Bigg Boss Marathi
(winner as per astrology analysis)
सध्या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस मराठी ह्या
कार्यक्रमाची रविवारी सांगता होणार आहे त्यात ह्या स्पर्धेचा विजेता घोषित होईल.
सहा उमेदवार सध्या अंतिम फेरीत आहेत . ह्या सहा लोकांचे त्यांच्या राशी प्रमाणे
कसे ग्रहमान आहे ह्याचा अंदाज आपण ह्या लेखात घेऊ.
मेघा धाडे : (सिंह
रास)
पंचमेश गुरु तृतीय
भावात आहे . गुरु राहू च्या नक्षत्रात असून राहू कर्क राशीत आहे . पंचमात शनी
वक्री असून तो केतू च्या नक्षत्रात असून केतू षष्ठ भावात
आहे. सप्तमेश शनी पंचमात आहे. त्यामुळे पब्लिक सपोर्ट खूप आहे. केतू षष्ठ भावात आहे. दशमेश मंगळ षष्ठ भावात आहे
. त्यामुळे दशम भाव बलवान आहे. लाभेश बुध बाराव्या भावात व त्याचा नक्षत्रात स्वामी
पंचमात आहे. त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत.
पुष्कर जोग : (वृषभ रास
)
पंचमेश बुध तृतीय भावात
आहे व बुधाच्याच नक्षत्रात असून शनीच्या उप नक्षत्रात आहे. सप्तमेश मंगळ नवम भावात
आहे. त्यामुळे पब्लिक वोट्स मिळतील. दशमेश शनी अष्टमात आहे व केतू नवम भावात आहे
त्यामुळे दशम भाव कमकुवत वाटतो. लाभेश गुरु षष्ठ भावात आहे व राहू तृतीयात आहे
त्यामुळे लाभस्थान चांगले आहे. त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत.
सई लोकूर : (तूळ
रास)
पंचमेश शनी तृतीयात व केतू चतुर्थात आहे. सप्तमेश मंगळ
चतुर्थ भावात आहे. त्यामुळे पब्लिक सपोर्ट ची विशेष साथ दिसत नाही. दशमेश चंद्र
द्वितीयात व राहू ,बुध ,रवि दशमात
असल्याने दशम भाव बलवान झाला आहे. लाभात शुक्र व रवि दशम भावात असल्याने लाभ स्थान
पण चांगले आहे. त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत.
आस्ताद काळे : ( ह्या कार्यक्रमा मध्ये मिथुन रास सांगितली
आहे ) पण १६ मे १९८४ हि जन्म तारीख खरी असेल तर वृश्चिक रास
येते.
मिथुन राशी प्रमाणे: पंचमेश तृतीय भावात . सप्तमेश व दशमेश
गुरु पंचमात , राहू ,बुध रवि द्वितीय भावात आहेत परंतु लाभेश मंगळ अष्टमात आहे . त्यामुळे
मिथुन रास असेल तर जिंकण्याचे चान्सेस वाढतात.
वृश्चिक रास असेल तर : पंचमेश गुरू व्यय स्थानी , राहू, बुध
आणि रवि नवम भावात . सप्तमेश शुक्र दशमात आणि राहू नावं भावात पब्लिक वोट्स कमी मिळतील. त्यामुळे वृश्चिक रास असेल तर जिंकण्याचे
चान्सेस कमी आहेत.
स्मिता गोंदकर : (कर्क रास)
लग्नी रवि,राहू आणि बुध आहेत . पंचमेश मंगळ सप्तमात आहे .सप्तमेश
षष्ठ भावात आहे . त्यामुळे पब्लिक वोट्स अपेक्षेपेक्षा कमी मिळतील. लाभेश शुक्र
द्वितीयात आहे ,त्यामुळे लाभस्थान चांगले आहे. परंतु जिंकण्याच्या दृष्टीने
ग्रहमान फार चांगले आहे .
शर्मिष्ठा राऊत : (मकर रास )
पंचमेश शुक्र अष्टमात
. सप्तमेश चंद्र लाभात आहे. त्यामुळे पब्लिक सपोर्ट आहे. लाभेश मंगळ लग्नी आहे. त्यामुळे
ग्रहमान चांगले आहे. परंतु शनी व मंगळ
दोन्ही वक्री असल्याने त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत.
Top - 3
मेघा धाडे ,पुष्कर जोग ,स्मिता गोंदकर असतील (आस्ताद काळे
मिथुन रास असेल तर पुष्कर ऐवजी आस्ताद असेल)
Top-2
मेघा , स्मिता (आस्ताद काळे मिथुन रास असेल तर स्मिता ऐवजी आस्ताद असेल)
Winner – मेघा
(कोणाचीही जन्मपत्रिका माहित नसल्याने हे सर्व विश्लेषण राशी प्रमाणे आहे त्यामुळे अर्थातच जन्मपत्रिकेतील योगानुसार गोष्टी बदलू शकतात . ह्यामध्ये फक्त राशीनुसार गोचर भ्रमण लक्षात घेतले आहे)
Are You Looking for Indian Astrologer in Upstate.
ReplyDelete