Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday, 28 September 2016

राशीभविष्य ऑक्टोबर२०१६

राशीभविष्य ऑक्टोबर२०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
राशीभविष्य अॅस्ट्रॉलॉजी कौन्सिलिंगमार्फत दिलेली आहेत.
...
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

मेष :मेष राशीचा स्वामी मंगळ नवम स्थानी, केतू लाभ स्थानी आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. तसेच प्रकृती देखील साथ देईल. द्वितीय भावाचा स्वामी शुक्र सप्तमात, राहू पंचमात, आणि रवि षष्ठात हा योग कलाकारांना व लेखकांना चांगला आहे. तृतीयेश बुध षष्ठात व रवि पण षष्ठात त्यामुळे लेखक, पुस्तक विक्रेते, शिक्षणासंबंधी व्यावसायिक ह्यांना हा महिना लाभदायक आहे. आजोळच्या नातेवाईकांशी भेटीचा योग देखील येण्याची शक्यता आहे. चतुर्थाचा स्वामी चंद्र सप्तमात व राहू पंचमात त्यामुळे घराच्या सजावटीसंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. पंचमात राहू, सप्तमात शुक्र असल्याने तरुणांना हा काळ प्रेमप्रकरणी पोषक ठरेल. काहींचे प्रेमविवाह देखील होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची मात्र आवश्यकता आहे. षष्ठात तीन ग्रह रवि, बुध, गुरु असल्याने, केवळ अस्तित्वाने, प्रकृतीला थोडाफार त्रास देऊ शकतील, मात्र आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम फळे देतील. सप्तमातील शुक्र-चंद्र वैवाहिकदृष्ट्या अतिशय उत्तम आहेत. अष्टमातील शनि आणि षष्ठातील बुध हे दोन ग्रह भागीदारी व्यवसायासाठी उत्तम आहेत. शिवाय ज्यांच्या पेन्शन अगर ग्रॅच्युइटीची कामे लांबली असतील ती मार्गी लागतील. दशमेश शनि अष्टमात व बुध षष्ठात त्यामुळे काही व्यक्तींना कामाचा ताण बराच होईल त्या जोडीला आवक देखील बरीच राहील. ह्या जोडीला शनि लाभेश पण आहे त्यामुळे वरील विधानाला पुष्टी मिळते. एकंदरीत मेष राशीला हा महिना उत्तम आहे
.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र षष्ठात आणि राहू चतुर्थात आहे. षष्ठातील शुक्र काही आजारांना आमंत्रण देण्याचा इशारा देत आहे पण पंचमातील रवि, बुध आणि गुरु हे आजारपणाला टक्कर देण्यास समर्थ आहेत त्यामुळे काळजी नसावी, तरीही सावधगिरी बाळगावी हे इष्ट. द्वितीय स्थानाचा स्वामी बुध पंचमात, तिथेच रवि आणि राहू चतुर्थात सिंह राशीत, त्यामुळे आर्थिक बाबतीत बरीच सावधगिरी बाळगावी अन्यथा फसगत संभवते. तृतीय स्थानाचा स्वामी चंद्र षष्ठात, राहू चतुर्थात आणि शुक्र पण षष्ठात त्यामुळे घरासंबंधी काही कागदपत्रांसंबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण होतील, पण घर विक्रीचा इरादा असल्यास वर सांगितल्याप्रमाणे व्यवहार सावधगिरीने करावा. चतुर्थ स्थानाचा स्वामी रवि पंचमात व चंद्र षष्ठात आणि शनि सप्तमात हे सर्व ग्रह कोणत्याही व्यवहारासंबंधी सावधगिरीचा इशारा देत आहेत. पंचमातील तीन ग्रह, रवि, बुध व गुरु, मुलांच्या प्रगतीबाबत उत्तम आहेत. तसेच कुटुंबासमवेत छोट्या-मोठ्या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन होईल. सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ अष्टमात व शनि सप्तमात असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अष्टम भावातील मंगळ आणि दशम भावातील केतू काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देण्यास कारणीभूत होतील. केतू कुंभेत असल्याने आणि मंगळ अष्टमात असल्याने व्यवसायात मानसिक ताण अगर कामात वाजवीपेक्षा जास्त बोजा येण्याची शक्यता आहे. नवम स्थानातील मकर राशीचा स्वामी शनि सप्तमात असल्याने काहींना छोटेमोठे प्रवास संभवतात. दशमातील कुंभ राशीचा स्वामी शनि सप्तमात हा योग व्यावसायिकांना चांगला आहे पण बुध पंचमात असल्याने काही व्यवहारात विलंब होण्याची पण शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जमवून घेणे योग्य. एकंदरीत हा महिना वृषभ राशीला संमिश्र आहे.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध चतुर्थ भावात त्यामुळे कुटुंबापासून लांब राहत असल्यास ह्या महिन्यात कुटुंबाच्या भेटीचे योग आहेत. प्रकृतीच्या दृष्टीने ग्रहांची स्थिती ठीक आहे. द्वितीय स्थानाचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात पंचमात आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंध असणाऱ्या व्यक्तींना हा काळ चांगला आहे. मात्र आर्थिक आवक साधारण राहील. चतुर्थाचा स्वामी बुध चतुर्थातच शिवाय रवि आणि गुरु हे दोन बलाढ्य ग्रह पण तिथेच आहेत, त्यामुळे घरातील वातावरण प्रफुल्लीत राहील. पंचम स्थानात शुक्र, चंद्र असल्याने मुलाबाळांच्या काळजीचे कारण राहणार नाही. पंचमातील शुक्र चंद्राच्या युतीत असल्याने प्रेमीजनांना हा काळ उत्तम आहे, पण थोडे जपून रहाणे उत्तम. षष्ठभावाचा स्वामी मंगळ सप्तमात आणि केतू नवमात, शनि षष्ठ भावातच त्यामुळे एकंदरीत लोक संपर्क व प्रवास आणि त्यातून आर्थिक आवक असे ज्यांच्या कामाचे स्वरूप आहे अश्या लोकांना बराच लाभ संभवतो. सप्तमात मंगळ व सप्तमेश गुरु चतुर्थात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील शिवाय सर्व कुटुंबियांसमवेत मनोरंजनासाठी प्रवास देखील घडेल. दशम भावाचा स्वामी गुरु चतुर्थ स्थानी आणि महिन्याच्या सुरुवातीला चंद्र पंचम स्थानी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना थोडं अस्थिर वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एकंदरीत चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे हा महिना चढउताराचा राहील. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना उत्तम तर व्यवसायाच्या दृष्टीने सर्वसाधारण राहील.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र चतुर्थात, तिथेच शुक्र-चंद्र युती त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. राहू सिंह राशीत आणि रवि तृतीयात असल्याने प्रकृती देखील चांगली राहील. द्वितीय स्थानाचा स्वामी रवि तृतीयात, बुध देखील तृतीयात त्यामुळे ज्यांचा व्यवसाय पुस्तके, लेखन इ. संबंधी आहे किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिवज् ह्यांना चांगली आवक राहील. तृतीय स्थानात रवि, बुध व गुरु तसेच नवमेश देखील गुरु व द्वादाशेश बुध देखील तृतीयात त्यामुळे प्रवास निश्चित आहे. कदाचित धार्मिक स्थळांच्या भेटीचा योग देखील आहे. चतुर्थ स्थानाचा स्वामी शुक्र चतुर्थातच, राहू द्वितीय स्थानात आणि रवि तृतीय स्थानात ह्याशिवाय शुक्र लाभेश त्यामुळे ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे, त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे. पंचमाचा स्वामी मंगळ षष्ठात व केतू अष्टम स्थानात कुंभ राशीत व शनि पंचमात त्यामुळे मुलांच्या बाबतीत किरकोळ काळजी करावी लागेल. षष्ठ स्थानातील मंगळ आणि अष्टमातील केतू थोडाफार उष्णतेचा त्रास दर्शवतो. तरीही पंचमातील शनिमुळे तीव्र स्वरूप होणार नाही. सप्तम स्थानाचा स्वामी शनि पंचमात असल्याने कुटुंबाशी सलोख्याचे संबंध राहतील. दशमाचा स्वामी मंगळ षष्ठात, केतू अष्टमात व शनि पंचमात त्यामुळे आर्थिक व्यवहार थोडे जपूनच करावेत. नोकरी करणाऱ्यांनी ह्या महिन्यात वरिष्ठांशी सलोख्याने वागावे. एकंदरीत हा महीना उत्तम आहे.

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि द्वितीय स्थानी, व राहू प्रथम स्थानी तसेच चंद्र महिन्याचा सुरुवातीला तृतीय स्थानी त्यामुळे प्रकृतीमध्ये चंद्रभ्रमणप्रमाणे चढ-उतार होत राहतील. द्वितीय स्थानात तीन ग्रह रवि, बुध व गुरु त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक मार्गांनी आर्थिक लाभ होत राहतील. तृतीय स्थानात शुक्र, चंद्र, शुक्र स्वराशीत त्यामुळे प्रवास आनंददायी होतील. चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ पंचमात असल्याने काही कलाकारांना त्यांच्या कलेत प्राविण्य मिळेल. पंचम भावाचा स्वामी गुरु द्वितीय स्थानात, मंगळ पंचमात त्यामुळे मुलाबाळांच्या अभ्यासातील प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. षष्ठ भावाचा स्वामी शनि चतुर्थात असल्याने काहींना जुन्या दुखण्याचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. सप्तम भावात कुंभ रास असून स्वामी शनि चतुर्थात आहे व बुध तिथेच त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. नवम भावाचा स्वामी मंगळ पंचमात आणि केतू सप्तमात त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना हा काळ चांगला आहे. दशमाचा स्वामी शुक्र तृतीय स्थानी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्याचे योग्य ते लाभ देखील मिळतील. सर्वसाधारणपणे हा महिना सिंह राशीला उत्तम आहे.

कन्या :कन्या राशीचा स्वामी बुध स्वराशीत तसेच रवि, गुरु देखील तिथेच त्यामुळे प्रकृती चांगली राहून सामाजिक स्तर देखील उत्तम दर्जाचा राहील. द्वितीय स्थानात शुक्र, चंद्र त्यामुळे आर्थिक आवक देखील मनासारखी राहील. तृतीय स्थानातील वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात असल्याने काहींच्या बाबतीत पाहुणे/नातेवाईक येण्याची शक्यता आहे. तसेच तृतीय स्थानातील शनि रविशी लाभ योग करत आहे त्यामुळे अनेक लोकांना जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. पंचम भावातील मकर राशीचा स्वामी शनि तृतीयात आणि बुध प्रथम स्थानात हा योग देखील अतिशय उत्तम आहे, मुलाबाळांच्या दृष्टीने तर उत्तम आहेच तसेच ज्यांना बुद्धिबळाची आवड आहे त्यांनी स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही. सप्तमातील मीन राशीचा स्वामी गुरु लग्नी त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. दशम भावाचा स्वामी बुध लग्नी आणि रवि देखील लग्नीच त्यामुळे काही लोकांच्या हातून भरीव सामाजिक कार्य होऊ शकते आणि त्या योगाने प्रसिद्धी देखील मिळू शकते अगर शासनाकडून विशेष दखल घेतली जाऊ शकते.एकंदरीत हा महिना कन्या राशीसाठी उत्तम आहे.

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र प्रथम स्थानीच आहे व तो चंद्राशी युती करत आहे, त्यामुळे शुक्र-चंद्र युतिमुळे तुमचे मन प्रफुल्लीत राहील. त्या जोडीला राहू लाभात आहे आणि रवि बाराव्या भावात आहे, त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. द्वितीय भावात वृश्चिक रास असून त्याचा स्वामी मंगळ तृतीयात आहे, केतू पंचमात आहे आणि कुंभेचा स्वामी शनि द्वितीय भावात आहे अश्या योगात कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अगर लेखन क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभाची बरीच शक्यता असते. चतुर्थात मकर रास असून त्याचा स्वामी शनि द्वितीय भावात आहे. बुध बाराव्या भावात आहे काही लोकांना नवीन घर खरेदीचा योग आहे. पंचमात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि द्वितीयात आहे मुलाबाळांच्या दृष्टीने, विशेषत: मुले मोठी असल्यास त्यांना नोकरी निमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. सप्तमात मेष रास असून त्याचा स्वामी मंगळ तृतीयात आहे व केतू पंचमात आहे त्यामुळे जोडीदाराशी सुसंवाद राहतील. अष्टम भावाचा स्वामी शुक्र लग्नी, राहू लाभात व रवि बाराव्या स्थानी असल्याने रिटायरमेंट संबंधी कागदपत्रे थोड्या विलंबाने मार्गी लागतील. नवमातील मिथुन राशीचा स्वामी बाराव्या भावात व रवि तिथेच त्यामुळे अनेकांना लांबच्या प्रवासाची संधी निश्चित प्राप्त होईल. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला लग्नी, नंतर द्वितीयात, तृतीयात, चतुर्थात त्यामुळे पहिल्या पंधरवड्यात नोकरी संबंधी अतिशय उत्तम काळ आहे. दुसऱ्या पंधरवड्यात रवि जेव्हा कन्येतून तुळेत जाईल, तो काळ देखील तितकाच चांगला आहे. लाभेश रवि पहिल्या पंधरवड्यात बाराव्या स्थानी आणि दुसऱ्या पंधरवड्यात प्रथम स्थानी तुळेत जाईल हा काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याचा व इतर आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. एकंदरीत तूळ राशीला हा महिना अतिशय उत्तम आहे.

वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ द्वितीय स्थानी, केतू चतुर्थ स्थानी असल्याने ह्या काळात घरासंबंधी जास्त जवळीक राहील. ज्यांचे आई-वडील परगावी असतील त्यांची गाठभेट होईल. राशीतील शनि आणि लाभातील बुध हे दोन ग्रह नोकरी अगर व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देतील. तृतीयात मकर रास असून त्याचा स्वामी शनि लग्नी आहे व बुध लाभात आहे त्यामुळे फिरतीचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. तसेच ज्यांचा व्यवसाय पुस्तकाशी संबंधित आहे (पुस्तक विक्रेते, पब्लिशर), घरगुती उपकरणांचे डिलर्स ह्यांना देखील हा काळ उत्तम आहे.चतुर्थात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि लग्नी व बुध लाभात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना देखील हा काळ चांगला आहे. पंचमात मीन रास असून त्याचा स्वामी गुरु लाभात आहे त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणासंबंधी काळजी नसावी. तसेच ज्यांचा शेअर्स अगर इव्हेन्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे, त्यांना महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे. षष्ठात मेष रास असून त्याचा स्वामी द्वितीयात आहे हा योग आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. सप्तमात वृषभ रास, वृषभेचा स्वामी शुक्र बाराव्या स्थानी व मंगळ द्वितीय स्थानी त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील, शिवाय भागीदारीचा व्यवसाय आहे अश्यांना देखील हा काळ उत्तम आहे. नवमात कर्क रास असून त्याचा स्वामी चंद्र बाराव्या भावात आहे,राहू दशमात आहे, आणि रवि लाभात आहे ह्या योगात ज्यांचे व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत,
अश्यांना उत्तम काळ आहे. एकंदरीत वृश्चिक राशीला हा महिना उत्तम आहे.

धनु :धनु राशीचा स्वामी गुरु दशमात, मंगळ लग्नी, चंद्र लाभात हे ग्रह शरीर प्रकृती उत्तम ठेवतील तसेच नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल निश्चितपणे घेतली जाईल. मंगळ लग्नी असल्याने उत्साह कायम राहील. द्वितीय स्थानात मकर रास असून त्याचा स्वामी शनि बाराव्या स्थानी आहे व बुध दशमात आहे त्यामुळे आर्थिक आवक उत्तम राहील. तृतीयात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि बाराव्या स्थानी आहे आणि बुध दशमात आहे त्यामुळे कामानिमित्त प्रवास होण्याची बरीच शक्यता आहे. चतुर्थात मीन रस असून त्याचा स्वामी गुरु दशमात आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम काळ आहे, तसेच घरासंबंधीकामे मार्गी लागतील. पंचमाचा स्वामी मंगळ लग्नी आणि केतू तृतीय स्थानी त्यामुळे मुलाबाळांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक राहील. षष्ठात वृषभ रास, वृषभेचा स्वामी शुक्र लाभात, राहू नवमात आणि रवि दशमात ह्या योगात आर्थिकदृष्ट्या हा काळ उत्तम राहील व नोकरीतील दर्जा उंचावत राहील. सप्तमात मिथुन रास असून मिथुनेचा स्वामी बुध दशमात व रवि पण दशमात ह्या योगात कामाच्या ताणामुळे जोडीदाराकडे लक्ष कमी राहील.नवमात सिंह रास असून त्याचा स्वामी रवि दशमात, शनि बाराव्या स्थानी त्यामुळे कामानिमित्त प्रवासास दुजोरा मिळतो. दशमातील तीन ग्रह रवि, बुध व गुरु नोकरी अगर व्यवसायातील तुमचा दर्जा वाढवण्यास मदत करतील. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवि दशमातून लाभात जाईल त्यावेळी बराच आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना धनु राशीला बराच फायदेशीर ठरेल असे दिसते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी आहे व बुध नवम स्थानी आहे, शरीर प्रकृती उत्तम राहील असे दिसते. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक प्रकारचे लाभ संभवतात. द्वितीयात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि लाभात व बुध नवमात आहे, द्वितीयाशी संबंध असल्याने बरेच आर्थिक लाभ होतील. तृतीय स्थानाचा स्वामी गुरु नवमात, चंद्र दशमात व मंगळ बाराव्या स्थानी हा निश्चितपणे लांबच्या प्रवासाचा योग आहे, परदेश प्रवासाच्या तयारीला लागा!! चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ बाराव्या स्थानी व शनि लाभ स्थानी हा योग नवीन घर खरेदीसाठी उपयुक्त आहे. पंचमाचा स्वामी शुक्र दशमात स्वराशीत, राहू अष्टमात सिंह राशीत अभिनय क्षेत्रातील लोकांना हा योग अतिशय उत्तम आहे. तसेच चित्रकला व इतर कलाकारांसाठी पोषक काळ आहे. सप्तमातील कर्क राशीचा चंद्र पहिल्या आठवड्यात दशमात असल्याने कामाच्या व्यापामुळे जोडीदाराकडे लक्ष देणे अवघड राहील. नवमात तीन ग्रह रवि, बुध, गुरु असल्याने ह्या महिन्यात भाग्याची साथ उत्तम मिळेल, सर्व गोष्टींमध्ये यश मिळेल. दशम भावात शुक्र स्वराशीचा व राहू अष्टमात त्यामुळे काही प्रसंगी कामाचा ताण पण जाणवेल. एकंदरीत मकर राशीला हा महिना उत्तम राहील.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशम स्थानी व बुध अष्टमात ह्या योगात प्रकृतीच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी राहतील. तसेच दशमातील शनि नोकरी-व्यवसायात सावधानतेने वागण्याचा सल्ला देतो. द्वितीय स्थानी मीन रास असून त्याचा स्वामी गुरु अष्टमात आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. तृतीय स्थानी मेष राशीचा स्वामी मंगळ लाभात आहे, त्यामुळे ज्यांचा व्यवहार शेअर्ससंबंधी आहे अश्यांना लाभ होण्याची शक्यता आहे, पण तरीही व्यवहार सावधगिरीने करावेत.चतुर्थ भावात वृषभ रास असून त्याचा स्वामी शुक्र नवमात आणि राहू सप्तमात त्यामुळे प्रवासात काळजी घ्यावी, अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांना ह्या काळात जास्त कष्ट घ्यावे लागतील. पंचमातील मिथुन राशीचा स्वामी बुध अष्टमात असून रवि पण तिथेच आहे, मुलाबाळांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सप्तमात सिंह रास असून त्याचा स्वामी रवि अष्टमात आहे त्यामुळे चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे जोडीदाराशी संबंध नरम गरम राहतील. अष्टमातील तीन ग्रह रवि, बुध, गुरु काही बाबतीत अडचणी आणणारे ठरू शकतील. दशमातील शनि आणि अष्टमातील बुध नोकरी/व्यवसायात ताण तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. लाभ स्थानातील मंगळ तृतीयेश आणि दशमेश असल्याने काही बाबतीत दैनंदिन आयुष्यात सावरून घेईल. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे, बऱ्याच विरोधी घटना घडण्याची देखील शक्यता आहे.

मीन :मीन राशीचा स्वामी गुरु सप्तम स्थानी व चंद्र अष्टम स्थानी असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. द्वितीय भावात मेष रास असून त्याचा स्वामी मंगळ दशम भावात आहे त्यामुळे आर्थिक आवक उत्तम राहील. तृतीय भावात वृषभ रास असून त्याचा स्वामी शुक्र अष्टमात आहे, तरी प्रवासात सावधानता बाळगावी. चतुर्थाचा स्वामी बुध सप्तमात, रवि देखील सप्तमात त्यामुळे घरगुती वातावरण सलोख्याचे राहील व घरात सतत माणसांची वर्दळ राहील. पंचमात कर्क रास असून त्याचा स्वामी चंद्र अष्टमात आहे, तरी मुलाबाळांच्या प्रकृतीच्या दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तमात तीन ग्रह रवि, बुध, गुरु ह्या योगात जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. नवम स्थानी शनि असून नवमाचा स्वामी मंगळ दशमात आहे. दशमात धनु रास असून त्याचा स्वामी गुरु सप्तमात आहे. त्यामुळे ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे अश्यांना हा काळ चांगला आहे, तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी देखील उत्तम काळ आहे. लाभ स्थानाचा स्वामी शनि नवमात व बुध सप्तमात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, अश्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. पण भाग्याची साथ असल्याने सर्वकाही सुरळीत होईल. एकंदरीत हा महिना मीन राशीला संमिश्र राहील.

Thursday, 22 September 2016

पुस्तके मिळण्याची ठिकाणे :

Yog prasiddhiche(Language Marathi )----By sunil Deo & Anagha Bhade
Dasham Bhav(Language Marathi ) --------By Sunil Deo
Miracles of sublords(Language English ) ----By Deepali  Deo
Shasth Bhav(Language Marathi ) -----------By Sunil Deo
upnakshatra swaminchi kimaya(Language Marathi ) ------By Sunil Deo

All the above books are available at following places .

Shivpratap apartments ,Mayur colony ,kothrud ,Pune
contact Sunil Deo  9822206170
             Anagha Bhade 9011201560

Rohini book depot
Appa balvant chauk opposite  Jogeshwari temple ,Pune
phone no - 020 24455838

Rasik sahitya ,
Appa balvant chauk ,pune
phone no - 020 24451129

Nerlekar Books
opposite Dagdushet ganapati mandir ,Pune
phone no- 020 64007257,020 24483300

Ujwal granth bhandar
Appa balvant chauk ,pune
phone no- 9975584322

Abhang Book store
Appa balvant chauk ,pune
phone no-020 24459166

Shree Yogiraj pustakalay
Appa balvant chauk ,near NMV girls highschool ,pune
phone no -9890031915

Akshardhara Book Gallery
Bajirao road , near Atre sabhagruh ,Pune
phone no 020-24441001

Majestic Book Gallery
on DP road ,near mhatre bride , opposite vishnu ji ki rasoi ,pune
phone no- 020 68888908

bookganga.com

Thursday, 8 September 2016

' योग प्रसिद्धीचे ' ह्या पुस्तकाचे प्रकाशन

नुकतेच पुण्यात सौ.अमृता मराठे व सौ मोनिकाताई मोहोळ ह्यांनी ' योग प्रसिद्धीचे ' ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले. श्री सुनील देव व मी मिळून हे पुस्तक लिहिले आहे.




" योग प्रसिद्धीचे  " ह्या पुस्तकात काय वाचायला मिळेल तर नावावरून कल्पना आलीच असेल कि पत्रिकेतील प्रसिद्धी योगावर हे पुस्तक आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचे विश्लेषण ह्या पुस्तकात केले आहे . त्यांच्या पत्रिकेतील प्रसिद्धी योग कसा आहे हे तर लिहिले आहेच तसेच हे पुस्तक वाचताना प्रत्येक  कार्यक्षेत्रा साठी कोणते ग्रह कोणते भाव ह्यांना प्राधान्य द्यायचे ते पण लिहिले आहे . ज्याचा उपयोग वाचकाना पत्रिकेवरून करियर मार्गदर्शना करता होऊ शकतो.
उदा . सिनेकलाकारांच्या पत्रीकेमध्ये पंचम ,तृतीय  भावांचे तसेच शुक्र,बुध ह्या ग्रहांचे महत्व कसे असते हे बर्याच  उदाहरणावरून कळेल.तसेच मुख्यत: कृष्णमुर्ती पद्धती नुसार विश्लेषण असले तरीही पारंपारिक योगांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे . जसे नवपंचम योग ,युती योग ,लाभ योग इ. हे सर्व योग प्रसिद्धी मिळण्यास पोषकच असतात .
ह्या पुस्तकात प्रसिद्ध सिनेकलाकार ,राजकीय नेते ,खेळाडू,संत-महात्मे ,लेखर-कवी,गायक-वादक ,उद्योजक इ. लोकांच्या पत्रिकेचे विवरण आहे .  ४९ प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचे विश्लेषण ह्यात वाचायला मिळेल.

बऱ्याच लोकांमध्ये talent असते पण काहीच जण त्यात प्राविण्य मिळवतात आणि त्यातल्या देखील काहीच जणांना त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आणि त्यातून पैसा आणि प्रसिद्धी मिळते. तर मुळात पत्रिकेची कुवत आणि त्याला साथ देणारे ग्रहयोग व पोषक महादशा ह्या सर्वांचा मिलाफ होतो तेव्हाच प्रसिद्धी मिळते .
अर्थातच ह्या पुस्तकात सुप्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचा समावेश केला आहे . कुप्रसिद्ध व्यक्ती घेतलेल्या नाहीत . काही व्यक्ती त्यांच्या कुकर्मांमुळे सर्वाना माहित होतात.

श्री सुनील देव ह्यांनी पुस्तक लिखाणाबाबत माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक आभार .

(पुस्तकाचे मूल्य : २८० रु  आहे . ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा )

सुनिल देव -9822206170
अनघा भदे- 9011201560



Tuesday, 30 August 2016

राशीभविष्य सप्टेंबर २०१६


राशीभविष्य सप्टेंबर २०१६

                                   (के.पी.पद्धतीप्रमाणे)



 राशीभविष्य अस्टॉलॉजी कौन्सिलिंग मार्फत दिलेली आहेत.

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.

समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)



मेष : राशीस्वामी मंगळ अष्टमात बुध ,गुरु, शुक्र षष्ठात त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. अर्थात बुध वक्री आहे व रवि पंचमात त्यामुळे फार काळजीची गरज नाही. द्वितीयेश शुक्र षष्ठात रवि पंचमात ,षष्ठेश बुध वक्री आणि लाभेश शनि अष्टमात त्यामुळे आर्थिक बाबतीत महिना पहिल्या पंधरवाड्यापेक्षा दुसऱ्या पंधरवड्यात चांगला राहील. तृतीयेश बुध षष्ठात व रवि पंचमात आल्याने प्रकाशक, स्टेशनरी विक्रेते ह्यांना हा महिना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल. पंचमेश रवी पंचमात व पहिल्या आठवड्यात चंद्र पण पंचमात त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. सप्तमेश शुक्र षष्ठात त्यामुळे जोडीदाराशी जमवून घ्यावे. दशमेश शनी अष्टमात तसेच षष्ठेश बुध वक्री व रवी पंचमात त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना थोडा संयम बाळगावा लागेल. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण जाईल. 



वृषभ : राशी स्वामी शुक्र पंचमात आहे. तसेच गुरु व बुध देखील पंचमात आहेत. त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने काही काळजी नाही. द्वितीयेश बुध वक्री असून पंचम भावात आहे त्यामुळे पैशाची कामे रखडतील.चतुर्थेश रवि चतुर्थात आहे, विद्यार्थ्यांकरता हा योग चांगला आहे. पंचमेश बुध पंचमात तसेच शुक्र व लाभेश गुरु देखील पंचमात आहेत त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. कलाकारांना पण हा योग चांगला आहे. षष्ठेश शुक्र पंचमात व पहिल्या आठवड्यात चंद्र देखील पंचमात त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावेत. सप्तमात मंगळ व शनि असल्याने जोडीदाराशी पटवून घ्यावे.अष्टमेश पंचमात असल्याने भागीदाराशी व्यवहार जपून करावेत. नवमेश व दशमेश शनि सप्तमात हा योग उद्योजकांना चांगला आहे. कामासाठी काही प्रवास घडतील.एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

मिथुन : प्रथमेश व चतुर्थेश बुध चतुर्थात वक्री आहे तसेच षष्ठात मंगळ व शनि त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. मात्र रवि तृतीयात असल्याने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. द्वितीयेश चंद्र पहिल्या आठवड्यात चतुर्थात आहे, राहू तृतीयात आहे व रवि पण तिथेच आहे. ज्यांचे व्यवसाय बांधकाम साहित्य, जमीन अगर शिक्षणासंबंधी आहेत अश्यांना काळ चांगला आहे, ऑर्डर्स चांगल्या मिळतील. तसेच रवि तृतीयात असल्याने जे उत्तम वक्ते आहेत अश्यांना व्याख्यानासाठी बोलावणी येतील व त्यातून धनप्राप्ती देखील संभवते. षष्ठेश व लाभेश मंगळ षष्ठात हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थात शुक्र,बुध,गुरु ह्या सारखे शुभ ग्रह त्यामुळे घरात वातावरण छान राहील. पंचमेश शुक्र चतुर्थात आहे व चंद्र देखील तिथेच त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच प्रेमात पडलेल्यांनी थोडासा धीर धरावा. शुक्र आणि चंद्र दोघांची दृष्टी दशमावर असल्याने चतुर्थासंबंधी व्यवसाय भरभराटीला येतील. व्ययेश शुक्र चतुर्थात असल्याने घरात गुंतवणुकीस महिना चांगला आहे. षष्ठात शनि व मंगळ हे दोन ग्रह असल्याने ज्यांना उष्णतेचे विकार आहेत अश्यांनी काळजी घेणे इष्ट आहे. तसेच ज्यांना सांधेदुखी अगर त्वचाविकार आहेत अश्यांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. अष्टमेश शनि षष्ठात तसेच मंगळ पण षष्ठात त्यामुळे भागीदारांकडून फायदा होईल. चतुर्थात बुध, शनी षष्ठात हा योग स्पर्धा परिक्षांसाठी चांगला आहे. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.




कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात तृतीयात असल्याने आणि तिथेच बुध,गुरु, शुक्र हे तीन ग्रह असल्याने छोट्या प्रवासाचा योग आहे. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने देखील हा योग उत्तम आहे. द्वितीयेश रवि द्वितीयात व शुक्र तृतीयात हा योग लेखक, प्रकाशक ह्यांच्यासाठी उत्तम आहे. तसेच जे कमिशन एजंट आहेत त्यांना देखील  हा योग उत्तम आहे. चतुर्थेश शुक्र तृतीयात असल्याने तसेच तृतीयात अनेक ग्रह असल्याने बराच काळ कामानिमित्त घराबाहेर राहण्याचे योग आहेत, तसेच घरासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल असे दिसते. पंचमातील शनि, मंगळ व तृतीयातील बुध मुलांच्या अभ्यासासाठी उत्तम आहे. तसेच दशमेश मंगळ पंचमात व तृतीयात बुध, गुरु, शुक्र हा योग कलाकारांना चांगला आहे. सप्तमेश शनि  पंचमात असल्याने जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. नवमेश गुरु तृतीयात ,तृतीयेश व व्ययेश बुध तृतीयात हे सुद्धा प्रवास दाखवत आहेत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.



सिंह : प्रथमेश रवि प्रथमात आहे. त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश व लाभेश बुध द्वितीयात तसेच शुक्र व गुरु देखील द्वितीय भावात आहेत. हे आर्थिक लाभ दाखवत आहेत परंतु ते लाभ तुम्हाला दुसर्या पंधरवड्यात मिळतील. तरीदेखील आर्थिक स्थिती चांगली राहील.पहिल्या आठवड्यात चंद्रपण द्वितीय भावात आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक लाभ होतील. तृतीयेश शुक्र द्वितीयात आहे. त्यामुळे भावाबहिणीच्या गाठीभेटी होतील. तसेच प्रकाशक, पुस्तक विक्रेते, व्याख्याते, कमिशन अजेंट ह्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. चतुर्थेश व नवमेश मंगळ चतुर्थात तसेच शनी देखील चतुर्थात हा योग विद्यार्थाना छान आहे. पंचमेश गुरु द्वितीय भावात आहे त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. ह्या महिन्यात शुक्र द्वितीयात व मंगळ चतुर्थात असल्याने फारसे प्रवास होणार नाहीत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.



कन्या:  लग्नेश बुध प्रथमात आहे. शुक्र पण प्रथमात आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील. प्रथमत बरेच ग्रह असल्याने सामाजिक स्थान उत्तम राहील. आर्थिक दृष्टीने महिना सामान्यच राहील. तृतीयेश मंगळ तृतीयात तसेच व्ययेश रवि व्ययात व नवमेश शुक्र प्रथमात त्यामुळे प्रवास घडतील. दशमेश बुध प्रथमात आहे तसेच शुक्र व गुरु देखील प्रथमात आहेत त्यामुळे हा महिना बराच व्यस्त जाईल. चतुर्थेश गुरु प्रथम भावात व रवि व्ययात असल्याने घरात गुंतवणूक कराल. पंचमेश शनि तृतीयात व मंगळ देखील तृतीयात हा योग कलाकारांना चांगला आहे. सप्तमेश गुरु प्रथमात व रवि व्ययात त्यामुळे जोडीदारापासून लांब राहण्याचे योग आहेत. एकंदरीत हा महिना व्यस्त जाईल.



तूळ:  तूळ राशीचा स्वामी शुक्र व्ययात आहे व षष्ठ भावाचा गुरु देखील तिथेच आहे, त्यामुळे तब्येतीच्या बारीक सारीक कुरबुरी राहतील. द्वितीयेश मंगळ द्वितीयात, लाभेश रवि लाभात आहे. तसेच त्रिक स्थानांचे (षष्ठ, अष्टम, व्यय स्थाने) स्वामी व्यय स्थानी आहेत त्यामुळे आर्थिक लाभ होतील. घरात कोणी आजारी असेल तर हॉस्पिटलचे खर्च वाढतील. तृतीय भावाचा स्वामी गुरु व्ययात, तसेच नवमेश व व्ययेश बुध व्ययातच असल्याने लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. चतुर्थाचा स्वामी शनि द्वितीय भावात व मंगळ पण द्वितीयात त्यामुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. पंचम भावाचा स्वामी शनि द्वितीयात असल्याने मुलाबाळांची अभ्यासातील प्रगती उत्तम राहील व त्यांच्याशी पण छान जमेल. सप्तमेश मंगळ द्वितीयात त्यामुळे जोडीदाराशी चांगले जमेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना सर्वसाधारण राहील. एकंदरीत हा महिना ठीक जाईल.



वृश्चिक: राशीस्वामी मंगळ प्रथमात तसेच बुध, गुरु लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु लाभात व दशमेश रवि दशमात ह्यामुळे आर्थिक लाभ होतील. तृतीयेश व चतुर्थेश शनि प्रथमात त्यामुळे आईशी व भावंडांशी संबंध चांगले राहतील. षष्ठेश प्रथम स्थानात व बुध लाभात आहे त्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने महिना छान आहे . दशमेश रवी दशमात व राहू देखील दशमात त्यामुळे एखादे प्रमोशन जर अपेक्षित असेल तर ह्या महिन्यात मिळेल. सप्तमेश शुक्र लाभत यामुळे जोडीदाराशी पण चांगले जमेल.एकंदरीत हा महिना छान जाईल.



धनु: राशीस्वामी गुरु दशमात व रवि नवमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश मंगळ व्ययात व व्ययेश शनि व्ययात त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. बाराव्या भावात शनि,मंगळ व नवमात रवि ह्यामुळे प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. मुलांशीमात्र जमवून घ्यावे. शेयर्स चा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार जपून करावेत. दशमेश व सप्तमेश बुध दशमात तसेच प्रथमेश गुरु दशमात व षष्ठेश व लाभेश शुक्र पण दशमात हा योग  नोकरी अगर व्यवसायासाठी चांगला आहे. हा महिना बराच व्यस्त जाईल.पंरतु त्यातून लाभ होण्याकरता थोडी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा महिना ठीक जाईल.





मकर : राशीस्वामी शनि लाभात तसेच मंगळ पण लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शनि लाभात आहे व नुकताच मार्गी झाला आहे. लाभेश मंगळ पण लाभात आहे.  हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. तृतीय स्थानाचा स्वामी गुरु नवमात तसेच तो व्यय स्थानाचा देखील स्वामी आहे. नवम स्थानातील बुध गुरूशी युती करत आहे त्यामुळे लांबचे प्रवास घडतील. चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ लाभ स्थानी असून तो स्वराशीत आहे.  विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासंबंधी सर्व कामे मार्गी लागतील. तसेच घराची इतर कामे देखील व्यवस्थित होतील. पंचम स्थानाचा स्वामी शुक्र नवम स्थानी आहे, तसेच तो दशमेश देखील आहे. त्यामुळे मुलांशी छान जमेल व त्यांच्या अभ्यासाची काळजी राहणार नाही. पंचम व नवम ह्या दोन स्थानांचा संबंध आल्याने धार्मिक/ अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल. अष्टम स्थानाचा स्वामी रवि अष्टम भावातच आहे व शुक्र नवमात आहे त्यामुळे जोडीदाराला प्रवासाचे योग दर्शवतो. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे. तसेच महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.



कुंभ : प्रथम भावाचा स्वामी शनि दशमात व मंगळ देखील दशमात त्यामुळे ह्या महिन्यात कामाचा व्याप वाढेल. तसेच प्रकृती देखील उत्तम राहील. द्वितीयाचा स्वामी गुरु अष्टमात व रवि सप्तमात त्यामुळे आर्थिक चिंता राहतील. तसेच रवि सप्तमात असल्याने सरकारी कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. तृतीयाचा स्वामी मंगळ दशमात असून प्रथम भावाचा स्वामी शनि पण दशमातच आहे, हा योग काही लोकांना प्रसिद्धीच्या दृष्टीने चांगला आहे. चतुर्थाचा स्वामी शुक्र अष्टमात असल्याने विद्यार्थ्याना अभ्यासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. तसेच पंचमेश बुध वक्री असून अष्टमात आहे त्यामुळे मुलांबद्दल काही चिंता सतावतील. नवमेश शुक्र अष्टमात असल्याने प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. दशम भावाचा स्वामी मंगळ तिथेच आहे व तो शनि पण दशमातच आहे. बुध अष्टमात असून वक्री असल्याने व्यवसायात ताण जाणवण्याची शक्यता आहे, तरी सर्व व्यवहार जपूनच करावेत. एकंदरीत हा महिना व्यस्त व थोडा ताण तणावाचा जाईल असे दिसते.



मीन : प्रथमेश गुरु सप्तमात आहे व रवि षष्ठात आहे त्यामुळे प्रकृतीस जपावे. विशेषत: ज्यांच्या पत्रिकेत प्रथम व षष्ठ स्थानातील ग्रहांच्या दशा चालू असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी. द्वितीय भावाचा स्वामी मंगळ नवमात असल्याने धार्मिक संस्थांमध्ये काम करणार्यांना तसेच शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. तृतीय भावाचा स्वामी शुक्र सप्तमात असल्याने जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील, तरी सामोपचाराने घ्यावे. चतुर्थाचा स्वामी बुध सप्तम स्थानी आहे व रवि षष्ठात आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी जास्त मेहनत करणे आवश्यक आहे. पंचम भावाचा स्वामी चंद्र सप्तमात आहे व राहू षष्ठात आहे, मुलाबाळांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सप्तमात तीन ग्रह बुध, गुरु, शुक्र त्यामुळे महिन्याभरात तिन्ही ग्रहांचा परिणाम म्हणून जोडीदाराबरोबर कडू-गोड प्रसंग येऊ शकतील. तसेच सप्तमातील ग्रहांमुळे व्यावसायिक संपर्क बऱ्यापैकी वाढतील. नवमात शनि, मंगळ असल्याने ज्यांच डॉक्टरेटचे काम चालू आहे त्यांच्यासाठी ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला योग आहे. दशम भावाचा स्वामी गुरु सप्तमात असून रवि षष्ठात आहे हा योग व्यावसायिकांना चांगला आहे. एकंदरीत महिना चांगला जाईल.

Monday, 1 August 2016

राशीभविष्य ऑगस्ट २०१६


                                                        राशीभविष्य ऑगस्ट २०१६
                                                            (के.पी.पद्धतीप्रमाणे)

राशी भविष्य astrology councelling मार्फत दिलेली आहेत.
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

मेष रास : ह्या महिन्यात राशिस्वामी मंगळ अष्टमात तसेच शनि देखील अष्टमात तसेच गुरु दुसऱ्या आठवड्यात षष्ठात ,षष्टेश बुध महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात कन्येत त्यामुळे प्रकृतीस जपावे. त्याचप्रमाणे ११ व १२ तारखेच्या सुमारास वाहने जपून चालवावीत. द्वितीयेश शुक्र पंचमात आहे व केतू लाभात त्यामुळे महिन्याच्या मध्यानंतर शेयर्स मध्ये लाभ होण्याची शकयता आहे. पंचमेश रवि उत्तरार्धात पंचमात येत आहे त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. तसेच ज्यांचा कलाविषयक व्यवसाय आहे त्यांना पण भरपूर काम मिळेल.परंत्तू दशमेश शनी व प्रथमेश मंगळ अष्ट्मात असल्याने एकंदरच नोकरी / व्यवसाय करणाऱ्यांना मान अपमानाच्या प्रसंगाना कदाचित सामोरे जावे लागेल. कामाचा ताण जाणवेल. सप्तमेश शुक्र बराच काळ पंचमात असल्याने जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील. नवमेश गुरु दुसऱ्या आठवड्यात षष्ठात जात आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.
वृषभ रास : प्रथमेश शुक्र चतुर्थात तसेच चतुर्थात सुरुवातीला द्वितीयेश बुध, गुरु ह्यासारखे शुभ ग्रह त्यामुळे आईचा सहवास मिळेल तसेच गृहसौख्य चांगले राहील. कौटुंबिक गाठीभेटी होतील. चतुर्थात बरेच शुभ ग्रह असल्याने घराच्या शोधात असाल तर त्या दृष्टीने महिना चांगला आहे. प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला राहील. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना चांगला जाईल. ऍडमिशन ची काही कामे मार्गी लागतील. षष्टेश मंगळ सप्तमात तसेच शनी पण सप्तमात त्यामुळे जोडीदाराशी जमवून घेणे चांगले . नवमेश व दशमेश शनि सप्तमात असल्याने नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने जनसंपर्क वाढेल. तसेच त्यासाठी एखादा प्रवास पण घडण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
मिथुन रास : प्रथमाचा स्वामी बुध तृतीयात तसेच तृतीयात शुक्र,बुध ,गुरू ,राहू तसेच द्वितीय भावात रवि त्यामुळे लेखक प्रकाशक इ. लोकांना हा महिना चांगला जाईल . प्रकृतीच्या दृष्टीने देखील ग्रहमान चांगले आहे परंतु शेवटच्या आठवड्यात मात्र प्रकृतीस जपावे.मंगळ षष्ठात आहे त्यामुळे उष्णतेचे विकार(ताप,असिडीटी,उष्णता होणे इ. ) होण्याची शक्यता आहे. तसेच शनि देखील षष्ठात आहे त्यामुळे सांधे दुखी,हाडांची दुखणी वगेरे त्रास असल्यास काळजी घ्यावी. तृतीयात बरेच ग्रह असल्याने ह्या महिन्यात छोट्या प्रवासाचे पण योग आहेत. कलाकारांच्या दृष्टीने महिना चांगला आहे. द्वितीयात रवि ,षष्ठात शनी- मंगळ त्यामुळे आर्थिक दृष्ट्या महिना चांगला जाईल. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल.

कर्क रास : पहिल्या आठवड्यात राशिस्वामी चंद्र सिंहेत येत आहे. तसेच द्वितीयात शुक्र,बुध,गुरु,राहू एवढे ग्रह आहेत त्यामुळे अनेक मार्गांनी आर्थिक लाभ चांगले होतील. द्वितीयेश रवीदेखील महिन्याच्या मध्यास सिंहेत जाईल . त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उत्तम जाईल. तृतीयेश बुध द्वितीयात इतर बऱ्याच ग्रहांबरोबर आहे त्यामुळे स्टेशनरी ,प्रकाशन , ट्रॅव्हल कंपनी इ. क्षेत्रातील लोकांना आर्थिक लाभ दाखवत आहे. ह्या महिन्यात चतुर्थेश शुक्र द्वितीयात आहे त्यामुळे घराच्या सजावटी साठी वेळ द्याल. पंचमेश मंगळ पंचमात आहे . मुलांशी छान जमेल . सप्तमेश शनि पंचमात त्यामुळे जोडीदाराशी संबंध छान राहतील. एकंदर घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महिना छान जाईल.
सिंह रास : लग्नी बुध ,गुरु ,शुक्र,राहू एवढे ग्रह आहेत त्यामुळे ह्या महिन्यात बऱ्याच कामांमध्ये व्यस्त राहाल . समाजात मान मिळेल. प्रकृती पण चांगली राहील.कामाच्या व्यापामुळे घरी वेळ देता येणार नाही. चतुर्थात शनी-मंगळ त्यामुळे घरात थोड्याफार कुरबुरी व्हायची शक्यता आहे. स्वतःसाठी खर्च कराल. नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने काही प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे. आर्थिक लाभ मिळण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल .एकंदरीत बराच BUSY जाईल असे वाटते .
कन्या रास : प्रथमेश बुध सुरूवातील बाराव्या घरात आहे. महिना अखेरीस प्रथमात येत आहे. मंगळ आणि शनि तृतीयात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शुक्र बाराव्या घरात आहे त्यामुळे काही खर्च उद्भवू शकतात. घरासंबंधी काही गुंतवणूक होतील . पाहिले दोन आठवडे सप्तमेष गुरु बाराव्या घरात व मंगळ तृतीयात त्यामुळे कोणत्याही बाबतीत पती/ पत्नींनी वादविवाद टाळलेले उत्तम . नवमेश शुक्र बाराव्या भावात तसेच तिथे बुध ,गुरू, राहू आणि उत्तरार्धात रवीदेखील आहे त्यामुळे परदेश प्रवास घडतील. नोकरी/ व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र जाईल
तूळ : राशिस्वामी शुक्र लाभात आहे . त्याजोडीने बुध ,राहू आणि गुरु देखील लाभात आहेत. शनि व द्वितीयेश शुक्र द्वितीयात आणि दशमात रवि अशी ग्रहांची छान बैठक जमून आली आहे. त्यामुळे आर्थिक लाभ चांगले होतील. चतुर्थेश शनी १३ ऑगस्ट ला मार्गी होत आहे त्यामुळे घरसंबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील . शेयर्स चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑगस्ट मध्यानंतर काळ चांगला आहे . षष्ठेश गुरु लाभात व मंगळ द्वितीयात त्यामुळे कोणाकडून पैसे येणे असेल तर तेही मिळतील. सप्तमेश मंगळ द्वितीयात त्यामुळे विवाहोत्सुक मंडळींना छान योग आहेत.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र ,बुध ,गुरु हे ग्रह बाराव्या भावात जात आहेत त्यामुळे तेव्हा प्रवास होतील. एकंदर हा महिना चांगला जाईल.
वृश्चिक :शनि मंगळ प्रथमात आहेत त्यामुळे ज्यांना १ व ६ च्या दशा असतील त्यांनी प्रकृतीस जपावे . महिन्याच्या उत्तरार्धात आई,बहीण भाऊ ह्यांच्या गाठीभेटी होतील . पंचमेश गुरु दशमात व मंगळ प्रथमात त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणार्यांना महिना व्यस्त जाईल . सप्तमेश दशमात व मंगळ प्रथमात त्यामुळे जोडिदाराशी जमवून घ्यावे .नवमात रवी व दशमात बुध ,राहू,गुरु,शुक्र त्यामुळे नोकरी/व्यवसाय करणार्यांना हा महिना खूप व्यस्त जाईल. परंतु लाभ होण्यासाठी मात्र थोडी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा महिना बराच धावपळीचा जाईल असे दिसते.

धनु: प्रथम भावाचा स्वामी गुरु नवमात आहे व रवी देखील महिन्याच्या मध्याला नवम भावात जाईल . तसेच नवमात शुक्र,बुध ,राहू हे पण ग्रह आहेत त्यामुळे प्रकृती चांगली राहील. एखाद्या वेळेस धार्मिक स्थळांला भेट द्याल. तृतीयेश शनि बाराव्या घरात पण प्रवास दाखवत आहे. द्वितीयेश बाराव्या भावात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. चतुर्थेश गुरु नवमात त्यामुळे विद्यार्थ्यांना हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने छान आहे. पंचमेश मंगळ बाराव्या भावात व शनि देखील बाराव्या भावात त्यामुळे मुलांची काळजी घ्यावी तसेच त्यांच्याशी जमवून घेणे चांगले. षष्ठेश शुक्र नवमात हा योग स्पर्धा परीक्षा तसेच प्रबंध इ. करता चांगला आहे . महिन्याच्या सुरुवातील दशमेश बुध नवम भावात व रवि अष्टमात आहे त्यामुळे नोकरी/व्यवसायत खबरदारी घ्यावी. जबाबदारीने कामे करावीत नाहीतर मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एकंदर हा महिना संमिश्र आहे.
मकर : प्रथम भावाचा स्वामी शनि लाभात आहे तसेच शनी १३ ऑगस्टला मार्गी होत आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शनि लाभात तसेच लाभेश मंगळ लाभात हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थेश मंगळ लाभात तसेच शनि देखील लाभात हा योग घराच्या दृष्टीने चांगला आहे. पंचमेश शुक्र अष्टमात आहे त्यामुळे शेयर्स चा व्यवसाय करणार्यांनी ह्या महिन्यात खबरदारी घाव्यी . षष्ठेश बुध अष्टमात आहे त्यामुळे भागीदारांकडून काही मनस्ताप होण्याची शक्यता आहे . अष्टमात शुक्र,गुरु,राहू,मंगळ एवढे ग्रह आहेत त्यामुळे मानसिक ताण-तणांव होण्याची शक्यता आहे. दशमेश शुक्र अष्टमात असल्याने नोकरी/व्यवसायात कामाचा ताण राहील. एकंदर ह्या महिन्यात संयमाने वागणे चांगले.
कुंभ : प्रथम भावाचा स्वामी शनि दशमात तसेच मंगळ पण दशमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व सप्तमात शुक्र,बुध,राहू तसेच महिन्याच्या मध्यानंतर राविदेखील सप्तमात त्यामुळे जोडीदाराशी चांगले जमेल सुरुवातीला मात्र रवी षष्ठात आहे त्यामुळे जमवून घेणे चांगले . तृतीयेश व दशमेश मंगळ दशमात ,प्रथमेश शनि दशमात हा योग एकंदर प्रसिद्धी साठी तसेच व्यावसायिकांना छान आहे. सप्तमात असलेले ग्रह एखादा प्रवास घडवण्याची शक्यता आहे. सप्तमात असणारे शुक्र,गुरु,व नन्तर येणारा रवि विवाहोस्तुक मंडळीना चांगला आहे . विवाह ठरण्याच्या दृष्टीने छान योग आहे. एकंदर हा महिना चांगला आहे.
मीन : राशीस्वामी गुरु षष्ठात तसेच राविदेखील नंतर षष्ठात येत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. द्वितीयेश मंगळ नवमात तसेच नवमेश नवमात हा योग उच्चशिक्षणाकरता चांगला आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना महिना चांगला आहे. तृतीयेश शुक्र षष्ठात तसेच सप्तमेश बुध देखील षष्ठात आहे त्यामुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. शक्यतो मौन पाळणे उत्तम. चतुर्थेश बुध षष्ठात आहे त्यामुळे रियल ईस्टेट चा बिझनेस असणार्यांना चांगला. दशमेश गुरु षष्ठात तसेच नंतर रविदेखील षष्ठात त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नवमेश नवमात असल्याने धार्मिक कार्यात रस घ्याल. द्वादाशेष शनि नवमात तसेच मंगळ पण नवमात त्यामुळे परदेश प्रवास घडतील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.

Thursday, 30 June 2016

राशिभविष्य जुलै २०१६

                                                                                               राशीभविष्य  जुलै-२०१६
      (के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

मेष रास : राशीस्वामी मंगळ पूर्वार्धात तुळेत असून उत्तरार्धात वृश्चिक राशीत जात आहे. त्यामुळे उत्तरार्धात मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाचा ताण राहील. प्रकृतीच्या दृष्टीने पण काळजी घ्यावी. आर्थिक दृष्ट्या काळ सर्वसामान्य आहे . तृतीयात पूर्वार्धात अनेक ग्रह असल्याने काही लोकांना छोटे प्रवास घडतील. तसेच उत्साह पण भरपूर राहील. महिन्याच्या उत्तरार्धात बरेच ग्रह चतुर्थात येत असल्याने प्रवास बहुतांशी पूर्वार्धातच होतील. नंतर मात्र घरात वेळ द्याल. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे.महिन्याच्या सुरुवातीस जोडीदाराशी जमवून घेणे उत्तम .दशमेश शनी अष्टमात असल्याने कामाचा ताण जाणवेलच पण तृतीयातील बुधामुळे कामाची दाखल घेतली जाईल व समाधान राहील. एकंदरीत हा माहिना कामाच्या दृष्टीने ताणाचा राहील.

वृषभ रास : राशीस्वामी शुक्र द्वितीयात व गुरु चतुर्थात तसेच रवि पण द्वितीय स्थानी असल्याने घरासाबंधी काहीतरी सुवार्ता मिळतील. तसेच आर्थिक लाभ पण संभवतात .प्रकृती सर्वसाधारण राहील. द्वितीयात बरेच ग्रह असल्याने इतर अनेक मार्गांनी धन लाभ होण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या आठवड्यात प्रकाशकांना, पुस्तक विक्रेते ,प्रवासी कंपनी असणारे ,लेखक ह्या सर्वाना आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थात गुरु व चतुर्थेश रवि प्रथमात ह्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने महिना चांगला आहे.मुलांच्या दृष्टीने सुद्धा महिना चांगला जाईल . षष्ठेश शुक्र द्वितीयात हा योग सुद्धा आर्थिक दृष्टीने लाभ दाखवत आहे . परंतु मंगळ षष्ठात असल्याने कदाचित उष्णतेचे/पित्ताचे त्रास होतील. सप्तमेश षष्ठात असल्याने जोडीदाराशी जमवून घ्यावे.वाहने जपून चालवावीत . दशमेश शनि सप्तमात व बुध द्वितीयात हा योग व्यावसायिकांना चांगला आहे . एकंदरीत हा महिना चांगला आहे .

मिथुन रास : मिथुन राशीचा स्वामी बुध प्रथमात आहे. तसेच रवी ,शुक्र हे पण ग्रह आहेत त्यामुळे प्रकृती उत्तम राहील तसेच सामाजिक स्थान पण बळकट राहील .तृतीयात गुरु व तृतीयेश रवि प्रथमात त्यामुळे उत्साह बराच राहील व काम करण्याची क्षमता भरपूर राहील. प्रवास पण घडण्याची शक्यता आहे.चतुर्थेश बुध प्रथमात त्यामुळे आई जर लांब असेल तर भेटीचा योग वाटतो . पंचमेश शुक्र प्रथमात तसेच गुरु तृतीयात त्यामुळे कलाकारांना हा चांगला योग आहे . सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे जोडीदाराबरोबर प्रवासाची शक्यता आहे.तसेच जोडीदाराशी वादावादी टाळणे उत्तम. दशमेश गुरु तृतीयात व शुक्र प्रथमात त्यामुळे नामांकित व्यक्तींच्या प्रसिद्धीत भरच पडेल. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

कर्क रास : पहिल्या आठवड्यात राशीस्वामी चंद्र बाराव्या घरात आहे. तसेच द्वितीयेश रवी देखील बाराव्या घरात तसेच तृतीयेश बुध पण बाराव्या घरात आहे. त्यामुळे परदेश प्रवास होतील. तसेच खर्चाचे प्रमाण देखील वाढेल. चतुर्थेश व लाभेश शुक्र बाराव्या भावात आहे त्यामुळे घरामध्ये गुंतवणुकीस काळ चांगला वाटतो. पंचमात शनी व पंचमेश मंगळ चतुर्थात त्यामुळे मुलांशी पटवून घ्यावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत .सप्तमेश शनि पंचमात त्यामुळे जोडीदाराशी संबंध छान राहतील. दशमेश मंगळ चतुर्थात त्यामुळे नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळ सर्वसाधारण आहे. एकंदरीत हा महिना ठीक आहे .

सिंह रास : राशीस्वामी रवी महिन्याच्या पूर्वार्धात लाभात आहे तसेच चंद्र पण लाभात आहे . त्यामुळे पुस्तक विक्रते , प्रकाशक ,लेखक इ. लोकांना हा काळ चांगला आहे . काही जणांचे अडकलेले पैसे पण मिळण्याची खूप शक्यता आहे. तसेच गुरु ,राहू लग्नी व लाभात बरेच ग्रह असल्याने पूर्वार्धात प्रकृती उत्तम राहील . उत्तरार्धात बरेच ग्रह बाराव्या स्थानी येत असल्याने लांबचे प्रवास देखील होतील . तसेच त्यावेळी प्रकृतीस जपावे. कदाचित नातलगांसाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या होतील. अध्यात्माची आवड असणार्यांना हा काळ चांगला आहे. उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने काळ सामान्य आहे . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .

कन्या रास : राशीस्वामी बुध पूर्वार्धात दशमात आहे. तसेच रवी,चंद्र,शुक्र हे ग्रह देखील दशमात  आहेत त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे. द्वितीयात मंगळ व द्वितीयेश शुक्र आधी दशमात व नंतर लाभात त्यामुळे आर्थिक बाजू चांगली राहील. दशमात बरेच ग्रह असल्याने नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील जॉब मिळण्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे . तसेच सामाजिक कार्य करणार्याचा व्याप वाढण्याची बरीच शक्यता आहे. ह्या महिन्यात नातलगांच्या भेटी गाठी होतील. गृह /वाहन खरेदीस चांगला काळ आहे . कलाकार देखील बरेच ह्या महिन्यात व्यस्त असतील .प्रकृतीच्या दृष्टीने काळजी करण्यासारखे काही नाही . जोडीदारापासून नोकरी/व्यवसाय निमित्त लांब राहण्याचे योग आहेत . एकंदरीत हा महिना उत्तम आहे. 

तूळ रास : प्रथमात मंगळ आणि राशीस्वामी शुक्र नवमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. शुक्र मिथुनेत आणि मंगळ तुळेत हा योग खेळाडू व कलाकार ह्यांच्याकरता चांगला आहे . शनी द्वितीयात व द्वितीयेश मंगळ प्रथमत त्यामुळे आर्थिक आवक बेताची राहील . धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता आहे . लेखक ,प्रकाशक ,पुस्तक विक्रेते त्यातही धार्मिक पुस्तकांशी सबंधित लोकांना हा काळ चांगला आहे. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश मंगळ प्रथमात व गुरु लाभात त्यामुळे जोडीदाराशी संबंध कचना राहतील. पेन्शनर मंडळींची कामे ह्या महिन्यात होतील. तसेच वारसा हक्काविषयी ज्यांची कामे अडकलेली आहेत त्यांची पण कामे मार्गो लागतील. नवमात पूर्वार्धात बरेच ग्रह असल्याने लांबचे प्रवास होतील. उत्तरार्धात दशमात ग्रह असल्याने नोकरी /व्यवसायात व्यस्त राहाल तसेच प्रमोशन चे पण योग आहेत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

वृश्चिक रास : राशीस्वामी मंगळ बाराव्या भावात तसेच पूर्वार्धात रवी,चंद्र,शुक्र,बुध हे ग्रह अष्टमात त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत पण काळजी घेणे इष्ट. खास करून बँक कर्मचारी किंवा ज्यांना रोकड पैसे हाताळावे लागतात त्यांनी खबरदारी घ्यावी. कौटुंबिक दृष्टीने महिना सर्वसधारण राहील.कलाकार व्यस्त राहतील परंतु म्हणावे तसा आर्थिक फायदा होणे अवघड वाटते आहे. जोडीदारास आर्थिक दृष्टीने महिना चांगला आहे .नोकरी/व्यवसायात ताण जाणवेल. नोकरी बदलण्याचे पण विचार डोकावतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम बाळगणे चांगले.

धनु रास : राशी स्वामी गुरु नवमात ,शुक्र अष्टमात व शनी बाराव्या भावात आहे त्यामुळे प्रकृतीस जपावे. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना कदाचित मनासारख्या शाळा / कॉलेज मध्ये प्रवेश मिळण्यात अडचणी येतील. संतती दृष्टीने काळ चांगला आहे. जोडीदाराशी संबंध नेहेमीप्रमाणे राहतील. उत्तरार्धात अष्टमात रवी,बुध ,शुक्र येत असल्याने कामाचा ताण राहील. मानसिक चिंता पण राहतील. जोडीदार जर नोकरी/व्यवसाय करत असेल तर त्यला आर्थिक लाभ दिसतात.ह्या महिन्यात प्रवास फारसे दिसत नाहीत. एकंदर्तीत ग्रहमान प्रवास अनुकूल नाही. नोकरी/व्यवसायात ताण राहतील.एकंदरीत ह्या महिन्यात संयम बाळगणे चांगले. 

मकर रास : राशी स्वामी शनी लाभात व बुध सप्तमात त्यामुळे प्रकृती ठीक राहील. द्वियेश शनि लाभात आहे परंतु वक्री असल्याने आर्थिक व्यवहारास विलंब होण्याची शकयता आहे. तृतीयेश अष्टमात व शुक्र सप्तमात त्यामुळे शब्द जपून वापरावेत नाहीतर वाद वाढून मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.ज्यांचे व्यवसाय घरासंबंधी आहेत त्यांना हा महिना थोडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. षष्ठातील पूर्वार्धातील ग्रह आर्थिक आवक चांगली ठेवतील. उत्तरार्धात जोडीदाराशी छान जमेल. भागीदारीच्या व्यवसाय चांगले चालतील. दशमात मंगळ व दशमेश शुक्र सप्तमात हा योग व्यावसायिकांसाठी चांगला आहे. बरेच काम आल्याने ताण पण येईल. परंतु आर्थिक बाजू चांगली राहील.एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.

कुंभ रास : राशीस्वामी शनि दशमात व बुध पंचमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व शुक्र पंचमात हा योग विवाहोत्सुक तरुणांना उत्तम आहे. तृतीयेश मंगळ नवमात व गुरु सप्तमात प्रवासास अनुकूल आहे. धार्मिक कार्याकरता देखील प्रवास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळ चांगला आहे. सप्तमेश रवि पंचमात आणि राहू सप्तमात त्यामुळे प्रेमविवाह योग पण जोरदार आहे. भागीदारांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी दशमात गुरु सप्तमात त्यामुळे व्यावसायिकांना काळ चांगला आहे. एकंदरीत महिना चांगला आहे.


मीन रास : राशीस्वामी गुरु षष्ठात व शुक्र चतुर्थात तसेच मंगळ अष्टमात त्यामुळे प्रकृतीस जपावे.विशेष करून पायासंबंधी दुखणी वाढतील. ह्या महिन्यात काही पेन्शन किंवा वडिलार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना interview छान जातील. नवीन नोकरी मिळण्याची खूप शक्यता आहे. चतुर्थात बरेच ग्रह असून बुध पण तिथेच आहे त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी जमवून घ्यावे. अष्टमात मंगळ व शुक्र चतुर्थात त्यामुळे वाहन जपून चालवावे. नवमात शनि तसेच मंगळ अष्टमात त्यामुळे प्रवासात अडचणी येतील किंवा ठरवलेले प्रवास रद्द होतील.दशमेश षष्ठात व शुक्र चतुर्थात असल्याने काहीना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच काहींच्या बाबतीत जर घरापासून लांब काम करत असतील त्यांची बदली स्वत:च्या गावात होऊ शकेल.एकंदरीत महिना संमिश्र जाईल. 

Saturday, 4 June 2016

राशिभविष्य जून २०१६

राशिभविष्य
जून-२०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि
समन्वय साधावा .


मेष : महिन्याची सुरुवात चंद्राने तुमच्याच राशीपासून केली आहे. बुध देखील तिथेच आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ मात्र अष्टमात
आहे. गुरु पंचमात असल्याने शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. द्वितीय स्थानी रवि व शुक्र हे दोन ग्रह आणि चंद्र प्रथम
भावात त्यामुळे बराच खर्च होण्याची शक्यता आहे. १,५,९ ह्यांचा परस्पर संबंध असल्याने बराच खर्च धार्मिक किंवा सामाजिक
कार्यासाठी होण्याची शक्यता आहे. तृतीयेश बुध लग्नात, शुक्र द्वितीयात लेखक मंडळींना हा काळ चांगला आहे. प्रथमात बुध, चंद्र
असल्याने त्यांच्या विचारांना चालना मिळेल. चतुर्थेश चंद्र प्रथम स्थानी व शुक्र द्वितीय स्थानी विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.
तसेच घरातीलवातावरण देखील आनंदी राहील. पंचमात गुरु आणि शुक्र द्वितीयात उच्चीचा त्यामुळे मुलाबाळांच्या दृष्टीने हा काळ
उत्तम आहे, सर्व काही त्यांच्या मनासारखे घडेल. षष्ठेश बुध लग्नी आहे व तो तृतीयेश आहे. ज्या लोकांना मज्जासंस्थेचे विकार
असणाऱ्यांना किरकोळ त्रास जाणवेल. सप्तमेश शुक्र द्वितीय स्थानी व चंद्र प्रथम स्थानी त्यामुळे जोडीदाराशी उत्तम संवाद राहतील.
अष्टमातील शनि, मंगळ मात्र काही प्रमाणात त्रासदायक ठरतील..उष्णतेचे त्रास, वाहन चालवताना काळजी घ्यावी. दशमेश शनि
अष्टमात आणि बुध प्रथमात शनि अष्टमात जरी असला तरी उत्तम योग आहे, काही लोकांना केलेल्या कामाची पावती मिळेल.
एकंदरीत हा महिना मेष राशीला खर्चाचे प्रमाण वाढले तरी बराच चांगला आहे.


वृषभ : वृषभ राशीचा शुक्र वृषभेतच व रवि पण तिथेच शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वितीयेश बुध बाराव्या स्थानी, शुक्र प्रथम स्थानी
बरीच मंडळी आर्थिक गुंतवणुकीच्या मागे लागतील, मात्र पैसे गुंतवताना माहितीच्या कंपनीमध्ये गुंतवण्याची काळजी घ्यावी.
तृतीयेश चंद्र बाराव्या स्थानी व शुक्र प्रथम स्थानी अनेकांना लांबच्या प्रवासाची किंवा परदेशगमनाची पण संधी प्राप्त होईल.
चतुर्थातील गुरु व प्रथम भावातील रवि हा योग शिक्षणासाठी उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यांचे निकाल
मनाप्रमाणे लागतील. पंचमेश बुध बाराव्या स्थानी व शुक्र प्रथमस्थानी त्यामुळे शेअर्सचा व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी
बाळगावी. षष्ठेश शुक्र लग्नी व चंद्र बाराव्या स्थानी त्यामुळे काही लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी काळजीपूर्वक राहावे. सप्तमात मंगळ, शनि जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. प्रथमेश शनि सप्तमात व बुध बाराव्या स्थानी त्यामुळे ज्यांचा व्यवसाय आहे अश्यांना
आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी प्राप्त होऊ शकते. एकंदरीत हा महिना काहीबाबतीत संमिश्र तर काही बाबतीत उत्तम राहील.


मिथुन :मिथुन राशीचा स्वामी बुध लाभात आणि शुक्र बाराव्या स्थानी आहे. हा योग गुंतवणूकीसाठी योग्य आहे. पण शनि आणि
मंगळ दोघेही वक्री षष्ठात आहेत. व्यवहार जपून करावा. प्रकृतीच्यादृष्टीने विशेष काळजीचे कारण नाही. द्वितीयेश चंद्र लाभात केतू
अष्टमात वक्री शनि षष्ठात, हे योग पण जपून व्यवहार करण्याचा इशारा देत आहेत. त्तृतीयातील गुरु राहूमुळे काही लोकांना प्रवास
दाखवत आहे. चतुर्थातील बुध लाभात शुक्र बाराव्या भावात अनेक लोकांना नवीन घर घेण्याची संधी उपलब्ध करून देणार
आहे.पंचमेश शुक्र शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांना नुकसानीत गेलेले शेअर पुनः घेतलेल्या किंमतीत येतील. सप्तमेश गुरु तृतीय भावात
शुक्र बाराव्या भावात जोडीदाराशी काही प्रमाणात असमाधान व्यक्त होण्याशीशक्यता आहे. दशमेश गुरु ऑफिसच्या कामानिमित्त
परदेश प्रवास घडवून आणण्याची शक्यता आहे. एकूण हा महिना संमिश्र असावा असे दिसत आहे.


कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र दशमात आणि शुक्र लाभात त्यामुळे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे, पण षष्ठ स्थान
तपासताना जास्त व्यवस्थित कल्पना येईल. तरीही एक गोष्ट निश्चित ह्या महिन्यात कर्क राशीच्या काही लोकांच्या हातून
समाजमान्य चांगली गोष्ट घडून त्याचा लाभ मिळणार आहे. द्वितीय स्थानात गुरु, राहू आर्थिक आवक उत्तम ठेवतील. तृतीयेश बुध
दशमात व शुक्र लाभात हा योग प्रसिद्धीचा आहे, त्यामुळे व्यक्तीच्या कुवतीप्रमाणे नामनिर्देश होईल. चतुर्थेश शुक्र लाभात आणि चंद्र
दशमात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. शिवाय अनेक लोकांना घरासंबंधी एखादी सुवार्ता कळू शकेल. पंचमेश मंगळ
पंचमातच आणि शनि पण तिथेच, दोन्ही ग्रह वक्री, त्यामुळे पंचम स्थानाचा म्हणावा तसा उपयोग होऊ शकत नाही. पण बुध
दशमात असल्याने शनि मार्गी झाल्यावर ज्यांचा इव्हेन्ट मॅनेजमेंट किंवा मैदानी खेळाशी संबंध आहे अश्यांना त्यांच्या कार्यात यश
मिळेल. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानात, शुक्र लाभात प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही, शिवाय आर्थिक लाभ देखील होईल.
सप्तमेश शनि पंचमात, शुक्र लाभात जोडीदाराशी सलोख्याचे आणि आनंदाचे संबंध असतील. दशमात चंद्र, बुध व लाभात रवि, शुक्र
हे योग तुमच्या कामाच्या ठिकाणी लाभदायक ठरतील. नोकरीत प्रमोशन, आर्थिक लाभ तसेच व्यवसाय करणाऱ्यांना (विशेषत:
कमिशन एजंट) भरपूर प्रमाणात ऑर्डर्स आणि आर्थिक लाभ मिळणार. एकंदरीत हा महिना कर्क राशीला उत्तम आहे.


सिंह :सिंह राशीचा स्वामी रवि दशम स्थानी, चंद्र नवमात आणि गुरु, राहू दोन्ही सिंह राशीतच हा योग प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी
उत्तम आहे. शिवाय हातून भरीव सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश बुध नवमात व शुक्र दशमात आर्थिकदृष्ट्या योग
चांगला आहे. तृतीयेश शुक्र दशमात व चंद्र नवमात त्यामुळे अनेक लोकांना प्रवासाचे योग येऊ शकतात, तसेच लिखाण नावाजले
जाण्याची शक्यता आहे. चतुर्थात शनि, मंगळ-दोन्ही वक्री, बुध नवमात त्यामुळे उच्च शिक्षणासाठी हा योग उत्तम आहे, मात्र ग्रह वक्री
असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. पंचमेश गुरु लग्न स्थानी असल्याने मुलाबाळांच्या दृष्टीने काळजी नसावी. सप्तमेश शनि
चतुर्थात वक्री जरी असला तरी घरातील वातावरण ठीक राहील व जोडीदाराशी सुखसंवाद राहतील. लाभेश बुध नवम स्थानी आणि
शुक्र दशमात हा योग देखील अतिशय उत्तम आणि भाग्यकारक आहे. ह्या योगामुळे लेखकांना उत्तमकाळ आहे. तसेच ज्यांचा थिसीस
पी. एच.डी. साठी सादर झाला असेल, अश्यांना स्वीकृती मिळून पी.एच.डी. पूर्ण होण्याचे योग आहेत. एकंदरीत सिंह राशीला हा महिना
उत्तम आहे .


कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध अष्टमात व शुक्र नवमात त्यामुळे थोडीफार मानसिक चिंता लागून राहील. त्यामुळे प्रकृतीवर पण
थोडाफार परिणाम होऊ शकेल. द्वितीयेश शुक्र नवमात व शनि तृतीयात ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे (कमिशन एजंट, विक्रेते इ.)
त्यांना हा काळ बरा आहे. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी व शुक्र नवम स्थानी ज्यांच्या भावचलित पत्रिकेत चंद्र लाभ स्थानी असेल,
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. प्रवेशाची प्रक्रिया सुलभ होईल. पंचमेश शनि तृतीयात वक्री व बुध अष्टमात
त्यामुळे मुलाबाळांकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी व शुक्र नवमात उच्चीचा त्यामुळे घरातील वातावरण ठीक
राहील व जोडीदाराशी सुसंवाद राहील. शनि तृतीयात असल्याने काही वेळा वादाचे प्रसंग येऊ शकतील. अष्टमातील चंद्र, बुध व
तृतीय स्थानातील मंगळ हे ग्रह वाहने जपून चालवण्याची सूचना देतात. नवमेश शुक्र नवमातच व शनि तृतीयात वक्री काही लोकांचे
प्रवासाचे बेत ठरतील. दशमेश बुध अष्टमात व शुक्र नवमात काही लोकांना कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, तसेच कामाचा ताण
देखील वाढेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे.


तूळ : तुळेचा स्वामी शुक्र अष्टमात व शनि द्वितीय भावात. आर्थिक बाबतीत काही चिंता राहील असे वाटते. द्वितीय भावात शनि,
मंगळ वक्री हे दोन्ही ग्रह वरील गोष्टीला दुजोरा देत आहेत. तृतीयेश गुरु लाभातआणि शुक्र अष्टमात पुस्तक विक्रेते, कमिशन एजंट्स
यांनी व्यवहार जपून करावा. पैसे अडकून पडायची शक्यता आहे. पंचमात केतू, गुरु लाभात, बुध सप्तमात शेअर ब्रोकर्सना काही
प्रमाणात लाभ होईल असे दिसते, तरी पण व्यवहार जपूनच करावा. सप्तमातील चंद्र, बुध घरातील वातावरण आनंदी ठेवील तसेच
जोडीदाराशी पण सुखसंवाद होतील. दशमेश चंद्र सप्तमात व केतू पंचमात नोकरी करणाऱ्यांनीवरिष्ठांशी गोडीगुलाबीने घ्यावे.
लाभातील राहू, गुरु काहीतरी आर्थिक लाभ करतील असे दिसते. तूळ राशीला हा महिना एकूण संमिश्र स्वरूपाचा आहे.


वृश्चिक : मंगळ व शनि दोघेही तुमच्या राशीत वक्री, बुध षष्ठात प्रकृती संबंधीने जपूनच राहावे.धनेश गुरु दशमात व शुक्र सप्तमात
व्यवसायिक लोकांना छान आहे. तृतीयेश शनि प्रथमात, बुध षष्ठात प्रवास टाळावे. चतुर्थेश शनि लग्नात, बुध षष्ठात, गुरु दशमात हा
योग घरासंबंधी जर काही व्यवहार असेल तर वक्री शनिमुळे विलंब होण्याची शक्यता आहे. पण शनि मार्गी झाल्यावर व्यवहार
मनासारखा घडेल. मुला बाळांच्या दृष्टीने महिना चांगला आहे. षष्ठातील चंद्र, बुध, दशमात गुरु,राहू आर्थिक योग उत्तम आहे. लाभ
नक्कीच मिळेल. सप्तमात रवि,शुक्र व षष्ठात चंद्र, बुध जोडीदाराशी जमवून घेतल्यास उत्तम.थोडेफार खटके उडण्याचा संभव आहे.
एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.


धनु :धनु राशीचा स्वामी गुरु नवमात व शुक्र षष्ठात प्रकृती संबंधी किरकोळ तक्रारी होतील. द्वितीयेश शनि बाराव्या भावात व चंद्र
पंचमात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील पण प्रवासाची शक्यता कमीच. चतुर्थेश गुरु नवमात,
शुक्र षष्ठात स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता बरीच आहे. मुलांच्या अभ्यासासंबंधी व इतर कार्यक्रम ह्यासाठी महिना उत्तम
आहे. षष्ठातील रवि, शुक्र, पंचमातील चंद्र आजारपण येवू देणार नाहीत असे वाटते. जोडीदाराशी उत्तम वेळ व्यतीत होईल.
नवमातील गुरु व षष्ठातील शुक्र वडिलांच्या कार्यक्षेत्रास उत्तम वाव देतील.दशमेश बुध पंचमात शुक्र षष्ठात हा योग नोकरी अगर
व्यवसाय दोन्हीला उत्तम आहे. एकंदरीत हा महिना छान आहे.


मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व बुध चतुर्थात प्रकृतीस किरकोळ तक्रारी राहतील. द्वितीयेश शनि लाभात बुध चतुर्थात
घरातील एकंदरीत वातावरण आनंदी राहील.तृतीयेश गुरु अष्टमात व शुक्र पंचमात. शुक्र दशमेश पण आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना
कदाचित कामाचा जादा ताण पडेल. काहींच्या बाबतीत नोकरी बदलायची पण वेळ येईल. चतुर्थात चंद्र तुमच्या आईचा दौरा
तुमच्या भेटीसाठी होईल असे वाटते. पंचमात रवि, शुक्र तुमचा एकंदरीत मूड प्रसन्न ठेवील. त्यामुळे घरातील वातावरण देखील
आनंदी राहील. षष्ठेश बुध चतुर्थात व शुक्र पंचमात प्रकृती उत्तम राहील. अष्टमातील गुरु, राहू पंचमात शुक्र, शुक्र दशमेश, अचानक
धनलाभ दाखवत आहे. लॉटरीचे तिकीट घ्यायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी देखील हा योग छान आहे. एकंदरीत हा महिना
चांगला जाईल असे वाटते .


कुं: कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात वक्री, बुध तृतीयात, नाव मिळवण्यास एक उत्तम, परंतु वक्री शनि तसे होऊ देईल असे वाटत
नाही. थोडा फार लाभ तरी पण होईल. द्वितीयेश गुरु सप्तमात, शुक्र चतुर्थात रिअल इस्टेटचा व्यवसाय असणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त
होईल. कुंभेत केतू, मेषेत बुध, चंद्र सर्व दृष्ट्या उत्तम योग. वैचारिक लेख लिहिणारे लेखक ह्यांना उत्तम. संधी पण तशी प्राप्त होईल.
मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने सर्वसाधरण काळ आहे. सप्तमातील गुरु राहू घरातील वातावरण सर्वसाधारण ठेवील. विद्यार्थ्यांना थोडी
फार अडचण भासेल पण पुढील उच्च शिक्षणासाठी वेळ उत्तम आहे.दशम भावातील मंगळ, शनि वक्री असल्याने, त्यांची फळे विलंबाने
मिळतील असे वाटते. अन्यथा दशमातील शनि, मंगळ नोकरी व्यवसायासाठी उत्तम आहेत. एकंदरीत हा महिना संमिश्र फळे देईल


मीन : मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात व राहू देखील तिथेच आणि शुक्र तृतीयात त्यामुळे प्रकृती उत्तम राहील. द्वितीयात चंद्र, बुध,
शुक्र तृतीयात त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला काहीतरी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. द्वितीयातील बुध बऱ्याच लोकांसाठी
कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवण्याचे सुचवतो. मुलाबाळांसंबंधी काळजीचे कारण नाही. षष्ठात गुरु, राहू व शुक्र तृतीयात नोकरी
करणाऱ्यांसाठी ठीक काळ आहे मात्र काहींना छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग येतील. अष्टमेश शुक्र तृतीयात असल्याने वाहने जपून
चालवावीत. नवमात शनि, मंगळ व मंगळ वृश्चिक ह्या स्वराशीत लांबच्या प्रवासाला उत्तम योग आहे, पण दोन्ही ग्रह वक्री असल्याने
बेत ठरून देखील प्रवासाचे योग विलंबाने (ग्रह मार्गी झाल्यावर) येतील. दशमेश गुरु षष्ठात व शुक्र तृतीयात त्यामुळे काहीजण
ऑफिसच्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करतील तर काहींना प्रमोशन पण मिळेल. लाभेश शनि अष्टमात व बुध द्वितीयात त्यामुळे
काहींना वारसाहक्क प्राप्त होण्याची शक्यता आहे. शनि वक्री असल्याने कदाचित विलंब होऊ शकतो. एकंदरीत हा महिना काही
बाबतीत संमिश्र तर काही बाबतीत उत्तम राहील.