Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday 28 September 2016

राशीभविष्य ऑक्टोबर२०१६

राशीभविष्य ऑक्टोबर२०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
राशीभविष्य अॅस्ट्रॉलॉजी कौन्सिलिंगमार्फत दिलेली आहेत.
...
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

मेष :मेष राशीचा स्वामी मंगळ नवम स्थानी, केतू लाभ स्थानी आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. तसेच प्रकृती देखील साथ देईल. द्वितीय भावाचा स्वामी शुक्र सप्तमात, राहू पंचमात, आणि रवि षष्ठात हा योग कलाकारांना व लेखकांना चांगला आहे. तृतीयेश बुध षष्ठात व रवि पण षष्ठात त्यामुळे लेखक, पुस्तक विक्रेते, शिक्षणासंबंधी व्यावसायिक ह्यांना हा महिना लाभदायक आहे. आजोळच्या नातेवाईकांशी भेटीचा योग देखील येण्याची शक्यता आहे. चतुर्थाचा स्वामी चंद्र सप्तमात व राहू पंचमात त्यामुळे घराच्या सजावटीसंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. पंचमात राहू, सप्तमात शुक्र असल्याने तरुणांना हा काळ प्रेमप्रकरणी पोषक ठरेल. काहींचे प्रेमविवाह देखील होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची मात्र आवश्यकता आहे. षष्ठात तीन ग्रह रवि, बुध, गुरु असल्याने, केवळ अस्तित्वाने, प्रकृतीला थोडाफार त्रास देऊ शकतील, मात्र आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम फळे देतील. सप्तमातील शुक्र-चंद्र वैवाहिकदृष्ट्या अतिशय उत्तम आहेत. अष्टमातील शनि आणि षष्ठातील बुध हे दोन ग्रह भागीदारी व्यवसायासाठी उत्तम आहेत. शिवाय ज्यांच्या पेन्शन अगर ग्रॅच्युइटीची कामे लांबली असतील ती मार्गी लागतील. दशमेश शनि अष्टमात व बुध षष्ठात त्यामुळे काही व्यक्तींना कामाचा ताण बराच होईल त्या जोडीला आवक देखील बरीच राहील. ह्या जोडीला शनि लाभेश पण आहे त्यामुळे वरील विधानाला पुष्टी मिळते. एकंदरीत मेष राशीला हा महिना उत्तम आहे
.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र षष्ठात आणि राहू चतुर्थात आहे. षष्ठातील शुक्र काही आजारांना आमंत्रण देण्याचा इशारा देत आहे पण पंचमातील रवि, बुध आणि गुरु हे आजारपणाला टक्कर देण्यास समर्थ आहेत त्यामुळे काळजी नसावी, तरीही सावधगिरी बाळगावी हे इष्ट. द्वितीय स्थानाचा स्वामी बुध पंचमात, तिथेच रवि आणि राहू चतुर्थात सिंह राशीत, त्यामुळे आर्थिक बाबतीत बरीच सावधगिरी बाळगावी अन्यथा फसगत संभवते. तृतीय स्थानाचा स्वामी चंद्र षष्ठात, राहू चतुर्थात आणि शुक्र पण षष्ठात त्यामुळे घरासंबंधी काही कागदपत्रांसंबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण होतील, पण घर विक्रीचा इरादा असल्यास वर सांगितल्याप्रमाणे व्यवहार सावधगिरीने करावा. चतुर्थ स्थानाचा स्वामी रवि पंचमात व चंद्र षष्ठात आणि शनि सप्तमात हे सर्व ग्रह कोणत्याही व्यवहारासंबंधी सावधगिरीचा इशारा देत आहेत. पंचमातील तीन ग्रह, रवि, बुध व गुरु, मुलांच्या प्रगतीबाबत उत्तम आहेत. तसेच कुटुंबासमवेत छोट्या-मोठ्या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन होईल. सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ अष्टमात व शनि सप्तमात असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अष्टम भावातील मंगळ आणि दशम भावातील केतू काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देण्यास कारणीभूत होतील. केतू कुंभेत असल्याने आणि मंगळ अष्टमात असल्याने व्यवसायात मानसिक ताण अगर कामात वाजवीपेक्षा जास्त बोजा येण्याची शक्यता आहे. नवम स्थानातील मकर राशीचा स्वामी शनि सप्तमात असल्याने काहींना छोटेमोठे प्रवास संभवतात. दशमातील कुंभ राशीचा स्वामी शनि सप्तमात हा योग व्यावसायिकांना चांगला आहे पण बुध पंचमात असल्याने काही व्यवहारात विलंब होण्याची पण शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जमवून घेणे योग्य. एकंदरीत हा महिना वृषभ राशीला संमिश्र आहे.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध चतुर्थ भावात त्यामुळे कुटुंबापासून लांब राहत असल्यास ह्या महिन्यात कुटुंबाच्या भेटीचे योग आहेत. प्रकृतीच्या दृष्टीने ग्रहांची स्थिती ठीक आहे. द्वितीय स्थानाचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात पंचमात आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंध असणाऱ्या व्यक्तींना हा काळ चांगला आहे. मात्र आर्थिक आवक साधारण राहील. चतुर्थाचा स्वामी बुध चतुर्थातच शिवाय रवि आणि गुरु हे दोन बलाढ्य ग्रह पण तिथेच आहेत, त्यामुळे घरातील वातावरण प्रफुल्लीत राहील. पंचम स्थानात शुक्र, चंद्र असल्याने मुलाबाळांच्या काळजीचे कारण राहणार नाही. पंचमातील शुक्र चंद्राच्या युतीत असल्याने प्रेमीजनांना हा काळ उत्तम आहे, पण थोडे जपून रहाणे उत्तम. षष्ठभावाचा स्वामी मंगळ सप्तमात आणि केतू नवमात, शनि षष्ठ भावातच त्यामुळे एकंदरीत लोक संपर्क व प्रवास आणि त्यातून आर्थिक आवक असे ज्यांच्या कामाचे स्वरूप आहे अश्या लोकांना बराच लाभ संभवतो. सप्तमात मंगळ व सप्तमेश गुरु चतुर्थात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील शिवाय सर्व कुटुंबियांसमवेत मनोरंजनासाठी प्रवास देखील घडेल. दशम भावाचा स्वामी गुरु चतुर्थ स्थानी आणि महिन्याच्या सुरुवातीला चंद्र पंचम स्थानी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना थोडं अस्थिर वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एकंदरीत चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे हा महिना चढउताराचा राहील. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना उत्तम तर व्यवसायाच्या दृष्टीने सर्वसाधारण राहील.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र चतुर्थात, तिथेच शुक्र-चंद्र युती त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. राहू सिंह राशीत आणि रवि तृतीयात असल्याने प्रकृती देखील चांगली राहील. द्वितीय स्थानाचा स्वामी रवि तृतीयात, बुध देखील तृतीयात त्यामुळे ज्यांचा व्यवसाय पुस्तके, लेखन इ. संबंधी आहे किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिवज् ह्यांना चांगली आवक राहील. तृतीय स्थानात रवि, बुध व गुरु तसेच नवमेश देखील गुरु व द्वादाशेश बुध देखील तृतीयात त्यामुळे प्रवास निश्चित आहे. कदाचित धार्मिक स्थळांच्या भेटीचा योग देखील आहे. चतुर्थ स्थानाचा स्वामी शुक्र चतुर्थातच, राहू द्वितीय स्थानात आणि रवि तृतीय स्थानात ह्याशिवाय शुक्र लाभेश त्यामुळे ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे, त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे. पंचमाचा स्वामी मंगळ षष्ठात व केतू अष्टम स्थानात कुंभ राशीत व शनि पंचमात त्यामुळे मुलांच्या बाबतीत किरकोळ काळजी करावी लागेल. षष्ठ स्थानातील मंगळ आणि अष्टमातील केतू थोडाफार उष्णतेचा त्रास दर्शवतो. तरीही पंचमातील शनिमुळे तीव्र स्वरूप होणार नाही. सप्तम स्थानाचा स्वामी शनि पंचमात असल्याने कुटुंबाशी सलोख्याचे संबंध राहतील. दशमाचा स्वामी मंगळ षष्ठात, केतू अष्टमात व शनि पंचमात त्यामुळे आर्थिक व्यवहार थोडे जपूनच करावेत. नोकरी करणाऱ्यांनी ह्या महिन्यात वरिष्ठांशी सलोख्याने वागावे. एकंदरीत हा महीना उत्तम आहे.

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि द्वितीय स्थानी, व राहू प्रथम स्थानी तसेच चंद्र महिन्याचा सुरुवातीला तृतीय स्थानी त्यामुळे प्रकृतीमध्ये चंद्रभ्रमणप्रमाणे चढ-उतार होत राहतील. द्वितीय स्थानात तीन ग्रह रवि, बुध व गुरु त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक मार्गांनी आर्थिक लाभ होत राहतील. तृतीय स्थानात शुक्र, चंद्र, शुक्र स्वराशीत त्यामुळे प्रवास आनंददायी होतील. चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ पंचमात असल्याने काही कलाकारांना त्यांच्या कलेत प्राविण्य मिळेल. पंचम भावाचा स्वामी गुरु द्वितीय स्थानात, मंगळ पंचमात त्यामुळे मुलाबाळांच्या अभ्यासातील प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. षष्ठ भावाचा स्वामी शनि चतुर्थात असल्याने काहींना जुन्या दुखण्याचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. सप्तम भावात कुंभ रास असून स्वामी शनि चतुर्थात आहे व बुध तिथेच त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. नवम भावाचा स्वामी मंगळ पंचमात आणि केतू सप्तमात त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना हा काळ चांगला आहे. दशमाचा स्वामी शुक्र तृतीय स्थानी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्याचे योग्य ते लाभ देखील मिळतील. सर्वसाधारणपणे हा महिना सिंह राशीला उत्तम आहे.

कन्या :कन्या राशीचा स्वामी बुध स्वराशीत तसेच रवि, गुरु देखील तिथेच त्यामुळे प्रकृती चांगली राहून सामाजिक स्तर देखील उत्तम दर्जाचा राहील. द्वितीय स्थानात शुक्र, चंद्र त्यामुळे आर्थिक आवक देखील मनासारखी राहील. तृतीय स्थानातील वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात असल्याने काहींच्या बाबतीत पाहुणे/नातेवाईक येण्याची शक्यता आहे. तसेच तृतीय स्थानातील शनि रविशी लाभ योग करत आहे त्यामुळे अनेक लोकांना जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. पंचम भावातील मकर राशीचा स्वामी शनि तृतीयात आणि बुध प्रथम स्थानात हा योग देखील अतिशय उत्तम आहे, मुलाबाळांच्या दृष्टीने तर उत्तम आहेच तसेच ज्यांना बुद्धिबळाची आवड आहे त्यांनी स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही. सप्तमातील मीन राशीचा स्वामी गुरु लग्नी त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. दशम भावाचा स्वामी बुध लग्नी आणि रवि देखील लग्नीच त्यामुळे काही लोकांच्या हातून भरीव सामाजिक कार्य होऊ शकते आणि त्या योगाने प्रसिद्धी देखील मिळू शकते अगर शासनाकडून विशेष दखल घेतली जाऊ शकते.एकंदरीत हा महिना कन्या राशीसाठी उत्तम आहे.

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र प्रथम स्थानीच आहे व तो चंद्राशी युती करत आहे, त्यामुळे शुक्र-चंद्र युतिमुळे तुमचे मन प्रफुल्लीत राहील. त्या जोडीला राहू लाभात आहे आणि रवि बाराव्या भावात आहे, त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. द्वितीय भावात वृश्चिक रास असून त्याचा स्वामी मंगळ तृतीयात आहे, केतू पंचमात आहे आणि कुंभेचा स्वामी शनि द्वितीय भावात आहे अश्या योगात कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अगर लेखन क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभाची बरीच शक्यता असते. चतुर्थात मकर रास असून त्याचा स्वामी शनि द्वितीय भावात आहे. बुध बाराव्या भावात आहे काही लोकांना नवीन घर खरेदीचा योग आहे. पंचमात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि द्वितीयात आहे मुलाबाळांच्या दृष्टीने, विशेषत: मुले मोठी असल्यास त्यांना नोकरी निमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. सप्तमात मेष रास असून त्याचा स्वामी मंगळ तृतीयात आहे व केतू पंचमात आहे त्यामुळे जोडीदाराशी सुसंवाद राहतील. अष्टम भावाचा स्वामी शुक्र लग्नी, राहू लाभात व रवि बाराव्या स्थानी असल्याने रिटायरमेंट संबंधी कागदपत्रे थोड्या विलंबाने मार्गी लागतील. नवमातील मिथुन राशीचा स्वामी बाराव्या भावात व रवि तिथेच त्यामुळे अनेकांना लांबच्या प्रवासाची संधी निश्चित प्राप्त होईल. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला लग्नी, नंतर द्वितीयात, तृतीयात, चतुर्थात त्यामुळे पहिल्या पंधरवड्यात नोकरी संबंधी अतिशय उत्तम काळ आहे. दुसऱ्या पंधरवड्यात रवि जेव्हा कन्येतून तुळेत जाईल, तो काळ देखील तितकाच चांगला आहे. लाभेश रवि पहिल्या पंधरवड्यात बाराव्या स्थानी आणि दुसऱ्या पंधरवड्यात प्रथम स्थानी तुळेत जाईल हा काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याचा व इतर आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. एकंदरीत तूळ राशीला हा महिना अतिशय उत्तम आहे.

वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ द्वितीय स्थानी, केतू चतुर्थ स्थानी असल्याने ह्या काळात घरासंबंधी जास्त जवळीक राहील. ज्यांचे आई-वडील परगावी असतील त्यांची गाठभेट होईल. राशीतील शनि आणि लाभातील बुध हे दोन ग्रह नोकरी अगर व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देतील. तृतीयात मकर रास असून त्याचा स्वामी शनि लग्नी आहे व बुध लाभात आहे त्यामुळे फिरतीचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. तसेच ज्यांचा व्यवसाय पुस्तकाशी संबंधित आहे (पुस्तक विक्रेते, पब्लिशर), घरगुती उपकरणांचे डिलर्स ह्यांना देखील हा काळ उत्तम आहे.चतुर्थात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि लग्नी व बुध लाभात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना देखील हा काळ चांगला आहे. पंचमात मीन रास असून त्याचा स्वामी गुरु लाभात आहे त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणासंबंधी काळजी नसावी. तसेच ज्यांचा शेअर्स अगर इव्हेन्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे, त्यांना महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे. षष्ठात मेष रास असून त्याचा स्वामी द्वितीयात आहे हा योग आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. सप्तमात वृषभ रास, वृषभेचा स्वामी शुक्र बाराव्या स्थानी व मंगळ द्वितीय स्थानी त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील, शिवाय भागीदारीचा व्यवसाय आहे अश्यांना देखील हा काळ उत्तम आहे. नवमात कर्क रास असून त्याचा स्वामी चंद्र बाराव्या भावात आहे,राहू दशमात आहे, आणि रवि लाभात आहे ह्या योगात ज्यांचे व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत,
अश्यांना उत्तम काळ आहे. एकंदरीत वृश्चिक राशीला हा महिना उत्तम आहे.

धनु :धनु राशीचा स्वामी गुरु दशमात, मंगळ लग्नी, चंद्र लाभात हे ग्रह शरीर प्रकृती उत्तम ठेवतील तसेच नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल निश्चितपणे घेतली जाईल. मंगळ लग्नी असल्याने उत्साह कायम राहील. द्वितीय स्थानात मकर रास असून त्याचा स्वामी शनि बाराव्या स्थानी आहे व बुध दशमात आहे त्यामुळे आर्थिक आवक उत्तम राहील. तृतीयात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि बाराव्या स्थानी आहे आणि बुध दशमात आहे त्यामुळे कामानिमित्त प्रवास होण्याची बरीच शक्यता आहे. चतुर्थात मीन रस असून त्याचा स्वामी गुरु दशमात आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम काळ आहे, तसेच घरासंबंधीकामे मार्गी लागतील. पंचमाचा स्वामी मंगळ लग्नी आणि केतू तृतीय स्थानी त्यामुळे मुलाबाळांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक राहील. षष्ठात वृषभ रास, वृषभेचा स्वामी शुक्र लाभात, राहू नवमात आणि रवि दशमात ह्या योगात आर्थिकदृष्ट्या हा काळ उत्तम राहील व नोकरीतील दर्जा उंचावत राहील. सप्तमात मिथुन रास असून मिथुनेचा स्वामी बुध दशमात व रवि पण दशमात ह्या योगात कामाच्या ताणामुळे जोडीदाराकडे लक्ष कमी राहील.नवमात सिंह रास असून त्याचा स्वामी रवि दशमात, शनि बाराव्या स्थानी त्यामुळे कामानिमित्त प्रवासास दुजोरा मिळतो. दशमातील तीन ग्रह रवि, बुध व गुरु नोकरी अगर व्यवसायातील तुमचा दर्जा वाढवण्यास मदत करतील. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवि दशमातून लाभात जाईल त्यावेळी बराच आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना धनु राशीला बराच फायदेशीर ठरेल असे दिसते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी आहे व बुध नवम स्थानी आहे, शरीर प्रकृती उत्तम राहील असे दिसते. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक प्रकारचे लाभ संभवतात. द्वितीयात कुंभ रास असून त्याचा स्वामी शनि लाभात व बुध नवमात आहे, द्वितीयाशी संबंध असल्याने बरेच आर्थिक लाभ होतील. तृतीय स्थानाचा स्वामी गुरु नवमात, चंद्र दशमात व मंगळ बाराव्या स्थानी हा निश्चितपणे लांबच्या प्रवासाचा योग आहे, परदेश प्रवासाच्या तयारीला लागा!! चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ बाराव्या स्थानी व शनि लाभ स्थानी हा योग नवीन घर खरेदीसाठी उपयुक्त आहे. पंचमाचा स्वामी शुक्र दशमात स्वराशीत, राहू अष्टमात सिंह राशीत अभिनय क्षेत्रातील लोकांना हा योग अतिशय उत्तम आहे. तसेच चित्रकला व इतर कलाकारांसाठी पोषक काळ आहे. सप्तमातील कर्क राशीचा चंद्र पहिल्या आठवड्यात दशमात असल्याने कामाच्या व्यापामुळे जोडीदाराकडे लक्ष देणे अवघड राहील. नवमात तीन ग्रह रवि, बुध, गुरु असल्याने ह्या महिन्यात भाग्याची साथ उत्तम मिळेल, सर्व गोष्टींमध्ये यश मिळेल. दशम भावात शुक्र स्वराशीचा व राहू अष्टमात त्यामुळे काही प्रसंगी कामाचा ताण पण जाणवेल. एकंदरीत मकर राशीला हा महिना उत्तम राहील.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशम स्थानी व बुध अष्टमात ह्या योगात प्रकृतीच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी राहतील. तसेच दशमातील शनि नोकरी-व्यवसायात सावधानतेने वागण्याचा सल्ला देतो. द्वितीय स्थानी मीन रास असून त्याचा स्वामी गुरु अष्टमात आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. तृतीय स्थानी मेष राशीचा स्वामी मंगळ लाभात आहे, त्यामुळे ज्यांचा व्यवहार शेअर्ससंबंधी आहे अश्यांना लाभ होण्याची शक्यता आहे, पण तरीही व्यवहार सावधगिरीने करावेत.चतुर्थ भावात वृषभ रास असून त्याचा स्वामी शुक्र नवमात आणि राहू सप्तमात त्यामुळे प्रवासात काळजी घ्यावी, अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांना ह्या काळात जास्त कष्ट घ्यावे लागतील. पंचमातील मिथुन राशीचा स्वामी बुध अष्टमात असून रवि पण तिथेच आहे, मुलाबाळांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सप्तमात सिंह रास असून त्याचा स्वामी रवि अष्टमात आहे त्यामुळे चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे जोडीदाराशी संबंध नरम गरम राहतील. अष्टमातील तीन ग्रह रवि, बुध, गुरु काही बाबतीत अडचणी आणणारे ठरू शकतील. दशमातील शनि आणि अष्टमातील बुध नोकरी/व्यवसायात ताण तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. लाभ स्थानातील मंगळ तृतीयेश आणि दशमेश असल्याने काही बाबतीत दैनंदिन आयुष्यात सावरून घेईल. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे, बऱ्याच विरोधी घटना घडण्याची देखील शक्यता आहे.

मीन :मीन राशीचा स्वामी गुरु सप्तम स्थानी व चंद्र अष्टम स्थानी असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. द्वितीय भावात मेष रास असून त्याचा स्वामी मंगळ दशम भावात आहे त्यामुळे आर्थिक आवक उत्तम राहील. तृतीय भावात वृषभ रास असून त्याचा स्वामी शुक्र अष्टमात आहे, तरी प्रवासात सावधानता बाळगावी. चतुर्थाचा स्वामी बुध सप्तमात, रवि देखील सप्तमात त्यामुळे घरगुती वातावरण सलोख्याचे राहील व घरात सतत माणसांची वर्दळ राहील. पंचमात कर्क रास असून त्याचा स्वामी चंद्र अष्टमात आहे, तरी मुलाबाळांच्या प्रकृतीच्या दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तमात तीन ग्रह रवि, बुध, गुरु ह्या योगात जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. नवम स्थानी शनि असून नवमाचा स्वामी मंगळ दशमात आहे. दशमात धनु रास असून त्याचा स्वामी गुरु सप्तमात आहे. त्यामुळे ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे अश्यांना हा काळ चांगला आहे, तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी देखील उत्तम काळ आहे. लाभ स्थानाचा स्वामी शनि नवमात व बुध सप्तमात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, अश्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. पण भाग्याची साथ असल्याने सर्वकाही सुरळीत होईल. एकंदरीत हा महिना मीन राशीला संमिश्र राहील.

No comments:

Post a Comment