Title

Astrology Blog by Anagha Bhade


Tuesday 1 March 2016

'प्रसिद्धी योग ' पुस्तकाविषयी थोडेसे ......

बरेच दिवस ब्लॉगवर काही लिखाण झाले नाहीये .एक तर consultations आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे पुस्तक लिखाण .
मी आणि श्री सुनील देव सध्या ' प्रसिद्धी योग ' हे पुस्तक लिहित आहोत . तर ह्या पुस्तकाबद्दल थोडेफार लिहावे असे मनात आले .


"प्रसिद्धी योग " ह्या पुस्तकात काय वाचायला मिळेल तर नावावरून कल्पना आलीच असेल कि पत्रिकेतील प्रसिद्धी योगावर हे पुस्तक आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचे विश्लेषण ह्या पुस्तकात केले आहे . त्यांच्या पत्रिकेतील प्रसिद्धी योग कसा आहे हे तर लिहिले आहेच तसेच हे पुस्तक वाचताना प्रत्येक  कार्यक्षेत्रा साठी कोणते ग्रह कोणते भाव ह्यांना प्राधान्य द्यायचे ते पण लिहिले आहे . ज्याचा उपयोग वाचकाना पत्रिकेवरून करियर मार्गदर्शना करता होऊ शकतो.
उदा . सिनेकलाकारांच्या पत्रीकेमध्ये पंचम ,तृतीय  भावांचे तसेच शुक्र,बुध ह्या ग्रहांचे महत्व कसे असते हे बर्याच  उदाहरणावरून कळेल.तसेच मुख्यत: कृष्णमुर्ती पद्धती नुसार विश्लेषण असले तरीही पारंपारिक योगांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे . जसे नवपंचम योग ,युती योग ,लाभ योग इ. हे सर्व योग प्रसिद्धी मिळण्यास पोषकच असतात .
ह्या पुस्तकात प्रसिद्ध सिनेकलाकार ,राजकीय नेते ,खेळाडू,संत-महात्मे ,लेखर-कवी,गायक-वादक ,उद्योजक इ. लोकांच्या पत्रिकेचे विवरण आहे . जवळपास ५० प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचे विश्लेषण ह्यात वाचायला मिळेल.


बऱ्याच लोकांमध्ये talent असते पण काहीच जण त्यात प्राविण्य मिळवतात आणि त्यातल्या देखील काहीच जणांना त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आणि त्यातून पैसा आणि प्रसिद्धी मिळते. तर मुळात पत्रिकेची कुवत आणि त्याला साथ देणारे ग्रहयोग व पोषक महादशा ह्या सर्वांचा मिलाफ होतो तेव्हाच प्रसिद्धी मिळते .
अर्थातच ह्या पुस्तकात सुप्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रिकेचा समावेश केला आहे . कुप्रसिद्ध व्यक्ती घेतलेल्या नाहीत . काही व्यक्ती त्यांच्या कुकर्मांमुळे सर्वाना माहित होतात.


फक्त ह्या पुस्तकाकरता अजून सहा महिने तरी वाट बघावी  लागेल . हे पुस्तक माझे पहिलेच पुस्तक असल्याने मी पण खूपच excited आहे . श्री सुनील देव ह्यांनी पुस्तक लिखाणाबाबत माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक आभार .