Title

Astrology Blog by Anagha Bhade


Sunday 12 January 2014

पत्रिकेतील ग्रहयोग भाग-२.


मागील लेखात आपण पत्रिकेतील काही ग्रहयोग पाहिले . ह्या लेखात केंद्र योग , प्रतियोग , षडाअष्टक योग ह्या  ग्रहयोगांची माहिती घेऊ .

केंद्रयोग : 
हा एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . नैसर्गिक अशुभ ग्रहांचे केंद्र योग जास्त अशुभ समजले जातात .
ह्या ह्यायोगात व्यक्तींला  यश मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात . कोणत्या दृष्टीने ह्याचे फळ मिळेल ते त्या ग्रहांवर तसेच त्याच्या कारकात्वावर अवलंबून असते .
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण ९० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून चवथ्या व दहाव्या स्थानात असतात तेव्हा ते केंद्र योगात असे म्हटले जाते .

उदा . जर मेष लग्न आहे . मेषेत १० अंशावर मंगळ  आहे व चतुर्थात कर्केत १० अंशावर शनि आहे . तर शनि - मंगळ केंद्र योग आहे असे म्हणतात . आता इथे हा शनि - मंगळ अंशात्मक दृष्टीअधिष्टीत केंद्र योग आहे . कारण मंगळाची चौथी दृष्टी शनि वर व शनीची दहावी दृष्टी मंगळावर आहे म्हणून याला दृष्टीअधिष्टीत केंद्र योग म्हटले आहे . तसेच शनि मंगळ दोन्हीही ग्रह १० अंशावर म्हणजे सारख्याच अंशावर आहेत म्हणून याला अंशात्मक केंद्र योग म्हटले आहे .
तसेच जर शुक्र- हर्शल केंद्र योग असेल तर वैवाहिक सुखात अडचणी / घटस्फोट वगेरे शक्यता असते अर्थात त्यासाठी सप्तमेश व सप्तम स्थानपण पहिले पाहिजे . शुक्र-  हर्शल नवपंचम योग उलट कलेत प्रगती , प्रेमविवाह  वगेरे दाखवतात .

प्रतियोग : 
हा एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . नैसर्गिक अशुभ ग्रहांचे प्रतियोग योग जास्त अशुभ समजले जातात . 
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण १८० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून  सातव्या  स्थानात असतात तेव्हा ते केंद्र योगात असे म्हटले जाते . 

उदा . जर  वृषभ  लग्न आहे . वृषभेत २० अंशावर शुक्र आहे व  सप्तमात  वृश्चिक राशीत २० अंशावर मंगळ आहे . तर शुक्र  - मंगळ प्रतियोग योग आहे असे म्हणतात. 

षडाअष्टक योग :

हा सुद्धा  एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . 
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण १५० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून  सहाव्या व आठव्या स्थानात असतात तेव्हा ते षडाअष्टक योगात आहेत असे म्हटले जाते . 


उदा . जर  मिथुन  लग्न आहे . मिथुनेत  ५ अंशावर बुध आहे व  षष्टात  वृश्चिक राशीत  ५ अंशावर मंगळ आहे . तर बुध - मंगळ षडाअष्टक योगात आहेत असे म्हटले जाते . 

वरील सर्व  योग हे त्यातील ग्रहाच्या कारकत्वाला बाधा / न्यूनता आणणारे आहेत . जसे वर उदाहरण दिले आहे शुक्र- हर्षल केंद्रयोग किंवा प्रतियोग हा वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हानी करणारा असतो . 
आता ह्या ग्रहांमध्ये जर एखादा किंवा एकाहून अधिक ग्रह वक्री असतील तर मग अशुभत्वात अजूनच भर पडते असे वाटते . 

मागे म्हटल्याप्रमाणे ग्रहयोगांमुळे पत्रिकेचा दर्जा ठरतो . बरेच अशुभयोग असणाऱ्या पत्रिकेत त्या त्या ग्रहांच्या काराकात्वामुळे ते सुख लाभत नाही अथवा खूप कष्टाने आयुष्य जाते कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही . 
याचाच अर्थ अशा लोंकानी हार न मानता सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे . 

No comments:

Post a Comment