हा प्रवास होतील. एकंदर हा महिना चांगला जाईल.
वृश्चिक :शनि मंगळ प्रथमात आहेत त्यामुळे ज्यांना १ व ६ च्या दशा असतील त्यांनी प्रकृतीस जपावे . महिन्याच्या उत्तरार्धात आई,बहीण भाऊ ह्यांच्या गाठीभेटी होतील . पंचमेश गुरु दशमात व मंगळ प्रथमात त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणार्यांना महिना व्यस्त जाईल . सप्तमेश दशमात व मंगळ प्रथमात त्यामुळे जोडिदाराशी जमवून घ्यावे .नवमात रवी व दशमात बुध ,राहू,गुरु,शुक्र त्यामुळे नोकरी/व्यवसाय करणार्यांना हा महिना खूप व्यस्त जाईल. परंतु लाभ होण्यासाठी मात्र थोडी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा महिना बराच धावपळीचा जाईल असे दिसते.
धनु: प्रथम भावाचा स्वामी गुरु नवमात आहे व रवी देखील महिन्याच्या मध्याला नवम भावात जाईल . तसेच नवमात शुक्र,बुध ,राहू हे पण ग्रह आहेत त्यामुळे प्रकृती चांगली राहील. एखाद्या वेळेस धार्मिक स्थळांला भेट द्याल. तृतीयेश शनि बाराव्या घरात पण प्रवास दाखवत आहे. द्वितीयेश बाराव्या भावात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. चतुर्थेश गुरु नवमात त्यामुळे विद्यार्थ्यांना हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने छान आहे. पंचमेश मंगळ बाराव्या भावात व शनि देखील बाराव्या भावात त्यामुळे मुलांची काळजी घ्यावी तसेच त्यांच्याशी जमवून घेणे चांगले. षष्ठेश शुक्र नवमात हा योग स्पर्धा परीक्षा तसेच प्रबंध इ. करता चांगला आहे . महिन्याच्या सुरुवातील दशमेश बुध नवम भावात व रवि अष्टमात आहे त्यामुळे नोकरी/व्यवसायत खबरदारी घ्यावी. जबाबदारीने कामे करावीत नाहीतर मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एकंदर हा महिना संमिश्र आहे.
मकर : प्रथम भावाचा स्वामी शनि लाभात आहे तसेच शनी १३ ऑगस्टला मार्गी होत आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शनि लाभात तसेच लाभेश मंगळ लाभात हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थेश मंगळ लाभात तसेच शनि देखील लाभात हा योग घराच्या दृष्टीने चांगला आहे. पंचमेश शुक्र अष्टमात आहे त्यामुळे शेयर्स चा व्यवसाय करणार्यांनी ह्या महिन्यात खबरदारी घाव्यी . षष्ठेश बुध अष्टमात आहे त्यामुळे भागीदारांकडून काही मनस्ताप होण्याची शक्यता आहे . अष्टमात शुक्र,गुरु,राहू,मंगळ एवढे ग्रह आहेत त्यामुळे मानसिक ताण-तणांव होण्याची शक्यता आहे. दशमेश शुक्र अष्टमात असल्याने नोकरी/व्यवसायात कामाचा ताण राहील. एकंदर ह्या महिन्यात संयमाने वागणे चांगले.
कुंभ : प्रथम भावाचा स्वामी शनि दशमात तसेच मंगळ पण दशमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व सप्तमात शुक्र,बुध,राहू तसेच महिन्याच्या मध्यानंतर राविदेखील सप्तमात त्यामुळे जोडीदाराशी चांगले जमेल सुरुवातीला मात्र रवी षष्ठात आहे त्यामुळे जमवून घेणे चांगले . तृतीयेश व दशमेश मंगळ दशमात ,प्रथमेश शनि दशमात हा योग एकंदर प्रसिद्धी साठी तसेच व्यावसायिकांना छान आहे. सप्तमात असलेले ग्रह एखादा प्रवास घडवण्याची शक्यता आहे. सप्तमात असणारे शुक्र,गुरु,व नन्तर येणारा रवि विवाहोस्तुक मंडळीना चांगला आहे . विवाह ठरण्याच्या दृष्टीने छान योग आहे. एकंदर हा महिना चांगला आहे.
मीन : राशीस्वामी गुरु षष्ठात तसेच राविदेखील नंतर षष्ठात येत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. द्वितीयेश मंगळ नवमात तसेच नवमेश नवमात हा योग उच्चशिक्षणाकरता चांगला आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना महिना चांगला आहे. तृतीयेश शुक्र षष्ठात तसेच सप्तमेश बुध देखील षष्ठात आहे त्यामुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. शक्यतो मौन पाळणे उत्तम. चतुर्थेश बुध षष्ठात आहे त्यामुळे रियल ईस्टेट चा बिझनेस असणार्यांना चांगला. दशमेश गुरु षष्ठात तसेच नंतर रविदेखील षष्ठात त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नवमेश नवमात असल्याने धार्मिक कार्यात रस घ्याल. द्वादाशेष शनि नवमात तसेच मंगळ पण नवमात त्यामुळे परदेश प्रवास घडतील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.
No comments:
Post a Comment