Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday 31 December 2014

ब्लॉग च्या सर्व वाचकांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे ,भरभराटीचे आणि निरोगी जावे .

                          येणाऱ्या  नवीन वर्षात
                   तुमच्या सगळ्या पूर्ण होवोत इच्छा
                           नवीन वर्षाच्या तुम्हा
                        सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !


वाचकांचे आभार . Pageview वरून कायम आपले लिखाण वाचले जाते आहे हे कळते आणि लिहिण्यास उत्साह येतो .

'पत्रिकेच्या माध्यमातून योग्य दिशेने प्रयत्न ' हाच मुद्दा कायम ठसवण्याचा प्रयत्न मी ह्या ब्लॉग द्वारा करत असते .

पत्रिका म्हणजेच सर्वकाही नाही पण निश्चित पणे हे एक मार्गदर्शक  म्हणून उपयोगी आहे . त्यामुळे सजगपणे आणि

तारतम्याने ह्याचा वापर केल्यास नक्कीच मदत होते .

पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !






Saturday 27 December 2014

राशी व पत्रिकेतील भाव ह्यानुसार आजार

जेव्हा पत्रिकेतून आपल्याला होणार्या संभाव्य आजारांचे अनुमान केले जाते तेव्हा  १, ५,६,८, ११ ,१२ ह्या सर्व भावांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो म्हणजे ह्या भावात असणारे ग्रह , राशी त्या त्या भावांचे उपनक्षत्र स्वामी .आता जेव्हा हे analysis करायचे तेव्हा प्रत्येक ग्रहानुसार राशीनुसार तसेच नक्षत्र परत्वे कोण कोणत्या आजाराची शक्यता असते हे माहिती असणे आवश्यक आहे .
सर्वप्रथम आपण प्रत्येक राशीच्या अमलाखाली कोणते अवयव व आजार  येतात ते बघुयात .

मेष रास : डोके , मेंदू ( प्रथम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात )
आजार : मेंदू किंवा डोक्यासाबंधी  आजार , मेष हि मंगळाची रास असल्याने उष्णता विकार इ.

वृषभ रास : घसा , दात , डोळा , मान ( द्वितीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात.)
आजार : आवाजाशी सबंधित विकार , टोन्सिल्स , दातांचे विकार, कफ तसेच वृषभ हि शुक्राची रास असल्याने व निसर्ग कुंडलीत द्वितीय स्थानी असल्याने अयोग्य आहारावरून होणारे विकार इ. 

मिथुन रास : कान , nervous system , हात (तृतीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वायुमुळे होणारे विकार  , मज्जातंतू विषयीचे विकार ( nervous system ) इ. 

कर्क रास : छाती , मन, शरीरातील द्रव पदार्थ किंवा पाचक रस (चतुर्थ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : फुफुसासाबंधी आजार , शरीरातील द्रव पदार्थ , सर्दी इ. 

सिंह रास : heart , पाठ , पाठीचा कणा (पंचम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : heart attack , पाठीच्या कण्या सबंधित आजार इ. 

कन्या : पोट , पचन संस्था , मज्जासंस्था ( षष्ठ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : पचनासबंधी आजार ,acidity ( विशेषत: कन्या राशीत मंगळ असेल तर ) 

तूळ रास : किडनी , कंबर ,गर्भाशय (सप्तम  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार  संदर्भात आजार

वृश्चिक रास :reproductive oragans   . ( अष्टम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : किडनी स्टोन , गुदद्वार व वरील सबंधी आजार

धनु रास : मांड्या , बरगड्या इ. (नवम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

मकर रास : गुढगे , हाडे , सांधे इ. (दशम  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : त्वचा विकार , डिप्रेशन तसेच वरील संबंधी आजार

कुंभ रास : दात , रक्ताभिसरण ,पोटऱ्या  (एकादश  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

मीन रास : पावले , पायाची बोटे ,डावा डोळा ( व्यय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

पुढील भागात आपण प्रत्येक ग्रहांवरून होणारे आजार बघुयात .




Friday 21 November 2014

आजार आणि पत्रिका

Prevention is better than cure !

आजारी  पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी . काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे तर योग्य व्यायाम , आहार आणि सगळ्यात महत्वाचे आनंदी मन जपायचे . आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन सांगते आहे हे सगळ्यांनाच माहित आहे पण बहुतेक कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे .

ह्या सगळ्यामध्ये पत्रिका आपल्याला काही मार्गदर्शन करू शकते का ? तर हो ! आपल्याला संभाव्य आजारांचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो . उदा. समज डायबेटीस होईल अशी शक्यता वाटत असेल तर योग्य व्यायाम व आहार ठेवून आपण काही काळ हा आजार लांबणीवर  टाकू शकतो व  अगदी झालाच तर आधीच कल्पना असल्याने योग्य ती काळजी घेऊन कंट्रोल मध्ये ठेवू शकतो .

शरीरातील कोणत्या अवयवांची काळजी घेतली पाहिजे  ह्याचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो उदा . पोट , पाठ इ.
समजा हृदयाशी सबंधित काही दुखणे उद्भवण्याची काही शक्याता असेल तर दरवर्षी आपले रक्त तपासून त्यातील cholesterol, triglyceride इ. योग्य प्रमाणात  आहे ना ह्याची पण खात्री करून घेतली पाहिजे जेणेकरून झालेला बदल लगेच लक्षात येईल व त्याप्रमाणे उपचार करून घेता येईल किंवा पथ्य पाळता येईल .

मी जे वारंवार सांगत असते कि पत्रिकेचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो . परंतु केवळ पत्रिका संभाव्य धोके दाखवू शकते . त्यामुळे त्यातून धडा घेऊन कसे वागायचे हे  ज्याने त्यानेच ठरवले पाहिजे . आता काही जणांना वाटते कि  पत्रिका बघितली कि झाले मग एखादा आजार आपल्याला होणार नाही असे कळले कि मग चिंता मिटली तर असे नसते आजाराचे इतके प्रकार आहेत जे दर वेळेस medical science साठी सुद्धा नवीन असतात . आपण पत्रिकेतून फक्त आपल्याला होऊ शकणाऱ्या आजाराच्या शक्यता पडताळून पाहत असतो जेणे करून त्यातल्या त्यात काळजी घेऊ शकतो . उदा . काही जणांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असता त्याने आहारावर  विशेष लक्ष देणे आवश्यक आहे काही जणांच्या बाबतीत पाठीचे  होण्याची शक्यता असल्यास बर्याच वेळ एका जागीजागी  बसून काम करणे टाळणे , योग्य व्यायाम करणे इ. गोष्टी केल्या पाहिजेत .

पत्रिकेतून आजाराची शक्यता  कशी बघायची ? तर ह्यासाठी आधी प्रत्येक ग्रहावरून तसेच पत्रिकेतील प्रत्येक भावावरून कोणत्या प्रकारचे अवयव तसेच आजार होऊ शकतात ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे . त्या नंतर
पत्रिकेतील  प्रथम भाव ( एकंदर आरोग्य ) , पंचम भाव( आजारातून बाहेर येण्यासाठी पंचम भाव कार्यरत असणे आवश्यक आहे )  , षष्ठ भाव ( आजार पण ) , अष्टम भाव ( सर्व प्रकारचे त्रास ) तसेच द्वादश भाव ( hospitalization ) हे सर्व भाव अभ्यासण्याची गरज असते . आता ह्या सर्व भावांचा व त्याच्याशी सबंधित ग्रहांचा एकत्रित पणे विचार करून मग काही निष्कर्ष काढता येतात . एकदा आपल्याला आपल्या पत्रिकेतील काळजी घेण्यासारखे अवयव शोधले कि त्या दृष्टीने काळजी घेता  येते . आता एखादे आजारपण होईल असे वाटल्यास साधारण त्याचा कालखंड महादशा तसेच अंतर्दशा व गोचर भ्रमण म्हणजे transits ह्यावरून ठरवता येते .साधारणपणे १,६,८,१२ ह्या भावांच्या एकत्रित दशा  सुरु असल्यास आजारपण येऊ शकते . तसेच पंचम व लाभ स्थान कार्यान्वयित(active ) असेल तर आजारातून बरे होण्यास सुरुवात होते . एखाद्या वेळी सर्जरी (operation ) ची शक्यता पण मंगळाचा सबंध असल्यास पडताळून बघता येते .

ह्यावरून तुम्हाला समजले असेल कि ज्योतिषशास्त्राचा योग्य उपयोग  हा काळजी वाढवण्यासाठी नसून काळजी घेण्यासाठी आहे . 

Thursday 11 September 2014

शिक्षण आणि पत्रिका भाग -३

मागील लेखात आपण रवि , चंद्र , मंगळ ह्या ग्रहांशी सबंधित शिक्षण क्षेत्रातील माहिती घेतली ह्या लेखात पुढील ग्रहांबद्दल माहिती बघुयात .
मागील लेखात म्हंटल्या प्रमाणे शिक्षण शाखा ठरवताना चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी महत्वाचा ठरतो . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र असेल किंवा शुक्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पण शुक्राशी सबंधित शिक्षण  घेतले जाते . शुक्रावरून कला म्हणजे गायन , नृत्य ,चित्रकला , भरतकाम , शिवण कला ह्याचाविचार केला जातो    . तसेच वाहन ( गाड्या) , खाण्याचे पदार्थ , आर्किटेक्ट , सौदर्य प्रसाधने ,fashion designing ह्या  क्षेत्रांचा पण विचार होतो . 
शुक्राबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . शुक्र बरोबर जर बुध , चंद्र असतील व ३,५,७ ह्या भवांशी सबंध असेल तर textile designing ,शुक्र बरोबर जर बुध , राहू असतील व ५,३,८ ह्या भवांशी सबंध असेल तर फोटोग्राफी असे वर्गीकरण करता येते . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध  असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे बुधाशी सबंधित शिक्षण  घेतले जाते. बुधावरून गणित , तत्वज्ञान , भाषा , टूरिझम  , पत्रकारिता , ज्योतिष , प्रकाशन , लेखन इ. क्षेत्रांचा अभ्यास  केला जातो . बुधामुळे एका पेक्षा जास्त शाखेत प्राविण्य मिळण्याची पण शक्यता असते . 
बुधाबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . बुधा  बरोबर गुरु असेल व ३, ९ ह्या भावांशी सबंध असेल तर जाहिरात क्षेत्र , बुधा  बरोबर शुक्र असेल व ३,१०,११ ह्या भावांशी सबंध असेल तर मार्केटिंग व सेल्स ,
बुधा  बरोबर गुरु असेल व ४,९,११ ह्या भावांशी सबंध असेल तर शिक्षण  क्षेत्र , बुधा  बरोबर गुरु असेल व ३, ११,१२  ह्या भावांशी सबंध असेल तर परदेशी भाषा ह्या प्रमाणे अंदाज बांधता येतात . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी गुरु  असेल किंवा गुरूच्या  नक्षत्रात असेल तर साधारण पणे गुरूशी  सबंधित शिक्षण  घेतले जाते . 
गुरूवरून कॉमर्स , बॅंकिंग , शिक्षणक्षेत्र ,धर्मशास्त्र , राजकारण , वेद व मंत्र शास्त्र इ. क्षेत्रांचा विचार होतो . गुरु बरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . गुरु  बरोबर रवि व मंगळ असेल आणि ६,१०,११ ह्या भावांचा सबंध असेल तर राजकारण ,गुरु बरोबर बुध ,शुक्र असून २,३,७,९ ह्या भावांशी सबंध असेल तर सी . ए  ( वाणिज्य शास्त्र ) , गुरु बरोबर शनि ,बुध असून ३,९,११,४ ह्या भावांशी संबंध असेल तर कॉम्पुटर सोफ्टवेअर इ. क्षेत्रांचा विचार  करता येतो . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शनि असेल किंवा शनिच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे शनीशी सबंधित शिक्षण  घेतले जाते .शनि वरून archaeology , engineering , ज्योतिष , तत्वज्ञान इ. गोष्टींचा अभ्यास केला जातो . शनी कोणत्या ग्रहाबरोबर आहे तसेच कोणत्या स्थानाशी सबंधित आहे त्यावरून अजून जास्त माहिती मिळू शकते . उदा . शनी , बुध , मंगळ  व १, ८ हे भाव mechanical engg  सुचवतात , शनी बरोबर शुक्र , मंगळ असल्यास व २,१,५,८ ह्या भावांशी सबंध असल्यास  dentist हे क्षेत्र सुचवते . 


जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी राहू किंवा केतू असेल किंवा राहू , केतूच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे राहू ,केतू ज्या राशीत आहेत त्या राशीच्या राशीच्या अधिपातीप्रमाणे  तसेच राहू केतू ज्यांच्या युतीत आहे व ज्या ग्रहांची दृष्टी त्यांच्यावर आहे त्या ग्रहांप्रमाणे त्याचे मूल्यमापन करावे . 

एकंदर शिक्षणाचा विचार पत्रिकेवरून करताना ४, ९,११  महत्वाची आहेत तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघितला जातो. त्याचा  ग्रहांशी तसेच स्थानाशी येणारा सबंध तसेच पुढे येणाऱ्या महादशा ह्या सर्व गोष्टींचा तारतम्याने विचार करावा लागतो.
एक दिशा सापडण्यासाठी नक्कीच पत्रिकेचा उपयोग होऊ शकतो परंतु ज्योतिष हे एक तर्क शास्त्र आहे ह्याचे भान मात्र सदैव ठेवायला हवे .



Thursday 21 August 2014

शिक्षण आणि पत्रिका - भाग २

मागील लेखात आपण शिक्षण आणि पत्रिका ह्याबाबतीतला आढावा घेतला .  ह्या लेखात ग्रह आणि भाव साधारण कोणती शिक्षण शाखा सुचवतात हे पाहू.

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाकरता लक्षात घ्यावा लागतो .

हा उपनक्षत्र स्वामी जर बुध किंवा गुरु शी सबंधित( बुध , गुरु असेल किंवा बुध - गुरु च्या नक्षत्रात असेल ) असेल तर शिक्षण चांगले होते . तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ४, ९,११ ह्या भावांचा कार्येश असेल तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण होते . अर्थात त्या काळात येणाऱ्या दशा सुद्धा ४,९, ११ हि स्थाने देणाऱ्या हव्यात त्या जर उलट्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या ३,८ स्थानाच्या असतील तर शिक्षणात अडचणी येतात . अडचणी येतात म्हणजे खूप मेहनत करावी लागते सहज यश मिळत नाही . 
आता चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे  ते बघावे तसेच 
कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे ते बघून मग साधारणपणे शिक्षण शाखा ठरवू शकतो . तसेच आयुष्यात पुढे येणाऱ्या महादशा कोणते क्षेत्र सुचवते आहे ह्याचा  सारासार विचार करून मग ठरवावे . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी रवि असेल किंवा रवीच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे रवि ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . वैद्यकशास्त्र ( medical field )  , administration , politics , astronomy इ. 
उदा . आता समजा चतुर्थ स्थानाचा उ. न स्वामी रवि व मंगळ ह्यांच्याशी सबंधित  असून १, ८, ५,१२ ह्या भावांचा कार्येश असेल    
व मेष , वृश्चिक , सिंह , मीन ह्या राशीचा प्रभाव असेल ( म्हणजे ह्या राशीत प्रामुख्याने ग्रह असतील ) ,तसेच पत्रिकेचा शैक्षणिक दर्जा पण चांगला असेल तर मग ' सर्जन' होण्यासाठी ती पत्रिका SUPPORTING आहे असे म्हणता येईल . 
एकदा जर वैद्यक शाखा निश्चित केली तर मग ग्रह , राशी भाव ह्याप्रमाणे मग आयुर्वेद , homeopathy , allopathy ह्या शाखा ठरवता येतात तसेच समजा allopathy नक्की झाले तर मग पुढील शिक्षण कोणते क्षेत्र दाखवते हे पण बघता येते . उदा . जर शुक्र, रवि,चंद्र , मंगळ हे ग्रह वृषभ ,मीन , वृश्चिक , मेष ह्या राशी व २, १२,८,१ हे भाव असतील तर मग डोळ्यांचे डॉक्टर (आय सर्जन ) होता येईल .

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी चंद्र असेल किंवा चंद्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे चंद्र  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तसेच जलपदार्थ , ताज्या भाज्या , वाहतूक , पाककला इ. गोष्टी चंद्रावरून बघतात त्यामुळे मानसशास्त्र ,  नेव्ही , शेती,नर्सिंग , सुगंधी द्रव्ये इ. क्षेत्र  चंद्राच्या अधिपत्याखाली येतात . त्यामुळे Agriculture and food engg , dairy technology , pscyhology , bio- chemical , लहान  मुलांचे शिक्षण क्षेत्र इ. गोष्टींसाठी चंद्र अनुकूल असतो . 
आता प्रत्येक क्षेत्र हे कोण्या एका ग्रहामुळेच ठरत नसून हे ग्रह , राशी भाव ह्यांचे combination बघावे लागते . 
उदा .psycology मध्ये चंद्र , बुध , गुरु हे ग्रह कर्क, मीन , मेष , मिथुन ह्या राशी आणि ४,३,१२ हे भाव ह्या सगळ्या गोष्टीं असाव्या लागतात . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी मंगळ असेल किंवा मंगळाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे मंगळ  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते .
उदा. energy , power ,electricity , fire , जमीन etc . 
त्यामुळे प्रामुख्याने अभियांत्रिकी ( enggineering ) , मिलिटरी , बांधकाम , रवि पण असेल तर मग सर्जरी , पोलिस खाते इ. क्षेत्रासाठी अनुकूल असातो . 
एक उदाहरण द्यायचे झाल्यास electrical engineering करता मंगळा बरोबर बुधाचा विचार होतो तसेच मेष ,सिंह ,वृश्चिक ह्या राशी व ३, ८, ११ हे भाव महत्वाचे असतात . 

वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक ग्रह ठराविक शाखेकरता कारणीभूत नसतो तर ग्रह ,राशी ,भाव ह्यांचे combination बघावे लागते व पुढे येणाऱ्या दशा ह्या सगळ्यांचा समग्र विचार करून मग दिशा ठरवता येते .

बाकी ग्रहांबद्दलची माहिती पुढील भागात बघुयात .


Monday 28 July 2014

शिक्षण आणि पत्रिका भाग -१

आजकाल शिक्षण हा विषय फारच महत्वाचा झाला आहे . चांगल्या करियर करता चांगले शिक्षण आवश्यक आहे हे आता सर्वमान्यच आहे . त्यामुळे पालक सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूपच जागरूक असतात . आता वाढती competition आणि अवाढव्य फिया ह्यामधून योग्य त्या शिक्षणाची शाखा निवडणे म्हणजे फारच अवघड होऊन बसले आहे . पुन्हा काही मोजकी मुले सोडली तर बहुतांशी मुले स्वत:ला काय आवडतंय किंवा कोणत्या विषयात गती आहे . पुढे जाऊन काय करायचं आहे ह्याविषयी गोंधळलेली असतात . अशात आई वडील म्हणतात म्हणून एखाद्या  शाखेला प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात .  ह्या सर्व गोष्टींचा ताण मुलांवर असतो आई वडील सुद्धा मुलाच्या करियरच तेवढेच टेन्शन घेतात . अशा परिस्थिती मध्ये पत्रिकेतून काही मार्गदर्शन मिळू शकते का ?तर हो !
पत्रिकेवरून मुळात मुलाची बुद्धिमत्ता , कल /आवड , कोणते क्षेत्र मुलाकरता ( इथे 'मुलाकरता ' हा शब्द मुले म्हणजे kids मुलगा / मुलगी ह्या दृष्टीने  वापरला आहे . नुसते मुलगे असे नव्हे ) चांगले आहे , कोणते शिक्षण घेतल्यास फायदा होईल , करियर च्या दृष्टीने पुढे येणारा काळ कोणत्या क्षेत्रात काम करण्यास जास्त supporting आहे ह्या गोष्टींचा अंदाज येतो . तसेच जर एखादे वेळेस २-३ options मध्ये कोणती side निवडावी ह्याबाबतीत गोंधळ होत असेल तर पत्रिकेतून जास्त suitable option निवडण्यास मदत होऊ शकते .
आता पत्रिकेतून शिक्षणासंबंधी विचार कसा करायचा ते बघू .
ह्याबाबतीत मला कृष्णमुर्ती पद्धत जास्त प्रभावी वाटते . कृष्णमुर्ती पद्धती नुसार चतुर्थ स्थान,नवम स्थान व लाभ स्थान  हे शिक्षणाच्या दृष्टीने बघितले जाते . चतुर्थ स्थानावरून साधारण पणे graduation पर्यंत च्या शिक्षणाचा विचार केला जातो नवम स्थानावरून उच्च शिक्षणाचा विचार होतो व लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभा करता विचारात घेतले जाते त्यामुळे शिक्षणाचा विचार करताना ४,९,११ हि महत्वाची स्थाने होत . तसेच ३,८ हि स्थाने शिक्षणाला विरोध करणारी किंवा अडथळे आणणारी आहेत .त्यामुळे साहजिकच ४,९,११  हि स्थाने कार्यान्वयित असणाऱ्या दशा शिक्षणाला पोषक व ३, ८ च्या दशा त्यामानाने अडचणी उत्पन्न करणाऱ्या असतात .
चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो . प्रथम पत्रिका बघताना शिक्षणाचा प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो रुलिंग  मध्ये आहे का ते पाहावे . जर रुलिंग मध्ये असेल तर जन्मवेळ बरोबर आहे जर नसेल तर त्या उपनक्षत्र स्वामी च्या जवळचा ग्रह जो रुलिंग मध्ये आहे तो उ. न स्वामी म्हणून समजून त्याप्रमाणे जन्मवेळ शुद्ध करून घ्यावी . अशाप्रकारे जर २-४ मिनिटांचा जन्म वेळेत फरक असेल तर तो error काढता येतो . 
आता एकदा चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी ठरला कि मग तो  ग्रह कोणता आहे ? कोणाच्या नक्षत्रात आहे ? कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे . तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या दिशेच्या / क्षेत्राच्या दृष्टीने जास्त supporting आहेत हे बघून मग  एक दिशा मिळू शकते . 
प्रत्येक ग्रहानुसार आणि पत्रिकेतील भावानुसार क्षेत्र ठरतात .  त्यामुळे  सर्वांचा तारतम्याने  विचार करून तसेच  मग ठरवता येते . आता कोणते ग्रह , भाव  कोणती क्षेत्रे दाखवतात  त्याचा विचार पुढच्या भागात करू . 


Friday 27 June 2014

गुरु बदल - भाग २ ( Jupiter Transit 2014 )

गुरु  कर्क राशीत १८ जून १२०१४ पासून १३ जुलै २०१५ पर्यंत आहे .

सध्याच्या कर्क राशीतील गुरु ग्रहाच्या भ्रमणाचा प्रत्येक राशीनुसार होणार्या परिणामाचा ढोबळ अंदाज : 
( अर्थातच ह्या अंदाजात प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तसेच दशा ह्यांचा विचार  नसल्याने  ' ढोबळ ' अंदाज असे म्हंटले आहे ) 


मेष रास : 
सध्या मेष  राशीला चौथा गुरु आहे. गृहसौख्य चांगले राहील . विद्यार्थ्यांना पण चतुर्थ स्थानातील गुरु शिक्षणाच्या दृष्टीने चांगलाच असतो . गृह खरेदी , वाहन खरेदी या करता पण अनुकूल . इथल्या गुरूची दृष्टी जरी दशमावर येत असली तर प्रमोशन वगेरे साठी  हा गुरु तितकासा उपयोगी नाही  . 


वृषभ रास : 
सध्या वृषभ राशीला तिसरा गुरु आहे . तृतीय स्थान   आहे , त्यामुळे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे . तृतीय स्थानावरून लेखन ,  प्रकाशन , media इ. विचार केला जातो . त्यामुळे ह्या क्षेत्रातील लोकांसाठी काही नवीन संधी घेऊन येईल . सप्तमावर व लाभ स्थानावर तृतीयातील गुरूची दृष्टी असेल . 

मिथुन  रास : 
सध्या मिथुन  राशीला दुसरा गुरु आहे . द्वितीय स्थानावरून आर्थिक प्रगती (द्वितीय  हे २,६,१० ह्या अर्थ त्रिकोणातील स्थान आहे  )  , कुटुंबवृद्धी इ. गोष्टी बघितल्या जातात इथला गुरु ह्या गोष्टी वृद्धिंगत करणारा ग्रह आहे त्यामुळे आर्थिक मान वाढेल . कटुंब वृद्धी म्हणजे संतती साठी प्रयंत्न करणाऱ्या लोकांना संतती प्राप्ती तसेच लग्नाळू लोकांचे विवाह होणे.इ. गोष्टी शक्य आहेत .नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने काही संधी उपलब्ध करून देईल . 

कर्क रास : 
सध्या कर्क राशीला पहिला गुरु आहे . प्रथम स्थानावरून म्हणजे चंद्र राशीप्रमाणे चंद्रावरून गुरुचे भ्रमण होत आहे . चंद्र हा मनाचा कारक  ग्रह आहे . प्रथम स्थानातील गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने फारसा उपयुक्त नसला तरी गुरुसारखा शुभ ग्रह नक्कीच मन प्रसन्न ठेवेल  positive energy निर्माण करेल . तसेच गुरूची दृष्टी पंचम ,सप्तम  व नवम स्थानावरून बघितल्या जाणार्या गोष्टीचे शुभ परिणाम दिसतील . 

सिंह रास : 
सध्या सिंह राशीला बारावा गुरु आहे .व्यय स्थानातील गुरु अध्यात्मिक प्रगतीसाठी  चांगला असतो . बारावे स्थान हे मोक्ष त्रिकोणातील (म्हणजे ४,८,१२ ) महत्वाचे महत्वाचे स्थान आहे . हा गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने प्रभावी  नसला तरी
नियोजन ( planning ) च्या दृष्टीने उपयुक्त असतो .बारावे स्थान हे परदेश गमनासाठीचे (Long distance journey ) साठी महत्वाचे स्थान आहे . त्यामुळे प्रवास पण शक्य आहे . 

कन्या रास : 
सध्या कन्या  राशीला अकरावा  गुरु आहे . अकराव्या स्थानातील  सगळे ग्रह हे लाभदायक असतात . इथे कन्या राशीला गुरु हा तृतीयेश व सप्तमेश आहे त्यामुळे भावंडाकडून किंवा जोडीदाराकडून फायदा . सप्तमावरून business partner चा पण विचार होतो त्यामुळे भागीदारीत फायदा असेही logic लावता येईल . तसेच लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभाकरता विचारात घेतले जाते त्यामुळे विवाह , संतती , नोकरी , घर खरेदी  इ. सर्व  गोष्टी मध्ये गुरु मुळे सहाय्याच होईल .कन्या राशील तर जेव्हा शनि वृश्चिकेत जाईल  तेव्हा तृतीय शनि आणि अकरावा गुरु म्हणजे तर 'बहुत अच्छे दिन ! ' 

तूळ रास : 
सध्या तूळ राशीला दहावा गुरु आहे .दशमातील गुरु हा नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीकारक असतो परंतु कधीकधी बर्याच अवघड परिस्थिती निर्माण करतो . यश मिळणे अवघड असले तरी प्रगतीकाराकच असतो . ह्या काळात patience ची गरज असते . दशमातील ग्रह सर्वसाधारण पणे कामाचा ताण वाढवतात. २, ६ , १० ह्या अर्थ त्रिकोणातील गुरुची आर्थिकबाजू चांगली बाजू राहण्याच्या  दृष्टीने शुभ फ़लेच  मिळतात . 

 वृश्चिक रास : 
सध्या वृश्चिक राशीला नववा  गुरु आहे . मागील वर्षभर आठवा गुरु असल्याने बर्याच कामांमध्ये अडचणी  येत असतील तर  आता पासून नवव्या गुरु मुळे त्या दूर होतील तसेच नवीन संधी पण मिळू शकतील .  नवम स्थानातील गुरूमुळे धार्मिकस्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो .  तसेच नवामातील गुरु तृतीय स्थानाला बघत असल्याने व ३, ९ हि 
प्रवासाची स्थाने आहेतच त्यामुळे प्रवास होतील . नवमातील गुरु पंचम स्थानाला व प्रथमस्थानाला पण बघतो  
त्यामुळे मुलांच्या दृष्टीने पण चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे . 

धनु रास : 
सध्या धनु राशीला आठवा  गुरु आहे .सर्वसाधारण पण अष्टमातील ग्रह हे अडथळे उत्पन्न करणारे , मनस्ताप देणारे असतात . गुरु हा मुळात शुभ ग्रह असल्याने  मनस्ताप होईलच  असे नाही परंतु साधारण पणे  'जैसे थे '  परिस्थिती ठेवणारा हा गुरु आहे . 

मकर रास : 
सध्या मकर राशीला सातवा गुरु आहे .सप्तमातील गुरु हा वैवाहिक सुखास चांगला ! लग्नाळू मुला/ मुलांची लग्न ठरण्याच्या दृष्टीने पोषक . तसेच सप्तमातील गुरूची दृष्टी तृतीय व लाभ स्थानावर असल्याने छोटे प्रवास पण आनंददायी 
ठरू शकतात . तसेच सप्तमावरून भागीदारांचा विचार  करत असल्याने चांगले भागीदार मिळू शकतात . सप्तमातील गुरु  लोकसंग्रह / ओळखी वाढवणारा आहे . 

कुंभ रास :
सध्या कुंभ राशीला  सहावा गुरु आहे .षष्ठ स्थान हे विरोधकांचे तसेच आजारांचे स्थान आहे गुरु कोणतीही गोष्ट वाढवतो त्यामुळे ह्या स्थानातील गुरु आजारपणे आणि आणि विरोधक वाढवणार . अर्थातच आता लगेच माझी कुंभ रास आहे आणि षष्ठात गुरु म्हणजे आजारी पडणार असे नव्हे तर जर दशा पण आजारपणाच्या असतील तरच त्याचा प्रभाव दिसून येईल . षष्ठ स्थान हे अर्थ त्रिकोणातील स्थान आहे त्यामुळे आर्थिक प्रगती  पण होईल . 

 मीन रास :
सध्या मीन राशीला पाचवा  गुरु आहे .चंद्राच्या पंचमातील गुरुची चंद्रावर पूर्ण दृष्टी असते . पंचमातील गुरु भ्रमण हे शुभ मानले आहे .  पंचम स्थान हे संततीे   स्थान आहे त्यामुळे मुलांच्या ( kids ) दृष्टीने प्रयत्न करणार्यांना हे वर्ष अपत्य प्राप्तीच्या दृष्टीने चांगले आहे . तसेच मुले असणाऱ्या लोकांना पण मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने शुभ . पंचम स्थानाशी सबंधित व्यवसाय / नोकरी असणाऱ्या म्हणजे कला , क्रीडा इ. क्षेत्रातील लोकांना पण चांगले जाईल . 

सर्वसाधारण पणे  ग्रहाचा स्वभाव व तो ज्या स्थानात येत आहे त्या स्थानावरून बघितल्या जाणाऱ्या गोष्टींची सांगड घालून हे लिहिले आहे तुम्ही सुद्धा असे लॉजिक लावून अजून conclusions काढू शकाल . 
आधी लिहिले त्याप्रमाणे हा फक्त ढोबळ अंदाज आहे कारण अर्थातच प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असते त्याप्रमाणे ग्रहयोग, दशा बदलत असतात . 







Friday 20 June 2014

गुरु बदल -भाग १ ( Jupiter Transit -2014 )

बऱ्याच वेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ग्रह ' बदल '  ग्रह बदलणे म्हणजे काय तर सध्या ज्या राशीत ग्रह आहे त्याच्या पुढच्या राशीत जाणे . जर ग्रह वक्री असेल तर तो ज्या राशीत सध्या आहे त्याच्या मागील राशीत जातो . उदा . राहू व केतू हे नेहिमी वक्री असतात त्यामुळे राहू बदलतो म्हणजे तो त्याच्या आधीच्या राशीत जातो . सध्या राहू तूळ राशीत आहे . राहू बदल होईल तेव्हा तो कन्या राशीत जाईल .
ह्या लेख पुरता आपण गुरु बदलाचा विचार करू . १९ जून ला गुरु कर्केत आला आहे त्या आधी मिथुनेत होता आता साधारण वर्षभर गुरु कर्केतून  भ्रमण करेल म्हणजेच मिथुन राशीतून कर्क राशीत येणे हा सध्याचा (२०१४ ) ' गुरु बदल ' आहे . आता गुरु गोचरीने ( as per transit ) कर्केत आल्याने त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल ? ते बघुयात . त्यासाठी गुरु ह्या ग्रहाची माहिती असणे आवश्यक आहे . गुरु हा शुभ ग्रह आहे . बाकी गुरु ग्रह बद्दलची माहिती इथे http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html दिली आहेच .

गोचर गुरुचे परिणाम आपल्या चंद्र राशीप्रमाणे तसेच लग्न राशीप्रमाणे वाचावे .
 . समजा तुमची चंद्र रास मेष आहे व लग्न रास कर्क तर मग  तुम्हाला कर्केत असणारा गुरु चंद्र राशीला चौथा आहे व लग्न राशीला पहिला . त्यामुळे मेष व कर्क दोन्ही राशींमधील गुरु बदलाचे परिणाम वाचावेत . बऱ्याच  जणांचे मत आहे कि गोचार( transits  ) चंद्र राशीकडून येतात बऱ्याच जणांचे मत असते कि transits लग्न राशीकडून अनुभवास येतात .
 तुम्हाला जास्त काय APPLY होते ते तुम्ही थोडा अभ्यास करून ठरवू शकता . तसेच गोचर भ्रमणाचे परिणाम हे तुमची मूळ पत्रिका त्यातील चालू असणाऱ्या दशा ह्या सर्वांवर  अवलंबून आहेच . मग गोचर भ्रमण महत्वाचे आहे का ? तर ह्याचे उत्तर ' हो ' असेच द्यावे लागेल कारण जेव्हा एखादा फलादेश सांगितला जातो त्यावेळेस गोचर भ्रमण पण लक्षात घेऊनच तर्क  केले जातात . त्यामुळे फक्त गोचरीने येणारा ग्रह भविष्य बदलत नाही तर त्यात catalyst ची भूमिका करतो . गोचर ग्रह शुभ परिणाम सांगत असतील व बाकी दशा पण प्रगतीकारक असतील तर त्या पत्रिकेच्या दर्जा प्रमाणे त्याकाळात प्रगती होईलच परंतु दशा अनुकूल असून गोचर ग्रह साथ देत नसतील तर प्रगती मध्ये काही काळ अडथळे किंवा विलंब होऊ शकतो . त्या उलट जर दशा अशुभ असतील व गोचर भ्रमण  शुभ असेल तर कदाचित होणारा अनर्थ तात्पुरता टळू शकतो किंवा त्याची तिव्रता कमी होते .
आता प्रत्येक राशीला आत्ता कर्केत असणारा गुरु काय फळे देईल ह्यासाठी कर्क रास त्या राशीपासून कितवी आहे हे मोजा म्हणजे आपल्या राशीला सध्याचा गुरु कितवा आहे हे कळेल त्याप्रमाणे मग त्या स्थानातून बघितल्या जाणार्या गोष्टी व गुरु ग्रहाचा स्वभाव ह्याची सांगड घाला त्यावरून सध्याचा गोचरीचा गुरु आपल्याला कसा आहे त्याचा अंदाज बांधता  येईल . तसेच गुरु हा शुभ ग्रह आहे त्याची दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते . गुरू स्वत: च्या स्थानापासून ५,७,९ ह्या स्थानावर बघतो त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत कर्केत , वृश्चिकेत , मकरेत किंवा मीनेत जेवढे ग्रह असतील त्या सर्वांवर  कर्केतील गुरूची दृष्टी पडेल  व त्याचे शुभ परिणाम अनुभवास येतील .तसेच गुरुचे भ्रमण पत्रिकेतील ज्या  ग्रहावरून होते त्या ग्रहाच्या कारकत्वा नुसार शुभ परिणाम अनुभवास येतात . उदा . जन्म पत्रिकेतील शुक्रावरून गुरुचे भ्रमण विवाह सौख्यास  पोषकच असते.
( सध्या गुरु कर्क राशीत आहे  जन्म पत्रिकेत कोणते कोणते ग्रह कर्केत आहेत . कदाचित काही असतील कदाचित एकही नाही . )

आता जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास मेष आहे तर कर्क रास मेषेपासून चौथी आहे म्हणजे मेष राशीला सध्या चौथा गुरु आहे . जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास वृषभ  आहे तर कर्क रास वृषभ राशीपासून  तिसरी आहे म्हणजे वृषभ राशीला सध्या तिसरा गुरु आहे . ह्याप्रमाणेच मिथुन राशीवाल्याना दुसरा गुरु ,कर्क राशीवाल्याना पहिला गुरु , सिंह राशीवाल्याना बारावा  गुरु, कन्या राशीवाल्याना अकरावा गुरु, तूळ राशीवाल्याना दहावा  गुरु, वृश्चिक राशीवाल्याना नववा  गुरु, धनु राशीवाल्याना आठवा  गुरु, मकर राशीवाल्याना सातवा  गुरु, कुंभ राशीवाल्याना सहावा  गुरु,मीन राशीवाल्याना पाचवा गुरु आहे . (इथे सध्याचा गोचरीचा  कर्क राशीतील गुरु धरला आहे ) . 
आता तुमची रास कोणती हे तुम्हाला माहित असेल तर  तुमच्या राशीला कितवा हे लगेचच कळेल . 
प्रत्येक  राशीला सध्याचे गुरुभ्रमण कसे आहे ते पुढच्या लेखात  बघुयात . 

Wednesday 28 May 2014

ब्लॉगच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.


नुकताच दहा हजार pageviews चा टप्पा पार झाला . त्यासाठी ब्लोग च्या सर्व वाचकांचे मनापासून आभार ! 


सध्या बरेच दिवसात काही लिहिणे झाले नाही परंतु आता लवकरच पुढचा लेख लिहीन . 
वाचकांच्या चांगल्या प्रतिसादाने लिहियाला नक्कीच हुरूप येतो . 

Monday 5 May 2014

मंगळ दोष ( Mangalik ) ????

पत्रिकेतील मंगळाचे लग्न ठरवताना एक वेगळेच महत्व आहे . ' मंगळ आहे ' किंवा ' मंगळ दोष आहे ' किंवा मग' मांगलिक आहे' हे  शब्द बर्याच वेळेला एकू येतात . पण 'मंगळ  असणे 'म्हणजे काय ते आधी बघू आणी मग त्या मंगळ  असण्याला कितपत महत्व द्यायचे ते तुम्ही स्वत :च ठरवू शकता .

मंगळ आहे म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ  पण 'मंगळ दोष 'धरतात. पण ह्या स्थानात नुसता मंगळ  असला तरी तो कोणत्या राशीत आहे ? रवि बरोबर आहे का ? कोणत्या ग्रहाच्या दृष्टीत  आहे ? इ . बाबींवर 'मंगळ  दोष ' असणे अवलंबून आहे . परत त्यात सौम्य मंगळ व कडक मंगळ हे प्रकार पण आहेतच . 

मंगळाला चौथी , सातवी , आठवी  असते . जेव्हा मंगळ  १, ४, ७आणि १२ ह्या स्थानात असतो तेव्हा तो सप्तमस्थानाला  ( विवाह स्थान ) दृष्टी ठेवून असतो .

सर्वप्रथम ह्याला ' मंगळ दोष ' का म्हणत असावेत त्याचे लॉजिक बघुयात . मंगळ हा मुळात एक पापग्रह धरला आहे . मंगळ म्हणजे आक्रमकता , धडाडी , प्रसंगी राग , सडेतोड स्वभाव . मंगळाच्या स्वभावात ' जमवून घेणे किंवा नमते घेणे '   हे प्रकार नाहीतच त्यामुळे नवरा- बायको हे नाते टिकण्यासाठी जी adjustment / compromises करावे लागतात त्यात मंगळाचा उपयोग तर नाहीच पण विरोधच जास्त होईल . त्यामुळे सप्तम स्थानावर ( विवाह स्थान ) जर मंगळाची दृष्टी असेल तर अर्थातच कदाचित तो त्याच्या अंगभूत स्वभावामुळे  नात्यामध्ये ताण आणू  शकेल . पण ह्यासाठी मंगळ पत्रिकेत किती प्रभावी आहे हे बघणे आवश्यक आहे . 

सर्वसामान्यपणे  'मंगळ आहे ' म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . परंतु खालील पैकी जर मंगळाची स्थिती असेल तर तो निर्दोष मानतात . ( निर्दोष म्हणजे ' मंगळ  असण्याचा ' कोणताही अपाय नाही . त्यामुळे ' मंगळ  आहे ' म्हणून घाबरू नये . )  

पंचांगात जे 'निर्दोष मंगळाचे 'नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे : 

मंगळ कर्क राशीत ( नीच राशीत ) , मिथुन किंवा कन्या राशीत ( त्याच्या शत्रू राशीत ) असल्यास , मंगळ  रवि बरोबर म्हणजे अस्तंगत असल्यास , प्रथमत मेषेचा , चतुर्थात वृश्चिक राशीत , सप्तमात मकर राशीत , अष्टमात सिंह राशीत आणि बाराव्या स्थानी धनु राशीत असल्यास  मंगळ  निर्दोष समजतात . 
आता ह्या सगळ्या  नियमानुसा जर मंगळ निर्दोष होत नसेल आणि जर शुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर सौम्य मंगळ आहे असे म्हणतात . 
आता समजा एवाढे फिल्टर्स लावून ' सदोष मंगळ  निघालाच तर मग वधू  - वरांच्या दोघांच्याही पत्रिकेत सदोष मंगळ असेल तर चालते किंवा समजा एकाच्या पत्रिकेत सदोष मंगळ  आहे व दुसर्याच्या पत्रिकेत १,४,७,८,१२ ह्या स्थानात शनि असेल तर किंवा शनीची दृष्टी सप्तमावर असेल तर प्रथमात किंवा सप्तमात गुरु / शुक्र असेल तर अथवा  सप्तमावर त्यांची दृष्टी असेल तर किंवा  प्रथमात किंवा सप्तमात राहू - केतू असतील तर  अशी पत्रिका पण ' मंगळ असणाऱ्या पत्रिकेला चालु  शकते . 

एका दिवसात १२ लग्न राशी (दर दोन तासानी एक लग्न रास बदलत असते ) आणि १२ लग्न राशींच्या पत्रिके पैकी ५ लग्न राशीच्या पत्रिकेत एक तर १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ येणार म्हणजे ह्या लोकांच्या पत्रिका ' मंगळ आहे ' ह्या category  मध्ये जाणार . 

सदोष मंगळ असण्याच्या नियमांबरोबर अशावेळेस मंगळाची अवस्था ( बाल , कुमार, युवा , वृध्द, मृत  ) पण बघायला हवी कारण त्यातल्या त्यात कुमार आणि त्याही पेक्षा जास्त युवा अवस्थेतील मंगळ जास्त त्रासदायक होईल बाल ,वृद्ध 
आणि त्यामानाने मृत ग्रह काय प्रभाव टाकणार ? 

माझ्यामते एखादी वाईट घटना  हि कोणत्याही एका पापग्रहा मुळे  कधीही होत नाही तर त्या पापग्रहांचे इतर ग्रहांशी असलेले कुयोग ह्यांच्यामुळे घडत असते . त्यामुळे एकटा मंगळ  पण काय करणार , नाही  का  ? 
खरे बघायला गेले  तर शनी , राहू  , हर्षल हे पण पापग्रह धरले आहेत पण लग्नाच्या वेळेस मात्र मंगळालाच महत्व !

मला वाटते मंगळ हा लग्न ठरवताना पत्रिकेतील एक overrated ग्रह आहे . बघा , म्हणजे  उगाचच मंगळाला घाबरण्याचे 
कारण नाही . अगदी नियमाप्रमाणे पहिले तरी नुसते 'मंगळ  असण्याला 'सुद्धा बरेच अपवाद आहेत . त्यामुळे ' मंगळ आहे ' ह्या प्रकारचा फारसा बाऊ करू नये . 


Saturday 26 April 2014

साडेसाती - शनि महाराजांचे ऑडिट

बऱ्याच लोकांना पत्रिकेबद्दल फारसे माहित नसले तरी साधारणपणे स्वत: ची रास माहित असते आणि रास माहिती असण्याचा उपयोग म्हणजे मुख्यत्वे राशी भविष्य वाचण्यासाठी  होतो नाहीतरी ' मला साडेसाती कधी आहे ? ' हे  बघण्यासाठी होतो . स्वत: च्या आयुष्यात जरी काही मनासारखे होत  नसेल , तब्येतीच्या काही तक्रारी असतील नाहीतर आर्थिक प्रोब्लेम्स सगळ्या अप्रिय गोष्टींचा आणि मनस्तापाचा सबंध लोक बर्याच साडेसातीशी  लावत असतात .

सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते पाहू ,

जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यान शनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .


चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे जेव्हा गोचर शनि तुमच्या जन्म राशीतून म्हणजे चंद्रावरून भ्रमण करतो (साडेसातीमधील मधली अडीच वर्षे )तेव्हा मानसिक त्रास तणाव शनि निर्माण करतो तुम्ही त्याच्या ह्या कसोटीतून चांगले तावून सुलाखून बाहेर येता  . अहंकार असणाऱ्या माणसाना अशा वेळेस  खुप त्रास होतो पण जो माणूस आधीपासूनच जमिनीवर आहे  . ' मी , माझे , माझ्यामुळे ' ह्या  शब्दांपासून लांब आहे त्याला शनिच्या साडेसाती  चा फारसा  त्रास होत  नाही  कारण शनि हा ग्रह जीवाला शिवाचे रूप दाखवणारा आहे . साडेसाती मध्ये माणूस बर्याच वेळा परिस्थिती मुळे  हतबल होतो . साडेसाती माणसाला संयम शिकवते , अधिक परिपक्व बनवते . 

बर्याच वेळा साडेसाती चा त्रास कमी होण्यासाठी उपाय काय ? असे विचारले जाते . दर शानिवारी शनि मंदिरात तेल घालणे , शनीचा मंत्र म्हणणे वगेरे उपाय सांगितले जातात त्याने खरेतर बहुतेक माणसाला चांगले कर्म करण्याची बुद्धी होत असावी आणि अहंकार कमी होत असावा असे वाटते  . समजा तुम्ही शनि मंदिरात जाताय ,मंत्र म्हणताय पण ते फक्त कोणीतरी  सांगितले म्हणून आणि एकीकडे घरातील स्वत: च्याच आई वडिलांशी निट  वागत नाही आहात , पैशाचा माज आहे , भ्रष्टाचार , काळा  पैसा मिळवण्यात मग्न आहात तर शनि महाराजाची शिक्षा भोगणे अटळ  आहे .
चांगल्या कर्मानीच शनि महाराज प्रसन्न होतील . 

आपल्या आयुष्यात चांगला , वाईट काळ खरेतर  येत जात असतोच .ते पत्रिकेतील एकंदर ग्रहयोग व महादशेवर अवलंबून आहे . पण सर्वसामान्य माणसाला ज्याचा ज्योतिषशास्त्र ह्या विषयाशी सबंध  नाही त्याला महादशा आणि ग्रहयोग ह्या  विषय ी फारशी माहिती नसते . सगळ्या वाईट घटनांचा सबंध फक्त  साडेसातीशी लावला जातो  . सगळ्यांना कोणती न कोणती महादशा जन्मभर चालूच असते  मग कधी प्रगती करणारी किंवा मग त्रासदायक किंवा मग विशेष वाईटही नाही किंवा फार चांगली पण नाही .  ज्या माणसाच्या दशा  पण नेमक्या साडेसातीच्या काळात
त्रासदायक असतात त्यांना बराच त्रास होण्याची शक्यता असते . महादाशेबद्दल एक वेगळा लेख लिहीनच पुढे .

शनि हा तुमच्या कर्माचे मोजमाप तुमच्या पदरात घालतो . चांगल्या कर्मांची चांगली फळे देतो  आणि मूळ पत्रिकेतील ग्रहयोग आणि महादशा  चांगल्या असतील आणि ह्या जन्मी पण कर्म चांगलीच असतील तर शनि कसा त्रास देईल नाही का ?  शेवटी चांगली पत्रिका  म्हणजेच आपल्या आधीच्या जन्माच्या  चांगल्या कर्मांचा raincheck !

सध्या  २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीला साडेसाती सुरु आहे . २ नोव्हेंबर २०१४ ला कन्येची साडेसाती संपेल शनि वृश्चिक राशीत प्रवेश  करेल आणि ३ नोव्हेंबर २०१४ पासून तूळ आणि वृश्चिक राशीबरोबर धनु राशीला साडेसाती सुरु होईल . त्यानंतर साधारण अडीच वर्षांनी  शनि धनु राशीत प्रवेश करेल आणि तूळ राशीची साडेसाती संपेल व मकर राशीची सुरु होईल . 

Monday 21 April 2014

ज्योतिषशास्त्र ???


जेव्हा सांगते कि मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आहे ,मला ह्या विषयात खूप इंटरेस्ट आहे तेव्हा बर्याच reactions येतात त्यापेकी काही चांगल्या ,काही आश्चर्य व्यक्त करणाऱ्या आणि काही  "ज्योतिषशास्त्र ??? सध्या तुला  काही काम दिसत नाही ! "अशा  अर्थाच्या असतात . खरेतर अशी REACTION देण्यात त्या व्यक्तीला एक तर ज्योतिष ह्याविषयाची फारशी माहिती नसते किंवा बऱ्याच प्रमाणात चुकीची माहिती असते त्यामुळे काही करायला नसेल तर time pass म्हणून ज्योतिष शिकतात असा काहीतरी त्यांचा समज असतो . आपण स्वत: उच्च शिक्षित असलो कि 'ज्योतिष 'ह्या विषयाला एकदम फालतू time pass समजणे  किंवा अंधश्रद्धा इतकेच दोन options अशा लोकांकडे असतात . मला वाटते हे मत होण्यासाठी ह्या विषयाचा बरेच वेळा झालेला चुकीचा प्रचार कारणीभूत असावा . तसेच फारसा अभ्यास न करता लोकांना भल्यामोठ्या फिया घेऊन उगाचच काहीतर सतत धार्मिक विधी / मंत्र - तंत्र सांगणारी तसेच उगचच घाबरवून सोडणारी  मंडळी कारणीभूत असावीत . ह्या विषयात काम करणारी बरीच विद्वान मंडळी पण आहेत जी अगदी मनापासून ह्या शास्त्राशी प्रामाणिक राहून योग्य मार्गदर्शन करीत असतात . परंतु अशी लोक बाकी लोक जे ह्या विषयाचा गैरवापर करतात त्यांच्यापेक्षा कदाचित कमी प्रमाणात असावेत . त्यामुळे साहजिकच ज्योतिषी म्हणजे पैसे उकळून काही बाही सांगणारा किंवा एकंदर हा विषय म्हणजे अंधश्रद्धा असेच चित्र बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर आहे . 

                  ज्योतिषशास्त्र हे 'शास्त्र'  नव्हेच फक्त अंधश्रद्धा आहे असे एक मत असते बर्याच जणाचे  . मला वाटते कि ह्यात ' शास्त्र ' हा शब्द विज्ञान (science )ह्या अर्थाने वापरलेला नाही तर तो नागरिक शास्त्र , समाजशास्त्र ह्यामध्ये जो 'शास्त्र ' ह्या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे त्या दृष्टीने वापरला असावा . शास्त्राचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ बर्याच जणांच्या पत्रिकेचा अभ्यास करून त्यातून काही नियम बनवून त्याचा analysis साठी उपयोग करणे व त्यातून मार्गदर्शन करणे हा असावा . ह्यामध्ये ग्रहांना दिलेले कारकत्व किंवा सुचकत्व हे बर्याच observation नंतर नक्की केलेले असावे असे वाटते . उदा . शुक्र हा वैवाहिक सौख्याचा ग्रह घटस्फोटांच्या पत्रिकेत बिघडलेला ( अशुभ ग्रहांच्या योगात ) आढळतो . 
           पत्रिकेतून लोकांना एक POSITIVE ATTITUDE देणे व योग्य मार्गदर्शन करणे हा ज्योतिष विद्येचा प्रमुख हेतू आहे . त्यामुळे असे मार्गदर्शन करणाऱ्यास ASTROLOGER  न म्हणता  ASTRO -COUNSELOR म्हणणे मला जास्त appropriate  वाटते .

कितीतरी गोष्टींमध्ये हे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते उदा . शिक्षण म्हणजे कोणत्या शाखेचे शिक्षण  घ्यावे .आता ह्यामध्ये त्या  व्यक्तीचा कल कोणत्या बाजूस आहे त्याची बौद्धिक क्षमता किती आहे , पुढील दृष्टीने कोणत्या क्षेत्रात काम करणे जास्त अनुकूल वाटते आहे ह्याचा पत्रिकेच्या दृष्टीने  विचार करून शिक्षण शाखा सुचवता येऊ शकते .            

आपल्याला होणारे आजार ह्याचा अंदाज पत्रिकेतून शकतो . आता ह्यावर काही जण म्हणतील कि पत्रिका बघितली कि झाले डॉक्टरांची गरजच काय ? असा लगेच प्रतिवाद करतील पण पत्रिकेतून शरीरातील कोणत्या भागाची जास्त काळजी घ्यावे एवढे कळू शकते पण आजार झाला तर डॉक्टरांना पर्याय नाहीच . समजा एखादी स्त्री जर IVF सारखी महागडी treatment घेत असेल तर ती यशस्वी होण्याच्या दृष्टीने पत्रिकेनुसार योग्य / अनुकूल काळ बघून सुचवता येतो . 

तसेच जर ARRANGED MARRIAGE असेल तर पत्रिका बघून अनुरूप जोडीदाराची निवड करता येईल येईल परंतु फक्त  गुणमिलन करू नये सखोल पत्रिका बघावी तसेच जर प्रेमविवाह असेल तर उगीचच पत्रिका बघत राहू नये . कारण अशा वेळेस लग्न करण्याचे त्या दोघांचे नक्कीच असते मग उगीचच पत्रिका बघून जुळत नसेल तर सांगूनही उपयोग  नाही . 


नोकरी करावा कि व्यवसाय तसेच कोणत्या क्षेत्रात जास्त अनुकूल आहे ह्या सर्वांचा विचार पत्रीकेतून करता येतो . आता तुम्ही म्हणाल कि पत्रिका बघितली नाही तर काय ? तर काही नाही ,कदाचित आपण न कळत योग्यच वाट निवडतो अथवा अयोग्य . पण जर चुकीची वाट निवडली तर मग बरेच कष्ट करून मनासारखे यश मिळत नाही आणि नैराश्य येऊ शकते . पण त्यातूनही जो सर्व अडचणीवर मात करतो त्याला पत्रिकेची गरज नाही. पत्रिका हे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शनाचे काम करते भविष्य घडवत नाही ते तुम्हालाच करायचे आहे योग्य प्रयत्न अधिक योग्य मार्गदर्शन बरोबर यश असे मला वाटते . 




Wednesday 16 April 2014

जुळून येती रेशीमगाठी !

जुळून येती रेशीमगाठी ! लेखाच्या नावावरून वाटले असेल तुम्हाला कि मराठी मालिकेविषयी काहीतरी आहे का ? आणि  ज्योतिष विषयक ब्लोग वर का  ? तर हे कोणत्याही मालिकेबद्दल नसून सर्वसाधारण पणे आपल्याकडे जी arranged  marriage होतात त्या विषयी आहे . बरेच जण  मुला / मुलीचे लग्न म्हटले कि ' पत्रिका बघणार आहोत ' म्हणजेच गुणमेलन झाले तरच पुढे ते ' स्थळ' बघू असे सांगतात . आता असे गुणमेलन करणे म्हणजे काय तर वधू  वराचे जन्म
नक्षत्रावरून  किती गुण जमत आहे ते पाहणे . हे पंचागात बघून लगेच काढता येते . ठराविक गुण जमले तर ठीक नाहीतर पत्रिका जुळत नाही असे म्हणून सरळ ते ' स्थळ ' reject केले जाते . आता गुणमेलानाची हि पद्धत मला तरी योग्य वाटत नाही . अशाप्रकारे पत्रिका बघण्याचा एकमेव फायदा कदाचित ' स्थळ' फारसे मान्य नसेल तर नकार द्यायला कारण म्हणून फार फार तर होईल .
मग पत्रिका बघूच नये का ? खरेतर 'जे होईल ते बघू  ,सगळीच लोक कुठे पत्रिका बघतात ? पण त्यांचे संसार होतातच न चांगले , कशाला ह्या फंदात पडा ' एकतर हा attitude चांगला पण पत्रिका बघायच्या नावाखाली फक्त गुणमेलानाला महत्व देवून 'उगाचच पत्रिका जमत नाही ' असा बाऊ करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते .
मग पत्रिका बघायचीच असेल तर काय बघायला पाहिजे ? ह्याचे उत्तर म्हणजे पत्रिका सखोल सगळ्या दृष्टीने बघायला हवी . पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे ? आयुष्य कसे आहे ? संतती सुख कसे आहे ? पत्रिकेत पुढे येणाऱ्या महादशा ह्या सगळ्या दृष्टीने कशा आहेत ? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा .
विवाह संबंधी माहिती माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये दिली आहेच.

विवाह ( सप्तम स्थान ) http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_23.html

घटस्फोट http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_9537.html

त्यामुळे मला वाटते  कि पत्रिका बघायचीच असेल तर फक्त गुणमेलन करू नका सखोल बघा त्यातूनच योग्य मार्गदर्शन होईल . 

Thursday 10 April 2014

रविची स्थानगत फले

रवि  संबंधी  माहिती आधी दिलीच आहेच .
http://anaghabhade.blogspot.in/2014/01/blog-post_26.html
( पत्रिकेतील रवि )

स्थानगत ग्रहाच्या फलांचा अभ्यास केला तरी तो ग्रह  कोणत्या स्थानांचा अधिपती ( lord ) आहे . कोणत्या राशीत आहे . अजून कोणत्या ग्रहांशी युती किंवा योग करत आहे ह्यावर त्याचे फलित अवलंबून असते .परंतु ह्या सगळ्याची प्रथम पायरी म्हणून स्थानगत फले अभ्यासायला हवीत .


पत्रिकेतील रवीच्या स्थानावरून सर्वसाधारण सर्वसाधारण पणे जन्मवेळेचा अंदाज येतो किंवा किती वाजता जन्म आहे ह्यावरून रवि पत्रिकेत कोणत्या स्थानात असेल ह्याचा अंदाज बांधता येतो म्हणजे जर प्रथम  रवि असेल तर सकाळी ६ ते ८ या दरम्यान जन्म असतो . व्यय स्थानी रवि असेल तर ८-१० या दरम्यान जन्म असतो . लाभ स्थानी रवि असेल तर सकाळी ८ ते १० या दरम्यान जन्म असतो.दशमस्थानी दशमस्थानीअसेल तर १० ते १२  दुपारी जन्म . नवम स्थानी असेल तर १२ते दुपारी २ मध्ये जन्म , अष्टमात असेल तर २-४ दुपारी  जन्म , सप्तम स्थानी असेल तर ४-६ संध्याकाळी जन्म , षष्ठ स्थानात असेल तर संध्याकाळी ६-८ मध्ये जन्म , पंचमात असेल तर रात्री ८-१० मध्ये जन्म , चतुर्थात असेल तर रात्री १२-२ मध्ये जन्म , तृतीय स्थानात असेल तर २-४ रात्रीचा जन्म व द्वितीय स्थानात ४-६पहाटेचा जन्म असे अनुमान घेता येते . 

पत्रिकेत रवि ज्या राशीत असतो त्यालाच sunsign असे म्हणतात . उदा . जर कर्क राशीत रवि असेल तर तुमची sunsign cancer आहे असे म्हणतात . पाश्च्यात्य  ज्योतिषशास्त्रात sunsign ला महत्व दिले आहे . लिंडा गुडमन चे sunsign वरील पुस्तक तर प्रसिद्ध आहेच. राशिगत रवीच्या अभ्यासाकरता हे पुस्तक चांगले आहे .

कोणत्याही ग्रहाचा राशिगत अभ्यास करण्याकरता त्या राशीचे गुणधर्म अधिक ग्रहाचा स्वभाव असे मिश्रण केले कि अंदाज येतो . तसेच स्थानगत फला  करता त्या स्थानावरून बघण्यात येणाऱ्या गोष्टी तसेच त्या ग्रहाचा स्वभाव व कारकत्व ह्याचे मिश्रण केले कि साधारण फलाचा अंदाज येतो .

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ठरण्यात त्याची त्याची लग्न रास , चंद्र रास आणि सूर्य रास ( sunsign )  गोष्टींचा महत्वाचा वाटा  असतो .

रविवरून पिता , सरकारी कामे / कर्मचारी , स्वाभिमान , गर्व , अधिकार ,अधिकारी व्यक्ती प्रतिकारशक्ती ,हृदय , पाठ,डोळ्यांचे आजार इ. गोष्टींचा विचार केला जातो .

आपण रवीची ची स्थानगत फले बघुयात . 

प्रथम स्थानात रवि असता : प्रतिकारशक्ती चांगली असते . भरपूर आत्मविश्वास असतो . समाजात मान असतो . 

द्वितीय स्थानात रवि असता : द्वितीय स्थान हे कुटुंब , धन स्थान आहे . ह्या स्थानावरून डोळे , घसा ह्या अवयव बघितले जातात . इथे रवि पापग्रहांबरोबर ( शनि,हर्शल,मंगळ , राहू )असेल तर डोळ्यांचे ,दातांचे 
किंवा घशाचे आजार असण्याची शक्यता असते . पापग्रहांबरोबरचा रवि आर्थिक नुकसान पण करतो . रवि-गुरु युती आर्थिक प्रगती दाखवते . 

तृतीय  स्थानात रवि असता : हे पराक्रम स्थान आहे . इथे असणारा रवि पण आत्मविश्वास चांगला देतो . 

चतृर्थ  स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. इतर ग्रहांच्या योगाप्रमाणे फळे मिळतात . पापग्रहांबरोबर असता चतुर्थ स्थानाची फारशी चांगली फळे मिळत नाहीत 

पंचम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या ,कला,उपासना  इ. गोष्टी बघतात. ह्या स्थानातील रवि पापग्रहांच्या योगात नसता संतती सुखास चांगला असतो . 

षष्ठ स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात. रवी हा सरकारी नोकरीचा कारक ग्रह आहे त्यामुळे बर्याच वेळा अशा नोकरीत अधिकार योग देतो . ह्या स्थानावरून आजारपण बघितले जाते त्यामुळे रवि पापग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात किंवा प्रतियोगात असता त्या ग्रहांप्रमाणे आजाराचे स्वरूप ठरते . उदा . रवि- मंगळ युती हाडे मोडणे किंवा उष्णतेचे विकार देऊ शकते .

सप्तम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ.बघतात . जोडीदार मानी असतो . बर्याच वेळाग्रहांबरोबर असलेला रवि वैवाहिक सौख्य देत नाही विशेषत: बायाकांच्या पत्रिकेत रवि , मंगळ पापग्रहांच्या योगात असतील तर वैवाहिक सौख्य फारसे चांगले नसते . 

अष्टम स्थानात रवि असता : प्रतिकार शक्ती कमी असते . बर्याच वेळा अष्टमातील ग्रह बर्याच वेळा  मनस्ताप देतात . सरकार दरबारी SUPPORT न करणारा इथला रवि आहे . 

नवम स्थानात रवि असता : हे भाग्य स्थान आहे तसेच परदेश गमन पण ह्या स्थानावरून बघतात . हे स्थान रवीच्या दृष्टीने सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यात मदत करणारे आहे . 

दशम स्थानात रवि असता : हे स्थान रविकरता एक शुभ स्थान आहे . इथला रवि नोकरीत विशेषत: सरकारी नोकरीत चांगला हुद्दा  आणि मान असतो . सत्त्तेत असणार्यांन करता पण हा रवि शुभ फले देतो . 

एकादश / लाभ स्थानात रवि  असता : एकंदरच लाभातील ग्रह  आर्थिक दृष्ट्या शुभ फळे देतात . लाभ स्थानातील रवि आर्थिक लाभास चांगला . इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा आहे . 

व्यय / द्वादश स्थानात रवि असता : इथला रवि पाप ग्रहांच्या योगात असेल तर आर्थिक नुकसान , डोळ्यांचे त्रास आणि बंधनयोग देणारा आहे . 

इथे रवीची स्थानगत फले जरी दिली असतील तरी  ढोबळमानाने अंदाज येण्यासाठीच त्याचा उपयोग जास्त आहे .कोणत्याही  ग्रहाची फले हि त्याच्या महादशेत व अंतर्दशेत प्रामुख्याने मिळत असतात . तसेच स्थानगत फलांपेक्षा त्याचे इतर ग्रहांशी होणारे योग जास्त प्रभावी वाटतात . 
महादशेच्या interpretation करता कृष्णमुर्ती पद्धती मला जास्त प्रभावी वाटते . त्याबद्दल पण पुढे लिहिण्याचा विचार आहेच . 


Thursday 3 April 2014

ज्योतिष शास्त्र का , कशासाठी ?

ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ? हा प्रश्न बर्याच वेळा लोकांना पडतो . मला पण हाच प्रश्न पडला होता . आमच्या  घरात  म्हणजे माहेरी पत्रिका , ज्योतिष वगेरे विषय फारसे कधी ऐकले नव्हते अगदी नाही म्हणायला माझे पणजोबाना जे माझ्या जन्माच्या आधीच वारले , ह्या विषयात रस होता व त्यांचा त्याबाबतीत बराच अभ्यास होता असे माझ्या आजीकडून व पणजीआजीकडून ऐकले होते .  तसेच माझ्या आजीचा भाऊ म्हणजे माझे मामाआजोबाना ह्या विषयात बराच interest होता . पण अर्थातच त्यामुळे  माझा ह्या विषयाशी सबंध येणे अवघडच होते .
माझ्या आई बाबांचा लग्नात साधारण जी पत्रिका बघितली जाते म्हणजे गुणमिलन करता तेवढाच सबंध !  ( जे आता कळतंय कि ' किती गुण जमले ' हे फारसे महत्वाचे नाही . पत्रिका बघायचीच असेल तर सखोल बघितली पाहिजे म्हणजे ग्रहयोग , महादशा वागेरेचा निट अभ्यास केला पाहिजे . नुसते अमके गुण जमले ह्याला तसा फारसा अर्थ नाही . ) त्यामुळे घरात ह्या विषयाची अजिबात चर्चा होत नसे .

माझे  लग्न झाले नंतर  काही काळ इथे नोकरी मग नवर्याच्या जॉब मुळे  अमेरिकेत बरीच वर्षे होते आणि आधीच्या लेखात उल्लेख केला तसा भारत भेटी करता एकदा आले असताना शरद उपाध्ये ह्यांचा 'भविष्यावर बोलू काही ' हा कार्यक्रम  बघण्यात आला आणि मग ह्या विषयाकडे माझे लक्ष गेले . तेव्हा मला 'ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ?' हा प्रश्न पडला . एक म्हणजे जर पूर्ण ज्योतिष शास्त्र हे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे ह्याचा अर्थ कि आपण चांगले कर्म केले कि चांगलीच फले  मिळणार आणि जे नशिबात आहे ते होणारच असेल तर मग कशासाठी पत्रिका / ज्योतिष बघायचे ? पण त्याच वेळेस  मग अतिशय साधी सरळ , कधी कोणाचे वाईट न केलेली माणसे आणि त्यांची काही दुखे: मला जास्त प्रकर्षाने दिसू लागली . उदाहरणच द्यायचे झाले तर माझा सख्खा  मामा ऑफिस म्हणून जायला बाहेर पडला ,एका ट्रक च्या धडकेमुळे त्याचा अपघात झाला व त्यातून तो वाचू शकला नाही . त्यावेळेस माझा मामेभाऊ अवघा ४-५ वर्षांचा होता . आजी ,  आजोबा ,मामी आणि घरातले इतर ह्या सर्वांना  हा धक्का खूप मोठा होता . ह्या घटनेचा  जेव्हा विचार करते तेव्हा सतत का बरे असे झाले ? माझ्या आजी-आजोबांनी , मामीनी असे काय बिघडवले होते कोणाचे ? माझ्या मामेभावाकडून  का देवाने पित्याचे सुख हिरावून घेतले असे प्रश्न पडतात . त्यावेळेस वाटते कि नुसती ह्या जन्मी केलेली चांगली कर्मे पुरेशी नसावीत त्या पलीकडेही काही आहे . कदाचित असा विचार करून आपण आपलीच समजूत घालतोय असाही विचार मनात आला . 

अशी बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर घडत असतात . कोणाला खूप प्रयत्न करून मुल  न होणे , कोणाचे जोडीदाराशी न पटणे सतत भांडणे होत राहणे मग घटस्फोट , मनस्ताप होणे, कोणाला सतत आर्थिक प्रोब्लेम्स असणे , शिक्षण आणि पात्रता असतांना मनासारखा जॉब न मिळणे इ. 

अर्थात आपले माणूस आपल्याला कायमचे सोडून जाणे हे जगातले सगळ्यात मोठे दुख: आहे असे मला वाटते . 
काही गोष्टी आपल्या हातात नसतात काही भोग भोगल्याशिवाय सुटका नाही हे खरेच परंतु काही गोष्टी आपल्याला सुधारता येऊ शकतील का ? असे  वाटू लागले . उदा नोकरी , व्यवसाय , जोडीदाराची निवड , काहि टाळता येण्यासारखे आजार , काही मानसिक त्रास इ. 

जेव्हा उत्सुकतेपोटी का होईना सुरुवातीला जेव्हा ह्या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हा जाणवले कि पत्रिका म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या पाप/ पुण्याचा आराखडा आहे . जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पत्रिकेशी ताडून बघता त्याची उत्तरे सापडू लागतात  . उदा वैवाहिक सौख्य नसणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र ,सप्तम स्थान , सप्तमेश ,   बिघडलेले असणे म्हणजे पापग्रहाच्या युतीत  केंद्रयोगात ,  प्रतियोगात असणे तसेच महादशा पण सप्तम स्थानाला म्हणजे वैवाहिक सौख्याला विरोध करणार्या षष्ठ आणि व्यय स्थान प्रामुख्याने देणाऱ्या आढळतात . ह्याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रात  जे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुक्राचे कारकत्व सांगितले आहे तसेच सप्तमेश आणि सप्तम स्थान ह्यांचे महत्व पटते . 

मग अशावेळेस विवाहासाठी पत्रिका बघताना नुसता गुण मिलनाचा विचार पुरेसा नाही त्य पत्रिकेत वैवाहिक सौख्य  आहे कि नाही हे बघणे महत्वाचे आहे तसेच मग संतती सूख  , वयोमर्यादा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे . 
आता पत्रिका बघून काय होणार जे व्हायचे ते तर होणारच आहे न असा प्रश्न पडतो त्यावेळेस कदाचित विवाह जुळवतना 
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग पत्रिका जुळते आहे का ते पहिले तर कदाचित एखादा घटस्फोट टाळता येऊ शकतो . 

अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर ,आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत मुल होण्याचा योग आहे परंतु abortion होणे 
किंवा एखाद्या treatment ला यश न मिळणे वगेरे गोष्टी होत  असतात.अशावेळेस मानसिक, शाररीक आणि आर्थिक दृष्टीने नुकसान होत असते . तेव्हा दशा / अंतर्दशा जेव्हा अनुकूल असेल तेव्हा प्रयत्न करा असे सांगता येते . 

पत्रिकेतील एकंदर ग्रहस्थिती ,महादशा ह्यांचा विचार करून शिक्षणाची शाखा सुचवता येते . तसेच एखाद्याला योग्य नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र सुचवता येऊ शकते . कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत  मार्गदर्शन मिळू शकते तसेच आत्ताचा काळ चांगला नसला तरी पुढचा काळ चंगला आहे प्रयत्न करत राहा हा आशावाद पत्रिकेतून मिळू शकतो किंवा एखादी गोष्ट मनासारखी घडणार नसेल तर ती accept करण्याची मानसिक तयारी होऊ शकते . 

एकंदर  ज्योतिषी पत्रिकेतून कौन्सेलिंगच करत असतो असे म्हणणे गैर ठरणार नाही . आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान साठवले आहे त्याचा सुयोग्य वापर करून जीवन नक्कीच सुसह्य बनवता येईल . 

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे अयोग्यच आणि  प्रत्येक गोष्टीचा पत्रिकेशी सबंध लावणे पण मला योग्य वाटत नाही . 
प्रयत्न तर करावेच लागतात त्याला पर्याय नाही परंतु प्रयत्नांची दिशा मात्र ह्यातून सापडू शकते .  जिथे अडचणी आहेत 
प्रोब्लेम्स आहेत confusions आहेत अशावेळेस ज्योतिष शास्त्राचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो असे मला वाटते . 





Monday 31 March 2014

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !






नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे जावो . 
सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत . 
गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! 




Saturday 22 March 2014

गुरूची स्थानगत फले

गुरु ग्रहासंबंधी  माहिती आधी दिलीच आहेच .
http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html ( पत्रिकेतील गुरु ) 

स्थानगत ग्रहाच्या फलांचा अभ्यास केला तरी तो ग्रह  कोणत्या स्थानांचा अधिपती ( lord ) आहे . कोणत्या राशीत आहे . 
अजून कोणत्या ग्रहांशी युती किंवा योग करत आहे ह्यावर त्याचे फलित अवलंबून असते .
परंतु ह्या सगळ्याची  पायरी म्हणून स्थानगत फले अभ्यासायला हवीत .

 आपण गुरूची स्थानगत फले बघुयात . 

प्रथम स्थानी गुरु असता : प्रथम स्थानी गुरु असता त्याची दृष्टी ५,७,९ ह्या स्थानावर पडते . त्यामुळे अनुक्रमे संतती , विवाह , भाग्य ह्या स्थानावर गुरूची शुभ  दृष्टी येते .प्रथम स्थानी असणारा गुरु व्यक्तीस स्थूल बनवतो . तसेच गोरा रंग असणे हे पण  गुरूचेच फल आहे . ह्या स्थानातील  गुरु समाजिक कार्याची आवड निर्माण करतो .

द्वितीय स्थानी गुरु असता : द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे तसेच धन स्थान पण आहे . ह्या स्थानातील गुरु मोठ्या कुटुंबात जन्म दाखवतो . पैशांच्या दृष्टीने गुरु आर्थिक स्थिती चांगली ठेवतो . द्वितीय स्थानातील ग्रहांवरून कोणत्या पदार्थांची आवड आहे हे समजते . गुरु मुळे  गोड पदार्थ खाण्याची आवड असते . 

तृतीय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून भावंडे, लिखाण इ. ह्या स्थानात गुरु असता त्याची दृष्टी विवाह व लाभ स्थानावर पडते जी ह्या दोन्ही स्थानाच्या दृष्टीने शुभ असते . ह्या स्थानातील गुरु  अभ्यासू वृत्ती देतो तसेच घरात पण ह्या व्यक्तींना महत्व असते . अक्षर गुरूमुळे सुंदर असण्याचीअसण्याची  पण शक्यता असते . भावंडे जास्त असतात . अर्थात आजकाल '  एक या दो बस ! ' असे असताना ह्या गुरूच्या फलाच  पडताळा येणे कठीण ! 
हे छोट्या प्रवासाचे स्थान आहे त्यामुळे असे प्रवासास गुरु चांगला . 

चतुथ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. विचार करतात . ह्या स्थानातील गुरु मातृ  सुख , गृहसौख्य चांगले देतो . शुक्रा बरोबर असेल तर वाहन सौख्य पण छान असते . अशुभ ग्रहांच्या योगातील गुरु हे सगळ्या सुखात बाधा आणतो . 

पंचम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या इ. गोष्टी बघतात .  ह्या स्थानातील गुरु संतती सुखास तसेच शिक्षणाला चांगला असतो . तसेच उच्च शिक्षणाला पोषक असतो .  इथला गुरु कोणताही अभ्यास सातत्याने करण्याची वृत्ती देतो . बर्याच शिक्षकांच्या पत्रिकेत पंचमात गुरु असतो . 

षष्ठ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात . इथे गुरु असता मातुल घराण्याची  ( मामा, मावश इ. ) आर्थिक स्थिती चांगली असते . इथे बिघडलेला गुरु अपचन , पोटाचे आजार ,रक्तविकार , रक्त दोष 
डायबेटीस , यकृत ( लिव्हर ) इ. चे आजार होऊ शकतात . 

सप्तम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ. बघतात वैवाहिक सौख्यास  इथे  गुरु  चांगला असतो  .बायकांच्या पत्रिकेत चंद्र किंवा गुरु बरोबर असलेला गुरु वैवाहिक सुखास चांगला परंतु पाप ग्रहांबरोबर असलेला वाईटच . पुरुषांच्या पत्रिकेत असा शुभ योगातील गुरु पत्नी सुशिक्षित व सुस्वभावी देतो . 

अष्टम स्थानी गुरु असता : हे मृत्यू स्थान आहे . इथला एकटा  गुरु शांत मरण दाखवतो. तसेच हे बायकोचे धनस्थान आहे . त्यामुळे बायकोकडून संपतिक लाभ होतात.

नवम  स्थानी गुरु असता : हे भाग्य स्थान आहे . तसेच उच्च शिक्षणाचे स्थान आहे . इथल्या गुरु मुळे व्यक्तीची वैचारिक बैठक चांगली असते . उच्च शिक्षणासाठी हा गुरु अतिशय चांगला .स्वकष्टावर आयुष्यात यशस्वी होतात .  अध्यात्माच्या दृष्टीने पण हा गुरु शुभ फले देतो . परदेश गमानासाठी पण नवम स्थान विचारात घेतले आहे . त्यामुळे इथला गुरु बर्याच वेळा शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी देतो. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देणे , सामाजिक कार्य करणे इ. गोष्टींकडे कल  असतो . 

दशम स्थानी गुरु असता : हे स्थान कर्म स्थान आहे . पारंपारिक ज्योतिष शास्त्रात वडिलांचा विचार ह्या स्थानावरून केला आहे . हा गुरु बौद्धिक क्षेत्रात व्यवसाय / नोकरी दाखवतो . तसेच उत्तम नाव लौकिक ,मान गुरूमुळे मिळते . गुरु पितृसुख पण चांगले  देतो . एकंदर दशमातील शुभयोगातील गुरु चांगलाच असतो . 

लाभ  स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून मित्रमंडळ , सर्व प्रकारचे लाभ इ. बघतात . इथे गुरु असता चांगले सुसंस्कृत , सुशिक्षित मित्र देतो . लाभतील गुरु आर्थिक दृष्ट्या पण चांगला .तसेच गुरूची सातवी दृष्टी पंचमावर असल्याने त्या दृष्टीने पण म्हणजे संतती सुखास चांगला असतो . 

व्यय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून परदेश प्रवास ,मोक्ष त्रिकोणातील स्थानामुळे पारमार्थिक उन्नती वगेरे बघतात . इथला गुरु त्यामुळे पारमार्थिक उन्नती,  अध्यात्म साठी चांगला , हा गुरु परदेश प्रवास पण घडवून आणतो . साधारण साधारणपणे गुरु चर राशीत असता ( मेष,कर्क,तुल,मकर ) परदेशात थोड्य  काळाकरता वास्तव्य असते . द्विस्वभाव राशीत असता (मिथुन, कन्या,धनु,मीन ) परदेशात मध्यम काळाकरता वास्तव्य असते . स्थिर राशीत गुरु असता ( वृषभ  सिंह , वृश्चिक, कुंभ ) परदेशात दीर्घ  काळाकरता वास्तव्य असते . 






Tuesday 11 March 2014

पत्रिकेतील हर्षल

पत्रिकेतील इतर ग्रहांच्या बरोबरीने हर्षल हा ग्रह पत्रिकेत तितकाच महत्वाचा आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा पत्रिके सबंधित अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा जर ह्या ग्रहाकडे दुर्लक्षच झाले परंतु नंतर मात्र कळून चुकले कि हा एक महत्वाचा व काही योगात / कुयोगात अति महत्वाचा ग्रह आहे .

हर्षल म्हटले कि  विलक्षण , प्रचंड ,रूढीभाय्य इ. विशेषणे आठवू लागतात . हर्षल म्हणजे लहरीपणा, तऱ्हेवाईकपणा . हर्षल म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन , अचाट बुद्धिमत्ता , काहीतरी जगावेगळे करण्याचे धाडस . हल्ली चे सगळे वैज्ञानिक शोध हे हर्षलाच्या अमलाखाली येतात . हर्षल म्हणजे आकस्मिक घटनांचा कारक ग्रह आहे . 

हर्शल जेव्हा इतर ग्रहांच्या शुभयोगात विशेषत: नवपंचम योगात असतो तेव्हा शुभ फळे देतो  व वाईट योगात म्हणजे षडाष्टक , केंद्र , प्रतियोग व युतीत असतो तेव्हा अशुभ फळे देतो .
 बुध-हर्षल नवपंचम योग बुद्धिमत्तेच्या दृष्टीने उत्तम असतो . शुक्र -हर्षल नवपंचम योग कलेच्या दृष्टीने उत्तम असतो .
थोडक्यात सांगायचे तर हर्षल ज्या ग्रहाच्या नवपंचम योगात असतो त्या ग्रहाचे कारकात्वातील चांगले गुण वृद्धिंगत करतो . ज्या ग्रहांच्या युतीत किंवा अशुभ योगात असतो त्या ग्रहाच्या कारकत्वात नुन्यता आणतो . उदा शुक्र- हर्षल युती 
शुक्र- हर्षल प्रतियोग व केंद्र योग  वैवाहिक सुखाच्या दृष्टीने वाईटच . बर्याच वेळा घटस्फोटाच्या पत्रिकेत शुक्र - हर्षल ह्या  ग्रहांचा एखादा तरी कुयोग सापडतो . ( लगेच कोणाच्या पत्रिकेत असा कुयोग असेल तर घटस्फोट होणारच असे नका सांगू  बर का , कारण महादशा पण खूप महत्वाच्या असतात ह्याबाबतीत ) 

हर्षलची ढोबळमानाने फळे खालील प्रमाणे आहेत . 

प्रथमस्थानी हर्षल असता थोडा विक्षिप्त स्वभाव असण्याचा संभाव असतो . 

द्वितीयस्थानी  हर्षल असता अचानक उद्भवणारे खर्च किंवा आर्थिक संकटे येऊ शकतात . तसेच ह्यास्थानातील हर्षल 
असणाऱ्या व्यक्ती बोलण्यात फटकळ असण्याची शक्यता असते . 

तृतीयस्थानी हर्षल असता  उत्तम आकलन शक्ती , स्मरणशक्ती असते . 

चतुर्थस्थानी हर्षल असता मातृसौख्य व गृहसौख्य चांगले मिळत नाही बर्याच वेळा भांडणे होण्याचा संभाव असतो . 

पंचम स्थानी हर्षल असता बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगला असतो . प्रथम व नवम स्थानी बुध , गुरु सारखे ग्रह असतील तर आकलन शक्ती व बुद्धिमत्ता चांगली असते . बायकांच्या पत्रिकेतील हर्षल abortions , delivery च्या वेळेस काही त्रास दाखवतो . 

षष्ठ स्थानी हर्षल असता अचानक उद्भवणारे आजार दाखवतो . कोणत्या ग्रहाच्या योगात हर्षल आहे त्यावर आजार अवलंबून असतो . उदा . मंगळा बरोबर असता उष्णतेचे विकार ,भाजणे ,मूळव्याध इ. 

सप्तम स्थानी हर्षल असता वैवाहिक सुखाला फारसा चांगला नसतो .  विवाह ठरण्यात  अडथळे येतात . ठरलेले लग्न मोडणे हा पण प्रकार होतो . 

अष्टम स्थानी हर्षल असता अकस्मात मृत्यू येण्याची शक्यता असते . 

नवम स्थानी हर्षल असता प्रदेश प्रवासाचे योग येतात . बर्याच वेळा ज्या माणसाना परदेश प्रवास करावा लागतो ( frequent flyer ) अशा लोकांच्या पत्रिकेत ह्या स्थानी हर्षल असण्याची शक्यता जास्त असते . 

दशम स्थानी हर्षल असता बर्याच वेळा नोकरी/ व्यवसायात बदल होतात . शुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात चांगली प्रगती दाखवतो तर अशुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात/ नोकरीत अडचणी दाखवतो. 

एकादश स्थानी हर्षल असता मित्रांशी पटत नाही . आर्थिक बाबतीत स्थिरता देत नाही . 

द्वादश स्थानी हर्षल पाप ग्रहांबरोबर असता वाईटच असतो . भांडणे ,मारामाऱ्या होण्याचा तसेच समाजात नाव खराब होण्याची शक्यता असते . 

वर  दिलेली सर्व हर्षलाची स्थानगत फळे ढोबळ मानाने दिलेली आहेत. मुख्यत्वे हर्षला चा कोणत्या ग्रहाशी योग होत आहे
त्यावरूनच जास्त अंदाज बांधता येतो .

हर्षल कुंभ राशीत चांगली फळे देतो . हर्षाल हा ग्रह विज्ञानाचा पुरस्कार करणारा ग्रह आहे तसेच कुंभ हि रास पण बौद्धिक रास असल्याने research वगेरे दृष्टीने फार चांगले .






Friday 28 February 2014

पत्रिकेतील नेपच्युन

 नेपच्युन हा ग्रह पृथ्वीपासून खूप लांब आहे . नेपच्यून म्हणजे गूढता , कल्पना शक्ती , intuition power,तरलता ,हळुवारपणा ,संवेदनक्षमता ,भावनाशीलता,कोमलता.

 नेपच्यूनला स्वत:ची रास नाही . परंतु जलराशीतील नेपच्यून जास्त प्रभावी असतो .जे ज्योतिषी पत्रिकेचा फारसा analysis न करता भविष्य सांगतात/ अंदाज वरतवतात आणि ज्यांचे अंदाज खरे होतात त्या ज्योतिषांच्या पत्रिकेतील नेपच्युन प्रभावी असतो ज़े ज्योतिषी पत्रिकेचा व्यवस्थित analysis करून भविष्य सांगतात/ अंदाज वरतवतात आणि ज्यांचे अंदाज खरे होतात त्या ज्योतिषांच्या पत्रिकेतील बुध जास्त  प्रभावी असतो असे म्हणायला हरकत नाही.

सूचक स्वप्ने पडणार्यांच्या पत्रिकेत पण नेपच्यून प्रभावी असतो.

प्रथम स्थानातील नेपच्यून व्यक्तीस भावनाप्रधान बनवतो . 

द्वितीय स्थानात असता गूढ मार्गाने धनार्जन ,

 तृतीय स्थानी  असता उत्तम कल्पना शक्ती देतो लेखक किंवा कवींच्या पत्रिकेत तृतीयातील नेपच्यून त्या विषयात उत्तम प्रगती दाखवतो . 

चतुर्थ स्थानात पाप ग्रहांबरोबर असता  गृहसौख्य देत नाही . 

 पंचमात नेपच्यून असेल तर सूचक स्वप्ने पडणे ( intuition ) ह्याची शक्यता जास्त  असते. पंचमात नेपच्यून असणाऱ्या व्यक्ती खूप भावनाप्रधान असतात .तसेच नेपच्यून हा गुढतेशी संबंधित ग्रह असल्याने पंचमात असता पंचम हे विद्या स्थान असल्यामुळे गूढ विषयाचा अभ्यास पण करण्याकडे कल असतो उदा . ज्योतिष , तंत्र मंत्र विद्या , जादू  इ .
 शुक्र- नेपच्यून शुभ योग हे कलेत प्रगती दाखवतात  . नेपच्युन वेगवेगळ्या music instruments शिकण्यात विशेष करून तंतू वाद्य म्हणजे गिटार ,सतार , व्हायोलीन इ.पंचमातील नेपच्यून उच्च प्रतिभाशक्ती देतो .

षष्ठ स्थानातील नेपच्यून गूढ , अनाकलनीय आजार देण्याची शक्यता असते  . 

सप्तमातील नेपच्यून इतर कुयोग असता वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही . 

अष्टमात असता गूढ मरण येण्याची शक्यता  असते म्हणजे कशामुळे मरण आले ते काळातच नाही . चुकीच्या औषधामुळे येणारे मरण , विषप्रयोगामुळे , गुदमरून मरणे इ. गोष्टी यात होतात .

नवम स्थानातील नेपच्यून जलप्रवास दाखवतो . आजकाल लोक विमान प्रवास करत असल्याने समुद्रावरून  प्रवास असे म्हणता येईल . थोडक्यात म्हणजे 'परदेशप्रवास ' .तसेच नवमातील नेपच्यून जर गुरूशी नवपंचम योग करत असेल तर चांगल्या प्रकारची अध्यात्मिक प्रगती दाखवतो . इथला नेपच्यन गूढ शास्त्र अभ्यासाला पण चांगला असतो . 

दशमस्थानातील नेपच्यून सर्वसाधारण पणे इथला नेपच्यून ह्या ग्रहावरून पहिले जाणारे व्यवसाय दाखवतो .  उदा मनोसोपचार तज्ञ , जादुगार, ज्योतिषी , कलाकार इ. अर्थात त्यासाठी पत्रिकेतील इतर योग पण पोषक असावे लागतात . 

एकादश / लाभ स्थानातील नेपच्यूनला हे स्थान फारसे चांगले नाही मैत्रीत किंवा आर्थिक लाभत फसवणूक होऊ शकते .

व्यय स्थानातील नेपच्यूनला सुद्धा हे स्थान तितकेसे चांगले नाही . बाकी पत्रिका बिघडली असल्यास शारीरिक त्रास , गुन्हेगारी, लबाड लोकांकडून त्रास दाखवतो .

कोणत्याही ग्रहाची स्थानगत फळे जरी लिहिली असली तरी ती दर वेळेस तशी मिळतिलच असे नाही . कारण प्रत्येक  ग्रहाचे इतर होणारे योग, त्या ग्रहाला मिळालेली रास , त्या ग्रहाची अवस्था  अशा इतर बर्याच गोष्टींवर ते अवलंबून असते .
बिघडलेल्या नेपच्यून वरून सर्वसाधारण पणे मानसिक आजार पहिले जातात  जसे अतिविचारने  किंवा तणावामुळे निर्माण होणारे  आजार , वेड लागणे , झोप न येणे इ. तसेच विषबाधा ह्या विषयाशी पण नेपच्यून सबंधित असतो .

ज्यांच्या पत्रिकेत नेपच्यून शुभ व बलवान आहे असे लोक  मनोसोपचार तज्ञ ,ज्योतिषी,वादक ,चित्रकार, कवी,लेखक तत्वज्ञ इ. होऊ  शकतात .

नेपच्यून चे रत्न ओपेल आहे .नेपच्यून चा थेट परिणाम आयुष्यावर होत नसल्याने महादशेत नेपच्यूनला स्थान दिलेले नाही.

Friday 14 February 2014

स्तोत्र का म्हणावीत ?


बऱ्याच लोकांना जेव्हा जेव्हा काही अडचणी येतात त्या वेळेसच पत्रिकेची आठवण होत असते . अर्थात त्यात काही फारसे चूक किंवा आश्चर्य पण नाही कारण ज्यांचे सगळे चांगले चालले आहे त्यांना कशाची गरजच नाही .

आयुष्यात प्रयत्नांना फार महत्व आहे . ज्योतिषशास्त्रात पण प्रयत्नांना खूप महत्व आहे . फक्त प्रयत्न कोणत्या काळात ,कोणत्या दिशेने करायचे ह्याचे मार्गदर्शन पत्रिकेतून मिळते . पण बर्याच वेळा प्रयत्न करूनही यश येत नाही अशावेळेस मग नैराश्य यायला लागते अशावेळेस स्तोत्रांचा खूप उपयोग होतो . स्तोत्र माणसाला एक मानसिक positivity देतात . माणसाचे मन प्रसन्न व शांत असेल तर हाती घेतलेल्या कामात यश येते मग ते शिक्षण असो नोकरी किंवा व्यवसाय .संतती विषयक प्रश्नामध्ये सुद्धा स्तोत्र म्हणून संतती होईल असे नव्हे तर जर काही medical tratment  वगेरे घेत असतील तर स्तोत्रांमुळे एक positive attitude निर्माण होतो व treatment यशस्वी होण्यास एका अर्थी मदतच होते असे वाटते . हेच logic सगळ्या बाबतीत apply होते . आजारी व्यक्ती पण काही treatment घेत असेल तर , घरात काही कलह असतील , व्यवसाय , नोकरी मध्ये काही अडचणी असतील तर स्तोत्रांमुळे  मन एकाग्र होणे , शांत होणे , positive attitude इ. गोष्टी साध्य होऊन प्रगतीच होते . आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत अशा गोष्टीना सामोरे जाण्याची मानसिक ताकद पण स्तोत्रामुळे मिळते .

कोणती स्तोत्रे म्हणावीत हे खरे तर प्रत्येकाचा वैयक्तिक choice आहे परंतु आपल्या कुलदेवतेची उपासना जरूर करावी त्या व्यतिरिक्त नवग्रह स्तोत्र हे ग्रहपीडा होऊ नये म्हणू व महलक्ष्मि अष्टक हे आर्थिक स्थैर्या  करता म्हणतात . हि दोन्हीही स्तोत्रे मला स्वत: ला आवडतात . स्तोत्रे लहान आहेत व पटकन म्हणून होतात म्हणजे ज्यांना वेळ नाही त्यांना पण दिवसभरातून ३-४ मिनिटे वेळ नक्कीच काढता येईल   .अथर्वशीर्ष पण मला खूप आवडते . मला स्तोत्रांविषयी फारशी माहिती नाही परंतु जो काही थोडासा अनुभव आहे तो लिहिला आहे .

मी वर म्हटले तसे प्रयत्नांना सगळ्यात जास्त महत्व आहे infact ते योग्य प्रकारे करता येण्याचे सामर्थ्य स्तोत्रांमुळे मिळते .माणसाला अहंकार राहत नाही .

स्तोत्रांहून जास्त महत्व खरेतर चांगल्या कर्माना आहे .

जे आयुष्य दिले आहे त्यातले सगळे बरे ,वाईट भोग काही तक्रार न करता भोगणे हे उत्तम  परंतु  हे सामान्य माणसाला शक्य होत  नाही ते अध्यात्मिक प्रगती झालेल्या व्यक्तीसच शक्य आहे . सामान्य माणूस हा आज पेक्षा उद्याचा दिवस कसा आनंदात जाईल किंवा मुले,जोडीदार , नातेवाईक , मित्र मंडळी ह्यांच्यासाठी कायमच काहीतरी मागत असतो .

नवग्रह स्तोत्र व महलक्ष्मी अष्टक  इथे देत आहे .

नवग्रह स्तोत्र : 

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम् I 
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् II १ II 

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् I 
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् II २ II 

धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I 
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II ३ II 

प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् I 
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् II ४ II 

देवानांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम् I 
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् II ५ II 

हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् I 
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् II ६ II 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I 
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II ७ II 

अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् I 
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् II ८ II 

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् I 
रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् II ९ II 

इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः I 
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति II १० II 

नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम् I 
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् II ११ II 

ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः I 
ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः II १२ II 

II इति श्रीव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं I



महालक्ष्मी अष्टक 


नमस्तेऽस्तु
महामाये

श्रीपीठे

सुरपूजिते

शङ्खचक्रगदाहस्ते
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥१॥

नमस्ते
गरुडारूढे
कोलासुरभयंकरि

सर्वपापहरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥२॥

सर्वज्ञे
सर्ववरदे
सर्वदुष्टभयंकरि

सर्वदुःखहरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥३॥

सिद्धिबुद्धिप्रदे
भुक्तिमुक्तिप्रदायिनि

मन्त्रमूर्ते
सदा
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥४॥

आद्यन्तरहिते
आद्यशक्तिमहेश्वरि

योगजे
योगसम्भूते
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥५॥

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे
महाशक्तिमहोदरे

महापापहरे
महाशक्तिमहोदरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥६॥

पद्मासनस्थिते
देवि
परब्रह्मस्वरूपिणि

परमेशि
जगन्मातर्महालक्ष्मि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥७॥

श्वेताम्बरधरे
देवि
नानालङ्कारभूषिते

जगत्स्थिते
जगन्मातर्महालक्ष्मि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥८॥

महालक्ष्म्यष्टकं
स्तोत्रं
यः
पठेद्भक्तिमान्नरः

सर्वसिद्धिमवाप्नोति
राज्यं
प्राप्नोति
सर्वदा
॥९॥

एककाले
पठेन्नित्यं
महापापविनाशनम्

द्विकालं
यः
पठेन्नित्यं
धनधान्यसमन्वितः
॥१०॥

त्रिकालं
यः
पठेन्नित्यं
महाशत्रुविनाशनम्

महालक्ष्मिर्भवेन्नित्यं
प्रसन्ना
वरदा
शुभा
॥११॥