Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday, 3 August 2015

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस

कृष्णमुर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस(बेसिक कृष्णमुर्ती कोर्से )   पासून सुरु करत आहोत .


दोन बॅचेस : आठवड्यातून एक दिवस ( साधारण अडीच ते तीन महिने )

१.गुरुवार १३ ऑगस्ट २०१५ पासून (११:३० ते  १२:३० )

२. रविवार १६ ऑगस्ट २०१५ पासून (२.३० ते ३:३० )


के.पी प्रवीण अभ्यासक्रम

(ह्या  कोर्स मध्ये बेसिक ज्योतिषशास्त्र व कृष्णमुर्ती पद्धतीचे नियम तसेच के.पी पद्धतीने पत्रिका

 तयार करणे ह्यांचा समावेश आहे )

१. पत्रिका का बघावी ? जन्मपत्रिका म्हणजे काय ? कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ? पारंपरिक       
   
  व कृष्णमुर्ती ह्यातील फरक काय आहे ? ग्रहांबद्दल माहिती 

२. १२ राशी ,२७ नक्षत्र व १२ भावासंबंधी माहिती ,महत्वाचे ग्रहयोग

३. कृष्णमुर्ती पद्धतीची पत्रिका तयार करणे . (कॉम्पुटर software चा उपयोग न करता )

   कृष्णमुर्ती अयनांश संबंधी माहिती .तात्कालिक ग्रह (ruling planets)म्हणजे काय ?

४. नक्षत्र स्वामी ,उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय ? पत्रिकेत ह्यांचे महत्व काय ?

५. प्रथम भाव ,द्वितीय भाव , तृतिय भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

६. चतुर्थ भाव ,पंचम भाव , षष्ठ भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

७. सप्तम भाव ,अष्टम भाव , नवम भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

८. दशम भाव , एकादश भाव , द्वादश भाव ह्या संबंधी के.पी चे नियम व उदाहरणे

९. महादशा म्हणजे काय ? दशेचे परिणाम कसे बघावेत ? वरील सर्व भावासंबंधी चर्चा ,प्रश्न -    
   
   उत्तरे इ.

१०. परीक्षा . 


अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा .

अनघा भदे- 9011201560


सुनिल देव -9822206170


क्लास चा पत्ता : 

शिवप्रताप अपार्टमेंटस
flat no - १०१
४३ ,मयुर कॉलनी
पुणे - ४११०३८


वरील कोर्से पूर्ण करणार्यांना मग कृष्णमुर्ती पध्दतीचा विषारद(advance) हा कोर्से करत येईल . 
हा वरील बेसिक कोर्से संपल्यानंतर पुढे advance कोर्से चालू करू . 

Friday, 31 July 2015

राशीभविष्य ऑगस्ट २०१५

राशीभविष्य ऑगस्ट २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :

१४ ऑगस्ट पासून शुक्र कर्क राशीत वक्री , २३ ऑगस्ट पासून बुध कन्या राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत ,१७ ऑगस्ट पासून रवि सिंह राशीत,१४ जुलै पासून गुरु सिंह राशीत, २ ऑगस्ट पासून शनि वृश्चिक राशीत मार्गी होत आहे .


मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात त्याच्या जोडीला रवि व बुध हे सर्व योग प्रकृती ठणठणीत राहील असे दाखवतात . तसेच ह्या महिन्यात प्रवास फारसा होणार नाही . तुम्ही घरात जास्त वेळ देऊ शकाल . ह्या महिन्यात आर्थिक व्यवहार जपून करावेत कारण शुक्र पंचमात आणि केतू बाराव्या स्थानात आहेत . हे दोन्ही ग्रह व्यवहारात नुकसान दाखवतात . जी लोक सध्या घरापसुन लांब आहेत त्यांना स्वगृही येण्या करता काळ उत्तम आहे . चतुर्थात तीन ग्रह असल्याने शिक्षणाच्या दृष्टीने चांगला काळ आहे . १७ ऑगस्ट नंतर कला /क्रीडा , शेयर्स चा व्यवसाय असणारे लोक ह्यांच्या करता काळ चांगला आहे . जोडीदाराशी सबंध सर्वसाधारण राहतील . सध्याचा काळ धार्मिक /अध्यात्मिक कार्याला चांगला आहे .नोकरी/व्यवसायात कामाचा ताण राहील तसेच आर्थिक बाबतीत सुद्धा पटकन हातावेगळी होण्याची शक्यता कमी आहे . हा महिना सर्वसाधारण राहील .


वृषभ : ह्या महिन्यात मनाविरुद्ध काही प्रवास घडण्याची शक्यता आहे कारण शुक्र वक्री आहे व तृतीयात तीन ग्रह आहेतच . कदाचित भाऊ बहिणीच्या काही कामासाठी प्रवास घडतील . शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे . तसेच मातृसौख्य चांगले मिळेल . कलाकारांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता आहे . जोडीदाराबरोबर वाद टाळणे शहाणपणाचे ठरेल . काही आर्थिक लाभ पण होतील असे वाटते. ह्या महिन्यात भाग्य फारसे साथ देणार नाही त्यामुळे प्रयत्न जास्त करावे लागतील . नोकरी/व्यवसायात पण त्रास होण्याची शक्यता आहे .हा महिना वृषभ राशीच्या लोकांना सर्वसाधारण राहील .
मिथुन : ह्या राशीच्या लोकांना त्यांनी पूर्वी केलेल्या कामाचे फळ ह्या महिन्यात मिळेल . तसेच प्रसिद्धीच्या दृष्टीने पण योग चांगले आहेत . द्वितीयात तीन ग्रह असल्याने आर्थिक दृष्टीने महिना चांगला जाईल.पुस्तक विक्रेते किंवा सरकारी कामाशी सबंधित असलेले व्यावसायिक ह्यांना हा महिना फायद्याचा जाईल. चतुर्थातील राहूमुळे घरासबंधी लाभ होतील तसेच घरात थोडेफार ताण-तणाव पण जाणवतील. कलाकार मंडळी कामात व्यस्त राहतील .मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील . ज्या लोकांनी कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना उशिराने किंवा अपेक्षेपेक्षा कमी कर्ज मिळेल.घरातले वातावरण थोडे नरम-गरम राहील .त्यामुळे मौन स्वीकारणे उत्तम . व्यावसायिकांना हा काळ त्यांच्या कार्याची दाखल घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे . हा महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल.
कर्क : प्रथम स्थानात रवि,बुध ,मंगळ हे ग्रह असल्याने प्रकृती चांगली राहील. समाजामध्ये मान मिळेल . ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. भावाबहिणींचे सबंध चांगले राहतील. लेखकांच्या दृष्टीने चांगला काळ आहे . विद्यार्थ्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे . मुलांशी सबंध खेळीमेळीचे राहतील . व्यावसायिक खेळाडू तसेच ह्या क्षेत्राशी सबंधित व्यावसायिक ह्याना काळ चांगला आहे . कर्ज मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असाल तर यश मिळेल . जोडीदाराबरोबर थोड्या कुरबुरी होऊ शकतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा होईल . भागीदाराशी सबंध सालोख्याचे राहतील . धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्यांना आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे परंतु लाभ एकदम होणार नाहीत .एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
सिंह : हा महिना अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला व्यस्त ठेवेल . प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला आहे . केलेल्या कामाचा मोबदला आर्थिक दृष्टीने लगेच मिळणार नाही . ह्या महिन्यात अनेक प्रवास होतील . कदाचित काही वेळेला प्रवासात ऐनवेळी अडचणी येण्याची शक्यता आहे . तयारीत राहावे . घरासबंधी काही खर्च निघतील. मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे . ह्या महिन्यात कामाच्या व्यस्ततेमुळे घरात वेळ कमी दिला जाईल . त्यामुळे थोडीफार घरामध्ये अशांती राहील.अनेक गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागत असल्याने मानसिक ताण / थकवा जाणवेल. हा महिना कामाच्या बाबतीत उत्तम परंतु घरघुती बाबतीत नरम-गरम राहील .
कन्या : तुम्ही ठरवलेल्या कामात अडथळे येतील किंवा विलंब होण्याची शक्यता आहे .प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे . आर्थिक व्यवहारात म्हणावा तसा फायदा होणार नाही कारण द्वितीयेश शुक्र बाराव्या स्थानी असून तो वक्री आहे . कागदपत्राशी सबंधित व्यवहार थोड्याश्या विलंबाने परंतु सुरळीत पार पडतील . ज्या लोकांनी नोकरी संबंधात इंटरव्ह्यू दिले /देणार आहेत त्यांना त्यात यश मिळेल. ज्या लोकांना नवीन घर घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर घ्यावे त्यात अडचणी येणार नाहीत . शिक्षणाच्या दृष्टीने तृतिय स्थानातील शनि चांगला आहे . बांधकाम क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. ह्या महिन्यात थोडे प्रवास होतील. काही लोकांना वारसा हक्काने मिळणारी संपत्ती मिळण्याचे योग आहेत .नोकरी करणार्यांनी आपल्या अधिकाऱ्याशी जमवून घेणे उत्तम . नवमेश शुक्र बाराव्या घरात असला तरी वक्री असून थोडे दिवसांनी कर्केत येत आहे .त्यामुळे परदेश प्रवास लांबणीवर पडतील. हा महिना एकंदरीत संमिश्र राहील.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभ स्थानी असून केतू षष्ठात मीन राशीत आहे व मीन राशीचा स्वामी गुरु हा देखील लाभातच आहे, त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील. शुक्र वक्री असल्याने आर्थिक लाभ थोडाफार उशिराने होण्याचा संभव आहे. द्वितीय स्थानातील शनि मार्गी झाल्याने तुमचे आर्थिक व्यवहार एकेक करून पूर्ण होतील. तृतीयातील गुरु लाभात आणि केतू षष्ठात हा योग स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना यश देईल. पुस्तकाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. चतुर्थेश शनि द्वितीय स्थानात मार्गी आहे, त्यामुळे घरासंबंधी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पंचमात चंद्र व पंचमेश शनि द्वितीयात मुलाबाळांच्या अॅडमिशनच्या दृष्टीने पण काळ चांगला दर्शवतात. शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांना ऑगस्टच्या सुरुवातीचा काही काळ चांगला आहे, पुढे मात्र सावधगिरीने व्यवहार करावा. सप्तमेश मंगळ दशमात व गुरु लाभात जोडीदाराशी थोडी कुरबुर होण्याची शक्यता दाखवतात, तरीही त्याच्या मार्फत लाभ देखील होतील. दशमातील तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध हे निश्चितपणे अनेक लोकांना नोकरीत प्रमोशन किंवा इतर लाभ मिळवून देतील. एकंदरीत महिना उत्तम आहे.
वृश्चिक :ह्या महिन्यात शनि लग्नी व रवि ,मंगळ नवमात ,पंचमात केतू असल्याने हा योग धार्मिक /अध्यात्मिक दृष्ट्या उत्तम आहे . आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत , हा महिना थोडा खर्चाचा वाटतो आहे . कामाच्या ठिकाणी उत्साह राहिल. मातृसौख्य चांगले राहील. ह्या महिन्यात तुम्ही कुटुंबा सोबत बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल . कलाकार कामामध्ये व्यस्त राहतील.ज्यांच्या पत्रिकेत १ व ६ ह्याच्याशी सबंधित अशा दशा चालू असेल त्यांनी ह्या महिन्यात प्रकृतीस जपावे .जोडीदाराशी सबंध ठीक राहतील. सरकारी नोकरदारांना आर्थिक फायदे होतील. दशमात बुध,गुरु,शुक्र एवढे तीन ग्रह असले तरी बुध व गरु केतूच्या नक्षत्रात असून केतू पंचमात असल्याने तसेच शुक्र वक्री असून नंतर कर्केत जात असल्यामुळे दशमभाव तसा बलवान नाही . त्यामुळे व्यवसाय/नोकरी करणार्यांनी व्यवहार जपून करावेत . एकंदरीत हा महिना काही बाबतीत चांगला आहे व काही बाबतीत खबरदारी घ्यावी .
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात आहे त्यामुळे भाग्याची साथ लाभेल तसेच प्रकृती पण चांगली राहील. . शनि बाराव्या स्थानी असल्याने खर्च वाढतील. नवमात बुध,गुरु शुक्र व तृतीयेश शनि बाराव्या स्थानी असल्याने अनेकांना प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे . विशेषतः पद्युत्तर शिक्षणासाठी छानच . घरगुती वातावरण आनंदी राहील. शेयर्स चा व्यवसाय करणार्यांनी जपून व्यवहार करावेत . आधीची काही कर्ज असतील तर ह्या महिन्यात फेडू शकाल . मंगळ अष्टमात असल्याने मानसिक ताण जाणवेल तसेच काही लोकांना नातेवाईक किंवा मित्रमंडळ ह्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील .व्यवसाय /नोकरी करणार्यांना मानसिक ताण जाणवेल.एकंदरीत हा महिना विशेष आर्थिक लाभदायक नाही .
मकर : ह्या महिन्यात प्रकृतीच्या कुरबुरी राहतील . द्वितीयेश शनि लाभात आर्थिक प्राप्ती मात्र चांगली राहील. केतू तृतीयात व गुरु ,बुध ,शुक्र हे तीन ग्रह अष्टमात असल्याने जोडीदाराची पण आर्थिक प्राप्ती चांगली राहील .वारसा हक्काच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर हा महिना चांगला आहे . घरात थोद्य्फार कुरबुरी झाल्या तरी एकंदरीत वातावरण सुखद राहील .मुलांशी मात्र ह्या महिन्यात थोडे समजुतीने घ्यावे लागेल नाहीतर वादाचे प्रसंग उद्भवतील .ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी . ह्या महिन्यात फारसे प्रवास होणार नाहीत . केतू तृतीयात असल्याने नोकरी /व्यवसाय करणार्यांना कामाचा व्याप वाढलेला जाणवेल. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील .
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि मार्गी असून तो तुमच्या दशमात आहे. ह्या महिन्यात तुमच्या यशाची कमान चढत राहील. कामाची दाखल गेतली जाईल. तारीख ५-६ च्या दरम्यान चंद्र द्वितीयात येतो. अचानक धनलाभाचा प्रसंग दिसत आहे. तृतीयेश मंगळ षष्ठात, शनि दशमात हा योग इंटरव्ह्यु, अग्रीमेंट , स्पर्धा परीक्षा इ. गोष्टींमध्ये यश मिळेल . विवाह इच्छुकांनी तयारीत राहावे .लग्न ठरण्याचे योग आहेत . शनि दशमात , मंगळ षष्ठात आहे व दशमेश आहे त्यामुळे नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ उत्तम आहे . एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
मीन : राशीस्वामी गुरु षष्ठात व केतू लग्नी व ज्यांच्या पत्रिकेत शनि अष्टमात असेल अशा लोकांचे जुने आजार त्रास देऊ शकतील असे वाटते परंतु रवि पंचमात असल्याने आजाराची तीव्रता फार राहणार नाही . आर्थिक दृष्ट्या हा महिना ठीक राहील. आर्थिक व्यवहार सावधानीने करावेत . ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे किंवा पुस्तक व स्टेशनरी चा व्यवसाय असणाऱ्या लोकांचे आर्थिक व्यवहार लांबणीवर पडतील. धार्मिक अध्यात्मिक दृष्टीने हा महिना चांगला जाईल .जोडीदारशी पटवून घेतलेले बरे .भागीदारीत व्यवसाय असणार्यांनी व्यवहारात काळजी घ्यावी .नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही . प्रवासाचे फारसे योग वाटत नाहीत . एकंदरीत हा महिना ठीक राहील.
गुरु बदलाचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम ह्या विषयावरील लेख लवकरच प्रसिद्ध करू .

वरील राशी भविष्य अनघा भदे  व सुनील देव (Astrology Counselling ) ह्यांनी लिहिले आहे .



Thursday, 30 July 2015

गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने …

आज गुरुपोर्णिमा सगळ्यात पहिले माझे गुरु म्हणजे माझे आई वडील  . आई -वडील सगळ्यात निरपेक्ष राहून सतत आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात . 
माझी आई सौ . सुनिता पळसुले  व वडील श्री . विजय पळसुले ह्या दोघांनाहि माझा सर्वप्रथम नमस्कार !
आपल्या आयुष्यात बरेच गुरु असतात म्हणजे अगदी शाळा , कॉलेज , इतर क्लासेस मधले गुरु , आपण ज्यांना आदर्श मानतो अशी लोकं .अशांना पण माझा नमस्कार !
निसर्ग व त्यातील प्रत्येक गोष्ट ह्यापासून  आपण काहीतरी शिकत असतो. त्या निसर्गाला आज वंदन .

ज्योतिषशास्त्र ह्या विषयी सांगायचे तर ज्यांची बरीच पुस्तके मी वाचली असे सर्व आदरणीय ज्योतिर्विद्य,
माझे गुरु श्री . सुनील देव  ह्या सगळ्यांना मन:पूर्वक नमस्कार .
ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे .
त्या सर्वांचे आशीर्वाद कायम मला मिळोत हि इच्छा !
Last but not the least 'INTERNET' through which we always learn many things !


Tuesday, 7 July 2015

कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस

कृष्णमूर्ती  पद्धतीचे ज्योतिष क्लासेस जुलै अखेरीपासून सुरु करत आहोत .

कोर्स चा कालावधी : ५ महिने , आठवड्यातून एक दिवस एक तास 

ह्या कोर्से मध्ये संपूर्ण कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास अनेक उदाहरणासकट घेतला जाईल . 
जन्मपत्रिका , प्रश्नकुंडली ह्याचा अभ्यासक्रमात समावेश आहे . 
कोर्स संपल्यावर परीक्षा घेतली जाईल . त्यात उत्तीर्ण होणार्यांना ' वेदांग ज्योतिष ' ह्या संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल. 

कृष्णमुर्ती पद्धतीने ज्योतिष शिकण्यासाठी पारंपरिक ज्योतिषाचे साधारण ज्ञान असल्यास उत्तम नाहीतर आवश्यक तेवढे शिकवले जाईलच.

इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क करावा :

अनघा भदे- 9011201560
anaghabhade@gmail.com

सुनिल देव -9822206170
sunil_deo41@hotmail.com

Wednesday, 1 July 2015

मासिक भविष्य जुलै २०१५



मासिक भविष्य जुलै २०१५

श्री सुनिल देव ह्यांनी लिहिलेले जुलै २०१५ चे राशिभविष्य 
राशिभविष्य
जुलै २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :

५ जुलै पासून शुक्र सिंह राशीत, ५ जुलै पासून बुध मिथुन राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत, १७ जुलै पासून रवि कर्क राशीत, १४ जुलै पासून गुरु सिंह राशीत प्रवेश करत आहे . 

मेष : ह्या महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीचा स्वामी मंगळ तृतीयात आहे त्यामुळे द्वितीयातील बुध व षष्ठातील राहू तुम्हाला प्रवासातून आर्थिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे . ह्याचा अर्थ असा कि ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अशा लोकांना हा काळ लाभदायक आहे . द्वितीयेश शुक्र ५ जुलै नंतर सिंह राशीत जात असल्याने कुटुंबासह मजेत वेळ घालवाल असे वाटते. घरगुती वातावरण चांगले राहील. १६ जुलै पर्यंत ज्या लोकांचा व्यवसाय event management तसेच कलात्मक वस्तू अथवा क्रीडा साहित्य विक्रीचा आहे त्यांना लाभ होतील .मुलांच्या दृष्टीने पण काळ ठीक आहे. षष्ठाचा स्वामी बुध ४ जुलै नंतर मिथुन राशीत जात असल्याने प्रकृतीची काळजी करण्याचे फारसे कारण नाही. शुक्र पंचमात असल्याने जोडीदाराबरोबर खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण राहील. घरातील मोठ्या मुलांच्या सहलीच्या योजना आखल्या जातील . ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकरता उत्तम काळ उत्तम आहे . नोकरीत असणाऱ्या लोकांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. व्यवसाय असणार्यांनी व्यवहार साभाळून करावेत .एकंदरीत हा महिना कौटुंबिक दृष्ट्या उत्तम आहे परंतु नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी .

वृषभ : ह्या महिन्याच्या ५ जुलै नन्तर शुक्र चतुर्थात असल्याने सर्व लक्ष घरासाबंधी कामाकडे जास्त राहील. द्वितीयात तीन ग्रह असल्याने वृषभ राशीला आर्थिक दृष्ट्या अतिशय उत्तम काळ आहे. गुरु तृतीयात उच्चीचा असल्याने सतत कार्यरत व उत्साही राहाल. शिक्षकांना तसेच वक्त्यांना हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. घरासाबंधी व्यवहाराकरता हा महिना फायदेशीर आहे. शुक्र चतुर्थात व रवि द्वितीयात असल्याने नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील व तसेच घरातील वातावरण आनंदी राहील. राहू पंचमात व बुध द्वितीयात हा ग्रहयोग कलाकार,खेळाडू तसेच शेयर ब्रोकर्स ना आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. गुरु तृतीयात व बुध द्वितीयात असल्याने शक्यतो वादावादीचे प्रसंग टाळावेत. एकंदरीत महिना उत्तम आहे .
मिथुन : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील परंतु प्रथम भावातील मंगळ उष्णतेचे विकार देऊ शकतो त्या दृष्टीने काळजी घ्यावी. आर्थिक दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील. तृतीयातील शुक्र दशमातील केतू व षष्ठातील शनि हे सर्व योग अध्यात्मिक दृष्ट्या चांगले आहेत. ज्यांना ह्याची आवड असेल त्यांनी सत्संगाचा लाभ घ्यावा. चतुर्थात राहू असल्याने घरघुती वाद टाळावेत. ज्या व्यक्ती घरापासून लांब राहतात त्यांना घराची ओढ जाणवेल. शेयर ब्रोकर्सना हा काळ शेयर्स घेण्याच्या दृष्टीने चांगला आहे . मुलांच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. षष्ठात शनि वक्री व लग्नी मंगळ असल्याने जुनी दुखणी डोके वर काढतील. जोडीदाराच्या संदर्भात काळ चांगला आहे. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ संमिश्र आहे. व्यवसाय निमित्त छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
कर्क : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. आर्थिक दृष्ट्या महिना जे आधीच परदेशात आहेत त्यांना चांगला आहे. ह्या महिन्यात परदेशगमनाचा बऱ्याच जणांना नोकरी निमित्त जाण्याचा योग आहे. तृतिय स्थानदेखील प्रवास दाखवत आहे त्यामुळे होतकरू तरुणांनी तयारीत राहायला हरकत नाही. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी उत्तम काळ आहे. ह्या महिन्यात पाहुणे येण्याची शक्यता आहे. शेअर्सचा व्यवसाय असणार्यांनी गुतंवणूक जपुन करावी अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत मुले लांब राहायला जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सर्वसाधारण राहील. प्रथमात गुरु पंचमात शनि व नवमात केतू ह्या धर्म त्रिकोणात तीन ग्रह असल्याने ज्यांना अध्यात्माची आवड आहे अशा लोकांनी सत्संग केल्यास त्याचा उत्तम लाभ होईल. कर्क राहिला हा महिना उत्तम आहे असे दिसते.
सिंह : प्रथमात शुक्र तसेच प्रथमेश रवि लाभात व राहू द्वितीयात हे सर्व योग अतिशय उत्तम स्थिती दाखवत आहेत ह्याचा अर्थ ह्या महिन्यात तुमच्या मध्ये उत्साह तसेच उत्तम प्रकृती व अनेक प्रकारचे लाभ असा कपिलाषष्ठी चा योग आहे. लाभात रवि,मंगळ,बुध आणि द्वितीयात राहू असल्याने अनेक मार्गाने आर्थिक लाभ होतील. प्रवासाच्या दृष्टीने हा महिना तितकासा अनुकूल नाही. घर खरेदी/विक्री व्यवहार मध्ये विलंब होऊ शकतात. शेअर्स च्या व्यवसायात असलेल्यांनी ते विकून फायदा होऊ शकेल. मुलांच्या दृष्टीने पण काळ अनुकूल आहे. काही जणांना कफ ,छातीचे आजार अशी दुखणी आहेत त्यांनी काळजी घ्यावी. पेन्शनची कामे मार्गी लागतील. काही लोकांना त्यांचे अडकलेले पैसे देखील ह्या काळात मिळू शकतील .व्यावसायिकांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. नोकरी करणार्यांना प्रमोशन च्या दृष्टीने चांगले योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
कन्या : कन्येचा स्वामी बुध दशमात तसेच मंगळ पण दशमात असल्याने तुम्ही महिनाभर कार्यमग्न राहाल. त्या कार्यातून तुम्हाला समाधान मिळेलच पण तुमच्या कार्याचा गौरव पण करण्यात येईल. प्रथमत राहू असल्याने मनाची चंचलता वाढण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. ज्यांच्या पत्रिकेत मुळातच प्रसिद्धी योग आहे अशा व्यक्तींना ह्या महिन्यात प्रसिद्धी मिळाल्या शिवाय राहणार नाही. ज्यांचा व्यवसाय प्रकाशन, पुस्तक विक्रेते किंवा फिरतीचा व्यवसाय /नोकरी असणार्यांना हा काळ उत्तम आहे. ज्यांना घर विकायचे आहे त्यांना त्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रेमवीरांना ह्या काळात संयम बाळगल्यास बरे राहील. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसधारण आहे. जोडीदाराशी ह्या महिन्यात संयमाने वागावे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवतील . दशमात तीन ग्रह रवि, मंगळ, बुध व गुरु लाभात हे सर्व योग व्यवसाय/नोकरीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत. अनेकांना प्रमोशन तसेच आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
तूळ : शुक्र लाभात, गुरु दशमात आणि केतू षष्ठ स्थानात ह्या योगांमुळे तुमच्या कार्याची दाखल घेतली जाईल. पण त्यातून आर्थिक लाभ तितकासा होणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु कार्यमग्न ठेवेल परंतु आर्थिक लाभ ह्या महिन्यात फारसे दिसून येत नाहीत. घरासंबंधी सर्व कामे लांबणीवर पडतील असे वाटते. मुलांचे शाळा/कॉलेज प्रवेश सुद्धा लांबणीवर पडू शकतात. जोडीदारापासून लांब राहण्याचे योग वाटतात. नवमात तीन ग्रह व राहू बाराव्या घरात असल्याने प्रवास होतील. षष्ठेश गुरु दशमात व बुध अष्टमात असल्याने पैशाचे व्यवहार जपून करावेत. तसेच कामाच्या ठिकाणी देखील भरपूर ताण पडण्याची शक्यता आहे. नवमातील दोन ग्रह रवि आणि मंगळ, लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत, त्यामुळे काही लोकांना कामानिमित्त परदेश वारी देखील करावी लागेल असे दिसते. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटत आहे
वृश्चिक: मंगळ अष्टमात व शनी प्रथमात ह्या ग्रहस्थिती मुळे सतत कोणता ना कोणता ताण राहील तसेच कोणत्याही गोष्टीत उत्साह राहणार नाही. तुम्ही घराच्या मंडळी बरोबर जितका वेळ घालवाल तितके मानसिक दृष्ट्या चांगले. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळजीचे काही कारण वाटत नाही. अष्टमात तीन ग्रह असल्याने व राहू लाभात त्यामुळे पूर्वीची काही येणी असल्यास वसूल होतील परंतु त्याच प्रमाणात खर्चाचे प्रमाण पण तेवढेच राहील. प्रथमात शनि, पंचमात केतू आणि नवमात गुरु ह्या ग्रहांमुळे अध्यात्मिक गोष्टीतून आनंद मिळू शकेल. शेअर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी सुद्धा व्यवहार जपून करावेत. नोकरी करणाऱ्यांनी पण वरिष्ठांशी जमवून घ्यावे. लाभातील राहूमुळे काही लाभ संभवतात. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटतो.
धनु : शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वियेश शनि बाराव्या स्थानी वक्री तसेच शुक्र नवम भावात हे योग आर्थिक लाभांच्या दृष्टीने फारसे अनुकूल वाटत नाहीत. काहीना प्रवासाचे योग येतील. तृतीयेश शनि लग्नी असल्याने कागदपत्रांसंबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. मुलांच्या अभ्यासासंबंधी काळजीचे कारण राहणार नाही, तसेच त्यांच्या अॅडमिशनची कामे देखील मनाप्रमाणे होतील. सप्तमात दोन ग्रह, रवि आणि मंगळ, व राहू दशमात हा योग ज्यांचा सर्वसाधारण लोकांशी संपर्क जास्त येतो अश्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. वाहने जपून चालवावीत. कला/क्रीडा क्षेत्रातील लोकांचा जनसंपर्क वाढण्याची शक्यता आहे. सप्तमात ग्रहांमुळे ज्यांचा व्यवसाय/नोकरी चा सबंध जास्त लोकांशी येतो त्यांच्या दृष्टीने चांगले. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. दशमातील राहू व सप्तमातील तीन ग्रहांमुळे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. एकंदर हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे .
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आहे. तो द्वितीयेश आहे तसेच रवि, बुध, मंगळ षष्ठ स्थानात आहेत ह्या योगामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ व्हायला हवेत पण शनि वक्री असल्याने ह्या सर्व गोष्टी शनि मार्गी झाल्यानंतर जास्त अनुभवास येतील तो पर्यंत प्रतीक्षा करा. लेखक मंडळीना हा काळ उत्तम आहे . विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल .तसेच घर /वाहन ह्या व्यवहारात फायदा होईल . ज्यांच्या मनात घर भाड्याने द्यायचे आहे त्यांना भाडेकरू पण मिळतील. शेअर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधगिरीने व्यवहार करावा .नुकसान होण्याची शक्यता आहे . कदाचित जोडीदारापासून लांब राहण्याचे योग आहेत . बहुदा ज्यांच्या जोडीदारांचा/स्वत:चा व्यवसाय /नोकरी फिरतीची आहे त्यांना जास्त जाणवेल .कामाचा ताण ह्या महिन्यात राहील असे दिसते . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कुंभ : प्रकृतीच्या दृष्टीने महिना उत्तम आहे. इथे कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आहे परंतु वक्री असल्याने तुम्हाच्या कार्यात सध्या अडथळे येण्याची शक्यता आहे. पण केलेल्या कामाचे फळ शनि मार्गी झाल्यावर मिळेलच . आर्थिक कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह होईल पण तो टाळावा. भावा बहिणीच्या भेटीचे योग येतील. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला जाईल. जोडीदाराबरोबर सलोख्याचे संबंध राहतील. दशमेश मंगळ पंचमात आणि राहू अष्टमात ह्या योगामुळे अनेकांना कामाचा ताण जाणवेल. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल. हा महिना एकंदरीत " वाट बघा " असे सुचवतो.
मीन : प्रथमात केतू पंचमात गुरु तसेच नवमात शनि ह्या योगांमुळे अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल. पाहुणे येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. स्पर्धेत यश मिळेल. चतुर्थात रवि, मंगळ बुध व सप्तमात राहू ह्यामुळे घरात अनेक गोष्टींची चर्चा होईल. पार्टनरशीपचा व्यवसाय असलेल्या लोकांचा काळ समाधानकारक राहील. फिरतीच्या निमित्ताने छोटेमोठे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने अनुकूल ग्रह आहेत. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील .

Monday, 1 June 2015

मासिक भविष्य जून २०१५


श्री . सुनिल देव ह्यांनी लिहिलेले जून २०१५ चे राशिभविष्य :
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

राशिभविष्य
जून २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ द्वितीय स्थानी, चंद्र महिन्याच्या सुरुवातीला नवमात आणि शुक्र चतुर्थात, घराच्या संदर्भात काहीतरी लाभ दाखवत आहेत. प्रकृती मात्र उत्तम राहील. द्वितीय त्यामुळे भावात तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध निश्चितपणे आर्थिक लाभ करून देतील. तृतीयेश बुध द्वितीय स्थानी ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अश्यांना हा महिना लाभदायक आहे. तृतीयेश बुध असल्याने त्यांच्या बोलण्यात सुद्धा एक प्रकारचे मार्दव जाणवेल. चतुर्थातील गुरु आणि शुक्र घरातील वातावरण आनंदी ठेवेल. चतुर्थातील शुक्र व अष्टमातील शनि वाहने जपून चालवण्याचा संदेश देतात. पंचमेश रवि द्वितीयात, चंद्र पहिल्या आठवड्यानंतर १० आणि ११ ह्या स्थानी जाईल. त्यावेळी शेअरमध्ये लाभ होण्याची बरीच शक्यता आहे. तसेच मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगतीबाबत निश्चिंत असावे. कन्येचा राहू प्रकृतीसंबंधी किरकोळ तक्रारी देण्याची शक्यता आहे. सप्तमेश शुक्र चतुर्थात असल्यामुळे कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील, पण अष्टमातील शनि किरकोळ तणावाचे प्रसंग आणू शकेल. दशमेश शनि अष्टमात आणि बुध द्वितीयात ह्यामुळे कामाच्या ठिकाणी बराच ताण जाणवेल, पण मोबदला पण तेवढाच चांगला मिळेल. एकंदरीत हा महिना उत्तम आहे असे दिसते.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र गुरूबरोबर तृतीय स्थानी आहे व शनि सप्तमात आहे. प्रकृतीच्या दृष्टीने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय रवि पण वृषभेतच असल्याने प्रकृती ठीक राहील. काही लोकांना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. प्रथम भावात बुध, पंचमात राहू व नवमात शनि हा धर्म त्रिकोण बऱ्यापैकी कार्यान्वित झालेला आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना सत्संग, ध्यानधारणा, धार्मिक स्थळांना भेटी, मन:शांती इ. गोष्टींसाठी उत्तम काळ आहे. तृतीयेतील गुरु अनेक लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे संभव दाखवत आहे. सिंह राशीचा स्वामी रवि प्रथम भावात असल्याने मुलांच्या कडे अभ्यासाबाबत अधून-मधून लक्ष घालावे लागेल, पण मुलांची एकंदरीत प्रगती चांगली राहील. सप्तमेश मंगळ तुमच्याच राशीत व सप्तमातच शनि त्यामुळे जोडीदाराबरोबर किरकोळ कुरबुरीचे प्रसंग येतील. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र धनु राशीत, गुरु तृतीय स्थानी व केतू लाभ स्थानी आहेत. ज्यांचा व्यवसाय मार्केटिंग, पुस्तक विक्री, हॉटेल मॅनेजमेंट इ. असेल त्यांच्यासाठी काळ लाभदायक आहे. दशमेश शनि सप्तमात व बुध लग्नी ज्यांचे व्यवसाय आधीपासून आहेत, त्यांच्या व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे, व जी नवी मंडळी व्यवसाय करू इच्छितात त्यांनी शनि मार्गी होईपर्यंत थांबल्यास उत्तम. इतर नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली फळे मिळण्यासाठी शनि मार्गी होईपर्यंत वाट पहावी. एकुणात हा महिना उत्तम आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध बाराव्या स्थानी, चंद्र सप्तमात आणि राहू चतुर्थात हे योग घरासंबंधी काही अडथळे आणण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या अगर तुमच्या जवळच्या लोकांच्या प्रकृतीची चिंता करायला लावण्याची शक्यता आहे. द्वितीयातील गुरु-शुक्र धनलाभाच्या दृष्टीने उत्तम आहेत. विशेषत: ज्यांची नोकरी परदेशात आहे, त्यांना जास्त चांगला योग आहे. शनि वक्री असल्याने काही लोकांच्या कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. तृतीयेश रवि बाराव्या स्थानी आहे, ह्याचा अर्थ काही लोकांना परदेशगमनाचे योग येऊ शकतात व ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानाशी संबंधित महादशा असेल अशी मंडळी परदेशात जास्त काळ राहतील. मुलाबाळांची खूप चिंता नसली तरी अभ्यास व इतर गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराबरोबर सुसंवाद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील. ज्यांचे व्यवसाय पार्टनरशिपमध्ये आहेत अश्या लोकांना जास्त लाभ मिळेल. पण तो लाभ प्रत्यक्ष दिसण्यासाठी शनि मार्गी होण्याची वाट पहावी लागेल. दशमातील केतू परदेशाशी संबंध दाखवत आहे. तसेच दशमेश गुरु तृतीयात आहे. रवि-मंगळ व बुध हे तीन ग्रह बाराव्या स्थानात असल्याने परदेशगमनाचा योग आहे. पण शनि आणि बुध हे दोन ग्रह वक्री असल्याने गोष्टींना विलंब होण्याची बरीच शक्यता आहे. एकंदरीत हा महिना थोड्याफार विलंबाने का होईना लाभदायक आहे.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात षष्ठात आणि गुरु-शुक्र कर्क राशीतच असल्याने अनेक लोकांना काहीतरी अचानक आर्थिक लाभाचा प्रसंग येऊ शकेल. प्रकृतीच्या दृष्टीने थोडाफार त्रास संभवतो, विशेषत: ज्यांना डायबेटीस आहे, अश्यांनी साखर आटोक्यात ठेवणे जरुरी आहे. सिंह राशीचा स्वामी रवि लाभात व बुध लाभात हा देखील एक चांगला आर्थिक लाभाचा योग आहे. तृतीय भावातील राहू कन्येत, कन्येचा स्वामी बुध लाभात, आणि लग्नेश षष्ठात तुम्हाला सर्वच कामात एक प्रकारचा उत्साह जाणवेल. तसेच तुमच्या शब्दालाही वजन प्राप्त होईल. चतुर्थेश शुक्र लग्नी व शनि पंचमात त्यामुळे घरगुती बाबतीत तुम्ही आनंदाने लक्ष घालणार आहात. आपल्या सर्व कौटुंबिक सदस्यांच्या गरजा अगर मागण्या तुम्ही आनंदाने पुरवणार आहात! मुलाबाळांच्या बाबतीत काळजीचे अजिबात कारण राहणार नाही, त्यांचे अभ्यास, परीक्षा सुरळीत चालतील. जोडीदाराशी सुसंवाद राहील व सलोख्याचे संबंध राहतील. नवमेश गुरु लग्नी व बुध लाभात त्यामुळे मोठ्या प्रवासाचे योग आहेत, पण सध्या बुध वक्री असल्याने कदाचित ह्या गोष्टीस विलंब लागेल किंवा कृष्णमुर्तीचा नियम पाळल्यास हातातोंडाशी आलेली गोष्ट घडणार देखील नाही. पण माझ्या अनुभवाप्रमाणे कमीत कमी बुध हा वक्री असताना देखील इतका नकारात्मक नसतो. दशमेश मंगळ लाभात, चंद्राची वाटचाल षष्ठातून सुरु होऊन नवम, दशम, आणि लाभातून होत असताना त्याच्या जोडीला शुक्र लग्नात काहीतरी अचाट गोष्टी तुमच्या हातून होणार हे नक्की!! (‘अचाट’चा अर्थ ज्याच्या त्याच्या पत्रिकेच्या दर्जानुसार घ्यावा.) एकंदरीत हा महिना कर्क राशीला उत्तम आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि दशमात व चंद्र पंचमात त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने असे दिसते की थोड्याफार आजारपणातून रिकव्हरी मात्र ताबडतोब होईल. द्वितीयात राहू कन्येचा व बुध दशमात त्यामुळे कामाच्या ठिकाणाहून आर्थिक लाभ चांगला होईल. तृतीयेश शुक्र बाराव्या स्थानी आहे हा लांबच्या प्रवासाचा योग असला तरी कदाचित शनिमुळे त्याला बाधा येऊ शकते. सप्तमेश शनि चतुर्थात व बुध दशमात त्यामुळे असे दिसते की तुमचे सर्व लक्ष कामाच्या व्यापात राहील. अष्टमेश बाराव्या स्थानी असल्याने वाहने जपून चालवावीत. त्यातील एक चांगला भाग म्हणजे चतुर्थ, अष्टम आणि द्वादश हा मोक्ष त्रिकोण असल्याने हा काळ ध्यानधारणा, प्रवचन, सत्संग ह्या द्वारे मानसिक शांतीसाठी अतिशय लाभदायक आहे. दशमात रवि, मंगळ आणि बुध हे तीन ग्रह असल्याने त्यांचा एकत्रित परिणाम व्यवसाय अगर नोकरीच्या ठिकाणी उत्तम दिसून येईल. लाभेश बुध हा देखील दशमात असल्याने चंद्राचे भ्रमण वेळोवेळी लाभदायक ठरणार. एकंदरीत हा महिना बऱ्याच दृष्टीने उत्तम आहे, विशेषत: मोक्ष त्रिकोण अत्यंत प्रभावी आहे, त्याचा लाभ जरूर घ्यावा. काही लोकांची साधना पूर्वी थोडीफार झालेली असेल अश्यांना ह्या महिन्यात निश्चितपणे वेगळा अनुभव येईल.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध नवमात व राहू लग्नीच. शरीरप्रकृती उत्तम राहील. द्वितीय भावाचा स्वामी शुक्र लाभ स्थानी व शनि तृतीय स्थानी त्यामुळे ज्यांचा व्यवसाय बुकसेलर्स, लेखक, मेडिकल रिप्रेझेंटेटिवज् अश्यांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. तसेच ज्यांचा पुरातन (अँटिक) वस्तूंचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ उत्तम आहे. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र चतुर्थात व चतुर्थेश गुरु लाभात ह्यामुळे घरगुती बाबतीत वातावरण आनंदाचे राहील. तसेच ज्यांच्या जोडीदाराचा स्वतंत्र व्यवसाय आहे, त्यांना देखील हा काळ उत्तम आहे. पंचमेश शनि तृतीय स्थानी व बुध नवम स्थानी शिवाय लग्नेश बुधच त्यामुळे ज्यांना मंत्रसिद्धीची आवड असेल अश्यांनी अजून जास्त प्रयत्न केल्यास मंत्र सिद्ध होऊ शकेल. मुलाबाळांच्या अभ्यास अगर इतर प्रगतीच्या दृष्टीने देखील उत्तम काळ आहे, काळजीचे कारण नसावे. षष्ठेश शनि तृतीयात व बुध नवमात असल्याने धार्मिक बाबतीत प्रगती दाखवत आहे. खरे तर षष्ठ स्थान एक प्रकारचे धनस्थान आहे. पण षष्ठात षष्ठेश गुरु आहे, गुरु लाभात आहे व षष्ठ स्थानी केतू आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे शनि तृतीयात आणि बुध नवमात असल्याने मंत्रशक्तीचा लाभ होण्याची शक्यता अधिक वाटते. नवमातील तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध वरील सर्व विधानामुळे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त नक्कीच करतात. दशमेश बुध नवम स्थानी वक्री असल्याने तो कर्म स्थानातून लाभ देण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत हा महिना धार्मिक दृष्ट्या उत्तम आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र दशमात आहे, प्रकृतीच्या दृष्टीने काळजी करण्याचे काही कारण नाही. शुक्र दशमात असल्याने तुमच्या कामात देखील उठून दिसेल असे कर्तृत्त्व गाजवण्याची शक्यता आहे. द्वितीय भावातील शनि कदाचित तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा देऊ शकणार नाही. ह्याउलट बराचसा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यातील काही भाग कदाचित देणगी म्हणून द्याल असे दिसते. तृतीयेश गुरु दशमात, पहिल्या आठवड्यात चंद्र पण तृतीयात, बुध अष्टमात तुमच्या कार्यात तुम्ही बरेच यश मिळवाल असे दिसते. शिवाय कामाची दखल घेतली जाईल इतपत ऑफिसमध्ये अगर सामाजिक कार्य घडेल.चतुर्थेश शनि द्वितीय स्थानात घरासंबंधी देखील बराच खर्च दाखवत आहे. मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगती सुरळीत राहील. षष्ठात केतू व षष्ठेश गुरु दशमात प्रकृतीच्या दृष्टीने फारसे त्रास दाखवत नाहीत. सप्तमेश मंगळ अष्टमात व चंद्र तृतीयात त्यामुळे कौटुंबिक बाबतीत कदाचित दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोड्याफार कुरबुरी वाढू शकतील. नवमेश बुध अष्टमात व राहू बाराव्या स्थानी त्यामुळे काही अपरिहार्य प्रवास होण्याची शक्यता आहे, पण त्याबरोबर प्रवासात अडचणी येऊ शकतील. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानी व २० तारखेनंतर तो दशमात जेंव्हा येईल हा काळ तुमच्या एकंदरीत कार्यासाठी उत्तम आहे. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या लाभदायक नसला तरी कामाच्या दृष्टीने उत्तम आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सप्तमात तसेच तो षष्ठेश पण आहे. शनि वृश्चिकेत आणि बुध सप्तमात शरीर प्रकृतीच्या दृष्टीने जुन्या दुखण्यांचा किरकोळ त्रास वगळता चांगला काळ आहे. महिन्याच्या सुरुवातीला द्वितीय स्थानी चंद्र, पंचमात केतू आणि नवम स्थानी गुरु धार्मिक विधी करणाऱ्या लोकांना पहिल्या दोन आठवड्यांचा काळ उत्तम आहे. नोकरी अगर व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या हा काळ बऱ्यापैकी आहे. तृतीयेश आणि चतुर्थेश शनि, लग्नी व बुध अष्टमेश, शनिची बुधवार दृष्टी हे सर्व योग प्रवास करताना अगर वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहेत. मुलाबाळांच्या अभ्यासातील अगर परीक्षेतील प्रगती उत्तम राहील. सप्तमातील रवि, मंगळ, बुध हे तीन ग्रह त्यावर शनिची दृष्टी कौटुंबिक वातावरण नरम गरम ठेवील असे दिसते. नवमातील गुरु-शुक्र धार्मिक स्थळांना भेटी देण्यास उत्तम आहेत. दशमेश रवि सप्तमात व पहिल्या आठवड्यात चंद्र द्वितीयात व्यावसायिक लोकांना काही प्रमाणात लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना मात्र थोडेसे नमते घ्यावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना देखील वरिष्ठांबरोबर सलोख्याचे वातावरण ठेवल्यास उत्तम काळ आहे. लाभातील राहू चंद्रभ्रमणाप्रमाणे अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी लाभ मिळवून देईल. एकंदरीत हा महिना बऱ्यापैकी आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात व बुध षष्ठात त्यामुळे शरीर प्रकृतीबाबत तक्रारी उद्भवू शकतील. त्यामुळे जून महिन्यात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व बुध षष्ठ स्थानी त्यामुळे आर्थिक प्राप्ती बऱ्यापैकी होईल असे दिसते. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग येतील. चतुर्थातील केतू व बाराव्या स्थानातील शनि शेअर वा तत्सम गुंतवणुकीपासून लांबच राहावे असा इशारा देतात. मुलाबाळांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तमेश बुध षष्ठात त्यामुळे कौटुंबिक वातावरण चंद्रभ्रमणावर अवलंबून राहील. दशमातील राहू नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे, तसेच आर्थिक लाभ देखील बरेच मिळवून देईल. लाभेश शुक्र अष्टमात व शनि बाराव्या स्थानी काही लोकांना कामाचा ताण बराच जाणवेल असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र फळे देणार आहे असे दिसते.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व बुध पंचमात प्रकृतीच्या दृष्टीने हा योग उत्तम आहे. द्वितीयेश शनि देखील लाभात असल्याने आर्थिक प्राप्तीचे योग येतील. तृतीयातील केतू छोटेमोठे प्रवास घडवून आणेल. पंचम भावातील रवि, बुध आणि मंगळ व लाभातील शनि ह्या ग्रहस्थितीमुळे शेअर मध्ये गुंतवणूक केली असल्यास काही प्रमाणात लाभ मिळतील. तसेच मुलाबाळांच्या दृष्टीने देखील काळ उत्तम आहे. षष्ठेश बुध पंचमात असल्याने शरीर प्रकृतीची चिंता नसावी. सप्तमातील गुरु-शुक्र कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व आनंदाचे ठेवील. नवमात कन्येचा राहू व बुध पंचमात आहे, राहूमुळे ध्यानधारणा व धार्मिक कार्ये ह्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. तरीही नेटाने धार्मिक व अध्यात्मिक चर्चेद्वारा मन:शांती मिळू शकेल...ह्याचे कारण म्हणजे प्रथम, पंचम आणि नवम भावांचा संबंध येत आहे आणि शनि लाभात आहे. दशमेश शुक्र सप्तमात व शनि लाभात व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे, तसेच नोकरी करणाऱ्यांना देखील प्रमोशनचे चान्सेस आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात, बुध चतुर्थात शरीर प्रकृती चांगली राहील. द्वितीय भावातील केतू नोकरी अगर व्यवसायाच्या ठिकाणी निश्चित आर्थिक लाभ करून देईल. तृतीयेश मंगळ चतुर्थात त्यामुळे फारसे प्रवास घडतील असे वाटत नाही. पण चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे काही वेळेला पुस्तक विक्रेते आदी व्यावसायिकांची चांदी होईल. चतुर्थात तीन ग्रह रवि, मंगळ, बुध निश्चितपणे नवीन घर खरेदी अगर घरासंबंधी व्यवहार ह्यात लाभ करून देतील. पंचमेश बुध चतुर्थ स्थानी लहान मुलांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल असे सुचवतो. षष्ठातील गुरु, शुक्र आर्थिक बाबतीत उत्तमच आहेत. प्रकृतीची फारशी काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक वातावरण देखील सलोख्याचे राहील. दशमेश मंगळ चतुर्थात, शुक्र षष्ठात तसेच शनि दशमात आणि बुध चतुर्थात हे सर्व ग्रहयोग व्यावसायिक दृष्ट्या आणि नोकरी करणाऱ्या सर्वांना अतिशय उत्तम आहेत, वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल असे दिसते. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टींनी उत्तम आहे.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात, लग्न स्थानी केतू व नवमात शनि प्रकृती दृष्ट्या काळ उत्तमच आहे. शिवाय ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांच्या ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम काळ आहे. एकाग्रता उत्तम होईल आणि त्यापासून निश्चितपणे लाभ होईल. त्याबरोबर तरुण मंडळींचे सूत देखील जमू शकेल. द्वितीयेश मंगळ तृतीय स्थानी त्यामुळे वक्ते, शिक्षक आणि भविष्यवेत्ते ह्यांना हा काळ अतिशय उत्तम आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम आहे. सप्तमेश बुध तृतीयात, राहू सप्तमात जोडीदाराशी किरकोळ कुरबुरी होऊ शकतील. महिन्याच्या सुरुवातीला दशमात चंद्र व केतू लग्न स्थानी काही लोकांच्या हातून भरीव कार्य होण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांची बदली अगर नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. लाभेश शनि नवमात व बुध तृतीयात आर्थिक लाभापेक्षा अध्यात्मिक लाभ जास्त दर्शवतो आहे. एकंदरीत हा महिना अध्यात्मिक लाभ भरपूर प्रमाणात मिळवून देणार आहे. मीन राशीच्या लोकांना निश्चितपणे मन:शांतीचा लाभ होईल.

Saturday, 2 May 2015

मासिक भविष्य मे २०१५

मासिक भविष्य मे २०१५

श्री . सुनिल देव ह्यांनी लिहिलेले एप्रिल २०१५ चे राशिभविष्य :
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेषेचा स्वामी मंगळ द्वितीयात व राहू षष्ठात शरीर प्रकृतीची विशेष काळजी जरुरीचे आहे. विशेषतः ज्यांना मंगळ महादशा किंवा अंतर्दशा असेल त्यांना जास्त जाणवेल. द्वितीयातील मंगळ, बुध आर्थिक बाबतीत फारसे प्रबळ नाहीत पण शुक्र काही लाभ निश्चित करून देईल. चतुर्थातील शुक्र घरातील वातावरण आनंदी ठेवील. पंचमेश रवि लग्नात व शुक्र तृतीयात असल्याने मुलांच्या बाबतीत काळजीचे कारण नाही. जोडीदाराशी सुख संवाद होतील. दशमेश शनि अष्टमात वक्री आहे. त्यामुळे कामाचा ताण काही काळापुरता कमी होईल. लाभेश शनि आहे. आर्थिक आवक फारशी दाखवत नाही. द्वाद्शेश गुरु चतुर्थात असल्याने फारसे प्रवास होऊ शकणार नाहीत. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र द्वितीयात व मंगळ बाराव्या स्थानात पैश्याची चिंता दाखवत आहे. कदाचित अडकलेले पैसे हे कारण असू शकेल. तब्येतीवर परिणाम’ होण्याची शक्यता आहे. तृतीयातील गुरु वक्ते, प्रवचनकार इत्यादींना चांगला आहे.तृतीयेश चंद्र एप्रिलच्या मध्यात प्रवास घडवेल. नवीन घर घेणार असाल तर बेत पुढे ढकलणे योग्य होईल. कदाचित मनासारखा काम होणार नाही. पंचमात राहू व रवि बराव्यात मुलांच्या कडे लक्ष द्यावे लागेल असे दिसते. बँकेचे कर्ज घेणार असाल तर पहिल्या आठवड्यात जास्त लाभदायक आहे. कौटुंबिक संदर्भात थोडी नाराजी राहील असे दिसते. अष्टमेश गुरु तृतीयात व बुध लग्नी भाऊ बहिणी संबंधी काही काळजी अगर चिंता दाखवत आहे. दशमेश शनि सप्तमात व शुक्र द्वितीयात व्यापार करणाऱ्यांना लाभदायक आहे. लाभातील केतू व तृतीयात गुरु काही प्रमाणात आर्थिक लाभ दाखवत आहे. परदेशात नोकरी अगर व्यासाय करणाऱ्यांना उत्तम लाभ आहेत. एकंदरीत हा महिना समिश्र स्वरूपाचा आहे.

मिथुन : मिथुनेचा स्वामी बुध द्वादश भावात, रवि लाभत व शुक्र लग्नी व मंगळ द्वादश भावात, हे योग एकमेकांना विरोधी वाटतात. तसेच दुसऱ्या पंधरवड्यात रवि पण बारावा होत आहे. त्यामुळे स्वतःची प्रकृतिची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत पहिले पंधरा दिवस ओके आहेत नंतर चे व्यवहार जपून करावेत अन्यथा पैसे अडकायची भीति आहे. द्वितीय भावातील गुरु व चंद्राची चंचल गती हेच निर्देश करत आहेत. तृतीयेश रवि लाभात व नंतर द्वादश, अनेकांना लांबचे प्रवास घडवून आणेल. ज्या मंडळींना नवीन घर घ्यावयाचे आहे त्यांनी पहिल्या पंधरा दिवसात बुक करून घेतल्यास मनासारखे घर व व्यवहार पार पडतील. लहान मुले तुमच्या भोवती पिंगा घालतील व मोठ्या मुलांचा अभ्यास घ्यावा लागेल. षष्ठातील शनि जुनी दुखणी डोके वर काढण्याचा संभव आहे. सप्तमेश गुरु द्वितीयात व बुध बाराव्या भावात कुटुंबात सुसंवाद राखणे कठिण वाटते. दशमातील केतू व दशमेश गुरु व्यावसायिक मंडळींना आर्थिक 
लाभ मिळवून देतील. एकंदरीत हा महिना समिश्र स्वरूपाचा आहे.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र चतुर्थात, राहू तृतीयात व बुध लाभात हे योग प्रकृती उत्तम ठेवील. तसेच चंद्र आई व मनाचा कारक असल्याने तुम्ही घरच्या सर्व मंडळी बाबत भाऊक होणार असे दिसते. द्वितीयेश रवि दशमात असला तरी आर्थिक व्यवहार जपून करावेत. तृतीयेतील राहू अनेक लहान प्रवास देणार आहे. हा प्रवास ज्यांचा फिरतीचा उद्योग आहे 
त्यांना फायदेशीर होईल. पंचमेश मंगळ मुलांची काळजी ठेवणार नाही. तरीपण थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी मात्र थोडी कुरबूरी होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेतल्यास अपघात टळतील. नवमेश गुरु प्रथम भावात व बुध लाभात वर लिहिल्या प्रमाणे प्रवासातून लाभ हे दर्शवत आहे. दशमेश मंगळ लाभात व रवि दशमात कामाच्या ठिकाणी नक्की लाभ मिळवून देतील. फक्त मिळालेला लाभ नीट जपून ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना बऱ्यापेकी आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि नवमात व गुरु पंचमेश धार्मिक कार्यास योग्य आहे. ज्यांना ह्या गोष्टीची आवड आहे अशांनी जरूर लाभ घ्यावा कारण योग्य वेळेस केलेल्या कार्याचा जास्त फायदा मिळतो. प्रकृति उत्तम राहील. काळजी नसावी. कन्या राशीचा स्वामी बुध दशमात व रवि नवमात तुमच्या कामात नशिबाचा सहयोग दाखवत आहे. पण आर्थिक आवक सर्वसाधरण राहणार आहे. तृतीयातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग दाखवत आहे. वेल उत्तम आहे. त्यामुळे फिरून यायला हरकत नाही. बाराव्या भावातील गुरु शेयर अगर तत्सम गुंतवणूक सावधानतेने करावेत असा इशारा देत आहे. कौटुंबिक वातवरण खेळीमेळीचे राहील असे वाटते. दशमेश शुक्र लाभात व बुध दशमात हे योग नोकरी अगर व्यवसाय करणारास उत्तम आहेत. कामाची दखल घेतली जाईल असे कार्य हातून घडेल. लाभतील शुक्र अनेक गोष्टी मनाप्रमाणे पार पडतील. एकंदरीत हा सर्व बाजूनी उत्तम आहे
कन्या : शरीर प्रकृति किरकोळ तक्रारी वगळता छान राहील. द्वितीयेश शुक्र दशमात, चंद्र द्वितीयात आर्थिक लाभाचे योग आहेत. लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते इत्यादींना काळ उत्तम आहे. व्यवसाय छान होईल असे वाटते. मुलाबाळांच्या अभ्यासाची काळजी नको. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. सुसंवाद घडतील. अष्टमातील रवि, मंगळ अचानक आर्थिक लाभ नाक्कीन देणार. नवमातील बुध धार्मिक व्यावसायिक यांना अडी अडचणीतून जायला लावून मग मनासारखे घडवेल. दशमात शुक्र व लाभात गुरु हे दोन्ही ग्रह नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना चांगले असून भरपूर लाभ करून देतील. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे. एन्जॉय ....
तूळ : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र तुळेत, शुक्र नवमात, अनेक चांगल्या व मनासारख्या घटना घडण्याचा काळ आहे.प्रकृति पण छान राहणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा भरपूर उपयोग करू घेणे तुमच्या हातात आहे. इतके जरी छान असले तरी आर्थिक आवक या बाबत दिरंगाई होईल असे वाटते. तृतीयेत धनु राशीचा स्वामी गुरु दशमात,बुध अष्टमात व शुक्र नवमात अडी अडचणीतून तुम्ही पुढे जाणार आहात. मुला बाळांचा अभ्यास तुम्हाला घ्यावा लागेल असे दिसते. शेयर अगर तत्सम गुंतवणूक जरा जपूनच करा. सप्तमातील मंगळ कौटुंबिक वातावरण जरा गरम ठेवील पण रवि तेथेच असल्याने पटकन निवळण्याची पण शक्यता आहे. गुरु दशमात व बुध अष्टमात नोकरी अगर व्यवसायात बराच ताण देणारा आहे. लाभेश रवि सप्तमात व शुक्र नवमात काही आर्थिक फायदा करून देतील. द्वादश भावातील राहू काहींना प्रवासाचे योग आणेल असे वाटते. एकंदरीत हा उत्तम आहे असे वाटते.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सप्तमात, रवि षष्ठात प्रकृतीस जपणे अगत्याचे आहे. द्वितीयेश गुरु नवमात व बुध सप्तमात आर्थिकदृष्ट्या फार काही छान दिसत नाही. तृतीयेश शनि लग्नात, शुक्र अष्टमात वाद विवाद,चर्चा इत्यादी पासून दूर राहिल्यास शांतता मिळेल. मुलाबाळांच्या अभ्यासाबाबत चिंता राहणार नाही. कलगी नसावी. सप्तमात मंगळ, बुध, शुक्र अष्टमात कौटुंबिक वातावरण गरम राहण्याची शक्यता आहे. थोडे नमते, गोडी गुलाबीने घेतल्यास नो प्रॉब्लेम्स. सहकुटुंब धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे. जरूर भेट द्या. राहू लाभात आहे. धन भावातून आवक कमी असली तरी राहूमुळे ती कसर तुमच्या कामाच्या ठिकाणी भरून निघेल. अष्टमेश सप्तमात, द्वादशेष अष्टमात, कुणाच्यातरी आजारानिमित्त हॉस्पिटलला भेट देण्याचा संभव आहे. एकंदरीत महिना संमिश्र आहे.


धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात आणि बुध षष्ठात, शरीर प्रकृतीस जपणे आवश्यक आहे. दोन्ही भाव प्रकृतीस मारक आहेत. द्वितीयेश शनि बाराव्या भावात आणि शुक्र सप्तमात त्यामुळे खर्चाची बाजू बरीच वाढती राहील असे दिसते. 
मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. वर लिहिल्याप्रमाणे षष्ठातील मंगळ आणि बुध ह्यामुळे उष्णतेचे विकार किंवा बुधामुळे मज्जासंस्थेबाबत त्रास होऊ शकतात. सप्तम भावातील शुक्र आणि षष्ठातील मंगळ-बुध कौटुंबिक स्वास्थ्यात थोडाफार बिघाड आणू शकतात. राहू दशमात आणि बुध षष्ठात नोकरी अगर व्यवसायात आर्थिक दृष्ट्या उत्तम आहेत. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील असे दिसते.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आणि शुक्र षष्ठात, प्रकृती सर्वसाधारण ठीक राहील. शनि वक्री असल्याने आर्थिक बाबतीत दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु अष्टमात आणि बुध पंचमात ज्यांची मुले बरीच मोठी झाली असतील, त्यांच्याशी किरकोळ स्वरूपाचे वादाचे प्रसंग येतील, तरी मुलांबरोबर सामोपचाराने घ्यावे. रवि चतुर्थात आणि मंगळ-बुध पंचमात ही ग्रहस्थिती मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहे. षष्ठेश बुध पंचमात आणि रवि चतुर्थात ह्या ग्रहस्थितीमुळे वर लिहिल्याप्रमाणे प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नाही. सप्तमातील गुरु जोडीदाराबरोबर सलोख्याचे वातावरण ठेवील. अष्टमेश रवि चतुर्थात आणि शुक्र षष्ठात त्यामुळे वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना काही प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. लाभेश मंगळ पंचमात व शनि लाभातच वक्री असल्याने वर लिहिल्याप्रमाणे काही बाबतीत बरीच दिरंगाई होण्याची शक्यता आहे. एकंदरीत महिना संमिश्र राहील असे दिसते.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आणि शुक्र पंचमात ह्या ग्रहस्थितीमुळे प्रकृती उत्तम राहील. द्वितीयेश गुरु षष्ठात आणि बुध चतुर्थात असल्याने ज्यांना घरासंबंधी कर्ज घ्यायचे आहे त्यांचे हे काम लवकर मार्गी लागेल. तृतीयातील रवि काही लोकांना प्रवासाचे योग दाखवतो. पंचमात शुक्र आणि चतुर्थात मंगळ-बुध मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहेत. षष्ठातील गुरु आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे, काहीतरी आर्थिक लाभ नक्की होणार हे दर्शवतो! जोडीदाराशी सुसंवाद राहील व घरातील वातावरण आनंदी राहील. अष्टमेश बुध चतुर्थात आहे व रवि तृतीयात त्यामुळे वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी. नवमातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर लिहिल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना प्रवासाचे योग दाखवत आहे. दशमात शनि व तृतीयात रवि असल्याने तुमच्या हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. शनि वक्री असल्याने कदाचित कार्यातील यश मिळण्यास थोडा विलंब लागेल. एकंदरीत हा महिना चांगला आहे.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात व शनि नवमात ह्यामुळे १-५-९ धर्मत्रिकोण असल्याने हा काळ सत्संग करण्यासाठी उत्तम आहे. धार्मिक बाबी अगर अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी ह्या संधीचा लाभ जरूर घ्यावा. द्वितीय स्थानातील रवि आर्थिक बाबतीत फारसा उपयोगाचा नाही. तृतीयात मंगळ आणि बुध हे दोन ग्रह ज्यांचा व्यवसाय शिक्षणाशी संबंधित आहे (पुस्तक विक्रेते, लेखक, कमिशन एजंट इ.) त्यांना हा काळ यशदायी आहे. शुक्र चारचाकी वाहनाचा कारक असल्याने काही लोकांना कार घेण्याचा योग येईल. गुरु पंचमात आणि शुक्र चतुर्थात असल्याने मुलाबाळांचा अभ्यास आणि एकंदरीत प्रगती उत्तम राहील. षष्ठेश रवि द्वितीयात आणि शुक्र चतुर्थात, घरासंबंधी किंवा घरातील इतर गोष्टींसाठी कर्ज घ्यायचे असल्यास काम सुरळीत व जलद होण्याची शक्यता दाखवतात. जोडीदाराशी जुळवून घेतल्यास वातावरण सलोख्याचे राहील. दशमेश गुरु पंचमात आणि बुध तृतीयात हा योग तुमच्या कामाच्या दृष्टीने उत्तम आहे. लाभेश शनि नवमात असल्याने आर्थिक लाभ म्हणावा तितका होऊ शकणार नाही, मात्र अध्यात्मिक लाभ भरपूर होतील. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या कमी व अध्यात्मिक दृष्ट्या बरेच लाभ मिळवून देणारा आहे.