हल्ली बऱ्याच वेळा मुलाच्या आईची किंवा परिवारातील लोकांची तक्रार असते कि मुलाला लग्नच करायचे नाही असे वाटते. तो स्थळ बघतच नाहीये . तो स्वत: हून काही ठरवत नाहीये . बर मग लग्न करायचेच नाही असे पण स्पष्ट सांगत पण नाही .
अशाच एका मुलाची हि पत्रिका आहे .
लग्न कुंडली :
कृष्णमुर्ती पद्धती (भावचलित )कुंडली :
पारंपारिक पद्धत :
तूळ लग्न आहे . सप्तमेश मंगळ आहे . तसेच चंद्र पण तूळेत आहे . त्यामुळे चंद्राचा सप्तमेश पण मंगळ होतो.
मंगळ प्रथमस्थानी आहे . त्याची दृष्टी सप्तमावर आहे . शुक्र-राहू युती आहे . शनीची ह्या युतीवर दहावी दृष्टी आहे . पण गुरूची पण दृष्टी शुक्र - राहू युती वर आहे . एकंदर जेव्हा पत्रिकेतील शुक्र राहू च्या युतीत असतो तसेच त्यावर पापग्रहांची
दृष्टी असते व महादशा देखील वैवाहिक सौख्याच्या विरोधात असतात तेव्हा बहुतेक वेळा लग्न होऊनही काही सुख मिळत नाही किंवा मग लग्नच होत नाही . ह्या पत्रीकेच्या बाबतीत मुलाचे वय (३०-३५ च्या दरम्यान ) अजूनही लग्नाचे आहे परंतु एकंदर पत्रिका बघत लग्न होणे कठीणच दिसते आहे . ते कसे हे कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पाहिल्यास अजून स्पष्ट होईल .
कृष्णमुर्ती पद्धत :
सर्वप्रथम पत्रिका कृष्णमुर्ती पद्धतीने तयार केलेली असावी
ह्या पद्धती प्रमाणे विवाहाच्या प्रश्नासाठी सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .
ह्या पद्धती प्रमाणे विवाहासाठीचा नियम असा कि
"जर जन्मपत्रिकेनुसार सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी द्वितीय , सप्तम व लाभ ह्यापेकी किमान एका स्थानाचा कार्येश असून षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर २,७,११ ह्या स्थानाच्या दशेत/ अंतर्दशेत विवाह होतो . "
ह्या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे .
गुरुचे कार्येशत्व बघू : गुरु तूळ राशीत आहे परंतु कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे केलेल्या पत्रिकेत बाराव्या स्थानी आहे . गुरूच्या राशी तृतीय व षष्ठ भावारंभी आहेत . गुरु राहूच्या नक्षत्रात आहे . राहू अष्टमात आहे . राहू शुक्राच्या युतीत असल्यामुळे शुक्राची फळे देईल . तसेच मिथुन राशीत असल्यामुळे बुधाची पण फळे देईल .
गुरु ३,६,८,१२
राहू ८
शुक्र १,८
बुध ४,५,९,११,१२ ( राहू शुक्राच्या युतीत असल्याने मुख्यत्वे शुक्रचीच फळे देईल )
तसेच षष्ठ स्थानात मीन रास आहे . षष्टात एकही ग्रह नाही . षष्टेश गुरूच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही . तसेच कोणत्याही ग्रहाचा उपनक्षत्र स्वामी पण गुरु नाही त्यामुळे गुरु षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश आहे . ह्याचा अर्थ ह्या मुलाचे लग्न होणे कठीण! .
आता खरे म्हणजे महादशा बघायची पण गरज नाही परंतु कोणत्याही प्रश्नाचा सर्व बाजूने विचार करावा .
सध्या गुरूची महादश २०१७ पर्यंत आहे . गुरुचे कार्येशत्व वर आले आहेच . गुरु महादश विवाहास SUPPORT करत नसून उलट विरोधाच करत आहे .
आत शनि ची महादशा २०१७ ते २०३६ पर्यंत आहे . शनि लाभत आहे परंतु चंद्राच्या नक्षत्रात आहे चंद्र व्ययात आहे त्यामुळे शनि व्यय स्थानाची व दशमाची फळे प्रामुख्याने देईल .
शनीचे कार्येशात्व : ४,५,१०,११,१२
पुढे येणाऱ्या दशा पण विवाहास अनुकूल वाटत नाहीत .
एकंदर विवाह योग कठीणच आहे !
बघुयात पुढे काय होते ते .